दिनांक 16 जून 2021 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.ना. श्री अजितदादा पवार यांच्या दालनात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आणि टप्पा अनुदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 100% पगार देण्याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती संघटनेसोबत बैठक पार पडली. या बैठकीला शिक्षणमंत्री मा. ना. वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, वित्त विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके उपस्थित होते.
जुनी पेन्शन योजना लागू करा
आमदार कपिल पाटील यांनी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन पदावर नियुक्त आणि वस्तीशाळेवर नियुक्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना केली पाहिजे अशी मागणी केली. राज्याने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व शासकीय निमशासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना केली आहे, पण शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांबाबतच भेदभाव का केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली तर शासनावर आर्थिक भार वाढत आहे असा चुकीचा समज पसरवला जात आहे हे आमदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.
आमदार कपिल पाटील यांनी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन पदावर नियुक्त आणि वस्तीशाळेवर नियुक्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना केली पाहिजे अशी मागणी केली. राज्याने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व शासकीय निमशासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना केली आहे, पण शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांबाबतच भेदभाव का केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली तर शासनावर आर्थिक भार वाढत आहे असा चुकीचा समज पसरवला जात आहे हे आमदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.
जुनी पेन्शन योजना लागू केल्यास या सर्व कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची कपात शासनाकडे जमा होते. पण या सर्वांना डी सी पी एस आणि आताची एनपीएस योजना लागू केली तर राज्य शासनाला दरमहा 14 टक्के शासन हिस्सा म्हणून जमा करावी लागणारी रक्कम जास्त आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास शासनावर अधिक भार न येता शासनाकडे भविष्य निर्वाह निधीतून रक्कम जमा होते. तसेच दरवर्षी कर्मचारी टप्प्याटप्प्याने निवृत्त होत असल्याने शासनावर एकाच वेळी पेन्शनचा भार येणार नाही. शासनाकडे पैसे नव्हते म्हणून या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात आले त्यात कर्मचाऱ्यांची चूक काय? असा सवाल उपस्थित केला. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी वित्त विभागाने मान्यता देणे आवश्यक आहे असे सांगितले.
माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आमदार कपिल पाटील यांनी मांडलेला मुद्दा धोरणात्मक असल्याचे त्याबाबत मंत्रीमंडळाची आधी परवानगी घ्यावी लागेल असे मत मांडले. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी तसा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत सादर करावा असे सुचवले.
![]() |
बैठकीबाबत उपमुख्यमंत्री कार्यालयाचे पत्र |
100% पगार द्या
शिक्षण विभागाच्या अनुदान देण्याच्या प्रचलित धोरणानुसार राज्यातील सर्व पात्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना 100 टक्के पगार देणे आवश्यक असताना केवळ 20% वर बोळवण केली जात आहे. 20% पगारावरून 40% चा टप्पा सुरू होताना हजारो कर्मचाऱ्यांना वगळण्यात येत आहे. विविध स्तरावरच्या तपासण्या, त्रुटी या सर्वांचा सामना करावा लागत आहे. हे सर्व कर्मचारी गेली पंधरा ते सतरा वर्ष काम करत आहेत. या सर्वांना शंभर टक्के पगार देणे शक्य आहे.
सन 2012 सालापासून शिक्षकांची भरती बंद आहे. 2004 सालापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. वयोमानानुसार निवृत्त झाल्याने अथवा मृत्यू झाल्याने शिक्षक-शिक्षकेतर संख्या कमी होत आहे. शिक्षण विभागाला मंजूर असणारी पदे आणि कार्यरत पदे यांची गोळाबेरीज केली तर सुमारे एक लाख पदे रिक्त असल्याचे स्पष्ट होईल. टप्पा अनुदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पन्नास हजार पेक्षा कमी आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे समायोजन अनुदानित मंजूर पदावर केल्यास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार दिला जाऊ शकतो अशी मांडणी आमदार कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सोबतच्या बैठकीत केली.
माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी आमदार कपिल पाटील यांनी मांडलेल्या मांडणीचा सकारात्मक विचार करून याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्याचे मान्य केले. मुंबईमधील बंद पडलेल्या अनुदानित तुकड्यांचे उपनगरातील नैसर्गिक वाढीव तुकड्या वर समायोजन करून विनाअनुदानित तुकड्यांमधील शिक्षकांना शंभर टक्के पगार दिल्याचे उदाहरण आमदार कपिल पाटील यांनी यावेळी बैठकीत दिले. त्यानुसार शासनाने ठरवल्यास सर्व पात्र प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार देणे आवश्यक असल्याचे मत मांडले.
उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार साहेब यांनी वित्त विभाग आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी वर्गासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. जुनी पेन्शन आणि अनुदान यांची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने कालची बैठक हे अतिशय महत्त्वाचे पाऊल होते. नजीकच्या काळात या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी अपेक्षा करूया.
आपला स्नेहाकिंत
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य
-------------------------------
आमदार कपिल पाटील यांचे नवनवीन ब्लॉग वाचण्यासाठी क्लीक करा -
Great work sirji thanks..💐💐💐💐👌👌👌
ReplyDeleteGood work 👍👍👍
ReplyDeleteGo ahead sir.
ReplyDeleteदोन हजार पाचपूर्वी लागलेल्या सर्वांनाच पेन्शन मिळणे आवश्यकच आहे. खूप छान लेख सर
ReplyDeleteशिक्षक भारतीचा सच्चा लढवय्या म्हणजे सुभाष मोरे सर.अभ्यासूपणे मत मांडून समोरच्याला पटवून देणे,त्याला जिंकणे यात सरांचा हातखंडा आहे.खूपच छान लेख आहे सर.पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !!
ReplyDeleteRight
Deleteफक्त दिखावा आहे मंत्री महोदयांचा
Deleteकपील पाटील साहेब खुप प्रयत्न करत आहेत
सरांचा प्रयत्न खूप प्रामाणिक आहे. सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे.
DeleteNice work....
ReplyDelete2005 पूर्वी च्या शिक्षकांना पेंशन मिळणार तर नंतरच्यांना। का नको,सर्वाना पेन्शन मिळाले पाहिजे कायद्या प्रमाने त्यांचा हक्क आहे ते मिळाले पाहिजे 58 वर्ष नोकरी करून पेन्शन नाही .5वर्ष सेवा केली त्यांना पेन्शन हा कुठला कायदा काढलाय या शासनाणे न्याय सर्वाना द्यावा
Delete2005 नंतरच्यांना सुद्धा pension मिळाली पाहिजे.
Deleteआपले आमदार, शिक्षकांनी निवडुन दिलेले... यामध्ये 2005 नंतर नियुक्त शिक्षक सुद्धा मतदार आहेत...
Deleteपण त्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी आपले आमदार एकही स्टेटमेंट का करत नाहीत....???? कृपया ही पण मागणी करावी....
Thanks sir
DeleteSir what about who appoint after 2005
Deleteखुप खुप धन्यवाद मा.श्री.पाटील साहेब आणि श्री.मोरे सर
Deleteरास्त मागणी आहे.शिक्षक आ.मा कपिल पाटील साहेब आणि शिक्षक भारती स़घटना पदाधिकारी नेहमीच शिक्षकांच्या नाय्य हक्कसाठी लढत आहेत.
ReplyDeleteजय शिक्षक भारती
लढे़गे,जितेंगे.
मग मशी कुठे शिंकते आहे का आणखी बळी हवेत शासनाला. फुकट काम करून वाट लागली आहे शिक्षकांची. लवकर निर्णय घ्या नाहीतर सरकारला जड जाईल. असे पण बिन पगारी अर्ध मेले झालेत. नक्षलवादी भूमिका चांगली या शासन व्यावस्थे पेक्षा. त्यांचे निर्णय फास्ट होतात. शासनाच्या आडमुठे दोरणामुळेच नक्षलवादी प्रवृत्ती उदयास येतात.
ReplyDeleteअतिशय छान झाले शासनाच्या लक्ष्यात आणून दिले ते सर्व प्रश्न अतिमहत्वाचे आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे जिव्हाळ्याचे आहेत आम कपिल पाटील साहेब आणि सहकारी यांचे मनपूर्वक आभारी आहोत
ReplyDeleteThanks
DeleteKapil Patil sir
Good👍
DeleteGood thanks
Deleteछान..1नोव्हे.2005 पूर्वी नियुक्त सर्व अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन लागू करावी.धोरणात्मक निर्णय ..जय शिक्षक भारती.
ReplyDeleteसदर दोन्ही विषयाबाबत शासनाने गंभीरपणे दखल घेऊन आ.कपिलजी पाटिल साहेबांच्या सूचनेप्रमाणे जलदगतीने कार्यवाही केली तर ,शिक्षण विभागाला लागलेले हे मुख्य 2 समस्या चे ग्रहण निश्चितच सुटणार हे नक्की.
ReplyDeleteपण नेहमी प्रमाणे यात झारीतील शुक्राचार्य आड येतील व राजकारणी श्रेयवादासाठी हा प्रश्न लांबवतील.
पण देव करो आणि कपिल पाटील साहेबांच्या प्रयत्नास यश मिळो, हजारो शिक्षक बंधू भगिनींच्या दुवा त्यांना मिळतील.
योग्य मागणी आहे कित्येक वर्षीपासून जुनी पेन्शन योजनेची मागणी शिक्षक भारती करीत आहे 👍
ReplyDeleteआमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आ.कपिल पाटील साहेब व आपण काम करीत आहात आम्ही असंख्य शिक्षक बांधव आपल्या समवेत राहू...
ReplyDeleteसर 2011 ला आईचे सौभाग्याच लेन असलेल मंगळ सूत्र विकुन डोनेशन भरून मि आज 10 ते 11 वर्ष विनावेतन काम करत आहे सर माझ्या प्रागारीची वाट पाहुन पाहुन शेवटी आई 2020 साली आई देवाघरी गेली साहेब मि तीचा दवाखाना सुधा करू शकलो नाही
ReplyDeleteफारच वाईट भाऊ आपल्या शिक्षण क्षेत्राmadhe केवळ आशेवर जगावे लागते आहे ऐन उमेदीचे वय निघू जाते आणि शेवटी माणूस हतबल होतो
Deleteविनाअनुदानित व अंशतः अनुदानित २०% व ४०% शाळांना अनुदान हे मिळालेच पाहिजे.कारण गेल्या २० वर्ष्यापासून विनाअनुदानित बांधवाना पगार नाही.सर आपण हे काम मनावर घेऊन न्याय मिळवून द्यावा.
ReplyDeleteअनुदान आणि जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी शिक्षक भारती बरोबर बाकीच्या संघटनांनीसुध्दा शर्थीचे प्रयत्न केले पाहिजेत पण आमदार कपिल पाटील यांचं काम निश्चितच कौतुकास्पद आहे
ReplyDeleteजय शिक्षक भारती
Good work
ReplyDeleteGood
ReplyDeleteअतिशय रास्त मागणी आहे.विनाअनुदानित शिक्षकांची अवस्था फारच दयनीय आहे.शिक्षक आज रिटायर च्या जवळ आले आहेत आपल्या आई वडील आजारी असतील तर ते याच्यावर दवाखान्यात विलाज करण्याची सुध्दा कुवत नाही.18 वर्षे सेवा करुन 40% अनुदान वाह रे सरकार.
ReplyDeleteसर,आपण रास्त मागणी केली आहे.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नेमणूक होणे हे काय शिक्षकांचा दोष आहे का ? इतर विभागात विनाअनुदानित धोरण नाही,त्यांना जुनी पेन्शन योजना लागू होते.आपल्या एकत्रित प्रयत्नाने न्याय मिळेल.धन्यवाद
ReplyDeleteअतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न हाताळत आहात. शुभेच्छा व धन्यवाद...!
ReplyDeleteJuni Pension milalich pahije
ReplyDeleteआपल्या प्रयत्नांना यश लाभो,हि सदिच्छा.
ReplyDeleteअगदी बरोबर आहे सर..... मनापासून धन्यवाद.....! जोपर्यंत आपल्या न्याय्य मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपला लढा असाच चालू ठेवावा लागेल.....
ReplyDeleteपुन:श्च मा.आ.कपिल पाटील साहेब.....
Juni pension milalich pahije
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteGreat job
माननीय कपिल साहेब आपण जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित करून सर्व सामान्य शिक्षक ांसाठी सतत उभे राहतात आहात यासाठी धन्यवाद
ReplyDeleteGood work jay shikshak bharti
ReplyDeleteThank u sir
ReplyDeleteGreat work
जय शिक्षक भारती
सर आपले मनापासून अभिनंदन...व धन्यवाद...या लढ्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करुन त्यांना ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या लढ्याला बळ दिले तर त्यांना ही न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
ReplyDeleteपेन्शन मिळावी हिच इच्छा
ReplyDeleteआपणास धन्यवाद.
Great work 🌹🌹🙏👍
ReplyDeleteखूप छान सर . रास्त मागणी आपण मांडली . आपल्याला लवकरच यश मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना .
ReplyDeleteGood work sir
ReplyDeleteलढेंगे जितेंगेही।शिक्षक भारती जिंदाबाद
ReplyDeleteआदरणीय महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुभाष मोरे सर महत्त्वाचे विषय रास्त मागणी
सन्माननीय कपिल पाटील साहेब नेहमीच शिक्षण क्षेत्रातील दुर्लक्षित आणि त्रुटीयुक्त मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून त्यांचं निराकरण करण्यासाठी पुढाकार घेत असतात.
ReplyDeleteयावेळीही दोन्ही मुद्दे अत्यंत संवेदनशील आणि अन्याय्य आहेत. त्याबाबत सन्माननीय कपिल पाटील साहेब यांनी यांच्या निराकरणासाठी पुन्हा एकदा सार्थ आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.तसेच घटनात्मक आणि सनदशीर मार्गाने त्यांचे महत्व शासनाला पटवून दिले. विधायक आणि शासकीय प्रोटोकॉल विचारात घेऊन मुद्दे तडीस नेण्याची व्यवस्था शासनाकडून करून घेतली आहे.
अशा पद्धतीने शासनाकडून नकळत अन्याय्य मुद्यांची सोडवणुक करून घेण्याचे कौशल्य सन्माननीय कपिल पाटील साहेबच वापरू शकतात.आणि या त्रुटींमुळे असंख्य अन्यायग्रस्त बांधवांची मुक्तता करण्याचे कामही सन्माननीय कपिल पाटील साहेबच करू शकतात याचा मला विश्वास आहे.
धन्यवाद साहेब!!!
खाजगी अनुदानित माध्यमिक विद्यालयात सेवा करणाऱ्या माध्यमिक शिक्षकांना शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधकारी परीक्षेपासून वंचित ठेवले आहे हा प्रश्न पण शासनाच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे.
ReplyDeleteसध्या आमदार कपिल पाटील साहेब व शिक्षक भारती चे काम उत्तम चालू आहे पेन्शन व अनुदान या प्रश्नांना प्राधान्य हवेच पण शिक्षकांना शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधकारी पदांच्या माध्यमातून प्रशासनात जायची संधी पण मिळावी
जय शिक्षक भारती
कपिल पाटील साहेब आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. दोन्ही ही मागण्या आपल्या
ReplyDeleteप्रयत्नात सुठाव्यात हिच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना🙌👏🙏
Please look after recruitment as there r lots of vacancies and there is no appropriate subject teachers to teach
ReplyDeleteखरंच साहेब खूपच चागलं काम वस्तीशाळा शिक्षक तसेच इतर ही शिक्षकांविषयी आपली तळ मळ ही एक खरोखरच चाग ली बाब आहे याला लवकर यश मिळो हीच प्रार्थना
ReplyDeleteविनाअनुदानित शिक्षकांचे काय हाल होत आहे याकडे शासनाने लक्ष देण्याची खूप गरज आहे
DeleteKharokhar juni penstion milalich pahije.
ReplyDeleteGood work sirji
ReplyDeleteआपण करत असलेल्या प्रयत्न व कष्ट यांचे फलित 2005 पुर्वीच्या शिक्षक बांधवांना पेन्शन योजना लवकर लागू व्हावी हिच अपेक्षा
ReplyDeleteखूपच अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे आपण. यामुळे न्याय मिळेल अशी 100 टक्के खात्री वाटते. व्वा अभिनंदन आपले.👌👌💐💐
ReplyDeleteGreat work sir ji
ReplyDeleteGood Work sir
ReplyDeleteGood efforts
ReplyDeleteकाल झालेल्या मिटिंग नुसार कपील पाटील साहेब, व त्याचें सहकारी यांनी मुद्देसुद मांडणी केली, 2005
ReplyDeleteपुर्वी श
नियुक्त सर्व कर्मचारी यांना जुनीच पेंशन देने कसे आवश्यक आहे हे पटवून दिले. लवकरच यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जुनीं पेंशन लागू होवून आमचे म्हातार पणातील जिवन सुखी जाईल हीच आशा बाळगुन आहोत.
हेमराज आर नंदेश्वर मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले विद्यालय जुनोना चंद्रपूर
Deleteअर्धवेळ ग्रंथपाल पूर्णवेळ करावे हीच विनंती
ReplyDeleteGreat work sir
ReplyDeleteहेमराज आर नंदेश्वर मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले विद्यालय जुनोना चंद्रपूर
ReplyDeleteVery important issue raised by Subhash More Sir and Shikshak Bharti
ReplyDeleteजर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित किंवा टप्पा अनुदानित पदावर नियुक्ती असलेल्यांना जुनी पेन्शन मिळणार असेल तर याच कालावधीत नियुक्ती असलेल्या अर्थवेळ शिक्षक ग्रंथपाल यांनाही जुनी पेन्शन मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अर्धवेळ उच्च माध्यमिक शिक्षकांची संख्या तर फक्त ६०० पेक्षा कमी आहे.
ReplyDeleteविषय तात्काळ मार्गी लागावा ही अपेक्षा..
ReplyDeleteशिक्षक भारतीचे आ.पाटील साहेबांचे व मोरे सरांचे मनापासुन आभार
सर,मागणी रास्त असून अजुन किती दिवस झाले तरी निर्णय होत नाही.विषय लावून धरल्या बद्ल मनःपूर्वक आभार प्रश्न मार्गी लागवा ही अपेक्षा धन्यवाद.....
ReplyDeleteशिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो मुद्देसूद मांडून शासनास जुनी पेन्शन दिली तर भर पडणार नाही हे निदर्शनास आणून दिले आहे खरंच लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे आणि होईल याबद्दल आत्ता शंकाच वाटत नाही
ReplyDeleteअगदी बरोबर आहे
Deleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteGreat job 👍
ReplyDeleteMore sir you are doing well we support you
ReplyDeleteअगदी योग्य मागणी आहे विनाअनुदानित कर्मचारी यांचा पण सरकार ने विचार करायला हवा गेले 15 ते 20 वर्षं हे कर्मचारी अनुदान कधी तरी भेटलं या आशेवर शाळेत काम करत आहे .तरी या कर्मचारी चा पण विचार करावा
ReplyDeleteMore sir,
ReplyDeleteYou are phenomenal & comnendable to execute such a wholesime activity & thst too since years together. Keep it up & all the very BEST. Hearty CONGRATULATIONS to you & your शिक्षक भारती team. Gr8 job.
ग्रेट जॉब सर जी शिक्षकांच्या हक्का साठी शिक्षक भारती नेहमीच अग्रेसर💐💐💐👍
ReplyDeleteछान!
ReplyDeleteलढेंगे ! जितेंगे !
जय शिक्षक भारती
अतिशय रास्त मागणी मांडली शासनांनाल माहीत असताना नाटक चालू आहे बंद करा हे नाटक
ReplyDeleteअनुदानाची योग्य मागणी आहे सर
ReplyDeleteThankyou sir
ReplyDeleteGreat work🙏
Great work saheb
ReplyDeleteसर खूप छान !
ReplyDeleteलढेंगे जितेंगे !
अघोषित शाळा निधि सहीत घोषित करा
ReplyDeleteजुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घणारे सरकार आणि संबंधित मंत्री यांना पेन्शनसाठी आशावादी शिक्षक कधीच विसरू शकणार नाहीत.
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteसर आपण 2005 पुर्वी नियुक्त व नंतर ब100 टक्के अनुदान प्राप्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळवण्यासाठी सतत प्रश्न मांडत आहेत आभारी आहोत
ReplyDeleteन्या दिला पाहिजे
ReplyDeleteदोनही मागण्या रास्त आहेत. त्यांची पूर्तता करणे हे मंत्री महोदयांनी सकारात्मक व दूरगामी विचार करून लवकरात लवकर पूर्तता करावी ही अपेक्षा.
ReplyDeleteकोणत्याही पक्षाचे सरकार असू दे फक्त त्यांचा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे अपेक्षित आहे. एकीकडे म्हणायचे राष्ट्र निर्माण करणारे व भावी आदर्श नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षकावर द्यायची व शिक्षकांना त्याचे अपेक्षित स्थान न देता लाचार बनवायचे ही राजकीय मंत्र्यांची व शासकीय अधिकाऱ्यांची पद्धत आहे. हे नेते स्वतःला सेवक म्हणतात मग त्यांना वेतन , भत्ते व पेन्शन कशाला पाहिजे ? नेत्यांच्या मागण्या काही सेकंदात मंजूर होतात पण शिक्षकांची हक्काची मागणी मंजूर होण्यासाठी संघटनांना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो हेच भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. याला थोडे बहुत आपण शिक्षक ही कारणीभूत आहोत. अनेक संघटना आहेत, अनेक होऊ घातलेले नेते आहेत आणि पक्षाच्या दावणीला बांधलेल्या शिक्षक संघटना आहेत.
असो सर असेच खंबीरपणे शिक्षकांसाठी काम करत राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!
प्रा. विलास गोपाळ पाटील
अध्यापक विद्यालय , श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर , मुंबई.
Great effort taken by Kapil Patil Sir, Subash More Sir and the Shikshak Bharati Team. God bless you all and we hope and pray for its success.
ReplyDeleteशिक्षक भारतीचे कार्य कायमच अतुलनीय असते.आदरणिय सर , जुनी पेंशन हा विषय एखादाचा निकाली लावा.
ReplyDeleteधन्यवाद सर, एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100% अनुदान वर आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी हीच अपेक्षा करतो.
ReplyDeleteरास्त मागणी, न्याय मिळावा ।धन्यवाद सर
ReplyDeleteदोनही मागण्या रास्त आहेत. त्यांची पूर्तता करणे हे मंत्री महोदयांनी सकारात्मक व दूरगामी विचार करून लवकरात लवकर पूर्तता करावी ही अपेक्षा.
ReplyDeleteकोणत्याही पक्षाचे सरकार असू दे फक्त त्यांचा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे अपेक्षित आहे. एकीकडे म्हणायचे राष्ट्र निर्माण करणारे व भावी आदर्श नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षकावर द्यायची व शिक्षकांना त्याचे अपेक्षित स्थान न देता लाचार बनवायचे ही राजकीय मंत्र्यांची व शासकीय अधिकाऱ्यांची पद्धत आहे. हे नेते स्वतःला सेवक म्हणतात मग त्यांना वेतन , भत्ते व पेन्शन कशाला पाहिजे ? नेत्यांच्या मागण्या काही सेकंदात मंजूर होतात पण शिक्षकांची हक्काची मागणी मंजूर होण्यासाठी संघटनांना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो हेच भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. याला थोडे बहुत आपण शिक्षक ही कारणीभूत आहोत. अनेक संघटना आहेत, अनेक होऊ घातलेले नेते आहेत आणि पक्षाच्या दावणीला बांधलेल्या शिक्षक संघटना आहेत.
असो सर असेच खंबीरपणे शिक्षकांसाठी काम करत राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!
वस्तीशाळा शिक्षकांचे दैवत कपिल पाटील साहेब 2005 पूर्वीच्या सर्वांनी जुनी पेन्शन मिळवून देणार यात शंका नाही
ReplyDelete2005 नंतर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोणी वाली आहे का नाही? त्यांना जुनी पेन्शन मिळावी म्हणून आपण मागणी करणे गरजेचे आहे
ReplyDeleteअतिशय छान माहिती माडंली सर्व मागण्या मंजूर करून घ्या एवढी विनंती जय शिक्षक भरती
ReplyDeleteएक नंबर काम.
ReplyDeleteखूपच छान.हजारो शिक्षकांवर होणारा अन्याय दूर होणार.
ReplyDeleteशिक्षक भारती जिंदाबाद.
लगेंगे,जितेंगे.
शासनाने वेळकाढूपणा थांबवला पाहिजे...प्रचलित प्रमाणे 15/11/2011 नुसार शंभर टक्के अनुदान दिलेच पाहिजे.
ReplyDeleteGreat work
ReplyDeleteखूप छान काम सर शासनाला या सर्व गोष्टी मुद्देसूद पणें सांगून आपली कामे करून घेणे गरजेचे आहे त्यासाठी आपण खूप चांगले प्रयत्न करत आहात.
ReplyDeleteपुढील कार्यासाठी सलाम
पुढील कार्यासाठी शुभेच्छा
ReplyDelete1नोव्हेंबर 2005पूर्वी नियुक्त आणि नंतर 100% अनुदानावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेवर निश्चितच अन्याय झालेला आहे जर ईतर विभागातील 2005पूर्वी नियुक्त कर्मचा-यांना जूनी पेन्शन लागू आहे तर फक्त शिक्षण विभागाला वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित होतो.मा.आ.कपिल पाटील साहेब आपण अतिशय योग्य पद्धतीने जूनी पेन्शनची मागणी केलेली आहे आणि आपण पाठपुरावाही मनापासून करत आहे त्याबद्दल आपले खूप धन्यवाद आणि आम्हाला खात्री आहे कि आ.कपील पाटील निश्चितच येत्या अधिवेशनात जूनी पेन्शनचा निर्णय शासनाकडून करून घेतील👏 श्री.ए.जी.गांगुर्डे (नासिक)
ReplyDeleteआमदार साहेब व बेलसरे सर आपण आज पर्यंत शिक्षकांच्या प्रश्नासाठी झगडत आहे तर तोड नाही आपलं मनःपूर्वक अभिनंदन
ReplyDeleteजुनी पेन्शन योजना जर वस्तीशाळ शिक्षकांना लागू केली तर अनेक गरिब शिक्षकांच्या कुटुंबाचे आशीर्वाद सरकारना व अर्थमत्र्यांन मिळतील
ReplyDeleteपेंशन हा नेहमीच ऐरणीवर राहणारा ज्वलंत प्रश्न आहे. 2005 पूर्वीचे काय किंवा नंतरचे काय. शेवटी सन्मानपूर्वक निवृत्तीपश्चातच्या जीवनासाठी ही तरतूद आहे. 2005 नंतरच्याही कर्म-यांनाही पुढे न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभारूया. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDeleteविषयाचा सखोल अभ्यास व मुद्देसूद मांडणी करून ती शासनाला पटवून देणे याबाबतीत आ. कपिल पाटील साहेबास तोड नाही. शिक्षकांच्या समस्या नेहमी आक्रमकपणे मांडणारे कपिल पाटील साहेब ह्या वेळेसही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांचा व अनुदानाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावतील ही अपेक्षा व शुभेच्छा.आम्ही सर्व शिक्षक आपल्या सोबत आहो. 👍💐
ReplyDelete1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर टप्पा अनुदानावर किंवा 100 टक्के अनुदानवर आलेले अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्यारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना आज2/3 वर्ष 1रु पेंशन नाही.बऱ्याच शाळाना अजूनही अनुदान नाही.आता ही निर्णायक वेळ आहे.आमदार सन्माननीय कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून उद्याच्या पावसाळी अधिवेशनात हे प्रश्न या वेळी नक्की मार्गी लागतील.
ReplyDelete2005 नंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनीच पेन्शन योजना लागू व्हावी अशी अपेक्षा.
ReplyDeleteHiremath sir very nice sir.
ReplyDeleteVery good and positive thoughts.
Deleteपाटील साहेबांनी 100 टक्के पगाराची केलेली मागणी सरकरने लवकरात लवकर आमलात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे
ReplyDelete२००५ पूर्वी लागलेल्या शिक्षकांना पंशन मिळणे आवश्क आहे.
ReplyDeleteही आपल्या कडून अपेक्षा आहे.धन्यवाद
Great job������������
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद पाटील साहेब तुम्ही विनाअनुदानितांचा प्रश्न मांडला.....
ReplyDeleteGreat
ReplyDeleteGreat
ReplyDeleteसातत्यपूर्ण पाठपुरावा व विषयाचा ध्यास म्हणजेच शिक्षकभारती।
ReplyDeleteलढेंगे,जितेंगे। जय शिक्षकभारती💐💐
सन्माननिय शिक्षक आ.कपील पाटील साहेब आपले धन्यवाद. जे शिक्षक व शिक्षकेतर 2005 पर्वी नियुक्त नंतर 100% अनुदानावर आलेत ज्यांचे जीपीएफ खाते चालू होते परंतू आज हयात नाहीत असे कर्मचारीचे फँमिली वंचित आहे त्यांना न्याय मिळेल. न्यायिक महाविकास आघाडी सरकार कायम स्मरणात राहील.पुनश्च आपले धन्यवाद साहेब.जय शिक्षक भारती.
ReplyDeleteSalute to shikask bharatiand kapil patil saheb
ReplyDeleteGood job पाटील साहेब
ReplyDeleteपाटील साहेबांचे मनापासून आभार
ReplyDeleteसाहेब आहेत तेथे सर्व काही शक्य आहे हा मागील 15 वर्षाचा अनुभव आहे
जय शिक्षक भारती
Great 👍
ReplyDeleteवस्तीशाळा शिक्षकांचे दैवत आ.पाटील साहेब
ReplyDeleteअतिशय उत्कृष्ट काम
ReplyDelete2005 पूर्वीच्या अंशता अनुदानित शिक्षकांना जुनी पेंशन योजना याबाबत लवकर निर्णय घ्यावा असे मला वाटते कारण आम्ही त्यामध्ये मध्ये च अडकलेले शिक्षक आहोत. आमचे GPF बंद झाले, service कमी आहे. निर्णय घेण्यात आला तर भविष्यात काही करता येईल.
ReplyDelete1 नोव्हेबेर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणे खूप गरजेचे आहे
ReplyDeleteमनापासुन खूप खूप धन्यवाद सर
ReplyDeleteNice work sirji
ReplyDelete२००५ पूर्वी व नंतर हा शब्दच मुळात नको आहे.. कारण २००५ पूर्वी लागलेले व २००५ नंतर लागलेले आपले सहकारी शिक्षक हे तेवढ्याच ताकदीने आपापली जबाबदारी बजावत आहेत... जर आपल्या कामगिरीत शिक्षक कोणताच भेदभाव करत नाहीत, तर शासन का करत आहे.. आपण सर्व शिक्षकांसाठी एक आशेचा किरण आहात.. त्यामुळे सर्वच शिक्षकांसाठी जूनी पेन्शन योजना लागू झाली तर खऱ्या अर्थाने लढा जिंकू..धन्यवाद!!
ReplyDeleteकपिल पाटील साहेब फक्त 2005 पूर्वीच्या जुनी पेन्शन बद्दला बोलतात..मग नंतरचे शिक्षकांचे यांना काळजी नाही का...आणि 2005 नंतर चे कोणी यांना मत केले नाही का....??????????????
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏🙏🙏✍
ReplyDeleteसर अगदीच जिव्हाळ्याचा प्रश्न आपण मांडला आहे याला न्याय मिळालाच पाहिजे
ReplyDelete1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच नियुक्त झालेल्या परंतू अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती.
ReplyDelete२००५ नंतरच्या शिक्षक कर्मचारी यांना सुध्दा जुनी पेन्शन मिळावी
ReplyDeleteमी एक अपंग कर्मचारी 70% अपंग आहे पेशन्स नसल्यामुळे पुढे काय व कस होईल या विचाराने सतत काळजी वाटत असते आम्हाला प्रत्येक गोष्टीला दुसर्या वयकतीवर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे आम्हा अपंग कर्म चारी यांच्या विचार करुन पेशन्स लावण्यात यावी ही विनंती आपले कृपाभिलाषी सो उर्मीला शशिकांत निनावे नागपूर
ReplyDeleteGreat Work sir
ReplyDeleteExcellent work Sirjí
ReplyDeleteExcellent work Sirjí
ReplyDelete१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर १००% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळण्यासाठी मा. आमदार कपिल पाटील साहेब खरोखर अतिशय, भक्कम अशी बाजू (उदाहरणादाखल) शासनासमोर मांडत आहे. खरोखर त्यांच्या या कामास यश मिळो. मला अशा आहेत, त्या कामात यश मिळतील. खरोखरच अभ्यासू असे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या या कार्यास निश्चितच यश मिळेल .!! जय शिक्षक भारती !!
ReplyDelete2005 पुर्वी नियुक्त पण टप्प्यावर आलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा जुनी पेंशन आमदार कपील पाटील व शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकारी सोडवावा....
ReplyDeleteGreat work sir
ReplyDelete