मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. सातव्या वेतन आयोगातील फरकाची थकबाकी पाच समान हप्त्यात पीएफ खात्यावर जमा होणार होती परंतु शासनाने कोरोना महामारीचे कारण देवून पहिला हप्ता दिलेला नाही. पीएफ खात्यावर जमा करण्यात येणार असल्याने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी इन्कमटॅक्स भरला आहे. आपली अवस्था तेलही गेले अन तुपही गेले... अशी झाली आहे.
बक्षी कमिटीने सादर केलेल्या खंड 1 मधील प्रकरण 5 मध्ये सुधारित आश्वासित प्रगती योजनेबद्दल माहिती दिली आहे. नवीन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत स्थापन केलेल्या अभ्यास गटाचा अहवाल प्रलंबित आहे. बारा वर्ष पूर्ण झाल्यावर मिळणारी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि चोवीस वर्ष पूर्ण झाल्यावर मिळणारी निवड श्रेणीचे लाभ शिक्षकांना मिळत नाहीत. राज्यभर वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे हजारो प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे.
कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवा कालावधीत पदोन्नती मिळत नाही. निदान वेतनाच्या बाबतीत वेतनाचे लाभ मिळावे या अपेक्षेने कालबद्ध पदोन्नती दिली जाते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विनाअट वेतन वाढ मिळते. परंतु शिक्षण विभागाने नेहमी शिक्षकांवर अन्याय केलेला आहे. वरिष्ठ / निवड श्रेणी देताना प्रशिक्षणाची अट ठेवण्यात आलेली आहे. सेवेची बारा वर्षे पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिल्यावर वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होते. तसेच निवड श्रेणी लागू होण्यासाठी चोवीस वर्षे पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण करावे लागते. निवड श्रेणी सरसकट दिली जात नाही. मंजूर पदाच्या केवळ 20 टक्के पदांनाच निवड श्रेणी लागू होते. त्यामुळे अनेक शिक्षक बांधव निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित राहतात. तसेच विज्ञान शाखेतील पदवीधर शिक्षकांना सुट्टी घेऊन पदव्युतर पदवी घेणे शक्य नाही. राज्य सरकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे शिक्षकांना ही विनाअट वेतनश्रेणीचा लाभ झाला पाहिजे, यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आपण लढत आहोत.
मागील काही वर्षांपासून प्रशिक्षण होत नाही. प्रशिक्षण न झाल्यामुळे वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी च्या प्रस्तावावर कार्यवाही होत नाही. शिक्षक संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर हमीपत्रावर वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ द्यायला सुरुवात केली होती. परंतु मागील शासनाने 23 ऑक्टोबर 2017 चा अन्यायकारक शासन निर्णय काढून जाणीवपूर्वक शिक्षकांना वेतनश्रेणीच्या लाभांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. शाळासिद्धिमध्ये शाळेला 'ए' ग्रेड असणे आणि 9वी / 10वी चा निकाल 80% पेक्षा जास्त असणे अश जाचक अटी घालण्यात आल्या. मोठया संघर्षाने 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार वरील जी.आर. अधिकरमित करण्यात आला आहे. पण अंमलबजावणी होत नाही.
शिक्षक भारतीने माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी मिळण्याबाबत खालील मागण्या केलेल्या आहेत
1) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन लाभाची सुधारित आश्वासित प्रगती योजना शाळेतील सर्व शिक्षकांना विनाअट लागू करा.
2) नवीन आश्वासित प्रगती योजना लागू होईपर्यंत वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करताना मागील दोन वर्षांचे गोपनीय अहवाल विचारात घेऊन पात्र शिक्षकांना वरीष्ठ/निवड श्रेणी देण्याबाबतचे स्पष्ट आदेश देण्यात यावेत.
3) 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयान्वये दिनांक ऑक्टोबर 2017 व दिनांक 21 डिसेंबर 2018 चे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत. 26 ऑगस्ट 2019 चा शासन निर्णय स्वयंस्पष्ट असूनही अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
4) 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयान्वये वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी करता पात्र शिक्षकांना प्रशिक्षण करण्याची आवश्यकता नाही. असे असूनही प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव प्रलंबित ठेवणे अन्यायकारक आहे. कृपया याबाबत राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व लेखाधिकारी यांना आदेश द्यावेत.
शिक्षक भारतीच्या आणि आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लवकरात लवकर लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करूया! लढूया !! जिंकूया !!!
आपला स्नेहांकित
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष
शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य
This comment has been removed by the author.
ReplyDeleteखूपच महत्वाच्या मुद्यावर छान लेखन व मागणी
ReplyDeleteलढेंगे जितेंगे।
खुप छान विचार मांडले आहेत.या करोना म्हातारीच्या काळात अॉनलाईन प्रशिक्षण दिले पाहिजे.
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteराज्यातील शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी लढनारी संघटना म्हणजे शिक्षक भारती..
ReplyDeleteतमाम पात्र शिक्षकांच्या वतीने बाजू मांडल्याबद्दल सुभाष मोरे सर् आपले लाख लाख धन्यवाद...!!!
Good
ReplyDeleteIt’s problem of all senior teachers, They are helpless, waiting for our efforts So......
Ladenge......,.Jitenge
M.sc is compulsory because m B.sc.b.ed n completed 25 years
ReplyDeleteयोग्य मुद्दा आहे
ReplyDeleteयोग्य मुद्दा आहे
ReplyDeleteअतिशय कळीचा मुद्दा आहे.खरोखरच शिक्षक बांधवांना या लाभापासून लांब ठेऊन त्यांच्यावर अन्याय केला जातो. सर्वांना दोन्ही वेतन श्रेणीचे लाभ मिळालेच पाहिजेत.या प्रश्नास वाचा आपण वाचा फोडली, आपणास खूप खूप धन्यवाद.
ReplyDeleteअतिशय कळीचा मुद्दा आहे.खरोखरच शिक्षक बांधवांना या लाभापासून लांब ठेऊन त्यांच्यावर अन्याय केला जातो. सर्वांना दोन्ही वेतन श्रेणीचे लाभ मिळालेच पाहिजेत.या प्रश्नास वाचा आपण वाचा फोडली, आपणास खूप खूप धन्यवाद.
ReplyDeleteअतिशय कळीचा मुद्दा आहे.खरोखरच शिक्षक बांधवांना या लाभापासून लांब ठेऊन त्यांच्यावर अन्याय केला जातो. सर्वांना दोन्ही वेतन श्रेणीचे लाभ मिळालेच पाहिजेत.या प्रश्नास वाचा आपण वाचा फोडली, आपणास खूप खूप धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद मोरे सर
ReplyDeleteअतिशय महत्वाच्या मुद्याला सुरुवात केली
निवड श्रेणी मिळालीच पाहिजेत.
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteछानच कार्य
Deleteसरांनी अचूक समस्या हेरून सरकारला शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली. धन्यवाद।
Deletewow Great Job Thank you
Deleteअतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत..स्वत:साठी हवे ते नियम धाब्यावर बसवून फायदा करून घेतला जातो पण जेव्हा शिक्षकाला काही द्यायची वेळ येते तेव्हा यांच्या तिजोरीत खडखडाट असतो..
ReplyDeleteसर,आपले खुप खुप आभार 🙏
ReplyDeleteमाझी नोकरी ३३वर्ष झाली.प्रशिक्षण २०१६ला झाले.पण निवड श्रेणी मिळाली नाही.
धन्यवाद सर,आपण अतिशय योग्य मुद्दा मांडलेलाआहे.
ReplyDeleteहा मुद्दा महत्वाचा आहे आजवर शिक्षकांवर सातत्याने अन्याय होत आला आहे.सर्वांनी मिळून लढलं पाहिजे.
ReplyDeleteधन्यवाद मोरे सर
हा मुद्दा महत्वाचा आहे आजवर शिक्षकांवर सातत्याने अन्याय होत आला आहे.सर्वांनी मिळून लढलं पाहिजे.
ReplyDeleteधन्यवाद मोरे सर
हा मुद्दा महत्वाचा आहे आजवर शिक्षकांवर सातत्याने अन्याय होत आला आहे.सर्वांनी मिळून लढलं पाहिजे.
ReplyDeleteधन्यवाद मोरे सर
2004 नंतर जे सेवेत आले त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा फायदा होत नाही, याबाबत आपण काय भूमिका घेतली?
ReplyDelete10 /20/30 ची आश्वशित प्रगती चा लाभ मिळाला पाहीजे
ReplyDeleteछान ,मांडणी आणि मागणी सुद्धा , धन्यवाद सर💐💐💐
ReplyDeleteबरोबर आहेत. सर्वानीच मिळून प्रयत्न केले पाहिजेत. व आपल्यावर होणारा अन्याय दूर केला पाहिजे.आपले खूप खूप आभार.
ReplyDeleteअगदी योग्य मागणी.धन्यवाद.
ReplyDeleteछान धन्यवाद सर.अनेक शिक्षकांची ही मागणी आहे.हा प्रश्न लवकर मार्गी लावावा .त्याकरिता लढेंगे जितेंगे..जय शिक्षक भारती.
ReplyDeleteअगदी योग्य मागणी.धन्यवाद.
ReplyDeleteछान धन्यवाद योग्य मागणी आहे
Deleteबरोबर आहे आपन सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर केला पाहिजे.
ReplyDelete7 वा वेतन आयोग चा पहिला हप्ता PF ला जमा केला म्हूणन 2019-20 साली income tax कट केला त्याचे काय होणार?
अप्रशिक्षित शिक्षणसेवक /अ.प्र सहा.शिक्षक मूळ नियुक्ति पासून सेवा धरण्यात यावी याबाबत संघटने प्रयत्न करावे ही विनंती
ReplyDeleteNice sirji
ReplyDeleteआपल्या सर्वांची ही मागणी आहे. लवकरच हा ही प्रश्न सुटेल. लढेंगे जीतेंगे
ReplyDeleteयापूर्वी चटोपाध्याय मिळल्यानंतर,पदवीधर शिक्षक म्हणून बारा वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा चटोपाध्याय मिळायला, पाहिजे यासाठी प्रयत्न व्हावे.
ReplyDeleteSarv teacher jyanchi 24 varsh seva zaleli ahe tya sarvana sarsakat nivad shreni dili pahije
ReplyDeleteहे सर्व बरोबर आहे. पण आपल्या मध्ये काही बांधव पार्ट-time आहेत यांना देखील अर्धे सर्व गोष्टीचा लाभ मिळावा म्हणून आपण सर्व जण कधी प्रयत्न करणार. काही teacher हे सेट नेट,पी. P.hd झालेले आहेत
ReplyDeleteShikshak Bhartacha Vijay Aso
ReplyDeleteAshok Meka
ReplyDeleteसर,
ReplyDeleteमागण्या योग्य व न्याय्य आहेत. अमलबजावणी झालीच पाहिजे.
जुनी पेन्शन ही मिळावी.
जय शिक्षक भारती!
सर आपला प्रयत्न खूपच चांगला आहे परंतु त्याची अंमलबजावणी ताबडतोब होत नाही यासाठी अजून प्रयत्नांची गरज आहे.
ReplyDeleteजर सरसकट 12 व 24 वर्षेपूर्ण चा लाभ मिळालाच पाहिजे
ReplyDeleteसर आपण करत असलेल्या विधायक कार्यामुळे सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खूपच मदत होत आहे धन्यवाद सर
ReplyDeleteसर, आपले विधायक कार्य जोमाने रेटून धराआणि शिक्षक बांधवांना न्याय मिळवून द्या.आमच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत.धन्यवाद
ReplyDeleteमोरे सर आपली तळमळ आणि धडपड रास्त आहे मात्र झारीतील शुक्राचार्य असे प्रस्ताव प्रलंबित ठेवत आहेत त्याविरुद्ध सर्वांनीच एकत्र येवू या . निवडश्रेणी उच्च पदवी प्राप्त प्रत्येक शिक्षकास मिळावयास हवी .त्यासा
ReplyDeleteठी पाच वर्षाच्या गोपनीय अहवालाची गरजच काय ?......... संजय सौंदलगे, कोल्हापूर
मोरे सर आपली तळमळ आणि धडपड रास्त आहे मात्र झारीतील शुक्राचार्य असे प्रस्ताव प्रलंबित ठेवत आहेत त्याविरुद्ध सर्वांनीच एकत्र येवू या . निवडश्रेणी उच्च पदवी प्राप्त प्रत्येक शिक्षकास मिळावयास हवी .त्यासा
ReplyDeleteठी पाच वर्षाच्या गोपनीय अहवालाची गरजच काय ?......... संजय सौंदलगे, कोल्हापूर
हे सर्व खर आहे सर आपण या प्रश्नासाठी आणि अनेक प्रश्नांसाठी नेहमीच प्रयत्नशील असता
ReplyDeleteसर ,
ReplyDeleteआपण खूप महत्त्वाच्या विषयावर भाष्य केले आहे ,शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे .ना प्रशिक्षण ,ना वेतनश्रेणी ,ना प्रस्तावावर विचार.महत्त्वाचे म्हणजे जितक्या उशिराने ही वेतनश्रेणी व तिचे लाभ (arrears)मिळतील, येणाऱ्या उत्पन्न कराचा टप्पा (slab) बदलेल परिणामी ,तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे "तेलही गेलं......".
आपल्या आमच्या करिता असलेल्या लढ्यास शुभेच्छा.
धन्यवाद.
Very nice sir
ReplyDeleteसर अतिशय योग्य मागणी.सर मी सुद्धा यासाठी खूप प्रयत्न केले,निवडश्रेणी सरसकट सर्वाना मिळाली तर बरे होईल.आपल्या या कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा👌👌👍👍
ReplyDeleteNice work ...jay shikshak bharBh
ReplyDeleteJay shikshak bharti
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteVery Nice Work Sir
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThank you very much Sir 🙏
ReplyDeleteसर, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे .शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी विना अट देण्यात यावी .आपण करत असलेल्या विधायक कार्यामुळे शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मदत होत आहे .आपल्या या कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा !!!
ReplyDeleteलढेंगे जितेंगे ......
जय शिक्षक भारती!!!
माननीय आयुष्यमान मोरे सर आपले लक्ष लक्ष धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार.निवड श्रेणीसाठी आपल्या शिक्षक भारती संघटनेचे पत्र शिक्षण निरीक्षक आणि लेखाधिकारीं जोगेश्वरी पश्चिम विभाग यांना देऊन जवळजवळ आता वर्ष होत आले परंतु प्रत्यक्षात साधा प्रस्ताव सुद्धा स्विकारले गेले नव्हते आपण या ज्वलंत विषयाला पुन्हा वाचा फोडली आपले लाख लाख धन्यवाद. माननीय आयुष्यमान आमदारांचेही आभार आणि धन्यवाद आपणा सर्वांचे आयुष्य उत्तरोत्तर वाढत जावो आणि शिक्षणक्षेत्रातील आपले योगदान असेच मोलाचं ठरत जावो.धन्यवाद
ReplyDeleteसर,
ReplyDeleteआपण महत्त्वाच्या मुद्द्याला वाचा फोडण्याचा सुंदर विचार आहे.
त्यासाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा.
परंतु काही शाळेतील संस्था चालक मुद्दामच वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यासाठी जाणून बुजून विलंबकरित आहे.निवड श्रेणी मिळू नये किवा निवृत्तीच्या वेळी निवृत्ती वेतन मिळू नये यासाठी आतापासूनच शिक्षकांना दाबाखाली आणून जाचक नियमांचा आधार घेऊन मेमो दिले जात आहे .व भविष्यात त्याचे ते भांडवल करीत आहे त्यासाठी कोणी उत्तर दिले तर त्याला अजून दबावाखाली आणून जाचक नियमांचा आदर घेऊन त्रास दिला जात आहे.
तरी असो,
सर आपल्या विचारानं व सुरू केलेल्या संघर्षाला यश नीचितव मिळेल अशी प्रार्थना गणाराला करतो.
धन्यवाद सर.
श्री. डी. एल.चाचारे.
सर संगली शिक्षणअधिकारी २६आॕगष्ट२०१९च्या जीआरचा चूकीचा अर्थ लावून प्रस्ताव नामंजूर करीत आहेत.प्रशिक्षण आवश्यक आहे असा रिमार्क देवून त्रूटी कळविली जाते.कृपया प्रश्न लवकर मिटवावा ही विनंती
ReplyDeleteशिक्षक भारती रांघटनेचे सर्व पदाधिकारी वेळोवेळी शिक्षकावर होण्याऱ्या अन्यायाविरुध्द वाचा फोडतात . आपल्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहेत . सर्व मान्यवरांच स्वागत व मा.श्री.मोरे सरांचे मनःपूर्वक आभार .
ReplyDeleteThank u so much sirji.......
ReplyDeleteEven after completing training...
ReplyDeleteमोरे सर आपण छान आणि मुद्देसूद मांडणी केली. आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि भविष्याचा हा विषय आहे.
ReplyDeleteअंमलबजावणी लवकर व्हावी इतकेच
ReplyDeleteशिक्षक भारती संघटनेला यश प्राप्त होवो कारण۔ शिक्षकांच्या हक्काचाा प्रश्न आहे۔
ReplyDeleteराज्यात जेथे संगीत शिक्षक असतात तिथे तबला शिक्षक पण असतात आणि त्यांना निवड श्रेणी तर लांबच वरिष्ठ श्रेणी पण मिळत नाही आणि गेली 20-25वर्षे शासन स्तरावर हा प्रश्न मांडला गेला असून त्यावर अद्याप काही मार्ग निघाला नाही तरी आपण पाठपुरावा करावा हि विनंती
ReplyDeleteराज्यात जेथे संगीत शिक्षक असतात तिथे तबला शिक्षक पण असतात आणि त्यांना निवड श्रेणी तर लांबच वरिष्ठ श्रेणी पण मिळत नाही आणि गेली 20-25वर्षे शासन स्तरावर हा प्रश्न मांडला गेला असून त्यावर अद्याप काही मार्ग निघाला नाही तरी आपण पाठपुरावा करावा हि विनंती
ReplyDeleteशिक्षक भारती च्या लढण्यास यश मिळावे व सर्व शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी विनाअट मिळावी जय शिक्षक भारती
ReplyDeleteYes... we all should fight for it very strongly to get it done, rather we should fight for 10 20 30 format of seniority and hence the increment in the scale.
DeleteBest of luck to all of us..
राज्यात जेथे संगीत शिक्षक असतात तिथे तबला शिक्षक पण असतात आणि त्यांना निवड श्रेणी तर लांबच वरिष्ठ श्रेणी पण मिळत नाही आणि गेली 20-25वर्षे शासन स्तरावर हा प्रश्न मांडला गेला असून त्यावर अद्याप काही मार्ग निघाला नाही तरी आपण पाठपुरावा करावा हि विनंती
ReplyDeleteराज्यात जेथे संगीत शिक्षक असतात तिथे तबला शिक्षक पण असतात आणि त्यांना निवड श्रेणी तर लांबच वरिष्ठ श्रेणी पण मिळत नाही आणि गेली 20-25वर्षे शासन स्तरावर हा प्रश्न मांडला गेला असून त्यावर अद्याप काही मार्ग निघाला नाही तरी आपण पाठपुरावा करावा हि विनंती
ReplyDeleteसर १०,२०,३० करीता सुध्दा प्रयत्न केला पाहिजे
ReplyDeleteApan hati ghetlela mudda yogy asun purn vhave. Aani he shikshak bhrarti marfatch ho oo shkte. 👆👌👍🤝
ReplyDeleteमाझे निवड श्रेणी प्रशिक्षण झाले वीस टक्के वरिष्ठ वेतनश्रेणी निकष पूर्ण होत नाही सन २०१४ पासून मी निवडश्रेणी पासून वंचित आहे. तरी अद्याप स्पष्ट झालेले नाही. १०/२०/३० टप्पा हे ही स्पष्ट झालेले नाही.निश्चित धोरण कधी होणार सर या विषयी मार्गदर्शन व्हावे.
ReplyDelete10/20/30 च काय...
Deleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteअजूनही एकजूट आवश्यक आहे सर्व शिक्षक एकाच छत्राखाली येणे आवश्यक आहे अन्यथा फोडा आणि झोडा
ReplyDeleteप्रामाणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीतच शासन असे निर्णय का घेतले जातात.कामाच्या बाबतीत ही असेचं आणि आता आर्थिक बाबतीत ही,म्हणून राज्य शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे शिक्षकांना दिलेल्या कालावधीत वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी त्या त्या टप्प्यानुसार देण्यात यावे
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteलढेंगे जितेंगे
ReplyDeleteGood decision
ReplyDeleteविनाअट वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी मिळाली पाहिजे
ReplyDeleteकाही ठिकाणी मुख्याध्यापक संस्थापक शिक्षणाधिकारी शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतन .श्रेणीसाठी अन्याय करत आहेत.
ReplyDeleteसर,
ReplyDeleteदिनांक ऑक्टोबर 2017 व दिनांक 21 डिसेंबर 2018 चे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत. असा उल्लेख आहे. ह्यात अधिक्रमित करणे म्हणजे नेमके काय करण्यात आले आहे ?
सर,आपण हाती घेतलेल्या कामाला यश मिळालेच पाहीजे, खरेच प्रत्येक सरकार शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे
ReplyDeleteवरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी हा मुद्दा गांभिर्याने बघण्यासारखा आहे. याचा पाठपुरावा झालाच पाहिजे.
ReplyDeleteThankyou sir
ReplyDeleteVariations and nivad vetan shreni please sancation us.Thanks foryour effort.
ReplyDeleteसर आपण शिक्षकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला आहे.
ReplyDeleteवरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी सरसकट सर्व शिक्षकांना मिळालीच पाहिजे.
माझी सलग 26 वर्ष सेवा झालेली आहे पण post graduate नाही तर मला निवड श्रेणि मिळेल ka?
ReplyDeleteकाही शिक्षक बांधव अर्हता असताना सुद्धा वरिष्ट किवा निवड श्रेणीपासून वंचित आहेत व ते आता निवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत किवा निवृत झाले
Deleteकाही शिक्षक बांधव अर्हता असताना सुद्धा वरिष्ट किवा निवड श्रेणीपासून वंचित आहेत व ते आता निवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत किवा निवृत झाले
ReplyDeleteमेरी भी संलग्न 26 वर्ष की सेवा हो चुकी है। डबल पोस्ट ग्रेजुएट होने के बावजूद भी, सवाल जहां का तहां।
ReplyDeleteGood point sir tumhi ahet manunch aamhaala himmat yete
ReplyDeleteमी काथार एस एस. मी 2013 निवड श्रेणी साठी पात्र असून अद्याप निवड श्रेणी मिळाली नाही.
ReplyDeleteरास्त मागणी
ReplyDeleteलढेंगे ! जितेंगेा!
जय शिक्षक भारती
ही मागणी योग्य असुन शासनाने लक्ष द्यावे.
ReplyDeleteवरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी सरसकट सर्व शिक्षकांना मिळालीच पाहिजे
ReplyDeleteसर,आपण छान मुद्दा उपस्थित केला.प्रशिक्षणाची अट रद्द झाली असतानाही(आँगस्ट 2019 चाgr)अधिकारीवर्ग प्रस्ताव मंजूर करित नाहीत.हा मुद्दा लवकर मार्गी लागायला हवा 🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeleteअतिशय छान
ReplyDeleteVery nice Sir.
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteवरिष्ठ वेतन श्रेणी या साठी प्रशिक्षण देण्यात यावे
ReplyDeleteरास्त मागणी
ReplyDeleteलढूया !जिंकूया
Good job sir.
ReplyDeleteविना अट निवड श्रेणी देण्याची सुविधा करा
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDeleteछान सर
ReplyDeleteखूप खूप आभार सर.🙏🙏
ReplyDeleteसर आपण खरोखर महत्वाचा मुद्याला वाचा फोडली आहे धन्यवाद मोरे सर.
ReplyDeleteVery good sir....thanx for fighting for our rights...
ReplyDeleteVery good sir....thanx for fighting for our rights...
ReplyDeleteवरिष्ठ व निवड श्रेणी साठी प्रशिक्षण लावण्याचे नियोजन
ReplyDelete10.३.२१.चा Jr
Great work sir!
वरिष्ठ व निवड श्रेणी साठी प्रशिक्षण लावण्याचे नियोजन
ReplyDelete10.३.२१.चा Jr
Great work sir!
सर अजूनही शिक्षकांना 10,20,30 वर्षे वरीष्ठ व निवड श्रेणी लागू करावी. याकरिता आपण आपल्या स्तरावर निर्णय घेण्यात यावा. व शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा. हि विनंती🙏😊
ReplyDeleteसर नमस्कार, आपण केलेल्या कार्याकरिता प्रथम तुमचे अभिनंदन🎉🎊, आपण आपल्या स्तरावर विचार विनिमय करून शिक्षकांना 10,20,30,वर्षांनंतर त्यांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मिळाली तर त्यांना योग्य न्याय⚖️ मिळेल असे मला वाटते. मी आपणास विनंती करतो.🙏😊
ReplyDeleteखूप खूप आपले आभार आहेब आपण नेहमीच शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून कार्य करत आहात व मोरे साहेब हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यास आपण सरकार ला भाग पाडले ।
ReplyDeleteलढेंगे जितेंगे।
sir, even demand justice for those teachers who work in partly aided and partly unaided section in same institution.
ReplyDeleteलेखन छान,योग्य मागणी.👍
ReplyDeleteसर,खुपच छान,रास्त मागणीची पुर्तता होवो ही मनोकामना.
ReplyDeleteसर,खुपच छान,रास्त मागणीची पुर्तता होवो ही मनोकामना.
ReplyDeleteछान मुद्दे मांडलेत सर धन्यवाद..लढेंगे जितेंगे.जय शिक्षक भारती.
ReplyDeleteNice points sirji
ReplyDeleteNice points sirji
ReplyDeleteसरजी, शिक्षक असा सहनशील प्राणी आहे की, कोन्हीही त्यांच्या वर अन्याय करावा त्याना त्यांच्या हकाच्या वरिष्ट निवड तसेच आश्वासित प्रगती योजनेपासून दुर ठेवावे हे खरेच शासनाचे आमच्या प्रती असलेले धोरण चुकीचे आहे. आपण तसेच शिक्षक भारती या आमच्या प्रश्नासंबधी शासन दरबारी प्रश मांडते व त्या सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करते . धन्यवाद पाटील सर .
ReplyDeleteइतर कर्मचाऱ्यांचे जसे अर्जित रजेचे रिटायर्मेंट नंतर रोखीकरण होते, तसें शिक्षकांचे पण व्हायला हवे. ह्यासाठी please प्रयत्न करा.
ReplyDeleteअप्रशिक्षित शिकक्षकांना लागु होईल का ?
ReplyDeleteवरीष्ठ व निवड श्रेणी शिक्षकांना लागु करण्या संदर्भात सखोल अभ्यासपूर्ण मुद्दा मांडल्याबद्दल सुभाष मोरे सरांना धन्यवाद शुभेच्छा शिक्षक भारती सतत पाठपुरावा करावा ही विनंती.
ReplyDeleteयोग्य मागणी सरजी
ReplyDeleteमहत्वपूर्ण मुद्दा हाती घेतल्याबाद्दल आभारी
ReplyDeleteआपण केलेले कार्य फारच उत्तम आहे शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत वाचा फोडली पाहिजे शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे.
ReplyDeleteशिक्षिकांना न्याय मिळायलाच पाहिजे .Good Work Sir Congratulations
ReplyDelete21 ऑक्टोंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार मी अविरतटप्पा 1,2 आणि 3 केलेले असुन माझ्याकडे अविरतचे 1,2 आणि3 चेऑनलाईनचे प्रमाणपत्र सुद्धा आहे करीता मी वरिष्ठश्रेणी करीता ZP ला मान्यतेकरीता फाईल टाकलेली आहे परंतुती नाकारण्यात आलेली आहे तरीसुद्धा योग्य मार्गदर्शन करावे
ReplyDeleteआपल्या कार्याला मानाचा मुजरा धन्यवाद श्री मोरे सर आपले खूप खूप आभार 🙏🙏
ReplyDeleteVery good sir
ReplyDeleteअतिशय महत्वची बातमी सरांचे अभिनंदन 🙏🙏🙏
ReplyDeleteखूपच महत्वाचे प्रश्न मांडलेत सर,इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रशिक्षणाची अट नाही मग फक्त आपल्यालाच का ? विज्ञान पदवीधर शिक्षकांना पदव्युत्तर शिक्षण त्याच शाखेत घेता येत नाही म्हणून त्यांना Graduate पदविधरवरच निवडश्रेणी लागू व्हायला हवी,तसेच विज्ञान शिक्षकांना दोन वेतनवाढ जास्त असायला हव्यात,आणि प्रशिक्षणतर कोणालाही नकोच,काय गरज आहे प्रशिक्षणाची,त्याने के साध्य होते की फक्त त्रासच द्यायचा आहे शिक्षकांना? कोणतीही गोष्ट शिक्षकांना सहजासहजी मुद्दामहून मिळू दिली जात नाही,यासाठी संघटना strong असायला हव्यात आणि शिक्षकांनी एकजूट दाखवणे फार गरजेचे आहे
ReplyDeleteआपल्याकडून दिलेली माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे असंख्य शिक्षकां पर्यंत ही माहिती पोहोचणे महत्त्वाचे आहे आणि तसा प्रयत्न आपल्याकडून होत असल्याने आपले खूप खूप अभिनंदन
ReplyDeleteNice work
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteGo ahead ,we r along with u sir.
ReplyDeleteआम्हाला 24 वर्षे पुर्ण होवून दोन वर्षे झाले आहे . परंतु आमचे प्रस्ताव अहमदनगर जिल्हा परीषद मध्ये प्रशिक्षणा अभावी तहकूब ठेवले आहे . तरी आपन त्यांना स्पष्ट आदेश द्यावे हि नम्र विनंती . मा कळावे आपला विश्वासू उपशिक्षक श्री गागरे एम बी मो .नं.9850182206
ReplyDeleteसव॔ कम॔चारी करीता जूनी पेन्शन मागणी करावी .नाशिक जिल्ह्य़ात अनेक प्रस्ताव निवड श्रेणी चे पडून आहे .कार्यवाही होत नाही.
ReplyDeleteGood job sir
ReplyDeleteप्रस्ताव स्विकारण्यासाठी संचाल साहेब, आयुक, किंवा शिक्षणमंत्री यापैकी कोणाचा शिक्षणाधिकारी यांना आदेश झाला आहे काय ? आपण सर्व संघटना व सर्व कर्मचारी मागणी करत आहेत. पण जी . आर . असूनही आमलबजावनी होत नाही .
ReplyDelete
ReplyDeleteGood job sir ji
आपल्या शिक्षक बांधवांचा प्रश्न सुटला आहे. धन्यवाद सर
ReplyDeleteलढेंगे जितेंगे
9689013429
ReplyDeleteVery nice Sir
ReplyDeleteआपल्या शिक्षक बांधवांचा प्रश्न सुटला आहे खुप खुप धन्यवाद सर लढेंगे तो हमारी जित होती रहेगी।
ReplyDeleteनेहमी प्रमाणे शिक्षकांच्या हक्कासाठी आपला प्रामाणिक लढा ,
ReplyDeleteधन्यवाद सर.
very nice sir.
ReplyDeleteप्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत पण मंजूरी मिळाली नाही
ReplyDeleteयोग्य मुद्दा आहे सर
ReplyDeleteअतिशय महत्वाचे मुद्दे आहेत
ReplyDeleteखूपच योग्य प्रकारे मुद्दे मांडले आहेत
ReplyDeleteशिक्षकेतर कमॅचारी बाबतही विचार करा.एकतीस वषॅ सेवा होवून ही अजून पदोन्नति नाही.यांच्याकड़े शिक्षण खातयासाठी च पैसा नाही.
ReplyDeleteआपण उत्कृष्ट पद्धतीने सदर बाब हाताळत आहात
ReplyDeleteखूप छान विषयाला वाचा फोडली, आता प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षक बांधवांना लाभ मिळेल .अशी आशा करू या. मोरे सर आपण. याकडे गभिर्याने लक्ष घालावं . आपल्या कार्यास प्रणाम. धन्यवाद.
ReplyDeleteआपल्या कार्यास सलाम
ReplyDeleteहा खरंच शिक्षकावर अन्याय आहे इतर विभागांमध्ये पदोन्नती होत असते पण शिक्षण विभागामध्ये होत नाही कमीतकमी निवड श्रेणी किंवा वेतन श्रेणी मिळावी हा शिक्षकाचा हक्क आहे
ReplyDeleteसर,
ReplyDeleteआपण महत्त्वाच्या मुद्द्याला वाचा फोडण्याचा सुंदर विचार आहे.
त्यासाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा.
परंतु काही शाळेतील संस्था चालक मुद्दामच वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यासाठी जाणून बुजून विलंबकरित आहे.निवड श्रेणी मिळू नये किवा निवृत्तीच्या वेळी निवृत्ती वेतन मिळू नये यासाठी आतापासूनच शिक्षकांना दाबाखाली आणून जाचक नियमांचा आधार घेऊन मेमो दिले जात आहे .व भविष्यात त्याचे ते भांडवल करीत आहे त्यासाठी कोणी उत्तर दिले तर त्याला अजून दबावाखाली आणून जाचक नियमांचा आदर घेऊन त्रास दिला जात आहे.
संस्था ठराव नसताना वरिष्ठ व निवड श्रेणी घेता येता का असा कोणता जी आर आहे का?
निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण अट आहे का?नसल्यास परिपत्रक पाठवावे.
ReplyDeleteमो.9881302892
छान प्रस्ताव सादर केला आहे १२व२४वर्षे झालेल्या सर्व शिक्षकांना कोणत्याही प्रकारची अट न लावता वरीष्ठ श्रेणी व निवड श्रेणी देण्यात आली पाहिजे.
ReplyDeleteजे सेवावृत्त झाले आहेत त्यांना सुध्दा २४वर्षे पूर्ण झाली तेव्हापासून निवड श्रेणी मिळणे आवश्यक आहे.
शिक्षणसेवक मानधनवाढ यासाठी संघटनेमार्फत काही प्रयत्न चालू आहेत काय?
ReplyDelete