Friday 7 August 2020

अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन!

विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष आणि शिक्षक भारतीचे सर्व पदाधिकारी व सदस्य,

पेन्शन नाकारणारी 10 जुलै 2020 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेली आधिसुचना मागे घेण्याचे आश्वासन माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले आहे. शिक्षण मंत्र्यांचे शिक्षक भारतीच्या वतीने जाहीर आभार!

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 10 जुलै 2020 रोजी पेन्शन हिरावून घेणारी अधिसूचना जारी केली होती. महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील मसुद्यात बदल सुचवणारी आधिसुचना राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पेन्शन वर घाला घालणारी होती.

शिक्षक भारती या आपल्या शासन मान्यताप्राप्त संघटनेने या  अन्यायाच्या विरोधात राज्यभर जागृती निर्माण केली.  पहिल्या टप्प्यात आपण सर्वांनी मिळून पोस्टर आंदोलन केले. त्याचा परिणाम म्हणून दुसर्या टप्प्यात राज्यभरातून शिक्षक भारतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो लेखी आक्षेप नोंदवण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात आपण स्थानिक मंत्री व आमदार यांना अधिसूचना रद्द करण्याबाबतचे निवेदन दिले. आपण घेतलेल्या मेहनतीमुळे राज्यभरातून अनेक मंत्री व आमदारांनी माननीय शिक्षण मंत्र्यांना फोनद्वारे व पत्राद्वारे अधिसूचना रद्द करण्याचे करण्याची विनंती केली.

आपल्या आंदोलनाला प्रतिसाद देत दिनांक 6 ऑगस्ट 2020 रोजी माननीय शिक्षण मंत्र्यांनी आमदार कपिल पाटील व शिक्षक भारती संघटनेला चर्चेसाठी बोलाविले. शिक्षक भारती संघटनेच्या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे,  कार्यवाह प्रकाश शेळके आणि शिक्षक भारती मुंबईचे कैलास गुजांळ उपस्थित होते. आमदार कपिल पाटील व  शिक्षक भारती ने मांडलेले सर्व मुद्दे मान्य करून अधिसूचना मागे घेण्याचे आश्वासन मा. शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.




(बातमी मोठी करून वाचण्यासाठी click करा)


10 जुलै 2020 रोजीच्या अन्यायकारक अधिसूचनेच्या विरोधात  आपले आमदार कपिल पाटील व शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष आदरणीय बेलसरे सर  यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी कोरोना महामारीच्या काळातही खूप मेहनत घेतली.  निवेदने दिलीत. राज्यभर जागृती निर्माण केली. आंदोलने केली. आणि म्हणून आज आपल्याला यश मिळाले आहे. शिक्षक भारतीचे सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका  अध्यक्ष, सर्व पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते या सर्वांच्या एकजुटीने हे यश मिळालेले आहे.

त्याचबरोबर राज्यभरातील  संस्थाचालक, मुख्याध्यापक  व विविध संघटनांचे पदाधिकारी यांनीही शिक्षक भारतीच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत लेखी आक्षेप नोंदवावा मोहिमेत सहभाग घेतला. त्यांचेही आभार!

शैक्षणिक प्रश्नावर  राज्यभरातून आपण सर्वजण शिक्षक भारतीच्या माध्यमातून एकत्रितपणे जो संघर्ष केला आहे त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल. आपल्या सर्वांच्या कार्याला सलाम !

माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई  गायकवाड, आपले आमदार कपिल पाटील तसेच राज्यभरातून आपल्या निवेदनाला प्रतिसाद देऊन फोन करणारे व निवेदन देणारे माननीय मंत्री, माननीय स्थानिक आमदार यांचे शिक्षक भारतीच्या वतीने आभार!

शिक्षक भारतीच्या एकजुटीचा विजय असो !!!

आपला स्नेहांकित,

सुभाष किसन मोरे

कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य


53 comments:

  1. न्याय मिळाला👍

    ReplyDelete
  2. अभिनंदन !👍💐

    ReplyDelete
  3. शिक्षक भारतीचा विजय असो..अभिनंदन व आभार..

    ReplyDelete
  4. अभिनंदन
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  5. Good job sir, Congratulation

    ReplyDelete
  6. अभिनंदन पण आपला लढा पेन्शन मिळेपर्यंत

    ReplyDelete
  7. शिक्षक भारती संघटनेचे अभ्यासू नेते ,शिक्षक आमदार कपीलजी पाटील व पदाधिकारी यांचे मनापासून अभिनंदन!आपण वेळोवळी अनेक विषय शासनाच्या पुढे सादर करतांना शिक्षकाविषयची कळकळ शिक्षकच समजू शकतो.आपण केलेला पाठपुरावा, व राज्यातील शिक्षकांनी नोंदवलेला विरोध याचे यश आहे. .कपीलजी साहेब आपण २००५ पुर्वी लागलेली कर्मचारी व टप्याटप्याने अनुदानित झालेल्या शाळेतील राज्यातील २६ हजार शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावावा. एवढी माफक अपेक्षा तमाम राज्यातील पेंशन वंचीत शिक्षकांच्या वतीने मी आपणास करीत आहे.
    ईश्वर रामदास महाजन शिक्षक तथा पत्रकार
    महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेर
    9860352960,9766939950

    ReplyDelete
  8. अभिनंदन. शिक्षक भारती.

    ReplyDelete
  9. जय हो. शिक्षक भारती . लढेगे और जितेगे........B. A. Jadhav Shirala Taluka Adhyaksha Shikshak Bharati
    8888126132

    ReplyDelete
  10. लढेंगे जितेंगे
    जय शिक्षक भारती।।

    ReplyDelete
  11. लढेंगे जितेंगे
    जय शिक्षक भारती।।

    ReplyDelete
  12. नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही पेन्शनचा हक्क मिळावा.

    ReplyDelete
  13. Sir very nice work u r doing but what about these teachers whos appointment is after Nov. 2005 they are also struggling for pension.

    ReplyDelete
  14. जय शिक्षक भारती।
    लढेंगे और जितेंगेही।
    🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  15. आमदार साहेब व टीम शिक्षक भरतीच्या अथक मेहनत व सतर्कतेमुळे च हे घडले .या सर्वांच्या कार्यास सलाम. जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  16. Sir proud of you and great selut for your job sir

    ReplyDelete
  17. जय शिक्षक भरती!आदरणीयआमदार कपिल पाटील साहेब व टीम शिक्षक भारतीच्या अथक व अत्यंत नियोजनबद्ध प्रयत्नामुळेच हे घडू शकले.त्यांच्या या कार्यास तमाम शिक्षकांच्या वतीने सलाम.

    ReplyDelete
  18. Abhinandan sir, salute to your work

    ReplyDelete
  19. शिक्षक भरती तेव्हडी काम करते, बाकी आमदारांना काही सोयर सुतक नाही

    ReplyDelete
  20. GOOD JOB SIR CONGRATULATIONS

    ReplyDelete
  21. Great job👍 congratulations SIR n SHIKSHAK BHARATI

    ReplyDelete
  22. अभिनंदन सर

    ReplyDelete
  23. मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  24. सर,
    १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेत्तरांना जुनीच पेन्शन योजना लागु करुन त्यांच्येवरील अन्याय दुर करावा तसेच नंतर सेवेत आलेल्या राज्यातील सर्व कर्मचारी वर्गासाठी जुनीच पेन्शन योजना लागु झालीच पाहिजेत
    प्रा अशोक भराड, अकोला

    ReplyDelete
  25. Congretulation all members of Bharati🌹🌹🌹

    ReplyDelete
  26. अभिनंदन सर.

    ReplyDelete
  27. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  28. जय हो शिक्षक भारती

    ReplyDelete
  29. जय शिक्षक भारती
    रवींद खरवंटे

    ReplyDelete
  30. शिक्षक भारतीचा व सर्वांच्या एकजूटीचा विजय आहे

    ReplyDelete
  31. Great job sir
    Jay shikshak bharti

    ReplyDelete
  32. शिक्षक भारती ्चा विजय असो

    ReplyDelete
  33. शिक्षक भारती ्चा विजय असो

    ReplyDelete
  34. शिक्षक भारती चा विजय झाला

    ReplyDelete
  35. अभिनंदन !!
    💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
  36. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  37. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  38. जय शिक्षकभारती

    ReplyDelete
  39. जय शिक्षक भारती व मा.आमदार कपिल पाटील साहेब

    ReplyDelete
  40. नोव्हेंबर 2005 नंतर च्या शिक्षकांना सुधा न्याय मिळाला पाहिजे.सगळ्यांना समान कायदा असावा.

    ReplyDelete
  41. लधेंगे जितेंगे, न्याय हक्का साठी असेच लढू
    जय शिक्षक भारती
    प्रा किरण थोरात
    पालघरजिल्हा संघटक शिक्षक भारती

    ReplyDelete
  42. मा.कपिल पाटील साहेब ,मोरे, अन्य शिक्षक यांचे मनापासून अभिनंदन.खरच शिक्षक भारती संघटना उत्कृष्ट काम करीत आहे शिक्षक आमदार यांनी पण मोलाचं सहकार्य केले आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. अशोक बेलसरे साहेब अनेक वर्षांपासून काम पाहतात मी त्यांना पूर्णपणे ओळखतो त्यांना माझा अनेक नमस्कार. संघटना खरोखरच कौतुकास्पद आहे. दुसरे असे की lockdown काळात माझ्या मिसेस आजारी होत्या तिला मेडिकल रजा घ्यायला लावली आहे हे कितपत योग्य आहे ? मला मार्गदर्शन करण्यात यावे.

    ReplyDelete
  43. जुंपले जाते. त्यामुळे शाळेतील इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येऊन शाळांंच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो.तसेच विभागाच्या ढीसाळ कामकाज आणि अनास्थेमुळे बऱ्याच वर्षांपासून बरीच प्रकरणे प्रलंबित आहेत.

    ReplyDelete
  44. समाज कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा आणि कर्मशाळांच्या कामकाजासाठी विभागाचा कर्मचारीवर्ग कित्येक वर्षांपासून उपलब्ध नसल्यामुळे शाळांतील कर्मचाऱ्यांना कामाला जुंपले जाते. त्यामुळे शाळेतील इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येऊन शाळांंच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो.तसेच विभागाच्या ढीसाळ कामकाज आणि अनास्थेमुळे बऱ्याच वर्षांपासून बरीच प्रकरणे प्रलंबित आहेत.

    ReplyDelete