Monday 2 November 2020

आमचा पगार दिसतो पण मग काम का नाही ?

गुहागरचे माजी आमदार आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष डॉक्टर विनय नातू यांनी लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांच्या पगाराचे आणि कामाचे मूल्यमापन करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ही बातमी वाचून आश्चर्य वाटले नाही. (विनय नातू यांची या संदर्भातली बातमी https://www.tv9marathi.com/maharashtra/bjp-leader-vinay-natu-send-letter-to-cm-uddhac-thackeray-302092.html ) मागील पाच वर्षात भाजपच्या शिक्षणमंत्र्यांनी व शिक्षण विभागाने दररोज सरासरी एकापेक्षा जास्त जीआर काढून जी वाताहत केली आहे ती सर्वांना माहीतच आहे. भाजपप्रणित संघटना असोत अथवा तत्कालीन शिक्षणमंत्री असोत यांनी नेहमी शिक्षण आणि शिक्षकांच्या विरोधात काम केले आहे. मागील पाच वर्षाच्या काळात शिक्षणाचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न इच्छाशक्ती असती तर सोडवता आले असते परंतु तसे न करता त्यांनी केवळ शिक्षकांच्या अडचणीत भर घातली. शिक्षकांना अतिरिक्त करणारे, मुख्याध्यापकांना धमकावणारे जी.आर काढून शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. सत्तेवर आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करू अशी गर्जना करणाऱ्यांनी सत्तेवर येताच वेगळेच रंग दाखवले. त्या धक्क्यातून आजही आम्ही शिक्षक - शिक्षकेतर, मुख्याध्यापक, संस्थाचालक सावरलेलो नाही.

सरकार बदलले ही केवळ भावनिक स्थिती असून व्यवस्थात्मक बदल होत नाही असे शिक्षणतज्ञ किशोर दरक यांनी म्हटले आहे ते खरंच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने प्रश्न न सोडवल्यामुळे भाजप सरकार प्रश्न सोडवेल या मोठ्या आशेने सगळ्यांनी भरघोस मतदान केले. पण शेवटी निराशा झाली. आताही सरकार बदलले पण मंत्रालयातील अधिकारी आणि त्यांची धोरणं तीच आहेत. मागील एका वर्षात माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागाने काढलेले शासन निर्णय मागची पुनरावृत्ती असल्यासारखेच आहेत.

कोरोना काळात शिक्षण आणि शिक्षणाचे नियोजन करण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सुरू झालेले नाहीत, दहावी-बारावीच्या यावर्षीच्या परीक्षा कधी होणार माहित नाही, शाळा सुरू करण्याबाबत केवळ घोषणा होतात पण ठोस नियोजन नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर अध्ययन-अध्यापन अहवाल मागवले जातात पण जी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली नाहीत त्यासाठीचे कोणतेही नियोजन नाही.

ऑनलाइन शिक्षणाचा बागुलबुवा उभा करून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना वेठीस धरण्याची एकही संधी सोडत नाहीत.

कोरोनाचे कारण देवून अनुदानाचा टप्पा मात्र देण्याचे टाळण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. प्रचलित नुसार शंभर टक्के अनुदान द्यायचं तर राहीलच पण 20 टक्के अनुदान देतानाही 18 महिन्यांचा पगार ढापण्यात सरकारने केलेली लबाडी लपून राहिलेली नाही. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ ग्रॅज्यूटीचे पैसे आणि सेवानिवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत. सातव्या वेतन आयोगातील थकबाकीचा पहिला हप्ता थांबवण्यात आलेला आहे. सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (शिक्षणसेवक) आजही केवळ सहा हजार रुपये मानधनात काम करत आहे. बक्षी कमिटीने सुचवलेली आश्वासित प्रगती योजना अद्यापि लागू झालेली नाही. 2004 पासून थांबलेली शिक्षकेतर कर्मचारी भरती सुरू झालेली नाही. बारा वर्षे व चोवीस वर्षाचे कोणतेही लाभ न घेता हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी निवृत्त होऊन गेलेले आहेत. आजही शिक्षक 27 पेक्षा जास्त अशैक्षणिक कामे करत आहेत. शिक्षकांना शाळेमध्ये शिकवू दिले जात नाही. कामाचे मूल्यमापन करण्याची मात्र वारंवार मागणी करणारे आत्ताच्या सरकारमधील आणि मागच्या सरकारमधील एकाच पकडीचे दोन दांडे आहेत.

सार्वजनिक प्रवासाची साधने सुरू झालेली नाहीत, कोरनाचे व्हॅक्सीन अजून आलेले नाही पण पन्नास टक्के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित करण्याचा जीआर मात्र काढलाय. शाळेत मुलं नसताना शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचारी यांना बोलवायचे कारण काय? हे मात्र शिक्षण विभागाने सांगितलेलं नाही.

50% शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बाबतच्या शासन निर्णयामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे

1) शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासह सर्व प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर असावे.

2) प्रत्येक प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर बसवावे.

3) शाळेत प्रवेश करण्यापूर्वी गणवेश आणि पादत्राणांचे सानिटायझेशन करावे.

4) गेटजवळ विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यांचे नियंत्रण करावे.

5) वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे.

6) वर्ग भरताना शिक्षकांनी सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश करावा. तसेच मास्क आणि हातमोजांचा वापर करावा.

7) वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करावा.

8) शाळांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करावा.

9) बसने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व बस चालकासाठीही नियमावली देण्यात आली आहे.

10) 20 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येतील अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये.

11) शाळेतील मध्यान्न भोजन सकाळी 10 ते 1 वेळात विद्यार्थ्यांची गट विभागणी करून द्यावे.

12) स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य विषयक व सर्व सुरक्षा उपायांचे पालन करावे.

13) शिकवण्यासाठी रिमोट लर्निंग, ऑनलाइन लर्निंग आणि बेल्डेड लर्निंग या पर्यायांचा वापर करावा.

14) स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही असे नियंत्रण करावे.

15) स्वच्छतागृहात मुबलक पाणी, साबण, हॅण्डवॉशचा पुरवठा करण्यात यावा.

16) विद्यार्थ्यांच्या तापमानाची रोज नोंद ठेवावी.

17) शाळेत विद्यार्थ्यांचे नियमित परीक्षण व्हावे.

18) शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वच्छतेचे परीक्षण व्हावे.

हि सर्व व्यवस्था उभी करायला छोट्या शाळांना किमान 25,000 रूपये तर मोठया शाळांना एक लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. व्यावसायिक दराने भरावे लागणारे वीजबील, पाणीबील थकले असताना हा खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. 

29 ऑक्टोबर 2020 चा 50 टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतचा शासन निर्णय रद्द करणेबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री मा. वर्षाताई यांच्याशी केलेला पत्रव्यवहार.



शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कामाचे मूल्यमापन जरूर करा ...
मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगाराबाबत नेहमीच बोललं जातं. त्यांच्या कामाच्या मूल्यमापन बाबत कोणीही उठून प्रश्न उपस्थित करतो. पण राष्ट्र घडवण्यासाठी खेड्यापाड्यांमध्ये, आदिवासी-दुर्गम भागामध्ये, डोंगरदऱ्यांमध्ये, शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये, वस्त्या वस्त्यांवर जाऊन शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवणाऱ्या शिक्षकाबद्दलचा सन्मान राजकारणीच ठेवणार नसतील तर समाजाने कोणता आदर्श समोर ठेवायचा?

शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन झालेच पाहिजे या मताचा आम्ही आदर करतो. पण त्या अगोदर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळणार आहे का? 27 पेक्षा जास्त अशैक्षणिक कामातून त्याची मुक्तता होणार आहे का? वर्षानुवर्षे न भरलेल्या रिक्त जागांवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करून अतिरिक्त ताण कमी केला जाणार आहे का? बालकांच्या शिक्षणाचा व मोफत सक्तीच्या कायद्यानुसार शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याची भूमिका शासन निभावणार का? गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षक निर्माण करणारी अनुदानित डी.एड, बी.एड बंद झालेली कॉलेज पुन्हा सुरू करणार का? शिक्षक भरती मध्ये होणारे घोटाळे थांबून खरंच गुणवत्तेवर शिक्षक शिक्षकेतर भरती करणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगोदर द्यावीत आणि मग आमचे मूल्यमापन करावे. आम्ही शिक्षक त्यांच्या मूल्यमापनाला सामोरे जायला तयार आहोत.

सलाम कोविड योद्धयांना
कोरोना काळामध्ये शिक्षण विभागाने कोणतेही अधिकृत ऑनलाइन शिक्षणाचे प्रशिक्षण न देताही 50% का होईना विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिक्षक धडपडत आहेत. ज्या ज्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था उभी होऊ शकली नाही तेथे ऑफलाइन शिक्षण देणारे शिक्षक आहेत. वस्तीवर पाड्यावर चालत जाऊन शिक्षण देणारे शिक्षक आहेत आणि हे सर्व कार्य सुरू असताना कोवीड ड्युटी करणारेही शिक्षकच आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारीच सर्वेक्षण करणारेही शिक्षकच आहेत.

सर्वांना असं वाटतं की शिक्षक घरी बसले आहेत आणि फुकटचा पगार घेत आहेत. पण हा आरोप करणाऱ्यांनी सर्वप्रथम खरी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. कोविड काळामध्ये आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांसोबत, पोलिसांसोबत अंगणवाडी सेविका सोबत खांदा लावून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. अनेकांना प्राणांचे बलिदान द्यावे लागले आहे. ही वस्तुस्थिती नाकारून केवळ शिक्षक या जमातीला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जात असतील खपवून घेतले जाणार नाही.

कोरोना काळात काम करणारे आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन यांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत असेल तर ते शासनाचे अपयश आहे. किमान वेतन कायद्यानुसार या प्रत्येकाला किमान अठरा हजार रुपये वेतन देणे बंधनकारक असताना त्याचं आर्थिक शोषण करणाऱ्यांच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नाही. पण शिक्षकांच्या पगारावर मात्र सर्व बोलतात.

अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणून तिला बदनाम करून शिक्षणाचे खाजगीकरण, व्यापारीकरण करण्याचे पुरस्कर्ते दोन्ही सरकार मध्ये बसलेले आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या सोबत शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी जोपर्यंत शासन घेणार नाही तोपर्यंत समाजाचा, राज्याचा, देशाचा विकास होणार नाही.

करा शिक्षकांचा सन्मान! तर घडेल राष्ट्र महान!


सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य


184 comments:

  1. Replies
    1. अगदी बरोबर आहे, वस्तुस्थिती लक्षात न घेता वक्तव्य करणारे अनेक आहेत

      Delete
    2. शशिकांत कुलकर्णी अगदी बरोबर आहे, सर वस्तुस्थिती लक्षात न घेता वक्तव्य करणारे अनेक आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे. 🙏🙏

      Delete
    3. अगदी बरोबर आहे सर. आपल आधपतन करणारे राजकारणी मात्र एकदा निवडुन आले की, मरेपर्यत पेन्शन घेतात. सर्वच कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद आहे तर या राजकारऱ्यांचीही पेन्शन बंद करून यांनाही dcps योजना लागु केली पाहिजे. आणी वयाच्या 58 वर्ष जर हे निवडुन येत असतील तरच यांनाही अंशःता पेन्शन योजना लागु केली पाहिजे. मगच यांना इतरांच्या भावना कळतील

      Delete
    4. अगदी बरोबर आहे सर. आपल आधपतन करणारे राजकारणी मात्र एकदा निवडुन आले की, मरेपर्यत पेन्शन घेतात. सर्वच कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद आहे तर या राजकारऱ्यांचीही पेन्शन बंद करून यांनाही dcps योजना लागु केली पाहिजे. आणी वयाच्या 58 वर्ष जर हे निवडुन येत असतील तरच यांनाही अंशःता पेन्शन योजना लागु केली पाहिजे. मगच यांना इतरांच्या भावना कळतील

      Delete
    5. सडेतोड उत्तर....!

      Delete
    6. खुब छान,सरजी

      Delete
    7. 'पद राहील कायम, बदलणार माणसे,पदाविनाही मज कोणती,ओळखणार माणसे ?'अशी स्थिती सध्या असल्याने मिळून माणसं जगवणे शिकुया.सत्य समोर येतच असते.

      Delete
    8. अगदी बरोबर. अन्याय कारक निर्णयांचा विरोध करायलाच हवा.

      Delete
    9. कोणीही याव आणि टिकली मारुन जाव हे चालणार नाही .सडेतोड उत्तर सरजी very nice

      Delete
  2. सर आपण वस्तुस्थिती मांडली आहे....Thanke

    ReplyDelete
  3. मोरे सर अतिशय समर्पक लेख

    ReplyDelete
  4. अतिशय छान आणि मार्मिक शब्दात कानउघडणी

    ReplyDelete
  5. अतिशय खरमरीत भाषेत, वास्तव आणि शासनाने आपल्या बुडाखालील अंधाराला तपसणारे प्रश्न आपण उपस्थित केले आहेत सर, आपले आभार,
    समस्त शिक्षकवृंदांच्या त्यागाचं मूल्यमापन शासनाने डोळसपणे निरपेक्षवृत्तीने करायलाच हवं त्याशिवाय शिक्षकांच्या सन्मानाचे शब्द आंधळ्यांनी पाहिलेल्या हत्तीच्या कथानकाप्रमाणे ठरेल.. कोणत्याही आपत्कालीन परिस्थतीत शिक्षकाने आपले प्राण हातावर घेऊन घेतला वसा सोडलेला नाही, विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षण हक्कासाठी जागृतपणे शिक्षकांशिवाय अन्य कोणी चकार शब्द काढीत नाहीये....शासन व्यवस्थेतील धुरिणांनी अशा मूल्यमापनाची सुरुवात स्वतःपासून करावी,, शिक्षक तर सदैव तत्पर व तयारच असणार आहे..

    ReplyDelete
  6. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  7. शिक्षकाची बाजू मांडण्याची धमक असली पाहिजे उठ सुठ शिक्षकांना बोलल्या जाते ,जवाबदार नेते असं बोलताना दुःख वाटते

    ReplyDelete
  8. खुप छान वाटले सर तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्या.

    ReplyDelete
  9. अतिशय छान आणि वास्तवला अनुसरुन प्रतिक्रीया अहे.एकदम रोकठोक सर .

    ReplyDelete
  10. सर
    या पुढे शिक्षकांच्या विषयी बोलतांंना दहा वेळा विचार करावा लावणांरा खरमरीत.......जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  11. All MLA che Evulation kara

    ReplyDelete
  12. सर
    या पुढे शिक्षकांच्या विषयी बोलतांंना दहा वेळा विचार करावा लावणांरा खरमरीत.......जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  13. सर
    या पुढे शिक्षकांच्या विषयी बोलतांंना दहा वेळा विचार करावा लावणांरा खरमरीत.......जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  14. अतिशय रोखठोक व वस्तुस्थिती मांडली सर तुम्ही.शिक्षकाबद्दल बोलताना 100वेळा विचार करतील.

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच सडेतोड भाषेत वास्तव मांडले सर. सलाम तुमच्या लेखनाला

      Delete
    2. वास्तव परीथितीवर सडेतोड ऊत्तर,सलाम।

      Delete
    3. स्वत: काही न करता समाजाचे आम्हीच कैवारी असा भ्रम निर्माण करणार्‍या अतिशहाण्यांना सडेतोड उत्तर दिलेय आपण.

      Delete
  15. Keep it up sir very nice sir

    ReplyDelete
  16. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. योग्य भूमिका सर.

      Delete
    2. अतिशय माफक शब्दात शिक्षकांची बाजू मांडून शासन आणि प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर आणली.

      Delete
  17. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  18. समर्पक लेख

    ReplyDelete
  19. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  20. खूपच छान प्रतिउत्तर दिले आहे, ह्याची गरजच होती.

    ReplyDelete
  21. प्रत्येक मुद्यांची मांडणी अगदी व्यवस्थितपणे केलेले असून शासनाला या प्रत्येकाचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल मी एक शिक्षक तुमच्यासोबत आहे

    ReplyDelete
  22. विना अनुदानित शिक्षकांची अवस्था या पेक्षा बिकट आहे.वास्तव खूप भयंकर आहे

    ReplyDelete
  23. सर,शिक्षण व्यवस्थेची पार वाट लावली आहे.आमदार,खासदार व मंत्रालयीन सचिव यांनी.

    ReplyDelete
  24. अतिशय मुद्देसूद लेख!

    ReplyDelete
  25. खुप छान उत्तर

    ReplyDelete
  26. आपल्या व्यथांची सुंदर कथा मांडणी

    ReplyDelete
  27. शिक्षकांची आजची वस्तुस्थिती तंतोतंत मांडली आहे .धन्यवाद सर🙏

    ReplyDelete
  28. अतिशय समर्पक व प्रभावी मत आपण मांडले आहे - कल्पेश पिंपळे सर

    ReplyDelete
  29. अतिशय उचित उत्तर दिलात सर, खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  30. सर , मनापासून धन्यवाद .
    आपल्या व्यथा मांडल्याबद्दल

    ReplyDelete
  31. अगदी बरोबर मोरे सर..छान..शिक्षणाच्या हक्कासाठी..शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती..जय हो..

    ReplyDelete
    Replies
    1. खरोखरच ,सत्य, वास्तव आणि कटू सत्य मांडले सर. शिक्षकांची कामे, त्यांच्यावर होणारे अन्याय विनाअनुदानित शिक्षकांचा तुटपुंजा पगार त्यांची होणारी ससेहोलपट सरकारला दिसत नाही. कोरोना च्या स्तिथीत सर्व सोयी, सुविधा असल्याशिवाय ,विद्यार्थी असल्याशिवाय शाळा सुरू करणे धोक्याचे आहे

      Delete
  32. जिन्दाबाद सर, बिनकामाचे लोकप्रतिनिधी शिक्षकांबद्दल बेताल वक्तव्ये करून स्वताच्या अल्प बुध्दीचा परिचय देत आहेत. यानिमित्ताने मागील सरकार व सध्याचे सरकार यांची शैक्षणिक धोरणं किती केविलवानी आणि अन्यायकारक आहेत याचा योग्य परामर्श केल्याबद्दल आपले अभिनंदन सर. जय शिक्षक भारती. जिन्दाबाद सर..

    ReplyDelete
  33. मोरे सर खुपच छान मुद्दे मांडले आपण 👍. कपिल पाटील सरांनी पत्र व्यवहार केलेलाच आहे. पण तुम्ही म्हणल्या प्रमाणे मागचे सरकार काय किंवा आताचे काय... एकाच पकडीचे दोन दांडे आहेत. शिक्षण खात्याची वाताहात करण्याचे यांनी ठरवलेलेच आहे.
    त्यात आता लोकप्रतिनिधी पण शिक्षकां प्रति सन्मान दाखवत नाहीत. यांच्या संपत्तीचे आणि पगार/पेन्शनचे मुल्यमापन होणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मूल्यमापन झालेच पाहिजे.

      Delete
    2. Khupach chaan sir. Aamachya shikshakanchya manatil sarvach prashna mandale aahet.

      Delete
  34. त्या bjp चे लोकप्रतिनिधी चे काम किती आहे याची चौकशी लावा.

    ReplyDelete
  35. त्या bjp चे लोकप्रतिनिधी चे काम किती आहे याची चौकशी लावा.

    ReplyDelete
  36. अगदी समपर्क उत्तर,मुद्देसूद मांडणी.आमदार, खासदार व मंत्रालयीन अधिकारी,सचिव यांनी शिक्षणाचा खेळ करून ठेवला आहे.शिक्षकांचा(गुरू)आदर करा अन्यथा विनाश जवळ आहे. सांगा या बिनडोक सरकारला कुणीतरी.
    आश्रम शाळेची अवस्था तर याहून बिकट आहे. शिकणे,खाणे,राहणे,झोपणे व बाकी इतर सर्व कामे तिथेच. एकाला काही झाले की संपूर्ण शाळा कुलूपबंद. आणि जबाबदार मात्र...... अधिक्षक.

    ReplyDelete
  37. Politician should evaluate themselves first.
    Sir you hv well explained and proper points.we are with you
    Thanks

    ReplyDelete
  38. हे विनय नातू असोत अथवा विनोद तावडे,
    बुद्धी आहे तशीच आहे. त्यात फरक नाही पडायचा. कदाचित भारतीय जनता पार्टी च्या या महाशयांना शाळा, शिक्षण शिक्षक आणि शैक्षणिक वातावरण या बद्दल ना माहिती आहे ना रस. शिक्षकांच्या पगारावर लक्ष असणारे जे महाभाग आहेत-त्यांचे दर्शन फेसबुक च्या कॉमेन्ट मध्ये होतेच-त्यातलेच हे पण आहेत बस.
    बाकी कपिल पाटील साहेब, आपल्या कर्तृत्वाचा डंका चहू बाजूला आहे हीच समाधानाची बाब. धन्यवाद

    ReplyDelete
  39. हे विनय नातू असोत अथवा विनोद तावडे,
    बुद्धी आहे तशीच आहे. त्यात फरक नाही पडायचा. कदाचित भारतीय जनता पार्टी च्या या महाशयांना शाळा, शिक्षण शिक्षक आणि शैक्षणिक वातावरण या बद्दल ना माहिती आहे ना रस. शिक्षकांच्या पगारावर लक्ष असणारे जे महाभाग आहेत-त्यांचे दर्शन फेसबुक च्या कॉमेन्ट मध्ये होतेच-त्यातलेच हे पण आहेत बस.
    बाकी कपिल पाटील साहेब, आपल्या कर्तृत्वाचा डंका चहू बाजूला आहे हीच समाधानाची बाब. धन्यवाद

    ReplyDelete
  40. सणसणीत उत्तर

    ReplyDelete
  41. खूपच जबरदस्त शिक्षक व शिक्षण यांना समजण्यासाठी गरजेचे आहे

    ReplyDelete
  42. मोरे सरांनी साल काढलीत ती बार केलं, अशी पण याची चामडी जड झाली आहे, कसलईच संवेदना शिल्लक राहिली नाही यांच्या कडे.

    ReplyDelete
  43. छान कान उघडणी केली आहे.उत्तम

    ReplyDelete
  44. अतिशय समर्पक आणि वास्तव चित्र रेखाटणारा लेख, धन्यवाद सर

    ReplyDelete
  45. सरजी, वास्तव मांडले.

    ReplyDelete
  46. खूपच छान लेख सर

    ReplyDelete
  47. सर खूप आभार!
    शिक्षकांची व्यथा आणि परिस्थिती जाणून घेऊन योग्य मांडले.

    ReplyDelete
  48. खूप वास्तववादी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करणारी आपली लेखणी आहे सर, खूप खूप धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  49. अगदी योग्य शब्दात उत्तर. आपले आभार सर!

    ReplyDelete
  50. सुभाष माेरे सर, अतिशय वास्तव परीस्थितीचे वर्णन केले आहे.सामान्य जनतेला शिक्षकांचे कार्याविषयी काहीच घेणे देणे नाही कारण त्यांचे काम शिक्षकांविषयी अडतच नाही.

    ReplyDelete
  51. सरजी, वास्तव मांडले

    ReplyDelete
  52. अगदी वास्तव परिस्थिती मांडली.

    ReplyDelete
  53. शिक्षकांचे मूल्यमापन करणार कोण हे सारेच अंगठेबहादूर ,लाळघोटे आपणास याबद्दल खूपच माहिती असेल असो शिक्षकांचे दुःख मांडणारा नेता तरी सापडला

    ReplyDelete
  54. अगदी योग्य शब्दात म्हणणे मांडलेत सर 👍

    ReplyDelete
  55. मोरे सर छान समाचार घेतलात आपण. पण या चोट्ट्यांना काही फरक पडत नाही. काविळीने ग्रस्त अशा यांना शिक्षकांचे कार्य दिसणारे नाही.

    ReplyDelete

  56. अगदी योग्य शब्दात म्हणणे मांडलेत सर👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  57. साहेब खरंच परीपुर्ण असे उत्तर दिलं आहात.फक्त कोवीड १९ नाही तर कोणत्याही परिस्थितीत देशावर आली तर सर्व प्रथम प्रत्येक विभागाला शिक्षकांची आठवण येते. निसर्ग चक्रीवादळात सुध्दा तलाठ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.या सर्व गोष्टींचा विसर आपल्या राज्य कर्त्यानां पडला आहे असे वाटते.....

    ReplyDelete
  58. श्री.मुबीन बामणे सर सचिव शिक्षक भारती उर्दू महाराष्ट्र राज्य

    ReplyDelete
  59. शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राची अवमानना कुठे तरी थांबलीच पाहिजे
    खूप छान सर

    ReplyDelete
  60. खरच अतिशय मार्मिक आणि सत्य मत माननीय सुभाष सरांनी मांडले आहे.शिक्षक कामासाठी केव्हाच नाही म्हणत नाहीत आणि म्हणणार हि नाहीत कारण त्यांना ती मुभाच त्यांना दिली जात नाही.शिक्षक शाळेत येण्यासाठी नकार देत नाहीच पण विद्यार्थी शाळेत नाहीत तर येवून करणार काय त्यापेक्षा घरी राहून विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिकविण्याची तयारी तरी करू शकतील.त्याशिवाय येण्या जाण्याच्या प्रवासात शिक्षकांना असणारा धोका सुद्धा टळेल.एकेकाळी शिक्षकांना देव मानणारा समाज होता आणि आज शिक्षकांना वेठबिगार समजणारी राजकीय व्यवस्था आणि परिणामी समाज निर्माण झाला आहे.याचा धोका लोकांना आज कळणार नाही पण भविष्यात घडणारे नागरिक ,स्वतःची मुले जेव्हा बुद्धिमान असून सुद्धा व्यवहारिक वागतील तेव्हा लोकांना शिक्षकांची किंमत कळेल.कारण तेव्हा शिकविणारा शिक्षक सुद्धा याच व्यवस्थेतून घडलेला असेल,तर तो विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानापलिकडे जाऊन संस्कार देवू शकणार आहे का? देश भले आधुनिकतेकडे झुकलेला असेल पण माणुसकीला मुकलेला असेल.पुन्हा एकदा सुभाष सराना खूप खूप धनयवाद की त्यांनी शिक्षकांच्या वतीने हे लोकांसमोर आणले आणि परखडपणे बाजू मांडली.

    ReplyDelete
  61. अगदी बरोबर

    ReplyDelete
  62. अगदी बरोबर मोरे सर
    आम्ही आपल्या सोबतच आहोत

    ReplyDelete
  63. शिक्षकांच्या समस्या समाज व शासनासमोर अगदी परखडपणे मांडलेले आहेत. त्याबद्दल सुभाष सरांचे आभार.

    ReplyDelete
  64. अगदी बरोबर आहे सर .

    ReplyDelete
  65. In writing..show the true picture

    ReplyDelete
  66. वस्तुस्थिती मांडली सर

    ReplyDelete
  67. बरोबर आहे मोरे सर
    मूल्यमापन करणे याचे ज्ञान कोणी दिले याचे उत्तर मागता येईल

    ReplyDelete
  68. एकदम बरोबर सर...

    ReplyDelete
  69. याला एकच उत्तर २००५ नंतर आमदार झालेल्यांची पेंशन बंद बस

    ReplyDelete
  70. शिक्षकांची बाजू योग्य पद्धतीने मांडल्याबद्दल धन्यवाद. या सर्व कामा सोबत राज्यातील आश्रम शाळेतील शिक्षकांना खावटी अनुदानाच्या सर्व्हेक्षणावचे कामही दिले गेले.पण आजतागायत तीन महिन्यापासून वेतनही दिले गेले नाही.सातव्या वेतनाचा पहिला हप्ता व अन्यायकारी डी सी पी एस चा पहिला हप्ताही रोखीने मिळाला नाही.

    ReplyDelete
  71. खुब छान सरजी,

    ReplyDelete
  72. कल्याणकारी राज्याची संकल्पना समजून देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.

    ReplyDelete
  73. अत्यंत योग्य शब्दात साऱ्या शिक्षकांच्या भावना आपण व्यक्त केल्या सरजी...👌👌👍

    ReplyDelete
  74. बरोबर आहे सर्वांना फक्त पगार दिसतो . त्रास दिसत नाही . विदयार्थी घडविणे व त्यांच्यात मूल्ये रुजवणे एवढे सोपे नाही . शिक्षकाच्या कामाची तुलना पैशात होऊच शकत नाही मात्र दुर्देवाने समाजाला आणि राजकारण्यांना फक्त आर्थिक गणित जुळवण्यातच धन्यता वाटत आहे .

    ReplyDelete
  75. सत्य परिस्थिती

    ReplyDelete
  76. स्पष्ट व सडेतोड 👌👍

    ReplyDelete
  77. पण यांना जाग कधी येणार ?

    ReplyDelete
  78. राजकारणी लोकांना शिक्षकांनी कायम दूर ठेवले पाहिजे
    त्या वेळेस त्यांना आपली किंमत कळेल पण असे होत
    नाही आपली काही लोक ते सोबत घेतात व माहिती घेऊन
    आपल्या विरोधात त्याचा वापर करतात कारण समाजात आपल्या सारखा स्वच्छ पेशा कोणताच नाही आपले कोणत्या
    आमदार किंवा खासदाराकडे आपले काम नसते हे लक्षात
    घेणे गरजेचे आहे

    ReplyDelete
  79. अगदी सत्य परिस्थितीमांडली आहे.

    ReplyDelete
  80. अगदी योग्य आहे.

    ReplyDelete
  81. मा. मोरे सर,
    सादर प्रणाम.
    सर, तुमच्या अभ्यासपूर्वक विचारांशी समस्त शिक्षक सहमत असतील यात शंका नाही. शिक्षकाचा सन्मान करण्यासाठी मनाचा मोठेपणा व औदार्य लागते यांच्यामाते, शिक्षक म्हणजे यांचा सालगडी आहे...वाटेल तिथे वापर करुन घ्यायचा निवडणूक काय, जनगणना काय, वनमहोत्सव, चेक पोस्ट. सर्वेक्षण, आपत्तिव्यवस्थापन वगैरे वगैरे त्यात ऑनलाइन, ऑफलाईन, प्रशिक्षण, ही माहिती दे ती माहिती दे....सारा तुघलकी कारभार चालू आहे. जाशी काय यांची मालमत्ता आहे पगार देतात म्हणजे यांच्या खिशातूनच देतात. रोज नवीन GR काय काढतात....सगळा बट्ट्याबोळ !! 15 वर्ष यांना DCPS चा साधा हिशोब देता येत नाही याला काय म्हणायचे...केवळ निश्क्रियता!! गेली 15 वर्ष हक्काच्या पेन्शन साठी आपण लढा देतोय कित्येक बांधव मेले त्यांची कुटुंब उघड्यावर आली मात्र ह्या निडरांना दया नाही आली....त्यांनी मात्र त्यांचे भत्ते काय वाढवले...मानधन काय वाढवले....पेन्शन काय..काहींना म्हने दोन दोन पेन्शन??? मुळात पेन्शन ही पगारी कर्मचारी यांना आसते..मानधनावर काम करनारया समाज्सेवकांना पेन्शन नसतेच. हे DCPS द्यायच्या सुद्धा पात्रतेच्या नाहीत. प्रत्येक शिक्षक हा उच्च शिक्षित आहे यांच्या सारखा आंगठे बहाद्दूर नाही...त्यामूळे शिक्षकांच्या बद्दल असे वक्तव्य करणे म्हणजे आपलीच अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा निर्बूद्ध प्रकार दुसरे काय.....यासाठी सर्वांनी संघटीत होऊन यांना जाब विचारायला पाहिजे...मला वाटते ते आपल्या स्थायी स्वभावाचा गैरफायदा घेतात...ही का लोकशाही ??
    खरे तर आपण अगदी वस्तविकतेला धरुन कानउघडनी केली आहे....सलाम !!!

    ReplyDelete
  82. Absolutely correct sirji keep going

    ReplyDelete
  83. खूप छान लेख सर .

    ReplyDelete
  84. अगदी बरोबर


    ReplyDelete
  85. Sir अतिशय परखडपणे आपण आपले विचार मांडले आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन लोकप्रतिनिधी किंवा राजकारणी लोक केवळ पाच वर्षासाठी सत्तेवर येतात व आपल्या मनमानी स्वभावानुसार शिक्षकांवर ताशेरे उडतात शिक्षकाचे समाजातील स्थान काय आहे याचे प्रशिक्षण देण्याची गरज खरंच आता आहे असे वाटते करुणा च्या पार्श्‍वभूमीवर सर्व शिक्षकांनी तंत्रस्नेही असून नसून देखील ऑनलाइन टिचिंग चे काम केले आहे करीत आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा करिता अहोरात्र शिक्षक झटत आहे केवळ शिक्षकांच्या पगारावर डोळा ठेवून आपलं मात्र झाकत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे शिक्षकांवर खुलेआम ताशेरे ओढणे थांबले पाहिजेत तुलना करणे बंद झाले पाहिजे असे मला वाटते पुन्हा एकदा आपले अभिनंदन

    ReplyDelete
  86. खूप छान लेख शिक्षकांच्या कामाबद्दल अतिशय तळमळीने भावना व्यक्त केल्या आहेत शिक्षकांच्या इतर कामांचे मोजमाप कुठेही केले जात नाही याची जाणीव करून दिली

    ReplyDelete
  87. संजय पाटील सर इंदापूर
    अगदी बरोबर सर 50/उपस्थितीचा आदेश रद्द झालाच पाहिजे.

    ReplyDelete
  88. अप्रतिम,अभ्यास पूर्ण लेखन मोरे सर जय शिक्षक भारती लढू या जिंकू या...!

    ReplyDelete
  89. आदरणीय मोरे सर,
    असल्या कमी बुद्धीच्या लोकांना अशीच सणसणीत चपराक दिली गेली पाहिजे. अतिशय प्रभावी लेखन केलेत आपण.

    मला एक प्रश्न राजकारण्यांच्या बाबतीत नेहमीच पडतो, राजकारण ही समाजसेवा आहे तर मग पगार आणि निवृत्तीवेतन कशासाठी? आणि जर का राजकारण ही नोकरी आहे तर तिथे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता का नाही?

    ReplyDelete
  90. Very nice your message to MLA

    ReplyDelete
  91. आजरोजी शिक्षकांच्या समस्या व अडचणी यांना वाचा फोडणारी एकमेव संघटना म्हणजे शिक्षक भारती ...!
    संघटना मजबूत करण्यासाठी आपण व्यवसाय बंधूंनी एकत्रित येवून मा . कपिल पाटील , साहेबांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे .
    ( हे माझे व्यक्तिगत मत आहे . कोणीही विपर्यास करू नये . )

    ReplyDelete
  92. वास्तव स्थिती मांडण्याचे कार्य केलात आपण अगदी बरोबर वस्तुस्थिती मांडली सर..

    ReplyDelete
  93. वास्तवदर्शी प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनात खदखदणारी सलं आपण पूर्ण केलीत

    ReplyDelete
  94. अगदी बरोबर आहे सर.ज्यांना शिकता आले नाही म्हणून राजकारणात गेले अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार?

    ReplyDelete
  95. अगदी बरोबर आहे सर.ज्यांना शिकता आले नाही म्हणून राजकारणात गेले अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार?

    ReplyDelete
  96. अगदी बरोबर आहे सर.ज्यांना शिकता आले नाही म्हणून राजकारणात गेले अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार?

    ReplyDelete
  97. सुभाष मोरे सर आपण वस्ततुस्थिती मांडली आहे याचा सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे .

    ReplyDelete
  98. खूपच सुंदर सर !आता तरी प्रशासनाला जाग येईल का ? झोपलेले जागे करता येतात पण सोंग घेतलेलं सरकार कधी जागे होईल ? अनेक सरकार येतील जातील पण शिक्षकांचे प्रश्न तसेच आहेत . सर्व संघटना एकत्र एऊन लढा दिला पाहिजे .

    ReplyDelete
  99. म्हणात ना! जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!
    मोरे सर
    आपण कडक भाषेत , समर्पक शब्दात वास्तव चित्र उभं केलं आहे.

    ReplyDelete
  100. जबरदस्त! शिक्षकांच्या पगारावर डोळा असणाऱ्यांना सडेतोड उत्तर.
    धन्यवाद सुभाषजी.

    ReplyDelete
  101. 5 वर्षे लोकसेवक म्हणून निवडून येणार आणि मरेपर्यत पेन्शन खाणाऱ्या लोकांना शिक्षकांचा पगार काढण्याचा काहीही अधिकार नाही आणि इतकाच काय मुंगळा उठला असेल तर स्वतःची पेन्शन सरेंडर करावी आणि गप्प बसावी
    आणि त्यावरही मनाचं समाधान होत असेल तर स्वतःची सर्व मालमत्ता विकावी आणि जे शिक्षक गेली 15 वर्षपासून विनावेतन काम करत आहेत त्यांच्यासाठी ते पैसे खर्च करावे
    किंवा सरकारी एक रुपयाही न घेता 10 जगून दाखवावं

    ReplyDelete
  102. 5 वर्षे लोकसेवक म्हणून निवडून येणार आणि मरेपर्यत पेन्शन खाणाऱ्या लोकांना शिक्षकांचा पगार काढण्याचा काहीही अधिकार नाही आणि इतकाच काय मुंगळा उठला असेल तर स्वतःची पेन्शन सरेंडर करावी आणि गप्प बसावी
    आणि त्यावरही मनाचं समाधान होत असेल तर स्वतःची सर्व मालमत्ता विकावी आणि जे शिक्षक गेली 15 वर्षपासून विनावेतन काम करत आहेत त्यांच्यासाठी ते पैसे खर्च करावे
    किंवा सरकारी एक रुपयाही न घेता 10 जगून दाखवावं

    ReplyDelete
  103. एकदम बरोबर आहे, आपल्या वेदना आपल्यालाच ठाऊक, ते तिरॖ्हाईत कसं ठरवणार, पण खूप छान मांडला आहे सर तुम्ही हा विषय

    ReplyDelete

  104. खूपच सुंदर सर ! वास्तव स्थिती मांडण्याचे कार्य केलात आपण अगदी बरोबर वस्तुस्थिती मांडली सर धन्यवाद!

    ReplyDelete
  105. अगदी बरोबर.......

    ReplyDelete
  106. अगदी बरोबर आहे सर, ईंट का जवाब पत्थर से।

    ReplyDelete
  107. मनापासून सलाम सर. खूपच छान

    ReplyDelete
  108. Very true more sir. You raised very valid points

    ReplyDelete
  109. आव्हानात्मक भविष्याचे प्रश्न सोडवण्या ऐवजी आज शिक्षकांवर अशी वेळ यावी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. युवा पिढीला आपल्या आदर्श शिक्षकांची ही अशी आणीबाणी झालेली पाहता स्वतः शिक्षक व्हावं असं अजिबात वाटताना दिसून येत नाहीये. वरील मांडलेले प्रश अगदी योग्य आहेत आणि मुळात शिक्षण-विद्यार्थी यांना जोडणारी कडी जर तुटली तर समाजात बौद्धिक पातळीवर दोन स्तर तयार होतील. " #राजा के बेटा ही राजा बनेगा". शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा स्पर्धात्मक कठीण काळ हा ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कधीच न संपणारा असेल.
    अभिमान आहे अशा शिक्षकांचा जे या परिस्थितीतही स्वतः एक नेतृत्व घेऊन अनेक शिक्षकांचा आवाज होत आहेत, कर्तव्य निभावत आहेत.

    ReplyDelete
  110. रोखठोक, वास्तवता दर्शविणारा, अभ्यासपूर्ण लेख... 👍👍💐💐💐🙏

    ReplyDelete
  111. सर्व शिक्षक बांधवांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या मुद्द्यांना अनुसरून या असल्या राजकारणी नेते आमदार खासदार यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केल्या पाहिजे किमान 10 शिक्षक मिळून 1 मुद्दा अशापद्धतीने सगळे खंडपीठ, जिल्हा सत्र न्यायालये उच्च न्यायालये येथे हजारो याचिका दाखल झाल्या तर ह्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही आणि हे करत असताना अपल्यातलेच जे काही या राजकारण्यांचे चमचे आहेत त्यांनाही त्यांची जागा दाखवावी लागणार आहे.

    ReplyDelete
  112. सर्व शिक्षक बांधवांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या मुद्द्यांना अनुसरून या असल्या राजकारणी नेते आमदार खासदार यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केल्या पाहिजे किमान 10 शिक्षक मिळून 1 मुद्दा अशापद्धतीने सगळे खंडपीठ, जिल्हा सत्र न्यायालये उच्च न्यायालये येथे हजारो याचिका दाखल झाल्या तर ह्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही आणि हे करत असताना अपल्यातलेच जे काही या राजकारण्यांचे चमचे आहेत त्यांनाही त्यांची जागा दाखवावी लागणार आहे.

    ReplyDelete
  113. कोणीही उठतय आणि शिक्षकाबाबत गरळ ओकतय.असल्या राजकारणी मानसिकतेचा संघटनेच्या माध्यमातून समाचार घेतलाच पाहिजे.

    ReplyDelete
  114. समर्पक आणि वास्तव चित्रण केले आहे सर.

    ReplyDelete
  115. रोखठोक उत्तर

    ReplyDelete
  116. कुठलंही विचार न करता केलेले वक्तव्य आहे
    .

    ReplyDelete
  117. सरजी योग्य व रोकठोक भूमिका

    ReplyDelete
  118. खरंच छान उत्तर

    ReplyDelete
  119. सर यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करायला पाहिजे मग नंतर दुसऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची गोष्ट करावी

    ReplyDelete
  120. Thank you for making people aware of the injustice being done to the students and teachers. God bless you 🙏

    ReplyDelete
  121. सर,उत्कृष्ट वक्तव्य..... फारच छान..

    ReplyDelete
  122. अगदी बरोबर आहे
    सरकारला ५ वर्षासाठी निवडून येणारे आमदार व मंत्र्याना जुनी पेंशन देता येते पण आपला पूर्ण जीवन शिक्षक म्हणून सेवा करणाऱ्या साठी जुनी पेंशन देता येत नाही.

    ReplyDelete
  123. शिक्षकांच्या समस्या मांडल्या त्याबाबत सरांचे आभार...

    ReplyDelete
  124. अगदी बरोबर आहे सर

    ReplyDelete
  125. Ajita Ajit Lanjekar. S.E.C DAY SCHOOL (santacruz)
    Very true Mr.More sirji ,Nice your m,essage to MlA. You raised very valid points

    ReplyDelete
  126. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केलेल्या सुचनेनुसार प्राथमिक शिक्षकांचे वेतन इतर कोणत्याही शिक्षकांपेक्षा जास्त असावे निर्देशित केले आहे.सत्य परिस्थिती ही जो पगार मिळतो तो देखील कधीच वेळेवर मिळत नाही.आणि हे आपला पगार काढणार??? तुम्ही अगदी बरोबर आहात.सर

    ReplyDelete
  127. अति सुंदर व विचारप्रधन लेख आहे, सर.

    ReplyDelete
  128. Writing very well
    राज्यातील सर्वात मोठी कर्मचारी संख्या म्हणजे शिक्षक
    पण शंभर संघटनेच्या रुपाने विभागलेली ताकत एकजुट झाल्या शिवाय कोणालाच दिसणार नाही
    मी अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव या वादात सामान्य शिक्षक संपनार आहे

    ReplyDelete
  129. छान व योग्य मांडणी.

    ReplyDelete
  130. अगदी बरोबर आहे सर, छान.

    ReplyDelete
  131. Khupach chhan lekh sir agdi yogya Uttar dile ahe. apan nehmi shikhakanchya bajune khambirpane lihita hatts off to you and hatts off to shikshak Bharti 🙏

    ReplyDelete
  132. अगदी बरोबर आहे सर तुमचे आभार

    ReplyDelete
  133. अगदी सडेतोड उत्तर दिले सर आज याची गरज होती.

    ReplyDelete
  134. शिक्षक हा सेवा करतो . कितीतरी वर्षे तुटपुंज्या पगारावर मास्तर गुजराण करायचे. आपल्या संघटनेमुळे शिक्षकांना चांगले दिवस आले. पगार वाढले पण कामेही वाढली. अशैक्षणिक कामेही लागली. तेव्हा का नातू बोलले नाहीत?
    मोरेसर खूप छान कानउघाडणी केली आहे. 👌

    कल्पना शेंडे
    अध्यक्ष, मुंबई
    शिक्षक भारती.

    ReplyDelete
  135. The Best Casinos Near Pittsburgh, PA | Mapyro
    Discover the best casino and 서귀포 출장샵 play poker games near Pittsburgh, PA. From a gaming 원주 출장안마 table 여주 출장마사지 to the casino floor, you'll find 대전광역 출장마사지 all the games in 상주 출장샵

    ReplyDelete