Sunday 27 June 2021

50% उपस्थितीतून सुटका. वर्क फ्रॉम होमची परवानगी मिळाली

शिक्षक भारतीच्या आंदोलनाचे यश

मुंबईसह राज्यभरात 15 जून पासून नियमितपणे शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना उपस्थिती बंधनकारक करण्यात आली होती.  ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी दिली नव्हती. मागील पंधरा दिवसापासून आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून शिक्षक भारतीने सातत्याने प्रवास करण्याची परवानगी द्या अथवा वर्क फ्रॉम होम सुरु करा अशी मागणी लावून धरली होती. आज अखेर शिक्षण विभागाला उशिरा शहाणपण सुचले. मुंबई आणि एम एम आर विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ची परवानगी मिळाली.







दहावीच्या निकालाशी संबंधित सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती आणि इयत्ता पहिली ते नववी ला शिकविणाऱ्या शिक्षकांना 50 टक्के उपस्थितीची अट लादण्यात आली होती. परंतु  ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी देण्यास शासन तयार नव्हते. मुंबईतील शाळांमध्ये नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई विरार, कर्जत, कसारा, पालघरपासून ट्रेनने प्रवास करून काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.  ट्रेन सुरु नसल्याने दररोज 1000 ते 2000 रुपये खर्च करून खाजगी वाहने अथवा टॅक्सीने प्रवास करावा लागत होता. अनेकांना रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने विनातिकीट प्रवास करावा लागला. विनातिकीट प्रवास केल्याने नाहक दंड भरण्याच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. बसने प्रवास करणाऱ्या महिला व पुरुष शिक्षकांना दररोज चार ते पाच तास प्रवास करावा लागत होता. याविरोधात शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना भेटून निवेदन दिले होते. परंतु वारंवार आश्वासन देऊनही ट्रेनच्या प्रवासाची परवानगी देण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरला. शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळाच्या विरोधात शिक्षक भारतीने मुंबईतील तिन्ही शिक्षण निरीक्षक कार्यालयावर जोरदार आंदोलन केले. तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयातही जाऊन वर्क फ्रॉम होम सुरू करण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास शिक्षक भारतीच्या महिला आघाडीने शिक्षणमंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्धार केला होता. आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वर्क फ्रॉम होमची परवानगी द्या अथवा ट्रेनचा प्रवास करण्याबाबत परवानगी मिळण्याबाबत विनंती केली होती. कपिल पाटील यांच्या मागणीनुसार शिक्षणमंत्र्यांना बोलावून याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले होते. त्यानुसार आज अखेर शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण व जोरदार आंदोलनाची दखल शिक्षण विभागाला घ्यावी लागली. शिक्षण संचालक आणि शिक्षण उपसंचालक यांनी मुंबईसह एम एम आर रिजनमधील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे.


निकालाचे काम करणाऱ्यांना दिलासा नाहीच
शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी आठ दिवसापूर्वी दहावीच्या निकालाशी संबंधित काम करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती लिंकद्वारे घेतली होती. पण त्याचे काय झाले हे अद्यापि स्पष्ट करण्यात आले नाही. ट्रेनची परवानगी देणे दूरच पण पास मिळणार की नाही हेही सांगितले जात नाही. शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी आज काढलेल्या पत्रानुसार निकाला संबंधी काम करणाऱ्यांना पर्यायी व्यवस्था काय करता येईल का? याची माहिती बोर्डाच्या सचिवांकडे मागितली आहे. एकूण काय शिक्षण विभागाचा गलथानपणा थांबलेला नाही. माहिती मागायची पण कार्यवाही काहीच करायची नाही. पण या सगळ्यांमध्ये शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा कोणीही विचार करताना दिसत नाही. शिक्षण विभागातील अधिकारी झोपेत आहेत की काय? असा प्रश्न पडतो. शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत शिक्षणमंत्री गांभीर्याने विचार करणार का? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

शिक्षण विभागाला संवेदनशील, वस्तुस्थितीला धरून निर्णय घेणारे, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना प्राधान्य देणारे आणि राज्यातील शाळांचा दर्जा व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षणमंत्री कधी मिळणार? हा मोठा यक्षप्रश्न आहे.

आपला स्नेहाकिंत 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य

31 comments:

  1. Hello sir... thanks for this blog... please look after the case Shishan Sevak struggling...passed tet after 30 March 2019...pls look forward

    ReplyDelete
  2. जय शिक्षक भारती!
    लडेंगे ! जितेंगे !

    ReplyDelete
  3. खूप गरजेचं होतं,तिकीट न मिळाल्याने 9000 खर्च झाले.

    ReplyDelete
    Replies
    1. त्यापेक्षा जास्त वाचवलेत की

      Delete
  4. 10 वी प्रश्न प्रलंबित,,,

    ReplyDelete
  5. लढेंगे जितेंगे.जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  6. Thank you very much. God bless

    ReplyDelete
  7. Very Good really helpful. Always support us

    ReplyDelete
  8. Sir, also do something for Kalyan rural.

    ReplyDelete
  9. स्तनदामाता आणि गरोदर महिला शिक्षीकासाठी पण शिक्षक भारतीने काहीतरी करूनwork from home करावे कारण त्यांना किमान1.5 वर्ष लस घेता येत नाही त्यामुळे सार्वजनिक वाहनाने प्रवास करता येणे धोकादायक आहे ... दोन जीवांचा प्रश्न असल्याने कृपया सहानुभूतीपुर्वक विचार करावा

    ReplyDelete
  10. नवशैक्षणिक वर्षातील नवोपक्रममार्गदर्शनासाठी आभार. ब्रीजकोर्स लिंक मध्ये प्राथमिक पदवीधर शिक्षक हा पर्याय हवा.एका पगारावर घर तरी विधवा भरते आयकर.अपंगकर्मचारीसारखे प्रवास वाहनघरखरेदी रोड टॅक्स कर्मचारी भत्ता,व्यवसायकर कोरोना मतदान जनगणना ड्युटीसुट हवी.नंतर अनाथ दोन अपत्य यांना एक कर्मचारी एकदा पेन्शन नुसार जोडीदाराने न घेतल्याने आधीच ए ग्रेडतरी मराठा म्हणून शिक्षणसेवक पासुन लागल्याने प्रत्येक शाळेचे लेकरं गुणवंत केले म्हणून पेन्शन योजना लागू करण्यात आली तेव्हा नोकरी त लागलो म्हणून आयुष्यभर मिळायला हवी. मी दोन्ही पायांनी कायमचे अपंग अवलंबून बेरोजगार पती ची औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव अपंग जोडीदार एकल महिला शिक्षिका तरी पतीला ते कर्मचारी नसल्याने जिवंतपणी लाभ मिळाला नाही.माजी सैनिक वडील ही शिक्षक बदलीत आजवर नव्हते.ते ही गेले.बालसंगोपन रजेत अपंगपतीनसल्याने दोन्हीलहान लेकरं असूनही तीन जिल्हा बॉण्ड्री वर बदली वेळी 99रजा अर्जित गेल्या.मेरिटमुळे शासकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून केंद्रीय सीईटी ने नियमित पूर्णवेळ बीएड केले म्हणून 285दिवस बिनपगारी रजा गेल्या.एक वेतनवाढ गेली.खाजगी अर्धवेळ शिफ्ट सगळ्यांना पाच महिन्यांतपदवी वनियमितवेतनवाढही मिळाली.शासकीयचे उपस्थितीपत्र शासकीय नेच अध्ययन रजेने मोजून प्रशिक्षण रजा करून कुणाचाच तोटा नव्हता.डीएडवर नोकरी तरी दहावी बारावी ऐच्छिक विषयांची भाषा सूट सक्ती आहे.एम.ए.संस्कृत बीएड मुळे चार तालुके झाले.दहावी, बारावी, डीएड बीएड ला मराठी हिंदी होते का,असा फॉरमॅट असावा.आरटीईने सहाते आठवर नियुक्ती वर्ग पाचतेआठचेउघडले.तिसरेपदनसलेतरी पदवीधर सगळे विषय शिकवतो.आता वाहने उपलब्ध नाहीत.दोन्ही लेकरं जन्म व माझे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया घाटीतलेच असून सेल्फ प्रमोटर केस ची आयुष्यात स्वतःपासूनलहान कुटुंब आदर्श एकही अबार्शन रजाहीर नाही एक वेतनवाढ नाही.विद्यार्थी नवोदय शिष्यवृत्ती पात्र दहावीला संस्कृतला शंभर पैकी शंभर गुण घेणारे घडवले.तीमाहिती कुठेच भरता येत नाही.सगळे ए ग्रेड तरी आदर्शशाळानिकषांत शिक्षक गुणवत्ता नाही.विधवा पदोन्नती स्वतंत्र यादी हवी.नंतर अनाथ मुलांना अनुकंपात तात्काळ घ्यावे.विशेष मुलांसारखे विधवांना राज्यस्तरीय खेळ, लेकरांच्या दहावी बारावी वार्षिक परीक्षेसाठी वेळापत्रक जोडून पगारी रजा हवी.पतीची पेन्शन न घेणारे या अल्पसंख्य महिलांना न्याय द्यावा.अठरा वर्षात एकही इलेक्शन ड्युटी रद्द केली नाही जनगणना एकही फॉर्म न चुकता केली आहे त्याचे प्रशंसा प्रमाणपत्र आजवर मिळाले नाही.औरंगाबाद शिक्षक सोसायटी उचलून अपंग पतीनावे फोरव्हीलर घेतली.कर्मचारीतर बहुतेक सोळा हजार गेअर इ.हातांतसाठी लागतात आम्हाला बेरोजगार मुळे साठहजार खर्च आला.आता पतीही गेले.अपघातात जिवंत साठीचा एकमेव प्रधानमंत्री सुरक्षा बीमा होता,बारा रुपये कपात,8/11/2015ला पायी जाताना गाडीने उडवले,मा.घाटीचे प्रमाणपत्र 1/12/2016ला मिळाले.सर्वांना अपघातानंतर इलाजानंतर वर्षानेच मिळते. सहा महिन्यांत क्लेम कशाच्या आधारावर करणार? म्हणून नाही मिळाले.कला क्रीडा विशेष शिक्षक पदवीधर जागेवर मोजतात म्हणून पदवीधर उडतो.तेही नुकसान टाळावे.प्रभारी म्हणून कामे करतोच पण वाहनेही नाहीत,मला गाडीही येतनाही,पाचपट भाडे रोज देते.कर्मचार्याचा अपंग जोडीदार चे न्यायदाते माझे पती यांनी इथे कुटुंब टिकले म्हणून आल्यावर ते व दोन्ही लेकरांच्या इच्छेने सातारा तांडा ची पहिली महिला प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून आमच्या सारखे अपंग एकल अनाथ चे सहा मुलांना दोन व नियमित येणारेच वंचित राहतात ते त्रेसष्ठ मुलांना एकेक असे एकोणसत्तर मुलांना मोफत गणवेष वाटले.तसे सर्व लेकरांना मिळावे.शाव्यस अध्यक्षपद आजवर महिला नाही तिथे संधी द्यावी.दोन अपत्य अट असावी.न ऊ वाले हटत नाही, दोन वाले वंचित राहतात.दुसरे जुळे तर सुट असावी.अपंग बेरोजगार किंवा विधवा कर्मचारी कुटुंब प्रमुख तर आजारखर्च, दोन अपत्य शिक्षण खर्च कमी असावा. रेशनकार्डावर धान्य मिळावे.अॉनलाईन कामासाठी अनुमती असावी.आर्थिक स्थिती पाहून बदलीत एकलचा विचार करावा. जिल्हा बदली सिटी अलाउन्स चीशाळातर दहाबारा वर्ष व टोकाची तर बदली नोकरी चा जोडीदार वाले करतील.एकल, अल्पभूधारक,माजी सैनिकपाल्य नातू, व तीनवर्षाचे लेकरं असणारे ही आहेत, खाजगी संस्थेतून आलेले ही आहेत.त्यांसाठीच प्रत्येक संवर्गाचा एकेक शिक्षक शाळेत हवा.नोकरी नियुक्ती वेळी दिव्यांग असणारे किंवा अपघाताने दिव्यांग असे कमी आहेत.अपंग पुरूष बेरोजगारला साधी शिलाई मशीन नाही मिळत.दत्तक लेकरांचा ही विचार व्हावा.आपत्कालात सरसकट निधी देतोच किमान समस्या समजून घेऊन काम करवून घेऊन न्याय द्यावा.

    ReplyDelete
  11. रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी नसल्यामुळे अनेक रेल्वेप्रवासी बसने प्रवास करू लागले आहेत.बसप्रवासातही उभ्याने प्रवास करण्यास मनाई असल्याने बसमार्गातील सुरवातीच्या ५-६ बसस्थानकावरच बस पुर्णपणे भरते.त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणावरून प्रवास करणऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.बसस्थानकावर बसच थांबत नसल्याने मिळेल त्या वाहनाने टप्प्याटप्प्याने प्रवास करत किंवा थेट रिक्षाने महागडा प्रवास करत शाळेत उपस्थित रहाणे म्हणजे रोजची तारेवरची कसरत व वेळेचा,पैशांचा कोविडसारख्या आपत्कालीन परिस्थितीत अपव्यय नाही का? या मुद्द्यावरही विचार करणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  12. धन्यवाद सर.शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ अनावश्यक प्रवासासाठी खर्च होत होता.कारण विद्यार्थ्यांना तर ऑनलाईन शिकवायचे आहे.त्यामुळे तो वेळ विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी वापरला जाईल.💐💐💐

    ReplyDelete
  13. ग्रामिनच पहा म्हणाव

    ReplyDelete
  14. Thanku you sir your great efforts.

    ReplyDelete
  15. धन्यवाद सर...... जय शिक्षक भारती.......लडेगे जीतेगे....

    ReplyDelete
  16. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  17. Nagpur division madhe pan काढावे असे आदेश

    ReplyDelete
  18. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  19. Sir tumhi khup chhan work kele wt pasun aamhala vachvile corona chya 3 latepasun dur rahnyad madat keli tumche far far aabhar

    ReplyDelete
  20. Great work,But sagdi kaddey impelement vhayala pahije.

    ReplyDelete
  21. Replies
    1. अतिशय उत्तम कामगिरी करणारी फक्त एकच संघटना म्हणजे शिक्षक भारती. हे पुन्हा एकदा सिद्ध. जय शिक्षकभारती

      Delete