Sunday 20 November 2022

तयारी बेमुदत संपाची

21 ते 25 नोव्हेंबर जागृती सप्ताह!!!


झारखंड नंतर पंजाबचे मुख्यमंत्री मा. श्री. भगवंत मान यांनी जुन्या पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. जुन्या पेन्शनसाठी लढणाऱ्या सर्व संघटना आणि कार्यकर्ते यांना आणखी एक राज्य जिकंण्यात यश मिळाले आहे. गुजरातमध्ये सत्तेवर आल्यानंतर जुनी पेन्शन योजना सुरू करू असे आश्वासन काँग्रेसच्या जाहिरनाम्यात देण्यात आले आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीचा निकाल आपल्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पुढील काळात प्रत्येक राजकीय पक्षांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही एवढा दबाव आंदोलनातून वाढवला पाहिजे. आपली लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. आत्ता गप्प बसून चालणार नाही. प्रत्येकाला बेमूदत संपाच्या लढाईत उतरवण्यासाठी जोर लावावा लागेलच. अभी नहीं तो कभी नहीं!

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ यांच्या आदेशानुसार सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यव्यापी बेमूदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक भारती संघटना समन्वय समितीचा घटक आहे.  

राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आपण सातत्याने संघर्ष करीत असून कर्मचाऱ्यांनी या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  21 सप्टेंबर 2022 रोजी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करा या एकाच मागणीसाठी तीव्र लक्षवेधी आंदोलन झाले. मुंबईत सर्व संघटनांनी आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संप करण्याचा  निर्णय घेतला आहे. हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाच्या हाकेला प्रतिसाद देऊन जुनी पेन्शन मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या निर्णयानुसार दिनांक 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत जुनी पेन्शन योजना लागू करा या एका मागणीसाठी बेमुदत संपाची मानसिक तयारी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.  राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बेमुदत संपात सहभागी होण्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि जुन्या पेन्शनची मागणी पूर्ण होईपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सांगण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.  

सर्व संघटनांचा एल्गार एकच मिशन जुनी पेन्शन
जुन्या पेन्शनसाठी पुकारण्यात येणाऱ्या बेमुदत संपात मंत्रालयीन कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी , राज्य शासनाच्या विविध विभागातील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. सर्व  शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी मतभेद बाजूला ठेवून बेमूदत संपात सहभागी होण्यासाठी शाळाभेटी देवून जनजागृती करणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे असे कर्मचारी बेमुदत संपात आपल्या सोबत सहभागी व्हायला तयार आहेत अशा वेळी आपल्या सारख्या पेन्शनची वाट पाहणाऱ्यांनी घरी बसून कसे चालेल?

माझी पेन्शन माझा अधिकार!
मी संपात सहभागी होणारच!


असा निर्धार आपण सर्वांनी करूया.
लढेंगे! जितेंगे!

सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य



19 comments:

  1. sir we are with you thank you for raising issues of old pension ,we need person like you who has good vision for welfare of teachers🙏

    ReplyDelete
  2. Sir after retirement pension is very essential to all employee. So everyone must participate in upcoming strike. We all r with you sir

    ReplyDelete
  3. We r with U it is essential for secure Our future

    ReplyDelete
  4. चांगला निर्णय आहे, संप केल्याशिवाय जूनी पेन्शन मिळणार नाही. आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही.

    ReplyDelete
  5. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जुन्या पेन्शनचे प्रश्न मांडल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला तुमच्या सारख्या व्यक्तीची गरज आहे ज्याची शिक्षकांच्या कल्याणासाठी चांगली दृष्टी आहे.

    ReplyDelete
  6. आम्हास मान्य आहे सर

    ReplyDelete
  7. लढेंगे । जितेंगे ।

    ReplyDelete
  8. याची फार गरज आहे. वेळोवेळी शिक्षक भारती जुनी पेन्शन लागू करा यासाठी आवाज उठवत आलेली आहे. आता सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे संघटित होऊन एकत्रित संपामध्ये भाग घेऊ.
    जय शिक्षक भारती !!! लड़ेंगे जीतेंगे !!!!!

    ReplyDelete
  9. एकच मिशन जुनी पेन्शन

    ReplyDelete
  10. हे केल्या शिवाय होणारच नाही

    ReplyDelete
  11. आपला निर्णय न्याय मिळे पर्यत ठाम असु द्या...आम्ही सर्व शिक्षक-शिक्षकेतर आपल्या सोबतच आहोत...एकच ध्यास जुनी पेन्शन लागु करा...🙏

    ReplyDelete
  12. एकाच मिशन, जुनी पेन्शन.
    लढेंगे जितेंगे!!!! जय शिक्षक भारती!!!!

    ReplyDelete
  13. खरयं सरजी जुनी पेन्शन योजना ही आम्हा सर्व शिक्षकांसाठी संजीवनी आहे..आणि सरत्या वयात हा एक चंद्र निर्वाहाचा एक आधार आहे..आमी हेच आमचा हक्क हे राजकारणी व सत्ताधारी हिरावुन घेत आहेत ...आता आमचा एकच निर्धार..जुनी पेन्शन बरकरार....

    ReplyDelete
  14. उदर निर्वाहाचा एक आधार

    ReplyDelete
  15. सोबत आहोत सोबत राहूया पेन्शन हक्क मिळवू्या

    ReplyDelete
  16. आम्ही तुमच्या सोबत आहोत....पेन्शन आपला हक्क आहे....NPS मुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे....पगारात वाढ दिसून येत आहे त्यामुळे न मिळणाऱ्या पगारावर टॅक्स भरावा लागत आहे...

    ReplyDelete
  17. एकच मिशन जुनी पेन्शन. आमच्या म्हातारपणाची आधाराची काठी म्हणजे जुनी पेन्शन.

    ReplyDelete