Monday 16 December 2019

शिक्षक भारती राबवणार कुटुंब स्वास्थ्य योजना

सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजना
Cashless Reimbursement Scheme for Teaching & Non Teaching Staff  in aided Schools & Junior Colleges



मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनींनो,
राज्यातील पोलिसांसाठी सुरू असलेल्या योजनेप्रमाणे शिक्षक शिक्षकेतरांसाठी कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना सुरु करावी अशी मागणी शिक्षक भारती 2013 पासून करत आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडे आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना सादर केली होती. परंतु सरकार बदलले आणि योजना थांबली. नव्याने आलेल्या सरकारमधील तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडेही शिक्षक भारतीनेही कॅशलेस योजना सादर केली. परंतु अनके वेळा घोषणा होऊनही 5 वर्षात योजना सुरु झालेली नाही.

आजची परिस्थिती काय आहे?
शिक्षक शिक्षकेतरांना वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्तीची रक्कम मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालय, शिक्षण विभाग ते मंत्रालयापर्यंत खेपा घालाव्या लागतात. स्वतः अथवा घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा अपघात झाला तर स्वखर्चाने उपचार घ्यावे लागतात. हॉस्पिटलचा खर्च मोठा असेल तर वेळप्रसंगी कर्ज घ्यावे लागते. उसनवारी करावी लागते. उपचार पूर्ण झाल्यानंतर हॉस्पिटलमधून सर्व कागदपत्रे जमा करुन वैद्यकीय प्रतिपूर्तीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी श्रम आणि पैसा खर्च होतो. वैद्यकीय प्रतिपूर्तीचा प्रस्ताव तयार करून शासकीय रुग्णालयात जमा झाल्यावर प्रस्तावाची छाननी केली जाते. प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी स्वतः जावे लागते. तीन ते चार वेळा खेपा घातल्यावर सातत्याने पाठपुरावा केल्यावर प्रस्ताव मंजूर होतो. वैद्यकीय उपचारासाठी खर्च झालेली शंभर टक्के रक्कम मिळेलच असे नाही. शासकीय रुग्णालयात झालेल्या खर्चाच्या रकमेत कपात केली जाते. जेवढी कपात होते तेवढे आपले आर्थिक नुकसान होते. शासकीय रुग्णालयात मंजूर झालेला प्रस्ताव नंतर शिक्षण विभागाकडे सादर केला जातो. शिक्षण विभागाने मंजूर केल्यानंतर वेतन अधीक्षकांकडे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल सादर करावे लागते. वेतन विभाग उपलब्ध निधीनुसार बिल मंजूर करते. आणि मग एवढा सर्व प्रवास करुन आपली रक्कम पुन्हा आपल्या खात्यात येते. या सर्व प्रक्रियेसाठी कधी कधी एक वर्ष लागते. वैद्यकीय बिल तीन लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या बिलाचा प्रस्ताव मंत्रालयापर्यंत जातो. मंत्रालयात बिल गेल्यानंतर किती वर्ष लागतील सांगता येत नाही. यामध्ये पैसा, वेळ, श्रम खर्च होतात. मनस्ताप होतो. सुट्टया जातात. या सर्व त्रासाला कंटाळून शिक्षक, शिक्षकेतर बहुतांश वेळा वैद्यकीय बिल सादर करत नाहीत. तर अनेक शिक्षक शिक्षकेतरांनी मेडिक्लेम पॉलिसी काढलेली आहे. या मेडिक्लेम पॉलिसीच्या हफ्त्यापोटी वार्षिक पंधरा ते वीस हजार रुपये भरावे लागतात. शिक्षक भारतीने सादर केलेली कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना मंजूर झाली असती तर आपल्या सर्वांची या त्रासातून मुक्तता झाली असती. पण तसे झालेले नाही. म्हणूनच आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षक भारतीने कुटुंब स्वास्थ्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शिक्षक भारतीची कुटुंब स्वास्थ्य योजना कशी असेल?
शिक्षक भारतीने सुरू केलेल्या या योजनेचे नाव सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजना (Cashless Reimbursement Scheme ) असे आहे. सदर योजना शिक्षक भारतीच्या आजीवन सभासदांसाठी लागू राहील. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र न्यायाधीश असोसिएशन आणि इतर संघटनांनी सुरू केलेल्या योजनेच्या धर्तीवर शिक्षक भारतीने सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी करार केलेला आहे. 

कुटुंब स्वास्थ्य योजनेत सहभागी सभासदाला व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. योजनेत सहभागी सदस्य आजारी पडल्यास किंवा अपघात झाल्यास जवळच्या नेटवर्क रुग्णालयात जाऊन केवळ कार्ड दाखवून उपचार घेता येतील. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करते वेळी कोणतीही रक्कम अ‍ॅडव्हान्स किंवा डिपॉझिट म्हणून भरावयाची नाही. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जाऊन नेटवर्क रुग्णालयात उपचार घेऊ शकते. उपचारादरम्यान युनिक हेल्थ केअरच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभणार आहे. रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज पर्यंतचा सर्व खर्च या योजनेतून दिला जाईल. युनिक हेल्थ केअरचे प्रतिनिधी आपल्या वतीने वैद्यकीय प्रतिपूर्तीचा प्रस्ताव तयार करतील. त्यानंतर प्रस्तावावर सदस्यांच्या सह्या घेतल्या जातील. मुख्याध्यापकांच्या कव्हरिंग लेटर सह तयार झालेला प्रस्ताव शासकीय रुग्णालयात सादर करण्यात येईल. युनिक हेल्थ केअरचे प्रतिनिधी शासकीय रुग्णालयात जाऊन पाठपुरावा करतील. प्रस्तावाच्या छाननी दरम्यान आलेल्या त्रुटींची पूर्तता करतील. शासकीय रुग्णालयाने मंजूर केलेल्या वैद्यकीय प्रतिपूर्तीचा प्रस्ताव शाळेमार्फत शिक्षण विभागाला सादर करायचा आहे. शिक्षण विभागाने मान्यता दिल्यानंतर मंजूर रकमेचे बिल वेतन विभागाकडे दिले जाईल. वेतन विभागाने वैद्यकीय बिलाची रक्कम मंजूर केल्यानंतर तुमच्या खात्यात जमा होईल. सदर रक्कम जमा झाल्यानंतर सदस्याला युनिक हेल्थ केअर कंपनीला कळवायचे आहे. रुग्णालयात दाखल होताना आपण दिलेल्या पोस्ट डेटेड चेक द्वारे ती रक्कम सदस्याला युनिक हेल्थ केअरला द्यावयाची आहे. अशा प्रकारे स्वतःच्या खिशातून एकही रुपया खर्च न करता आपण या योजनेमार्फत कॅशलेस उपचार घेऊ शकतो.

सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजनेची वैशिष्ट्ये / फायदे
1. शिक्षक भारती या शासनमान्य संघटनेच्या सदस्यांकरिता सदर योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. (अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी)
2. कॅशलेस योजना राबविण्यासाठी युनिक हेल्थकेअर अ‍ॅड मेडिकल सर्व्हिस प्रा. लि. यांच्यासोबत शिक्षक भारतीने करारनामा केला आहे. 
3. सदर योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकिय देखभाल) नियम 1961 व त्यानुसार वेळोवेळी निर्गमित केलेले नियम सुधारणेनुसार शिक्षक-शिक्षकेतर स्वतः व त्याच्यावर अवलंबून असलेले पती/पत्नी, पहिली दोन मुले, दिनांक 1 मे 2001 पूर्वीचे 3 रे अपत्य, अवलंबून असलेले आई-वडील (आई-वडील/सासू-सासरे महिला कर्मचाऱ्यांबाबत) यांना योजनेचा लाभ घेता येईल.
4. सदर योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकिय देखभाल) नियम 1961 व त्यानुसार वेळोवेळी निर्गमित केलेले नियम सुधारणेनुसार जाहिर केलेल्या 27 आकस्मिक आजारांसाठी 3 लाख व 5 गंभीर आजारांसाठी 3 लाख एवढ्या रकमेची मर्यादा असेल. तसेच एका वर्षात एका व्यक्तीस 5 लाख मर्यादा असेल.
5. सदर योजनेत सहभागी सभासदाला व त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक स्मार्ट कार्ड देण्यात येणार.
6. सदर योजना विमा पॉलिसी नसून Cashless Reimbursement Scheme आहे.

सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजनेची शुल्क आकारणी खालील प्रमाणे -
1. कुटुंब स्वास्थ्य योजनेचे वार्षिक सहभागी शुल्क रुपये 2,300/- (दरवर्षी 10% वाढ)
2. पहिल्या वर्षी नोंदणी आणि सहा स्मार्ट कार्ड खर्च रुपये 200/-
3. रुपये 2,500/- चा धनादेश ' युनिक हेल्थ केअर अ‍ॅड मेडिकल सर्व्हिस प्रा. लि.' (Unique Healthcare & Medical Services Pvt. Ltd.) या नावाने द्यावयाचा आहे. 

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे - 
1. शासकीय व निमशासकीय व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी - कार्यालयाचे ओळखपत्र, दोन फोटो, पॅनकार्ड, शिधापत्रिका, आधारकार्ड. 
2. अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी - प्रत्येकी दोन फोटो, शिधापत्रिका, आधारकार्ड, जन्माचा दाखला, पॅनकार्ड, शाळेचे ओळखपत्र, वरिष्ठ नागरिक ओळखपत्र, मतदानकार्ड . 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागाअंतर्गत सदर योजना युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यामातून सध्या सुरु आहे. योजनेत सहभागी सदस्य मागील तीन वर्षांपासून यशस्वीपणे योजनेचा लाभ घेत आहेत. राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतरांनी या योजनेत सहभागी होऊन स्वतःसह आपल्या कुटुंबियांना आरोग्याची हमी देऊया. 

सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजनेची नोंदणी सुरू
अधिक माहितीसाठी शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा. 
धन्यवाद!

नमुना अर्ज - 


आपला स्नेहांकित, 
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र
subhashmore2009@gmail.com

101 comments:

  1. यांच्याकडे कॅशलेस सुविधेकरिता उपलब्ध हॉस्पिटलची यादी द्या

    ReplyDelete
  2. जे पर्मनंट नाहीत त्यांचे काय ते शिक्षक नाहीत का त्यांना ना धड पगार, ना धड कसली सवलत त्यांनी काय करायचे त्यांच्या साठीबकही करा सर विनंती आहे

    ReplyDelete
  3. जे पर्मनंट नाहीत त्यांचे काय ते शिक्षक नाहीत का त्यांना ना धड पगार, ना धड कसली सवलत त्यांनी काय करायचे त्यांच्या साठीबकही करा सर विनंती आहे

    ReplyDelete
  4. शिक्षक भरतीचे धन्यवाद अशा योजनेची शिक्षकांना खरच खूप गरज होती आणि वेडी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करावा लागतो पुन्हा वैद्यकीय बिल सादर केल्यानंतर कमिशन खोरी सुरू होते

    ReplyDelete
  5. Thanks team Shikshak Bharati for such a nice medical policy.

    ReplyDelete
  6. No.1 उपक्रम आहे, हार्दिक हार्दिक अभिनंदन.

    ReplyDelete
  7. Nice more sir & Thanks team shikshak bharat I for a nice medical policy

    ReplyDelete
  8. Please send number of any responaible person of shikshak bharati. It would be helpful to ask for any help or queries.And if the desease is not included in the list , given by government, what to do in such cases, to pay the amounts,or what? And if proposals is rejected by civil sergeon, in that case, what to do? So many questions and doubts, So one number should be given to contact .

    ReplyDelete
  9. Please send number of any responaible person of shikshak bharati. It would be helpful to ask for any help or queries.And if the desease is not included in the list , given by government, what to do in such cases, to pay the amounts,or what? And if proposals is rejected by civil sergeon, in that case, what to do? So many questions and doubts, So one number should be given to contact .

    ReplyDelete
  10. सर अतिशय सुंदर योजना आहे...अर्थात मनापासुन स्वागत.

    ReplyDelete
  11. अशा योजनेची गरज होतीच ,स्तुत्य उपक्रम आहे.या योजनेचे स्वागत आहे..

    ReplyDelete
  12. Sir 20%40%60℅80℅anudanit shala na hi yojana lagu rahil ka??

    ReplyDelete
  13. Sir this is nice for aided teachers and their family members but what's for others. What we do for out of list diseases. Diseases which are not in the given list what's abt that. Thanks pls guide to all. Pls give ur kind suggestions. Thanks.

    ReplyDelete
  14. Mr. Eknath Lubal. Kurla W. Nice policy sir. But I have some doubts related abt disease list, kids and depended family member's. Thanks.

    ReplyDelete
  15. खुप छान योजना आहे. आज काळाची गरज बनली आहे. स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. धन्यवाद

    ReplyDelete
  16. खुपच छान सर

    ReplyDelete
  17. खूप छान योजना आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
  18. खुपच छान योजना सर . धन्यवाद

    ReplyDelete
  19. अतिशय चांगली योजना साहेब

    ReplyDelete
  20. अतिशय छान योजना आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
  21. काळाची गरज आहे. अतिशय सुंदर योजना आहे.

    ReplyDelete
  22. छान योजना आहे सहभागी होऊया

    ReplyDelete
  23. शिक्षकाला शिक्षक भारतीचा सभासद होणे जरूरी आहे का ते माहित करा सर

    ReplyDelete
  24. खुप छान सर आपले खुप खुप अभिनंदन

    ReplyDelete
  25. या योजनेसाठी शिक्षकांनी अनेक वर्ष वाट पाहात आहेत शिक्षकभरती कडून आम्ही आशावादी आहोत.खुप धन्यवाद

    ReplyDelete
  26. सर जे शिक्षक निवृत्त झालेत त्यांना लाभ घेता येईल का

    ReplyDelete
  27. योजना फार गरजेचंच आहे..

    ReplyDelete
  28. राज्यातील सर्व ग्रामीण जिल्हा परिषद शिक्षाकाना ही लागू आहे का की केवळ मुंबई व महानगर विभाग

    ReplyDelete
  29. फार फार आभारी

    ReplyDelete
  30. खूप सुंदर उपक्रम. Health care center chi यादी जाहीर करावी. म्हणजे सोयीच्या केंद्राची मदत घेणे सोयीचे होईल.

    ReplyDelete
  31. खूप गरज आहे हया उपक्रमाची. हे फहक्त कपिल पाटील सर च करू शकतील.तुम्ही आमचे शिक्षक आमदार तर आहेतच. पण खरच आम्हाला तुमच्या सारख्या शिक्षक मंत्री गरज आहे.

    ReplyDelete
  32. सर उपक्रम खूपच छान आहे, याची गरज होती, परंतु जळगांव जिल्हा तील कर्मचारी फॉर्म कुठे जमा करतील या विषयी माहिती द्यावी

    ReplyDelete
  33. योजना छान आहेत. सुरू केली की कळवा...

    ReplyDelete
  34. योजना छान आहेत. सुरू झाली कळवा.

    ReplyDelete
  35. Very nice skim thanks siksak barti

    ReplyDelete
  36. खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  37. सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साठी सुध्दा या योजनेचा लाभ घेता यावा अशी विनंती आहे सुधीर कुलकर्णी

    ReplyDelete
  38. Yes this scheme is very essential for us
    Really I m thankful to all of u
    I heartily appreciate the people who has taken the initiative and lot of efforts to start such scheme

    ReplyDelete
  39. गलेगट्ठ पगार घेनार्या सरकारी शिक्षकाला याची खरच गरज आहे का?

    ReplyDelete
  40. योजना फार चांगलो आहे धन्यवाद सर.

    ReplyDelete
  41. खूप छान उपक्रम आहे. हा उपक्रम लवकरात लवकर राबविण्यात यावा.धन्यवाद सर...

    ReplyDelete
  42. Congratulations for achievement. Good job. Thanks alot Go ahed.
    I think some more detailing is required, all is not clear. Many of us on 1st stage having different queries/doubts/confusions. I think ur team will clear all of it n this scheme will achieve its goal and will prove successful.
    Best of luck.

    ReplyDelete
  43. सर ,शिक्षक भारती नेहमीच शिक्षकांसाठी देवासारखी धावून येते.घराचे हफ्ते आयुष्यभर फेडून अर्धमेला झालेल्या शिक्षकांना नवसंजीवनी मिळणार.लक्ष लक्ष धन्यवाद

    ReplyDelete
  44. जि प शिक्षकांसाठी आहे का ही योजना?

    ReplyDelete
  45. सर खूपच छान आहे सर 🙏🙏

    ReplyDelete
  46. Z.P. Teacher sathi hi yojana aahe Ka sir
    Aslyas link pathava

    ReplyDelete
  47. सर ह्या योजनेत ऍड होणे चालू आहे का

    ReplyDelete
  48. This scheme is really revitalization for everyone

    ReplyDelete
  49. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू केले आहे

    ReplyDelete
  50. जि.प.शिक्षण सेवकांना ही योजना लागू केली आहे का?

    ReplyDelete
  51. सर शासन एकूण बिलाच्या 80 टक्के बिल मंजूर करते ते बिल किती असो आपल्या योजनेत पाच लाखाची मर्यादा आहे

    ReplyDelete
  52. खुपच छान सर

    ReplyDelete
  53. Very nice and always helpful

    ReplyDelete
  54. शिक्षक बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणारी योजना . स्तुत्य उपक्रम

    ReplyDelete
  55. मोरे सर लागणारे डॉक्यूमेंटची यादि आणि कोणाला संपर्क कराची ते लिहा

    ReplyDelete
  56. खुप सुंदर योजना सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, व आपणास एक सुरक्षाकवच प्राप्त करुण घ्यावे अशी अपेक्षा व शिक्षक भारती संघटणेच्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा!

    ReplyDelete
  57. खुपच छान योजना

    ReplyDelete
  58. एकदम मस्त योजना आहे

    ReplyDelete
  59. योजना खूपच छान आहे.

    ReplyDelete
  60. सर online या योजनेचा फायदा घेऊ शकतो का?

    ReplyDelete
  61. Sir, Please send the list of hospitals.It is helpful to all of us.

    ReplyDelete
  62. कृपया उपचार घेणेसाठी उपलब्ध असणारी हॉस्पिटल्सची नावांची यादी मिळावी,ही विनंती.

    ReplyDelete
  63. हॉस्पिटल ची यादी का टाकत नाहीत आपण

    ReplyDelete
  64. हॉस्पिटल ची यादी का टाकत नाहीत आपण
    कित्येक वेळा मागणी झाली आहे वर

    ReplyDelete
  65. कृपया हॉस्पिटल ची यादी पाठवावी

    ReplyDelete
  66. सर ऑनलाईन फार्म भरता येईल का. लिंक पाहीजे आहे.

    ReplyDelete
  67. रात्र शाळेतील शिक्षकांना हीयोजना लागू होईल का साहेब.?
    तर खूप बरे होईल.
    सर उपक्रम छान आहे रात्र शाळेला लागू करा

    ReplyDelete
  68. सुहास भोवड

    ReplyDelete
  69. सुहास भोवड....सर जी रात्र शाळेतील शिक्षकाना ही योजना लागू होईल का ! असेल तर बरे होईल .
    सर उपक्रम छान आहे. धन्यवाद !!!

    ReplyDelete
  70. अतिशय छान योजना आहे शिक्षक भरती ने जो उपक्रम राबवला आहे माझा पूर्ण पाठिंबा आहे श्री तुषार बोरसे सर नाशिक 9421508060

    ReplyDelete
  71. कोरोना आजार त्यात आहे का सर

    ReplyDelete
  72. शिक्षकांप्रती बांधिलकी जोपासत खऱ्या अर्थाने शिक्षक हित जोपासणाऱ्या शिक्षक भारतीचे मनापासून अभिनंदन !

    वैद्यकीय प्रतीपूर्तीचा जाचक कटकटीतून आणि आर्थिक पिळवणूकितून शिक्षकाची सुटका व्हावी हीच सर्वसामान्य शिक्षकाची अपेक्षा आहे.

    पुन्हा एकदा धन्यवाद.

    ReplyDelete
  73. खूप छान योजना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक कर्मचारी यांना या योजनेचा फायदा होईल.

    ReplyDelete
  74. खरचं खुप छान योजना आहे

    ReplyDelete
  75. नेटवर्क रुगणालय म्हणजे कोणते रुग्णालय?

    ReplyDelete
  76. खूपच उपयुक्त योजना आहे.सर्वांनी या योजनांचा लाभ घ्यायला हवा.

    ReplyDelete