Saturday 25 July 2020

गाफील राहू नका, अन्यथा मिळणारं पेन्शन जाईल

पेन्शन वाचवण्यासाठी लेखी आक्षेप नोंदवा अभियानात सामील व्हा!

प्रति,
राज्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू, भगिनींनो,

प्रति,
राज्यातील सर्व संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य 

प्रति,
विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष, शिक्षक भारती 

महोदय/महोदया,
आज मी आपल्या सगळ्यांना एक नम्र विनंती करत आहे. 10 जुलै 2020 च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिसूचनेवर प्रत्येकाला  लेखी आक्षेप नोंदवायचा आहे. आपल्या शाळेतील प्रत्येक व्यक्ती, आपण ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेतील प्रत्येक व्यक्ती, आपल्या परिचयातील प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर यांना जागरूक करून त्यांचा लेखी आक्षेप नोंदवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हा लेखी आक्षेप पोस्टाने अथवा कुरियरने *अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा, मंत्रालय विस्तार, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई 400032 * या पत्त्यावर 10 ऑगस्ट पूर्वी पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.

महाराष्ट्रात कोरोना महामारीने हाहाकार माजला आहे. आपण सर्वजण लॉक डाऊनमुळे घरात अडकलो आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाही. मंत्रालयात जाऊन शिक्षण मंत्र्यांना भेटू शकत नाही. आणि ह्याच कोरोना काळातील परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शिक्षण विभाग आपल्यावर अन्याय करत आहे. आपली पेन्शन हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आपले लेखी आक्षेप व सूचना पोहोचू नयेत यासाठी शिक्षण विभागाने ही वेळ निवडली आहे.

शिक्षण विभागाने 10 जुलै 2020 रोजी काढलेली अधिसूचना बेकायदेशीर आहे. एखादा शासन निर्णय अथवा कायद्यातील बदल ज्या दिवशी होतो त्या दिवसापासून लागू होतो. शिक्षण विभागाला आज कायद्यात बदल करून त्याची अंमलबजावणी पंधरा वर्षे मागे जाऊन म्हणजेच 2005 पासून करायची आहे. कायद्याने आपल्याला दिलेला पेन्शनचा अधिकार कायद्यात बदल करून काढून घ्यायचा आहे. हे आपण कदापि सहन करता कामा नये. 

*1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचा नियुक्ती दिनांक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करण्याचे षडयंत्र*

राज्यातील प्रत्येक बालकाला शिक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. देशभर शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाने उचलली आहे. महाराष्ट्रात मात्र खाजगी शिक्षण संस्थांनी स्वतःची जमीन, पैसा आणि श्रम देऊन शैक्षणिक  संस्था उभ्या केल्या आहेत. या शैक्षणिक संस्थांचे ज्ञानदानाचे कार्य वर्षानुवर्षे अविरतपणे सुरू आहे. शासनाने मात्र वेळोवेळी शैक्षणिक धोरणात  बदल करून वेतन अनुदान व वेतनेतर अनुदान कपात करण्याचा प्रयत्न केला आहे. अनुदान द्यायला पैसे नाहीत हे कारण पुढे करून विनाअनुदानित तत्त्वावर शाळा सुरू करण्याचा घातक निर्णय  घेतला. याविरोधात विनाअनुदान विरोधी कृती समितीने राज्यभर  आंदोलन उभे करून सरकारला अनुदान सूत्र ठरवून अनुदान द्यायला भाग पाडले. त्यातही सरकारने बदलत्या काळानुसार चार टप्पा अनुदानाचे पाच टप्पा अनुदानात रुपांतर केले. 25 टक्के टप्प्याने मिळणारे अनुदान सूत्र बदलून 20 टक्के टप्प्याचे अनुदान सुरू केले. त्यामुळे शाळा सुरू करून प्रत्यक्ष अनुदानावर येईपर्यंत मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागले. निदान निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याचा आधार होता, पण शासन आता तो आधारही काढून घेत आहे. आपला अपमान करत आहे.




(अधिसूचना वाचण्यासाठी ईमेजवर क्लीक करा)

अनुदानित शाळेची व्याख्या बदलून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त लाखो कर्मचाऱ्यांचे पेन्शन बंद करण्याचे षडयंत्र शासनाने आखले आहे. 2005 पूर्वी सुरू असलेल्या अनेक विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणारे, अनुदानित शाळांमधील वाढीव विनाअनुदानित तुकड्यांवर काम करणारे, अंशतः अनुदानावर काम करणारे, सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (शिक्षण सेवक) पदावर काम करणारे या सर्वांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी झाली आहे. हे सर्वजण 2005 नंतर 100 टक्के अनुदानावर आलेले आहेत. हे सर्व जण जुनी पेन्शन योजनेस पात्र आहेत. त्यांची पीएफ अकाऊंट सुरू आहेत. दरमहा पीएफ कपात होत आह. त्यातील काही निवृत्त होऊन आज नियमित पेन्शन घेत आहेत. मग आता त्यांची पेन्शन सुद्धा काढून घेणार काय ?

शासन शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करण्याची मान्यता देताना कर्मचाऱयांना प्रचलित वेतन पद्धतीनुसार वेतन दिले जाते असे हमीपत्र लिहून घेते. अनुदान मंजूर झाल्यावर शासनाने टप्प्याने वेतन दिले तरी उर्वरित वेतनाचा टप्पा शैक्षणिक  संस्थांना द्यावाच लागतो. शासनाने हे लक्षात घ्यायला हवे की शासन जरी टप्प्याने पगार देत असले तरी कर्मचाऱयांना 100 टक्के पगार  मिळालेला आहे. ( उदाहरणार्थ : 40 टक्के शासन  हिस्सा + 60   टक्के संस्था हिस्सा =  एकूण 100 टक्के पगार) त्यामुळे शिक्षण विभागाला 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पेन्शन काढून घेण्याचा अधिकारच नाही. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी ( सेवेच्या शर्ती)  नियमावली 1981 मधील मसुद्यात बदल करण्याचा मा. शिक्षणमंत्र्यांना सल्ला देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आपल्या सर्वांना करावी लागेल. 

*अधिसूचनेमुळे 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त DCPS अथवा NPS धारक शिक्षक शिक्षकेतरांना पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा*
10 जुलै 2020 रोजी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेचा कायदेशीर अभ्यास केला तर एक महत्त्वाची बाब लक्षात येते. ती म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना डीसीपीएस अथवा एनपीएस लागू करणे बेकायदेशीर आहे. वित्त विभागाने जरी राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2005 नंतर डीसीपीएस लागू केली असली तरी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती)  नियमावली 1981 मधील मसुद्यात अद्यापि बदल झालेला नाही. याचाच अर्थ असा की आजही 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. 10 जुलै 2020 च्या अधिसूचनेने शिक्षण विभागाला  तसा बदल पोटनियम 19 व पोटनियम 20 मध्ये करायचा आहे. आपल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडचण ठरणारी ही अधिसूचना रद्द केलीच पाहिजे. जेणेकरून राज्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला पेन्शनचा हक्क मिळेल. पेन्शन ही सरकारने केलेली मेहरबानी नाही तर तो कर्मचाऱयांचा मूलभूत अधिकार आहे. राज्यघटनेने आपणास समानतेचा अधिकार दिला आहे. त्याच न्यायाने कर्मचार्यांमध्ये भेदभाव न करता सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे.

*चला लढूया एकजुटीने!*
आपण सर्वजण वेगवेगळ्या पदावर काम करत आहोत, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी अथवा सदस्य आहोत, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये (मराठी, हिंदी, इंग्रजी इत्यादी) काम करणारे आहोत. तरी आपण सर्वजण एक आहोत. आपल्या सर्वांवर आपली एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. वर्षानुवर्ष आपले प्रश्न शासन दरबारी पडून आहेत. सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी आपला वनवास चुकलेला नाही. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात आपण सर्वजण काम करत असताना आपल्या पेशाला सन्मान मिळवून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. शिक्षक भारती संघटनेने राज्यभर पोस्टर आंदोलन उभे करून जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी आपापल्या स्तरावर 10 जुलै 2020 रोजीच्या अधिसूचनेला विरोध करण्याचे नियोजन करावे अशी अपेक्षा आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपला लेखी आक्षेप मंत्रालयात पोचला पाहिजे असा निर्धार करूया! एकत्रितपणे लढू या !

*हे आपण केलेच पाहिजे*

1) शाळेचे संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी आपल्या  शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन लेखी आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करावे. 
2) सर्व मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना व कला क्रीडा शिक्षकांच्या संघटनांनी आपापल्या सदस्यांची बैठक घेऊन लेखी आक्षेप नोंदविण्याबाबत ची मोहीम हाती घेण्यात यावी.
3) शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांनी आपापल्या स्तरावर बैठका घ्याव्यात.
आक्षेपाचा नमुना देण्यात यावा. लेखी आक्षेप पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवण्याबाबत मार्गदर्शन करावे.
4) आपल्या विभागातील व तालुक्यातील इतर संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांच्याशी चर्चा करून त्यांनाही लेखी आक्षेप नोंदविण्याबाबत प्रोत्साहन द्यावे.
5) आपल्या विभागातील, आपल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटून शिक्षक भारतीचे निवेदन द्यावे. आमदारांच्या लेटर हेडवर लेखी आक्षेप घेऊन तो पोस्टाने पाठवण्याबाबत पाठपुरावा करावा.

आपली पेन्शन वाचवण्यासाठी आपण हे नक्कीच करू शकतो. माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड आपल्या कुटुंबप्रमुख आहेत. आपल्या सर्वांनी पाठवलेल्या लेखी पत्रांचा ढीग पाहून त्या नक्कीच योग्य निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. 

-----------------------------------

पेन्शन वाचवण्यासाठी
अधिसूचनेवरील आक्षेपाचा नमुना

प्रति 
मा. अप्पर मुख्य सचिव 
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय विस्तार, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक
मुंबई - 32.

विषय - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली 1981 मधील मसुद्यात सुचविलेली दुरुस्ती याबाबत हरकत घेत असले बाबत.

संदर्भ - आपल्या विभागाने प्रसिद्ध केलेला मसुदा दि 10 जुलै 2020.

महोदया,
महाराष्ट्रातील खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भात महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती)  नियमावली 1981 मधील  नियम 2 पोटनियम (1) चा खंड (ब) मधील अनुदानित शाळेची व्याख्या बदलण्यात येत आहे. माझा त्यावर आक्षेप आहे. तसेच  निवृत्ती वेतनाबाबत असलेल्या मुख्य नियमातील नियम  क्रमांक 19 व नियम 20 यामध्ये दि 10 जुलै 2020 च्या प्रसिद्ध केलेल्या मसुद्याद्वारे दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. सदर अन्यायकारक दुरुस्तीला व पूर्ण मसुद्याला माझा पूर्णपणे आक्षेप व विरोध आहे. हा आक्षेप या पत्राद्वारे हरकत म्हणून नोंदवित आहे.

या मजकुराऐवजी

*राज्यातील शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित व अनुदानित अशा शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम 1982 मधील तरतुदी लागू करण्यात येतील*

असा बदल मी सुचवित आहे.  

तरी 10 जुलै 2020 चा मसूदा पूर्णपणे रद्दबातल करण्यात यावा.

सर्व कर्मचारी वर्गाला जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी मी करत आहे. 
कळावे. 

आपला,
सही/--

(             नाव            )

-----------------------------------

* विशेष सूचना :
वर आक्षेपाचा नमुना दिला आहे.  10 जुलै 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतील बदलावर दिनांक 10 ऑगस्ट 2020 पूर्वी लेखी विरोध नोंदवायचा आहे. 10 ऑगस्ट पूर्वी आपला लेखी विरोध  मंत्रालयात नोंदवला गेला पाहिजे याची काळजी घ्यावी.

अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा, मंत्रालय विस्तार, मादाम कामा मार्ग,  हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई 400032. 

या पत्यावर राज्यातील प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर यांनी सामूहिक न देता वैयक्तिक लेखी आक्षेप नोंदवावा आणि वरील पत्यावर कुरियरने अथवा पोस्टाने पाठवा. तसेच acs.schedu@maharashtra.gov.in या ईमेल आयडी वर ईमेलने पाठवा.
लढूया!  जिंकूया !! 

आपला स्नेहांकित 
सुभाष किसन मोरे,
कार्याध्यक्ष,
शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य.

108 comments:

  1. Nice Very Sir,.लढेंगे..जितेंगे.जय शिक्षक भाराती.

    ReplyDelete
    Replies
    1. हम सब साथ है। लढेंगे..जितेंगे जय महाराष्ट्र जय शिक्षण भारती

      Delete
  2. Very nice sirji jay shikshak bharati

    ReplyDelete
  3. सर केंद्र सरकारने दि 17/02/2020 रोजी जूनी पेंशन संदर्भात पत्र काढले आहे आणि त्या पत्राचा संदर्भाधीन जीआर दि 2/03/2020 रोजी काढला आहे.
    सदर पत्र आणि जिआर मध्ये निवड आणि नियुक्ती संंदर्भांत स्पष्ट माहिती दिली आहे
    केंद्र सरकारने दि 1/01/2004 रोजी नवीन पेंशन योजना आणली, पण सदर पत्र आणि जीआर मध्ये स्पष्ट केले आहे की जर भरतीची अधिसूचना त्या पुर्वी ची असेल, आणि त्याला अनुसरून जर कर्मचारी निवड जरी दि 1/01/2004 पुर्वी झाली असेल आणि काही कारणास्तव उदा- पोलिस चौकशी, आरोग्य तपासणी, जात पडताळणी इत्यादी मुळे जर नियुक्ती दि 1/01/2004 नंतर झाली असेल तर याला कर्मचारी जबाबदार नाही, असे कर्मचारी देखील जुन्या पेंशन साठी पात्र आहेत म्हणजेच निवड झाल्यावर देखील जूनी पेंशनला पात्र होतो तरी याचा संदर्भ आपण आपल्या राज्यात घेऊ शकतो

    ReplyDelete
  4. *मेरी पेंशन मेरा अधिकार*

    ReplyDelete
    Replies
    1. माझी पैंन्शन माझा हक्क

      Delete
    2. माझी पेंन्शन माझा हक्क

      Delete
  5. लढुया जिंकुया
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  6. आम्ही मेल व पत्र पाठवले आहे.
    2005 नंतर नियुक्त कर्मचारी यांचे पेन्शन बाबत आपण काय करत आहात?

    ReplyDelete
  7. एकजुटीने लढू.आणि निश्चितपणे जिंकू.

    ReplyDelete
  8. it is matter of course that we all have to fight together for our applicarble rights otherwise that day is not for off. The govrnment has done a lot of injustice agains everything especially The school department and its work is still going on . The living result of this is the closure of the on going pension

    ReplyDelete
  9. आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत सर.

    ReplyDelete
  10. एकच मिशन जुनी पेंशन

    ReplyDelete
  11. वाटेल ते सहकार्य करू पण मागे हटणार नाही चांगल्या भाषेत सांगायचे झाले तर घोडा लावू पण घोडा लावून घेणार नाही माझ्या सोबतचे सर्व प्राध्यापक आपल्या सोबत आहोत

    ReplyDelete
  12. This fight is for our right.we should be serious and fight for our right unitedly.It's a need of time.
    लढेंगे जितेंगे.
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  13. This fight is for our right.we should be serious and fight for our right unitedly.It's a need of time.
    लढेंगे जितेंगे.
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  14. This fight is for our right.we should be serious and fight for our right unitedly.It's a need of time.
    लढेंगे जितेंगे.
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  15. सब लड़े सब जीते

    ReplyDelete
  16. आपला हक्क अबाधित राहायला हवा. सर्वांनी आक्षेप नोंदवू.

    ReplyDelete
  17. लढेंंगें,जितेंगें जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  18. लढूया, जिंकण्यासाठी.
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  19. पेंशन हा आमचा हक्क आहे

    ReplyDelete
  20. हो,आपण सारे लिहुया,आक्षेप नोंदवूया!

    ReplyDelete
  21. लाढेंगे, जितेंगें!जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  22. नमस्कार, जय शिक्षक भारती. मेल पाठवले.

    ReplyDelete
  23. माझी पेन्शन माझा अधिकार

    ReplyDelete
  24. पेन्शन हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे

    ReplyDelete
  25. सन्मानिय सर आम्ही शिकविलेले विद्यार्थी कोण डाॅक्टर झाले कोणी इंजिनियर वकिल अधिकारी विविध क्षेत्रात गेले पण शिक्षक विद्यार्थी घडवित राहिले आणी त्यांची सरकार ने हि किमंत केली ???
    मी सर बरोबर 2000 साली अर्धवेळ शिक्षक म्हणू 6 वर्षानंतर आलेल्या पर्यावरण शिक्षण मुळे पुर्णवेळ झालो पण आम्ही पेन्शन योजनेचे हकदार होऊ शकत नाही
    ही शोकांतिका नहीं तर काय????


    ReplyDelete
  26. We are with you sir. Let's fight for our right

    ReplyDelete
  27. मिळायला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे.

    ReplyDelete
  28. मिळायला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे.

    ReplyDelete
  29. मिळायला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे.

    ReplyDelete
  30. मिळायला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे.

    ReplyDelete
  31. मिळायला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे.

    ReplyDelete
  32. मिळायला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे.

    ReplyDelete
  33. Jab govt.1 Nov.2005,ke pahle ki pension band karne lagi hai to,1 Nov.2005 walo ko kaise Degi.sambhram faila hua hai.

    ReplyDelete
  34. लढेंगे जितेंगे. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  35. We will fight for our right for justice.. we are with you sir..

    ReplyDelete
  36. मिळायला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे.

    ReplyDelete
  37. एकच मिशन जुनी पेन्शन

    ReplyDelete
  38. एकच मिशन जुनी पेन्शन

    ReplyDelete
  39. पेन्शन मिळालीच पाहिजे , नाही तर रस्त्यावर येऊन संघर्ष चालू करु@

    ReplyDelete
  40. एकच मिशन जुनि पेंशन।

    ReplyDelete
  41. एकच मिशन जुनी पेन्शन!

    ReplyDelete
  42. एकच मिशन जुनी पेन्शन!

    ReplyDelete
  43. सर...
    जुन 2007 साली लागलेल्या कर्मचार्यांनी पण अर्ज करायचा का??
    आम्हाला जुनी पेन्शन मिळू शकते का..???
    2005 आधी लागलेले व 2005 नंतर लागलेले असा भेदभाव न करता सर्व कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना लागु केली तर सर्व कर्मचार्यांच्या फायदा होईल...मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
  44. या लढाईत आपण सर्व सोबत आहोत पेन्शन आपला हक्क आहे तो आपण एकजुटीने व तीव्र आंदोलन करूनच मिळवू शकतो तेव्हा एकजुटीने दबाव टाकणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  45. सर,काही लोक 2005 पुर्वी कार्यभारानुसार १००%अनुदानावर अर्धवेळ जॉईन झाले मान्यताही मिळाल्या,पण संस्था प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डिसेंबत 2005,आला आशा लोकणातर जूनी पेन्शन मिळाली पाहिजे,व सर्वं new जॉईन लोकणासुद्धा.आम्ही आपल्या सोबत आहोत.

    ReplyDelete
  46. चौधरी मॅडम आपण सुद्धा शिक्षिका मुळेच घडल्या असून तुम्ही या पदापर्यंत पोहोचले आहेत शिक्षकांचा अंत पाहू नका कुटील डाव रचू नका आमची मागणी रास्त आणि योग्य आहे आमची जुनी पेन्शन योजना मान्य केली पाहिजे

    ReplyDelete
  47. पेन्शन ही सर्वाना मिळालीच पाहिजे व ती 2005 नंतर लागलेल्या सेवकांना सुद्धा मिळाली पाहिजे .

    ReplyDelete
  48. I am with u....Apla adhikar...Juni pension

    ReplyDelete
  49. पेन्शन मिळालेच पाहिजे

    ReplyDelete
  50. पेन्शन मिळावी पाहीले.

    ReplyDelete
  51. Everyone must get pension

    ReplyDelete
  52. मोरे सर, आपण अतिशय विस्तृतपणे सर्व अन्यायकारक गोष्टी मांडलात. आपण लढतच आहोत आणि या लढ्याला यश नक्की मिळेल. लढू आणि जिंकूच !!!

    ReplyDelete
  53. Penshan amcha huq aahe, amhala midalich pahije.

    ReplyDelete
  54. जुनी पेंशन मिळालीच पाहिजे. आपली पेंशन ,आपला अधिकार.

    ReplyDelete
  55. जुनी पेंशन मिळालीच पाहिजे. आपली पेंशन आपला अधिकार.

    ReplyDelete
  56. जुनी पेंशन मिळालीचं पाहिजे, आणि तो आपला हक्क आहे.

    ReplyDelete
  57. जुनी पेंशन मिळालीच पाहिजे.

    ReplyDelete
  58. are with you sir. Let's fight for our right

    ReplyDelete
    Replies
    1. जय शिक्षक भारती...👍👍👍
      hariharzade68@gmail.com

      Delete
  59. We are with u sir,,👍👍 लड़ेंगे और जीतेंगे....!!
    Majha pansion maja adhikar

    ReplyDelete
    Replies
    1. जय शिक्षक भारती...👍👍👍
      hariharzade68@gmail.com

      Delete
    2. जुनी पेन्शन ही आमची मागणी नाही हा आमचा अधिकार आहे तो मिळालाच पाहिजे
      जय शिक्षक भारती
      विजय चलाख

      Delete
  60. 'एकच मिशन जुनी पेंशन'. हा आपला अधिकार आहे. तो मिळविण्यासाठी संघर्ष करू.

    ReplyDelete
  61. We will fight and we will win.

    ReplyDelete
  62. एकच मिशन सर्वांना जुनी पेन्शन हेच ध्येय ठेवा.पुर्वी,नंतर असे करु नका.

    ReplyDelete
  63. एकच मिशन सर्वांना जुनी पेन्शन हेच ध्येय ठेवा.पुर्वी,नंतर असे करु नका.

    ReplyDelete
  64. जुनी पेंशन आपला अधिकार आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ नये.....

    ReplyDelete
  65. जुनी पेंशन हा आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे

    ReplyDelete
  66. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  67. मोरे साहेब आम्हाला जुनी पेंशन मिळावी

    ReplyDelete
  68. जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे तो आमचा हक्क आहे

    ReplyDelete
  69. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे करण नियुक्ती देताना कुठलाही या बाबतीत पूर्व सूचना नाही

    ReplyDelete
  70. शासन नियमाने नियुक्ती वेळेस असणारे सर्व जुनेच नियम लागू असायला हवेत

    ReplyDelete
  71. यात बऱ्याच लोकांचे gpf अकाउंट देखील चालू आहेत जे आमच्या सोबत म्हणजे6/12/2004 ला जॉईन आहेत आणि आमचे बंद आहेत

    ReplyDelete
  72. पेन्शन मिळालेच पाहिजे

    ReplyDelete
  73. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे

    ReplyDelete
  74. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे

    ReplyDelete
  75. सर,आपल म्हणणे खरे आहे. आता नाही तर पुन्हा कदापी नाही. लढताना ताकद ही शिक्षकासोबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पण दिसली पाहिजे. प्रसंगी रस्त्यावर उतरायला पण मागे पुढे पाहयला नको . पण केवळ शिक्षक व पदवीधर आमदाराच्या भरो श्यावर बसने म्हणजे पायांवर दगड मारून घेण्यासारखे होईल.

    ReplyDelete
  76. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे.तो आमचा मूलभूत हक्का आहे एक कामगार व देशाचा देश व उत्तम नागरिक घडविणारा सेवक म्हणून. आम्ही सर्व शिक्षक एक आहोत. आम्ही जीवनभर विद्यार्थी घडवण्यासाठी लढलो झगडलो आता आमच्या जिवणाशी खेळू नका.सेवा निवृत्ती नंतर काय संपले म्हणून आम्हाला बाहेर टकुंडेने वेगळे टकाने तुम्हाला अशोभनीय आहे..मुलाने आई बापाला गरज संपल्यावर टाकून दिल्यासारखे हे आहे.आम्ही ते कदापि होऊ देणार नाही.हा आमचा एल्गार समजा.चुकीचे निर्णय घेऊन नका कामगारांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले पाहिजे शिक्षक अखंड एक सेवक आहे हे ध्यानात असूद्या.

    ReplyDelete
  77. वरील कॉमेंट विजय कराळे सहशिक्षक dnyanvardhini विद्यालय चारकोप मुंबई.

    ReplyDelete
  78. जुनी पेंन्शन माझा हक्क

    ReplyDelete
  79. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे

    ReplyDelete
  80. जुनी पेन्शन हा कर्मचारी चा हक्क आहे आणि मिळत नाही ही दुःखाची गोस्ट आहे त्या साठी आपण शिक्षक भारती मार्फत लढा दिला पाहिजे व त्या साठी आंदोलन केले गेले पाहिजे

    ReplyDelete
  81. sarwanna juni pension yojna milalich pahije

    ReplyDelete
  82. Want the pension at the end of the day life

    ReplyDelete
  83. जूनी पेंशन लागू ठेवा नाहीतर सेवानिवृत्ती नन्तर शिक्षकावर उपसमारीची पाळी येईल

    ReplyDelete
  84. पेन्शन. आमच्या. हक्क आहे ते मीळ लीपाहीलीपाही जे. ते ह डपणयाचा. काही कार्य नकराव

    ReplyDelete
  85. जुनि पेंशन भविष्याचा आधार....
    पेंशन शिक्षकाच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची.

    ReplyDelete
  86. जुनी पेन्शन सर्व शिक्षकांना मिळालीच पाहिजे. तो आमचा हक्क आहे.

    ReplyDelete
  87. जुनी पेन्शन 2005पुर्वी नियुक्त शिक्षक यांना मिळालीच पाहिजे.

    ReplyDelete
  88. जुनी पेन्शन हा हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी शिक्षक भारती आणि आमचे सर्वाचे दैवत पाटील साहेब करीत आहेत त्यांच्या या प्रयत्नांना यश हे नक्कीच येणार हा आमचा अनुभव आहे. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  89. पेन्शन असणाऱ्यांची वृद्धपकाळात होणारी फरपट बघितल्यावर
    पेन्शन नसणारे कर्मचारी यांचा विचार केला तर कल्पना
    करवत नाही.पेन्शन हा हक्कच आहे नवीन नवीन घटकाला पेन्शन सुरू करणारे सरकार आहे त्यांची हिरावून घेणार असेल तर गप्प का बसावे.👍

    ReplyDelete
  90. सर्वानाच पेन्शन मिळाली पाहिजे त्यात भेद नकोच

    ReplyDelete
  91. पेन्शन हा आमचा हक्क आहे.आणि हक्क आम्हाला मिळायलाच हवा.निवृत्तीनंतर जर दिड - दोन हजार रूपये पेन्शन हातात येणार असेल तर पोट कसं भरणार उतारवयात? पोरंबाळांचं शिक्षण कसं करणार ? जन्मभर शिक्षणाचं दान करणारा,ज्ञानदान करणारा घटक म्हातार वयात काय आलू - कांदे विकून पोट भरणार काय ? पंचवीस- तीस वर्ष नोकरी करणा-यांना पेन्शन नाकारताय आणि राजकारणी हे जनतेचे सेवक आहेत .सगळ्या सोयी सुविधा आणि पेन्शन पण!आमदार खासदारांना पेन्शन मिळू नये.नियमानुसार पूर्णकालीन सेवा देणा-यांनाच पेन्शन हवी. पण इथे तर आमदारांची शेवटच्या दोन मिनिटात मंजूर केली जाते.आणि शिक्षकांना नाकारली जाते.किती विरोधाभास!
    आम्हाला जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे

    प्रा. संजय तिजारे ,नागपूर

    ReplyDelete
  92. जुनी पेन्शन सर्व शिक्षकांना मिळालीच पाहिजे. तो आमचा हक्क आहे.

    ReplyDelete
  93. जुनी पेन्शन सर्व शिक्षकांना मिळालीच पाहिजे. तो आमचा हक्क आहे

    ReplyDelete
  94. माझ्या शिवरायांच्या काळात स्वराज्याची सेवा करणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली जात होती.आपण आपले सर्व आयुष्य सरकारची सेवा करण्यात घालवणार आहोत मात्र 5 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणारे राज्यकर्ते जनतेच्या पैशाची लूट करून पेन्शन घेणारे आपल्या तोंडाला पाने पुसनार हा आपल्यावर अन्याय आहे.
    सर्व बांधवांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे.

    ReplyDelete
  95. आपल्या सर्व सहकार्यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत.

    ReplyDelete
  96. सर आम्ही तुमचा सोबतच आहोत. माझी पेन्शन माझा अधिकार.
    उच्च पदांवरील सगळ्या अधिकाऱ्यांना आपल्या सारख्याच शिक्षकांनी घडवले आहे. आणि आता तेच शिक्षकांना खालचा दर्जा देतात.

    ReplyDelete
  97. सर आम्ही तुमचा सोबतच आहोत. माझी पेन्शन माझा अधिकार.
    उच्च पदांवरील सगळ्या अधिकाऱ्यांना आपल्या सारख्याच शिक्षकांनी घडवले आहे. आणि आता तेच शिक्षकांना खालचा दर्जा देतात.

    ReplyDelete
  98. सर आम्ही तुमचा सोबतच आहोत. माझी पेन्शन माझा अधिकार.
    उच्च पदांवरील सगळ्या अधिकाऱ्यांना आपल्या सारख्याच शिक्षकांनी घडवले आहे. आणि आता तेच शिक्षकांना खालचा दर्जा देतात.

    ReplyDelete