Tuesday 21 December 2021

मुंबई पुन्हा जिंकली

सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार!!!

सेकंडरी स्कूल्स एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. कुर्ला मुंबई या पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल काल लागला.सहकार पॅनलला अपेक्षित यश मिळवता आले नाही.विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन तयार करण्यात आलेल्या सहकार पॅनलला मुंबईत सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने भरघोस मतदान झाले. परंतु ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत सहकार पॅनलला आपला निर्धारनामा पोहोचवता आलेला नाही. मुंबईतील बोरीवली, जोगेश्वरी, दादर,कुर्ला, विक्रोळी, चेंबूर विभागात मतदारांचा कौल सहकार पॅनलच्या बाजूने राहिला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, ठाणे सानपाडा शाखेतील आणि बाहेरच्या इंदापूर, नारायणगाव,माणगाव शाखेत सहकार पॅनलला चांगले मतदान केले. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कराड, सोलापूर, पंढरपूर, पिंपरी चिंचवड ,पुणे, लोणावळा इत्यादी शाखांमध्ये विरोधकांना जवळपास सहा हजाराचे मताधिक्‍य मिळाले. मुंबईत झालेल्या 8000 मतदानापैकी जवळपास साडेपाच हजार मते सहकार पॅनलला मिळाली.परंतु ग्रामीण भागातील मताधिक्य पार करून विजय मिळवण्या इतपत मते मिळालेली नाहीत. सहकार पॅनल हा पराभव स्वीकारत असून विजयी झालेल्या संचालकांना पारदर्शी व स्वच्छ कारभार करण्यासाठी शुभेच्छा देत आहे. सहकार पॅनलच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचा जाहीर केलेला निर्धारनामा पूर्ण करण्याची जबाबदारी विजयी संचालकांनी घ्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करत आहे.

मुंबईत समता पॅनलला काही संघटनांच्या नेत्यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता. विविध शाळातील काही गट समता पॅनलच्या सोबत असल्याचे चित्र समोर आले. या सर्व नेत्यांना आणि समता पॅनलच्या हितचिंतकांना सेकंडरी पतपेढीचा कारभार सभासदांच्या हितासाठी आणि पतपेढीच्या विकासासाठी करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यातील सभासदांची अर्थवाहिनी असलेली ही सेकंडरी पतपेढी सभासदांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करेल अशी मी आशा बाळगतो.

सेकंडरी पतपेढीच्या निवडणुकीत शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी,सदस्यांनी आणि आम्हा सर्व उमेदवारांच्या हितचिंतकांनी जिवाचे रान केले. रात्रीचा दिवस केला. कशाचीही अपेक्षा न करता स्वतःचा वेळ खर्च करून,पदरमोड करून जी मेहनत केली त्यामुळेच सहकार पँनलला भरघोस मते मिळाली. या माझ्या सर्व बंधू-भगिनींना मी त्रिवार अभिवादन करतो.

पाकीटे घेऊन, कसलीतरी आश्वासने घेऊन काम करणारे अनेक जण आपल्याला भेटतात, दिसतात पण निस्वार्थपणे आपले सहकारी निवडून यावेत म्हणून लढणारे, झटणारे कार्यकर्ते आम्हाला मिळाले हीच आमची आयुष्यभराची कमाई आहे. रात्री निकालाला उशीर होत होता. अनेकांना आपण घरी जावे अशी मी विनंती केली. पण आपण आम्हाला सोडून जायला तयार नव्हतात. सहकार पॅनलच्या पराभवाच्या दुःखापेक्षा माझ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून मला तीव्र वेदना झाल्या.आपण त्यांची इच्छा पूर्ण न करू शकल्याचे शल्य कायम टोचत राहणार आहे. मी आपल्या सर्वांचे आभार मानणार नाही तर आयुष्यभर आपल्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करेन. संघटनेच्या माध्यमातून अथवा वैयक्तिकरीत्या आपल्या सर्वांना कधीही गरज असल्यास एक आवाज द्या आम्ही सर्वजण आपल्या सोबत राहू. माझ्या आयुष्यात आपल्या सर्वांचे स्थान काय आहे हे मी शब्दात सांगू शकणार नाही पण नेहमी आपल्या सहकार्यासमोर नतमस्तक राहण्याचा मी प्रयत्न करेन. तुमची जिद्द, चिकाटी आणि लढण्याची हिम्मत मला भविष्यातील अनेक संघर्षासाठी सातत्याने प्रेरणादायी ठरेल.

आपल्या सर्वांना सलाम!

आपला स्नेहांकित,

सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष शिक्षक भारती,
महाराष्ट्र राज्य



89 comments:

  1. सर आपण हरलो नाही मुंबईकरांनी आपल्याला पूर्ण साथ दिलेली आहे आणि अनेक निस्वार्थी कार्यकर्ते जे आपल्यासाठी दिवस-रात्र झटले त्याचे खरच आपण सगळेजण ऋणी आहोत

    ReplyDelete
    Replies
    1. परंतु सर ग्रामीण भागामध्ये आम्ही ही रात्रीचा दिवस केला परंतु एका गोष्टीचं वाईट वाटतं सर शिक्षक हा सुद्धा विकला जातो याची मनामध्ये कुठेतरी खंत आहे पैशामुळे मतदान केलं त्यांच्या स्वकर्तुत्वावर त्यांना मिळालेला विजय नाही जेवणासाठी एवढा लाचार शिक्षक मी माझ्या 27 वर्षाच्या नोकरी मध्ये कधी पाहिला नाही खरंच खंत आहे मनामध्ये की सामान्य माणूस इथून पुढे राजकारणामध्ये टिकणार नाही जे खरे दिसलं ऐकलं बघितलं तेच थोडक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा सर्व मतदारांचे मनापासून आभार धन्यवाद

      Delete
    2. सर अपयश हि यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात ते चूक नाही या पुढचा विजय आपलाच असेल हे नक्की

      Delete
  2. सुभाष मोरे सर अगदी बरोबर. शिक्षक भारती व शिक्षक भारतीचे कार्यकर्ते पुन्हा सिद्ध झाले.अतिशय मेहनती व उत्साहाने काम करणारे कार्यकर्ते निष्ठेने काम करीत होते. या निवडणुकीत मुख्याध्यापकांनी सुद्धा स्वच्छ कारभरासाठी आपले मोठे योगदान दिले.सर्वांचे आभार.

    ReplyDelete
  3. मुंबई आपलीच आहे आणि आपलीच राहणार

    ReplyDelete
  4. लोकांना पातपेढीतील वास्तव परिस्थिती माहीत नाही.ग्रामीण भागातील लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त कर्ज मिळते.दुसरे पॅनल आल्यास आपल्याला काही मिळणार नाही असा गैरसमज पसरवला .वास्तव परिस्थिती लोकांच्या समोर येणे गरजेचे आहे.ते लोक वार्षिक सर्वसाधारण सभेला नसतात.म्हणून वास्तव बाहेर काढण्यास आपणास यश येवो.आपण दिलेल्या लढण्यास त्रिवार अभिवादन! जय शिक्षक भरती

    ReplyDelete
  5. सर, आशावाद आणि प्रयत्नांची कास हा भविष्यातील यशाची दिशा निश्चित करत असतो.तूर्तास आशावादी राहू या. शिक्षण आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण जे योगदान देत आहात ते लाख मोलाचं आहे.धन्यवाद

    ReplyDelete
  6. लढेंगे, जितेंगे

    ReplyDelete
  7. CONGRATULATIONS FOR YOUR VICTORY AND INSHA ALLAH IN NEXT ELECTION OUR PANEL WILL WIN AND WE WILL WORK MORE HARDER THAN THIS

    ReplyDelete
  8. sir आम्ही भाग्यवान समजतो की तुमच्यासारखे सत्यासाठी लढणारे,अन्यायाला वाचा फोडणारे असे सोबती आम्हाला लाभ ले.सर प्रत्येक संघर्षात,लढ्यात,सत्याच्या प्रत्येक मार्गात आम्ही तुमच्या सोबत आहोत.तरी सुध्दा खूप वाईट वाटले......
    सत्याचा विजय होवो.हीच इच्छा.

    ReplyDelete
  9. काही हरकत नाही आपण हरलो या जिंकलो तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत

    ReplyDelete
  10. सर आपण खूप मेहनत घेतली होती यावेळी परंतु आपल्याला विजयापर्यंत पोहोचता आलं नाही.शिक्षक भारती या पराभवातुन नक्कीच पुढे जाईल.एक चांगला संघर्ष आपण केला.शिक्षक भारतीच्या अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व शिलेदारांना मनःपूर्वक धन्यवाद!

    ReplyDelete
  11. सरजी खुप मोठ्या मनाने आणि धिराने आपण सहकार पॅनलची निकाला नंतरची भूमिका मांडली आहे....
    आर्थिक आणि गलीच्छ राजकारणाने ग्रामीण भागात मते कमी मिळाली असतीलही... परंतु आपल्या मार्गदर्शनाने निवडणूकीत शिक्षक भारतीने तयार केलेले वातावरण विरोधकांसह अनेकांच्या मनात धडकी भरवणारे होते..
    येणार काळात शिक्षक भारतीची ताकद निश्चितच अधिक मोठ्या प्रमाणात दिसून येईल...

    ReplyDelete
  12. नमस्कार सर
    आपणास सांगू इच्छितो की आपण हरलो नाही आपण सगळेच लढणारे सैनिक आहोत
    पण माझ्या मते आपल्याला ग्रामीण भागातील उमेदवारांकडून गाफील ठेवण्यात आले
    पुढे आपण काळजीघेऊच आणि भ्रष्टाचारी विचारसरणीला मुळासकट उपटून फेकू
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  13. यह हार एक विराम है
    जीवन महासंग्राम है
    तिल-तिल मिटूँगा पर दया की भीख मैं लूँगा नहीं।
    वरदान माँगूँगा नहीं।।

    ReplyDelete
  14. लढेंगे , जितेंगे एवढ्यात हार मानेल तो शिक्षक भारतीचा कार्यकर्ता कसला

    ReplyDelete
  15. आम्ही भाग्यवान आहोत की शिक्षक भारती सारख्या सत्यासाठी लढणारे,अन्यायाला वाचा फोडणाऱ्या शिक्षक संघटना आहे व आपल्यासारखे असंख्य कार्यकर्ते आम्हाला लाभलेले आहेत.सर प्रत्येक संघर्षात,लढ्यात,सत्याच्या प्रत्येक मार्गात आम्ही तुमच्या सोबत आहोत. शेवटी विजय हा सत्याचा होतो व होत राही, हीच आमच्या सदिच्छा!💐💐💐💐

    ReplyDelete
  16. ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. असे वाटत नाही. त्यामुळे त्यावर अधिक चिंतन करून त्या गोष्टीला महत्त्व देऊ नये. श्री.कपिल पाटील सर, श्री.सुभाष मोरे सर. आपण आमचे प्रेरणास्थान आहात. कायम असाल.

    ReplyDelete
  17. आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ हेतूने केलेले काम हाच आपला विजय आहे.

    ReplyDelete
  18. Sir,salute to you and your team.
    You are always been gr8 help and hope to all of us. Thanks for your selfless services. God bless you 🙏🏼

    ReplyDelete
  19. मोरे सर नमस्कार !आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि कौतुक ...
    जिंकणे किंवा हरणे हे महत्त्वाचे नसून लढणे हे सर्वात महत्त्वाचे आहे . सच्चाईला नेहमीच त्रासातून जावे लागते .आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा ...!
    धन्यवाद .

    ReplyDelete
  20. लढण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही

    ReplyDelete
  21. सुभाष गायकवाड सर

    ReplyDelete
  22. Sir next time Vijay nakki aplach

    ReplyDelete
  23. और भी लढेंगे सर! मोरे सर तुमच्या कार्याला सलाम.

    ReplyDelete
  24. खान्देशच्या पतपेडित बसून मत विकत घेतली गेली समता वल्यानं मगलकार्यलय बुक करून भरमसाठ दारू व पैसा सभासदांना दिला गेला मतदार याद्या देखील अडयावत नव्हत्या सत्ताधारी पक्षाकडे मोबाईल नंबर शाळेचे नाव घरचा पत्ता अशा अद्यावत याद्या होत्या

    ReplyDelete
    Replies
    1. हेच सत्य आहे

      Delete
    2. खरं आहे सर, निजामपूरला मटन व दारूची पार्टी झाली, धुळ्यातील दलालांकडे ४०,०००/- रूपये दिलेले होते व लामकानी येथील एका पत्रकाराकडे सर्व आर्थिक नियोजन असल्याचे ऐकीवात होते, त्यामुळे धुळ्यात ९३३ पैकी ७८६ मते मिळाली.

      Delete
    3. आर्वी येथील हाँटेल क्रुष्णकमलमध्ये ही एक दलालांची टीम मुक्कामी होती असे ऐकीवात आहे.
      या सर्व गोष्टी मतदारांपर्यंत पोहचायला हव्या होत्या

      Delete
  25. सर आम्हाला आपला व आपल्या सर्व सहका-यांचा अभिमान आहे

    ReplyDelete
  26. लढेंगे!जितेंगे!

    ReplyDelete
  27. पैसा जिंकला,विचार नाही
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  28. श्री मोरे सर आपण सर्व एकत्र आलो. आणि आपली सर्वांची घट्ट मैत्री निर्माण झाली. त्यामुळे भविष्यकाळात खूप चांगले काहीतरी करता येईल. आमचे श्री सुधीर भाऊ घागस श्री आर डी पाटील सर. व सर्व मित्र परिवार यांनी खूप मेहनत घेतली.

    ReplyDelete
  29. मोरे सर आकडेवारीनुसार आपण पराभुत झालेले असु परंतु मतदार बंधु भगिनी आणि शिक्षक भारती संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी घेतलेली मेहनत आणि मतदारांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास यामध्ये आपण विरोधकांपेक्षा खुपच पुढे आहोत.याच कारण विरोधक सत्ताधारी होते.आणि आपण सत्तेत नव्हतो.तरीसुध्दा आपण ज्या पद्धतीने विरोधकांना लढत दिली ती कोणत्याही विजयापेक्षा कमी नव्हती.फरक फक्त एवढाच कि विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आपल्या कडे योग्य आकडे नव्हते.कधी कधी विजयासाठी घेतलेली मेहनत विजयासाठी लागणा-या आकडेवारी पेक्षा खुप काही शिकवुन जाते आणि आत्मविश्वास देऊन जाते.शेवटी एकच म्हणेण आगे जाकर लढेंगे भी और शान से जीतेंगे

    ReplyDelete
  30. सर अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जय पराजय हा होताच असतो.पुढील काही दिवसात आपला विजय हा नक्कीच असेल.

    ReplyDelete
  31. श्री मोरे सर आपण मुंबई मधील मते मिळाली परंतु पश्चिम महाराष्ट्रातील मते मिळवण्यास कमी पडलो. तरीसुद्धा इतकी मते म्हणजे आपला विजयच आहे.

    ReplyDelete
  32. सर आम्हाला आपला अभिमान आहे

    ReplyDelete
  33. पुन्हा लढू सर,मुंबईची साथ कायम लाभेल यात शंका नाही. जेथे कमी पडलो तेथे निश्चितच लक्ष देऊ, लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  34. मोरे सर, लढाई ही सत्य आणि असत्याची होती . असत्याचा विजय झाला ,आणि सत्याचा पराभव , तरीही आपण मागे हटायचे नाही पून्हा तयारी करूया ,पण पतसंस्थेची नाही आमदारकीची. लगेंगे जितेंगे

    ReplyDelete
  35. मोरे सर, लढाई ही सत्य आणि असत्याची होती . असत्याचा विजय झाला ,आणि सत्याचा पराभव , तरीही आपण मागे हटायचे नाही पून्हा तयारी करूया ,पण पतसंस्थेची नाही आमदारकीची. लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  36. God bless you and Shiksha Bharati Team for all the hard work.

    ReplyDelete
  37. और भी लढेंगे, और ...जितेंगे भी .

    ReplyDelete
  38. नमस्कार सर🙏
    तुम्ही खरे बाजीगर आहात.
    हारकर भी जितते है उसे बाजीगर कहते है।
    तुमचा लढाऊ बाणा,संघर्ष, आदर्श विचार, संविधानिक मार्गाचा अवलंब या सर्व गोष्टींमुळे आमच्या दृष्टीने आपण आमची मने जिंकलेली आहेत. रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनासुद्धा बऱ्याच वेळा हार पत्करावी लागली होती पण त्यांनी शेवटपर्यंत आपल्या स्वप्नातील स्वराज्याच्या लढ्यातून माघार घेतली नव्हती. उलट आपल्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास त्यांनी वाढविला व स्वराज्यासाठी भली मोठी फौज तयार केली. आपल्यामध्ये संघर्षवृत्ती व उत्तम संघटनकौशल्य आहे. आपण यापुढेही आपले कार्य अशाच उमेदीने चालू ठेवावे. पुढील वाटचालीसाठी आपणास मनापासून शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व यश लाभो ही सदिच्छा.🙏🙏💐💐



    ReplyDelete
  39. sir आम्ही भाग्यवान समजतो की तुमच्यासारखे सत्यासाठी लढणारे,अन्यायाला वाचा फोडणारे असे सोबती आम्हाला लाभ ले.सर प्रत्येक संघर्षात,लढ्यात,सत्याच्या प्रत्येक मार्गात आम्ही तुमच्या सोबत आहोत

    ReplyDelete
  40. इंदापूर मधून खूप चांगलं काम झालं आहे फक्त पतसंस्थेच्या निवडणुकी पुरतेच मर्यादित न राहता शिक्षकांच्या एकजुटीचा वापर हा शिक्षकांच्या विविध समस्या सरकार दरबारी पोचवण्यासाठी आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी व्हावा ही कळकळीची विनंती फक्त मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक संघ यापुरतेच मर्यादित न राहता तळागाळातील शिक्षकांना सामावून घेऊन काम केले तर यापेक्षाही अधिक चांगली काम घडू शकते

    ReplyDelete
  41. शंकर नाईकवाडी अध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षक काँग्रेस

    ReplyDelete
  42. मोरे सर,आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली.....
    हार जीत होती रहती है! आपण शिक्षक आणि शिक्षणासाठी कायमच आत्मीयतेने आणि निर्भिडपणे कार्य करत आहात असेच कार्य पुढे सुरू ठेवा ....
    आपले मनःपूर्वक अभिनंदन!

    ReplyDelete
  43. सर आम्ही लोणावळा भागात खूप प्रयत्न केला,पण एका गोष्टीचे खूप वाईट वाटले की शिक्षकांना सुध्दा आपल्या हिताचे कोणता पॅनल कोणता आहे हे कळत नसेल तर ही शोकांतिका आहे.
    शेवटी एवढेच म्हणेल,अपयेश ही यशाची पहिली पायरी आहे.निराश न होता जोमाने काम करून पुन्हा लढू व यश प्राप्त करू.

    ReplyDelete
  44. सर,सत्याच्या मार्गाने दिलेला हा लढा नक्कीच प्रेरणादायी ठरेल.शिक्षक भारती चे सर्व पदाधीकारी,कार्यकर्ते व सदस्य,कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे तर सत्यासाठी एक संघपणे,कौटुंबिक भावनेने लढले.हाच खरा विजय आहे! बाकी आपण सर्व उमेदवार आमच्यासाठी आदर्श व प्रेरणादायी आहातच.लढेंगे,जितेंगे!

    ReplyDelete
  45. KOI BAAT NHIN SIR,
    PHIR LADENGE PHIR JEETENGE,.

    MUMBAI KE HAMARE SHIKSHAK HAMARE SAATH HAI YE SAB SE BADI UPLABDHI HAI..
    MUMBAI IS AS A STATE...
    SIR NEXT TIME MUMBAI ME 100% VOTE KARNE KA PLAN BANANO.
    MUMBAI KE 13000 VOTE BHI ONE SIDE ATE HAIN TO VICTORY HOGI...GRAMIN KE VOTE KAM BHI RAHE TO HAM JEETENGE.

    ReplyDelete
  46. सर हार मानू नका अपयश ही यशाची पहिली पायरी असते सत्याचा विजय होणारच

    ReplyDelete
  47. लढूया,,
    हे आपले ब्रीद आणि प्रवृत्ती आहे, सर....
    यश अपयश जे ही आहे,तो प्रयत्नाचा व परिवर्तनाचा भाग होता आपल्या प्रयत्नास सलाम.., प्रस्थापित व्यवस्थेद्वारा सत्तेचा गैरवापर हा निवडणुकीतला महत्वाचा फॅक्टर ठरला... असमंजस मतदार, दिशाभूलीचे वातावरण या गोष्टी ही सत्याच्या पराभवस कदाचित कारणीभूत झाल्या असतील, आपण आत्मपरीक्षण करूयात,नव्याने नियोजन करूयात,दोन पावलं मागे जाऊन पुन्हा अनोख्या उमेदीने यशाकडे कूच करूया...झुंजणारे अजून जिवंत आहेत...लढाई आगे जारी रहेगी!!💐💐💐

    ReplyDelete
  48. खरोखरच संघर्ष आपल्या नसानसात भिनलेला आहे. तो कसा करायचा हे तुम्ही आम्हांला शिकवलंत...एका पराभवाने आपण कधीच खचणारे नाहीत.नव्या उमेदीने पुन्हा आपण लढा उभारुन तुम्ही परत सज्ज व्हाल..त्यानंतर विजय आपलाच होईल.हे नक्की!

    ReplyDelete
  49. सर आपण सर्वानी दिलेला लढा खूप मोठा होता.कार्यकर्ते मनापासून प्रयत्न करत होते यापुढेही असाच संघर्ष करावा लागेल .

    ReplyDelete
  50. पराजयाला स्पष्टीकरण नको आसते, विजयाला स्पष्टीकरणाची गरज नसते, विजय हवा आसेल तर १०००० मते into ५००० रुपये =५ कोटी रुपये घेऊन बसले पाहिजे, मतदार तुम्हाला शोधत येतील , तुम्हाला फिरणयाची गरज नाही कारण तुमचा मतदार हा आति सुशिकशित आहे,

    सलाम आशा भाडकावांना 🙏

    ReplyDelete
  51. सर तुम्ही उड्या केलते सगळ्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या नशिबातच नव्हतं त्यामुळे आपण सगळे तर काय करणार प्रयत्न सर्वांनी केले पण आपण कुठेतरी कमी पडलो याची जाणीव आता आपला होत आहे.

    ReplyDelete
  52. सर आगे भी और लड़ना बाकी है,
    लढेंगे.... जीतेंगे!

    ReplyDelete
  53. सर, मुंबई जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, नारायणगाव, इंदापूर, व माणगाव या ठिकाणी आपल्यालाच मत मिळाली. शनिवारी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सुट्टी होती व शाखा जर नवीन उभारल्या नसत्या तर संपूर्णपणे आपलाच विजय होता असो आपल्या कार्यकर्त्यांनी देखील निस्वार्थीपणे खूप परिश्रम घेतले लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  54. सर नमस्कार, खूप प्रामाणिकपणे सर्वांनी सहाकार्य केलेले आहे. भविष्यात निश्चित चांगले वातावरण निर्माण होईल. ग्रामीण भागातील सभासदांना विशेज प्रयत्न करून आपल्या पाठीशी उभे राहतील असे ठोस कार्यक्रम घेऊयात . मोरे सर आपण एक प्रामाणिक व अभ्यासू तळमळीचे कार्यकर्ते आहात . आपण सहजासहजी हार मानत नाहीत. तर मग सर्वांना पुन्हा जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करुयात .

    ReplyDelete
  55. सर. मतांनी जरी हरलात तरी मनाने मात्र नक्की जिंकलात.जय सहकार पॅनेल.short but sweet sms..👍

    ReplyDelete
  56. सर आपण आमचे आदर्श आहात प्रामाणिक कार्यकर्ता कधीच हरत नाही.लगेंगे और जितेंगे रायगडचे आपले सर्व शिलेदार रात्रदिवस मेहनत घेत होते.आपली एकी हीच आपली ताकद सर्वाना प्रेरित करूया

    ReplyDelete
  57. पैसा जिकला सर प्रामाणिक माणूस हरला

    ReplyDelete
  58. सर आपण तत्वाने लढलात तत्व विकणे आपल्या तत्वात बसत नाही तरी कडवी झुंज दिली ही भविष्यातील विजयाची पहिली पायरी समजू
    लढेंगे जितेंगे
    जय शिक्षक भारती
    प्रा किरण थोरात(संघटक पालघर जिल्हा)

    ReplyDelete
  59. लढेंगे जितेंगे जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  60. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  61. Haari baazi ko jeetna humein aata hai 💞
    Aaj nahi toh Kal sahi jeet appki hi hogi ✅ koi baat nahi sir logo ka vishvas toh apne jeet hi liya hai🎉

    ReplyDelete
  62. Good show Subhash 👍👍👍👍

    ReplyDelete
  63. Good show Subhash 👍👍👍👍👍

    ReplyDelete
  64. हरकत नाही...आपला प्रामाणिक पणा सर्व काही देऊन जातोय......लढेंगे..जितेंगे..

    ReplyDelete
  65. सर ... Next time fir ladenge ladenge aur jitenge bhi

    ReplyDelete
  66. सर आपण मेहनत घेतली मुंबईत भरपूर माध्यमिक मिळाले परंतू ग्रामिण भागातील मतदारांना अमिष दाखवून आपल्या विरोधात खूपच चुकीचा अपप्रचार केला गेला दु:ख एवढेच आहे की सुशीक्षीत मतदार सुद्धा सारासार विचार न करता प्रलोभनांना बळी पडतो असूद्या आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत मान.कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच शिक्षक- शिक्षकेतर बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहूया धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  67. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...

    ReplyDelete
  68. निश्चितच सर,
    आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही परंतु आपण नक्कीच आपली ताकद दाखवून दिली.गावाकडे अपप्रचार झाला म्हणून त्याचा फटका आपल्याला बसला.अपयश आपण स्वीकारुन पुन्हा जोमाने कामाला लागुयात.आपली साथ आणि सहकार्य आपल्यासोबत कायम असेल.

    ReplyDelete
  69. शह...काटशह...ही तितकाच महत्वाचा प्रतिपाक्षाच्या भूमिकेत खुप महत्वाची भूमिका बजावली आहे 👍

    ReplyDelete
  70. सर - निवडणूक म्हणजे सर्व काही नाही तुमची आमची मैत्री तुमचे सहकार्य प्रेम आपुलकी हे च आमच्या साठी सर्व काही आहे . आमची साथ अखंडपणे आपणां सोबत च राहील . धन्यवाद !

    ReplyDelete
  71. सर आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत.
    लढेंगे जितेंगे.

    ReplyDelete
  72. लढेंगे ....जितेंगे
    जय शिक्षकभारती

    ReplyDelete
  73. सर, हार के जो बाजी जिता ऊसे बाजीगर केहते है और वही बाजीगर आप है सर लढेंगे, फिर जितेंगे, अगली जीत अपनी ही होगी. हम आपके साथ है 👍

    ReplyDelete
  74. आम्ही आपल्या सदैव पाठिशी आहोत. शिक्षकभारती.

    ReplyDelete
  75. मोरे सर तुमचे विचार व लेखणी पाटील सर (आमदार)यांच्या प्रमाणेच तेजस्वी आहे लिंकन याच्या सारखी चिकाटी आपणास शोभून दिसते आपले चांगले दिवस नक्की यातील आपण काम करत राहूया यश व अपयश याच्या पलीकडे पाहून काम करण्याचे दिवस आहेत तुमच्या सोबत आम्ही आहोत तुमच्या चिकाटी प्रयत्नाला सलाम धन्यवाद

    ReplyDelete
  76. शिक्षक भारती ही शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी काम करते. महाराष्ट्र माऊली सानेगुरुजी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा विचारवारसा पुढे चालवते. पतसंस्था आणि बँकांमधील अर्थकारण आणि राजकारण हा प्रांत आपला नाही. त्यासाठी लागणारी टगेगिरी आणि निबर कातडी आपल्या अजेंड्यावर येऊच शकत नाही. पोट भरल्यानंतर मनाला विधायक वळण देता आले नाही तर अनेक विकृती जन्माला येतात.

    सहकारातून सर्वांची नव्हे तर ठराविक मंडळींची हयातभर समृद्धी होताना दिसत आहे, आणि शिक्षक मतदारांची यत्ता न उंचावल्याने मत आणि भूमिकेपासून तो कोसोदूर आहे..आपण या भानगडींपासून दूर असलेले बरे..

    ReplyDelete
  77. आपण आणखीन शिक्षकांची कामे करून पुढच्या निवडणुकीला सामोरे जाऊ.हा पराभव आपल्या सर्वांचा आहे.पुन्हा नव्या जोमाने सामोरे जाऊ.

    ReplyDelete
  78. मोरे सर नमस्कार. आपल्या सर्व टिमचे कौतुक जिंकणे किंवा हरणे हे महत्त्वाचे नसून लढणे हे सर्वात महत्वाचे आहेत. प्रामाणिक माणसाला नेहमीच या त्रासातून जाव लागते. तसाही आपला विजयच आहे पैसा न देता एवढी मते मिळाली पुढील कार्यास शुभेच्छा.

    ReplyDelete