Friday 15 April 2022

खरंच शिक्षकांचे पगार वेळेवर होतील काय?

 
दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांच्या पगारा संदर्भात झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षाताई गायकवाड, आमदार कपिल पाटील, नागपूरचे आमदार अभिजित वंजारी, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, महिला आघाडी राज्याध्यक्ष संगीता पाटील, मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे आदी उपस्थित होते.
 
मंत्रालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आलेले प्रश्न/ मुद्दे
1) वित्त विभागाकडून वेळेवर पैशांचे वितरण होत असेल तर राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांचे पगार वेळेवर का होत नाहीत?
 
2) फेब्रुवारी पेड इन मार्चचा पगार,सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा हफ्ता, पीएफचे पैसे, थकबाकी, वैद्यकीय बिले इत्यादीसाठी 11000 कोटी रुपये वितरित केल्यानंतर 9000 कोटी रुपये परत का गेले?
 
3) आश्रम शाळा, आदिवासी शाळा, सैनिकी शाळा आणि सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरू असणाऱ्या विशेष शाळांचे पगार 3 ते 5 महिने उशिरा का होतात?
 
4) मा. सुप्रीम कोर्ट आणि मा. हायकोर्ट यांचे आदेश असूनही मुंबईतील शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी युनियन बँकेसोबत करार का होत नाही?
 
आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने मांडलेले मुद्दे
राज्यात कोवीड काळात आर्थिक अडचण असल्याने सर्वांचेच पगार सातत्याने उशिरा होत होते. आता कोवीडचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. राज्याची आर्थिक स्थिती सुधारत आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सोडले तर सर्वांचे पगार वेळेवर होऊ लागले आहेत. पण मग शिक्षक- कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा का होतात?

शिक्षण निरीक्षक कार्यालय, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक, संचालक (प्राथमिक / माध्यमिक), शिक्षण आयुक्त आणि मंत्रालयातील शिक्षण विभागातील अधिकारी या विविध स्तरावर प्रत्यक्ष भेटून चर्चा करून शिक्षकांच्या पगाराबाबत माहिती घेतली असता एक गोष्ट लक्षात आली की कोणीही आमच्या पगाराची हमी घ्यायला तयार नाही. मंत्रालयातील अधिकारी शिक्षण विभागातील वेतन अधीक्षक कार्यालयाकडे बोट दाखवतात तर अधीक्षक कार्यालयातील अधिकारी मंत्रालयातून बीडीएस प्रणाली बंद असल्याचे कारण देतात. याबाबत वित्त विभागातील अधिकाऱ्यांशी भेट घेतल्यानंतर आम्ही नियमितपणे पैसे देतो असे सांगितले. प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी शिक्षण विभाग, वित्त विभाग, शिक्षण मंत्री आणि वित्तमंत्री यांच्यासोबत एकत्रितपणे आजची बैठक होत आहे.

मुंबईतील शिक्षकांचे पगार 2017 सालापर्यंत दरमहा एक तारखेला होत होते. परंतु तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी युनियन बँकेसोबत असलेला करार मोडून मुंबई बँकेत पगार ढकलण्याचा निर्णय घेतला त्या दिवसापासून नियमित पगार होण्याची परंपरा खंडित झाली आहे. मा.हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने तत्कालीन शिक्षण मंत्र्यांचे आदेश रद्दबादल ठरवले आहेत.शिक्षण विभागाने युनियन बँकेशी तो करार पूर्ववत करून सर्व शिक्षक शिक्षकेतरांचे पगार युनियन बँकेतून केले तर 1 तारखेला पगार देणे सहज शक्य आहे.
 
 
उपमुख्यमंत्री अजितदादांचे उत्तर
वित्त विभागाने पैसे देऊनही पगार वेळेवर होत नाहीत यावर अजित दादांनी तीव्र नापसंती दर्शवली. वित्त विभागाने पैसे देऊनही पगार 3 ते 5 महिने उशिरा होत असतील तर वित्त विभाग व शिक्षण विभागातील अधिकारी नक्की काय काम करतात? असा सवाल अजितदादांनी केला. सभा सुरू असताना मा. अजितदादांनी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना फोन करून पगार सुरळीतपणे करण्याबाबत 10 ते 15 दिवसात तोडगा काढण्याचे आदेश दिले. तसेच वेळेवर पगार न झाल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाहक त्रास तर होतोच पण आपल्या विभागाचीही बदनामी होते हे बरोबर नाही असे दादा म्हणाले. वित्त सचिवांनी बीडीएस प्रणाली असो किंवा शालार्थ प्रणाली असो राज्यातील जिल्हा परिषद आणि सर्व खाजगी शाळातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टीत सुधारणा करून अहवाल मला सादर करावा असे सांगितले. शिक्षण सचिव, वित्त सचिव व सर्व संबंधित अधिकारी यांनी एकत्र बसून हा पगाराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा अशी स्पष्ट सूचना दिल्या. गरज वाटली तर या विषयावर पुन्हा एकदा बैठक घेण्याचे आश्वासन अजितदादांनी दिले. 
माननीय शिक्षण मंत्र्यांचे उत्तर
मुंबईसह राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होण्यासाठी वित्त विभाग आणि शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक होणे आवश्यक आहे हे मान्य केले. मुंबई संदर्भात 134 शाळा सोडल्या तर सगळ्यांचे पगार सद्यस्थितीत युनियन बँकेतून होत आहेत. ज्या शाळांचे पगार मुंबई बँकेतून होतात त्यांचेही पगार युनियन बँकेत वर्ग करण्यात येतील असे सांगितले. तसेच युनियन बँकेसोबत करार करून एक तारखेला पगार देण्याबाबत शासन आदेश काढण्याचे कबूल केले.
 
 
वित्त सचिवांनी दिलेले उत्तर 
आश्रम शाळा, आदिवासी शाळा, सैनिकी शाळा आणि विशेष शाळांचे तीन ते पाच महिने पगार उशिरा का होतात याची संपूर्ण माहिती स्वतः बैठक घेऊन घेण्याचे मान्य केले. तसेच बीडीएस प्रणालीअंतर्गत निधीचे वितरण वेळेवर होऊन सर्व कर्मचाऱ्यांना नियमितपणे पगार देण्यासाठी तांत्रिक अडचणीवर वित्त विभाग व शिक्षण विभाग संयुक्त बैठक घेऊन 25 एप्रिल पर्यंत या सर्व प्रश्नांच्या उत्तरासह आवश्यक त्या सुधारणा करून अंतिम अहवाल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सादर करण्याचे मान्य केले. 
 
शिक्षक भारतीची भुमिका
कोविड काळात राज्यातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी यांच्यासोबत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राणांची पर्वा न करता ड्युटी केली आहे. पगार हा आपला मूलभूत अधिकार आहे. कोवीड काळात दोन ते तीन महिने पगार उशिरा होऊनही शासनाची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने आम्ही सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली होती. आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर तरी एक तारखेला पगार मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. दरमहा पगार उशिरा झाल्याने गृहकर्जाचे हप्ते, दैनंदिन खर्च, मुलांची फी आणि इतर आर्थिक गरजांसाठी हक्काचा पगार असूनही ऊसनवारी करावी लागणे दुर्दैवी आहे. पगार वेळेवर न झाल्याने दरमहा दंड व्याज भरावे लागते, सिबिल खराब होतो हे शिक्षकीपेक्षातील आम्हाला शरमेचे वाटते. एक पगार आल्यानंतर दुसऱ्या पगारासाठी वाट पाहत राहणं नित्याचे झाले आहे.यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने शिक्षणमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. बैठकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे संपूर्ण कार्यवाही होते किंवा नाही याचा सातत्याने पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने घेतली आहे. आपला पगार हा आपला सन्मान आहे. हा सन्मान पुन्हा मिळवण्यासाठी शिक्षक भारती सातत्याने संघर्ष करतच राहील!
लढेंगे जितेंगे
जय शिक्षक भारती

सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य 











 
 
 
-------------------------------

उशिरा होणाऱ्या पगाराबाबत नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आमदार कपिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 
 
पगारासाठी कोविडचे कारण किती दिवस? - आमदार कपिल पाटील

78 comments:

  1. आवश्यक व जिव्हाळ्याचा विषय सर्वोतोपरी विचार करून मांडला आहे..नक्कीच यश येईल.

    ReplyDelete
  2. माध्यमिक शिक्षक वर्गाचे पगार राष्ट्रीय बँकेतून व्हावे.

    ReplyDelete
  3. शिक्षक भारती चा विजय असो

    ReplyDelete
  4. खूप खूप धन्यवाद सर

    ReplyDelete
  5. शिक्षक भारती जिंदाबाद!

    ReplyDelete
    Replies
    1. शिक्षकभारती झिंदाबाद.. सर्व कार्यकर्त्यांना मनापासून सलाम..

      Delete
  6. राज्य भर आंदोलन करावे लागेल. आपण मांडलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत

    ReplyDelete
  7. हा सन्मान नक्कीच मिळेल सर, आपल्या प्रयत्नांना यश मिळणारच.

    ReplyDelete
  8. शिक्षकांचे प्रश्न आंतरिक जिव्हाळ्याने सोडवणारे आमदार कपिल पाटील आणि शिक्षकभारती संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार🙏

    ReplyDelete
  9. मा.कोर्टाचे आदेश असताना सुयोग्य प्रणालीचा वापर करून गुरुजनांचे पगार १ तारखेलाच व्हावेत यासाठी मंत्री महोदयांनी लक्ष घातलेले आहे.यासाठी सातत्याने पाठपुरावा होत रहावा हीच शिक्षक प्रतिनिधींना विनंती व धन्यवाद.....

    ReplyDelete
  10. असाच पाठपुरावा व्हायला हवा
    अभिनंदन आमदार साहेब

    ReplyDelete
  11. Great 👍 Your efforts will be successful sir ,thank you for efforts

    ReplyDelete
  12. शिक्षक हा देशाचे भविष्य घडविण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो मनुष्याचे जीवन आनंदी होण्यासाठी त्याला भावनिक, सामाजिक आणि आर्थिक आधाराची गरज असते हया तिन्ही गरजांमध्ये मुळ गरज म्हणजे आर्थिक गरज असते ती वेळेवर पूर्ण नाही झाली की मानसिकता खराब होते आणि शिक्षकाची मानसिकता खराब झाली की त्याच्या सर्व प्रकारच्या कामात तो डिस्ट्रब होतो हे फक्त सन्मानिय आमदार साहेबच समजु शकतात आणि हया प्रश्नात त्यांनी लक्ष घातले म्हणजे तो निश्चित सुटेलच हे सत्य लपणार नाही त्यामुळे कार्यकारिणीने पाठपुरावा करणे आवश्यक आहे शिक्षकांनी साठी लाभलेले एक यशस्वी नेता म्हणजे सन्मानिय पाटील साहेब

    ReplyDelete
  13. Asharam shala solapur dist Thanks

    ReplyDelete
  14. मुंबईसह महाराष्ट्राची हीच परीस्थिती होती खूप महत्वाची बैठक झाली.आशादायी राहु नाहीच सुधारली व्यापक लढा उभारण्यासाठी प्राथमिक शिक्षक भारती हीरेरीने पुढे राहील..जय शिक्षक भारती..

    ReplyDelete
  15. समस्या कितीही मोठी असली तरी शिक्षक भारती चे माननीय आमदार श्री कपिल पार्टील साहेब,सुभाष मोरे सर व इतर पदाधिकारी त्याचे निराकरण करणारच यावर आम्हा सर्व शिक्षकांचा ठाम विश्वास आहे,शिक्षक भारतीचा विजय असो।

    ReplyDelete
  16. वेतन विलंबाने होत होते. ते आजही विलंबाने होते व भविष्यातही विलंबाने होईल याची मी ग्वाही देतो.1 तारखेला कधीच पगार होवू शकत नाही याचा मला विश्वासच नाही तर खात्री आहे.आदरणीय कपिलजी पाटील यांनी पोटतिडकीने प्रश्न उपस्थित केला म्हणून त्यांचे आभार.
    परंतु सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन 1 तारखेला मागण्याची विविध करणे आहेत
    1) गृहकर्जाचा हप्ता
    2) वैयक्तीक कर्जाचा हप्ता
    3) मुलांचे शैक्षणिक खर्च इत्यादी

    वेतन वेळेवर होणारच नाही पण निदान वरील कारणांसाठी थोडा ग्रेस पिरियड मिळणे आवश्यक आहे.एवढी तरतूद केली तरी तुमचे खूप आभार होतील...

    ReplyDelete
    Replies
    1. सर मुंबई विभागाचे पगार या अगोदर 1 तारखेलाच होत होते

      Delete
  17. धन्यवाद आमदार कपिल पाटील साहेब.

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. Great done Sir... for sure success

    ReplyDelete
  20. शिक्षकांचे पगार वेळेवर करा असे हायकोर्टाचे जर आदेश असतील. तर हाय कोर्टाच्या आदेशाचे पालन करणे जरुरी आहे. न्यायालयाच्या आदेशाचे जर उल्लंघन होत असेल तर या विषयी अवमान याचिका दाखल केली पाहिजे.

    ReplyDelete
  21. Amcha ICT cha Prashna ghya na Patil Sir plz tumhala vinanti ahe

    ReplyDelete
  22. Amcha ICT cha pan mudda ghya na sir plz tumhala vinanti ahe

    ReplyDelete
  23. नागपूर जिल्ह्यात पे युनीट अधिक्षक निधी वेळेवर उपलब्ध होत नाही..असे कारण संघटना पदाधिकारी यांना नेहमी सांगतात.पूर्वी प्रमाणे 3..3 महिन्याचे अलाॕटमेंट द्यायला हवे..एका महिन्याचे नाही.छान.. सन्मानाचा प्रश्न आहे.. शिक्षक भारती लढेल व जिंकेलच..शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती..जय हो..

    ReplyDelete
  24. ICT लॅब धूळ खात पडून आहेत सरकला प्रश्न संगीला नाही सर खेड्यातील गरीब विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान देणे बंद करण्यात का आले सरकार ला ? ..

    ReplyDelete
  25. वाटत नाही? जर झाले तर खूपच चांगले होईल... शिक्षक भारती चा विजय असो.

    ReplyDelete
  26. ICT संगणक शिक्षक नियुक्ति च्या प्रतिक्षेत आहेत त्यांना केव्हा न्याय मिळणार ?

    ReplyDelete
  27. Ict शिक्षक यांच्यासाठी काय? साहेब

    ReplyDelete
  28. सर, आपले खूप खूप धन्यवाद. हा आपला खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. कृपया कायमस्वरूपी सुटावा ही अपेक्षा.
    त्याच बरोबर अजूनही निवड श्रेणीसाठी काहीच हालचाल दिसत नाही. तरी कृपया लक्ष घालणेस नम्र विनंती.

    ReplyDelete
  29. धन्यवाद, आमदार साहेब, तुमच्या प्रयत्नाला यश येवो .

    ReplyDelete
  30. ICT ha vishay suddha khup important ahe sir...ICT teachers la pn yoggya to nyay milava hi vinanti

    ReplyDelete
  31. ICT shikshkana parat kamavar ruju kara sir.

    ReplyDelete
  32. ICT संगणक शिक्षक यांना केव्हा न्याय मिळणार?

    ReplyDelete
  33. आयसीटी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सकारात्मकतेने विचार व्हावयास हवा.आमदार साहेब आपणांला विनंती आहे आमच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्नपूर्वक सहकार्य कराल.

    ReplyDelete
  34. आदरणिय कपिल पाटील साहेब, सुभाष मोरे सर
    आपण योग्य वेळी योग्य मुद्दा उचलून शासनाला जाब विचारतात या बद्दल आम्ही महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आपले शतश: ऋणी आहोत.
    युनियन बॅंकेसोबत पुन्हा एकदा करार झाला तर वेतनाची समस्या राहणार नाही म्हणून युनियन बॅंकेसोबतचा करार पुनर्स्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न करावा हि विनंती.

    शिक्षक भारती संघटनेच्या कोणत्याही प्रयत्नाला यश मिळतेच
    हा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

    ReplyDelete
  35. शिक्षक भारती संघटनेचे प्रयत्न आशावादी आहेत.

    ReplyDelete
  36. आदिवासी विकास विभागाच्या शिक्षकांचे पगार तर २,३ महिन्यात एकदा पगार होतो

    ReplyDelete
  37. धन्यवाद सर 🙏🏻

    ReplyDelete
  38. मोरे सरजी, आतिशय उत्तम🌹🌹👋👋🙏🙏 मोरे सरजी विषय शिक्षक जि. प. मधील त्यांना न्याय मिळवून द्या ४२०० या वेतनश्रेणी मध्ये काम करीत आहे. समान काम समान वेतन असायला पाहिजे. मा . कपिल पाटिल , आमदार साहेब हा प्रश्न सोडवू शकते

    ReplyDelete
  39. आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळा चे वेतन दरमहा होत नाही. महिन्याला वेतणासाठी निधी अपूरा मिळतो त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याला होत नाही. त्यांना पुढील महिन्याच्या निधीची वाट पाहावी लागते. हा दर महिन्याचा क्रम आहे. अजून सातव्या वेतन आयोगाचा एकही हप्ता मिळाला नाही. त्यामुळे आपण मासिक वेतनसाठी पुरेसा निधी दर महा मिळेल व सातवा वेतन आयोगाचे इतर विभागाप्रमाणे हप्ते मिळेल यासाठी आदिवासी विकास विभाग मागणी करावी
    ही विनंती

    ReplyDelete
  40. लगेंगे जितेंगे

    ReplyDelete
  41. ICT हा विषय पण खूप महत्वाचा आहे.... याकडे पण लक्ष द्या.. ही नम्र विनंती

    ReplyDelete
  42. छान !! विषयाला गवसणी घातली.

    ReplyDelete
  43. नेहमीचा विषय आहे

    ReplyDelete
  44. ICT संगणक शिक्षक यांना केव्हा न्याय मिळणार
    ICT हा विषय पण खूप महत्वाचा आहे.... याकडे पण लक्ष द्या.. ही नम्र विनंती

    ReplyDelete
  45. ICT means information communication technology phase 3rd made amhi 5 varsh schools made kam kel ani mag amhi 7000 hun adhik shikshyk kam band zhalyaver sarvjan rastyavar alo amchyavar upasmarichi vel aliyy Saheb yevda shikshkani ghari basun kai karaych saheb jo Amchya ICT Teaches var anyay hotoy tyala Nyay dya saheb hi kalkalichi vinanti......
    ICT .....
    ICT.....

    ReplyDelete
  46. Sir ict teachers cha pn vichar Kara tehi berojgar ahet Ani students la pn computer knowledge chi garaj aahe tyanchya future cha prashn aahe hich vinanti 🙏

    ReplyDelete
  47. मा.आमदार कपील पाटील साहेबांनी एखादा मुद्दा हाती घेतल्यास100% तोडगा निघतोच

    ReplyDelete
  48. Please give me our rights whatever our whole team hard work in four to five years in ICT but today we are jobless so please as soon as possible give our rights thank you.

    ReplyDelete
  49. शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात माननीय आमदार आणि टीम शिक्षक भारती ने योग्य पावले उचलली आहेत.माननीय आंदरसाहेब व शिक्षक भारती च्या लढवय्या पदाधिकाऱ्यांचे खुप खुप आभार. लढेंगे, जितेंगे! जय शिक्षक भारती!

    ReplyDelete
  50. संगनक युगाच्या अगोदर पगार ५ तारखेपर्यंत होत होते मग असा काय चमत्कार झाला कि पगार दोन दोन महीने रखडले याची कारणे प्रत्येक जिल्ह्यानुसार शोधली पाहिजे पण भविष्यातही त्या त्या महीन्यात पगार होणे अशक्य आहे

    ReplyDelete
  51. शिक्षक भारती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांची दखल घेत आसते तत्काल सोडवण्यासाठी प्रयत्न करते मा कपील पाटील साहेब व राज्य कार्य कारणी चे मनापासून धन्यवाद सर खुप खुप आभार

    ReplyDelete
  52. जिव्हाळ्याचा प्रश्न मांडल्याबद्दल माननीय कपिल पाटील साहेबांचे मनापासून आभार

    ReplyDelete
  53. आयसीटी शिक्षकांना न्याय कधी मिळणार

    ReplyDelete
  54. अगदी बरोबर आहे साहेब प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला पगार झालेच पाहिजे.....
    लढेंगे.....जितेंगे....जय शिक्षक भारती!!!

    ReplyDelete
  55. युनियन बँकेतूनच एक तारखेला पगार झाले पाहिजेत...
    आमदार साहेब आणि आपण सर्व शिक्षक भरती चे लढवय्ये कार्यकर्ते यांची जिद्द आणि चिकाटी सापांचे सहकार्य नक्कीच मिळेल.
    सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!...

    ReplyDelete
  56. We r harrassed by others. But Kapil Patil and you are the only who takes care of the teachers community

    ReplyDelete
  57. शिक्षकाचे पगार झाले पाहिजेत तसंच दोन वर्षांपासून रखाडलेली मेडिकल बिल मिळण्यासाठी प्रयत्न करावेत ही संघटनेला विनंती
    काशिनाथ शिंद

    ReplyDelete
  58. मा.आ.कपील पाटील साहेब व शिक्षक भारतीच्या सर्व पदाधिका-यांचे हार्दीक अभिनंदन

    ReplyDelete
  59. मा कपील पाटील साहेब व शिक्षकभारतीच्या समस्त टीम चे मनापासून धन्यवाद व खुप खुप आभार
    Hope teaches and their services won't be ignored by our ministry.

    ReplyDelete
  60. साहेब पगार आणि १ नोव्हेंबर 2005 पुर्वीची पेन्शन योजना यांचा निकाल लवकर लावावा ही विनंती.

    ReplyDelete
  61. गेल्या काही वर्षापासून माध्यमिक शिक्षकांचे पगार दोन दोन तीन तीन महिने होत नाही यात महाविकास आघाडी सरकारचे किंवा विरोधी पक्षांचे अपयशच म्हणावे लागेल.. अनेक वेळा शिक्षक आमदार पदवीधर आमदार वित्तमंत्री याबाबत निर्णय घेतात पण अधिकारीवर्ग यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे पगार उशिरा होता ते तेवढेच सत्य

    ReplyDelete
  62. खरोखर प्रामाणिक प्रयत्न साहेब

    ReplyDelete
  63. all teachers were waiting for you sir since our slry is delay now after reading this there is a 100 % hope that will get our pay on time bcs we all teachers r suffering alot due to this delay we are unable to pay emi and other work also Thanku so much

    ReplyDelete
  64. Respected Sir,

    These are only meetings and only paper plans... We want to see some concrete action being taken..
    It's been 3 months without pay...it is heard that our salary is delayed this month as well... No salary in April...
    Kapil Sir... Please it's my earnest request... Salaries must be deposited in 1/2 days......
    Thank you🙏

    ReplyDelete
  65. Very nice but salaries must be deposited in bank as well as every account must be opened in central banks.

    ReplyDelete
  66. खूप खूप धन्यवाद सर

    ReplyDelete