Saturday 9 March 2019

पे फिक्सेशन व स्टॅम्पींग कसे होणार?


३० जानेवारी २०१९ रोजी राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जाहीर केल्यानंतर २२ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मार्च पेड इन एप्रिलचा पगार सातव्या वेतन आयोगानुसार काढण्याबाबतचे मार्गदर्शन शिबिर लेखाधिकारी (शिक्षण) कार्यालयाने घेतल्यानंतर वेतन बिल तयार करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. परंतू वेतन बिल शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडे किती तारखेपर्यंत द्यायचे याबाबत अद्याप शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून सूचना मिळालेली नाही. लेखाधिकारी (शिक्षण) मार्फत पे फिक्सेशन व  स्टॅम्पींग होण्यासाठी वेळ लागणार आहे. अशावेळी मुख्याध्यापकांच्या सहीने पगार काढल्यास एप्रिल महिन्यात पगार वेळेवर मिळू शकतो. शिक्षक, शिक्षकेतरांचे पे फिक्सेशन करणे, लेखाधिकारी कार्यालयाकडुन त्याची तपासणी करुन  स्टॅम्पींग करणे, सर्व्हिस बुक मध्ये त्यांची नोंदणी करुन लेखाधिकाऱ्याची सही घेणे हे प्रचंड वेळखाऊ काम आहे. या सर्व प्रक्रियेसाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्याऐवजी पे फिक्स करुन सातव्या वेतन आयोगानुसार होणारा पगार मुख्याध्यापकाच्या सहीने काढल्यास शिक्षक, शिक्षकेतरांना वेळेत पगार मिळू शकतो यासाठी ६ मार्च २०१९ रोजी शिक्षक भारतीने आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली लेखा व अधिदान कार्यालयात मुंबईतील तीन्ही वेतन अधिक्षक, लेखाधिकारी (शिक्षण) आणि शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली.




बैठकीत लेखा व अधिदान कार्यालयाचे प्रमुख श्री. वैभव राजे घाटगे यांनी शिक्षक, शिक्षकेतरांना सातव्या वेतन आयोगानुसार १ तारखेला पगार मिळाला पाहिजे यासाठी १६ मार्च पर्यंत वेतन बिले शिक्षण विभागाकडे जमा करण्याबाबतचे आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयाने तातडीने द्यावेत, असे सांगितले. याच बैठकीत लेखाधिकारी यांनी खाजगी सॉफ्टवेअर मार्फत फिक्सेशन केल्यास तसेच शासनाने निर्धारीत केलेल्या फॉरमेट ऐवजी इतर खाजगी फॉरमेटचा वापर केल्यास चालणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच काही ठिकाणी फिक्सेशनसाठी पैसे मागितल्याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. या शिक्षक भारतीने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पे फिक्स करणे आणि त्याचे  स्टॅम्पींग करणे हे प्रशासकीय काम आहे. त्यासाठी कोणालाही अतिरिक्त शुल्क देण्याची आवश्यकता नाही, हे स्पष्ट केले. 

पगाराचे पे फिक्सेशन करणे झाले सोपे
१ जानेवारी २०१६ या दिनांकास सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती करताना विद्यमान वेतन संरचनेतील (सहावा वेतन आयोग) दि. १ जानेवारी २०१६ लगतपूर्वीच्या मूळ वेतनास (बेसिक पे + ग्रेड पे) २.५७ ने गुणण्यात यावे व येणारी रक्कम नजिकच्या रुपयामध्ये पूर्णांकित करावी. 

अशी पूर्णांकित केलेली रक्कम सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये (सातवा वेतन आयोग) संबंधित संवर्गास / पदास अनुज्ञेय असलेल्या वेतन स्तरामधील सेलमध्ये (लेव्हल) असल्यास त्या रकमेवर वेतन निश्चिती करावी. जर ती रक्कम वेतन स्तरामधील सेलमध्ये नसेल तर सदर पूर्णांकित रकमेच्या लगतच्या पुढील सेलमधील रकमेवर वेतननिश्चिती करावी.

या प्रमाणे फिक्स केलेला पे स्वतः तपासावा. आपल्या शाळेतील मुख्याध्यापक अथवा लिपिक यांना याबाबतीत कोणतेही मार्गदर्शन आवश्यक असल्यास लेखाधिकारी विभागाशी संपर्क करावा. विनामूल्य मार्गदर्शन मिळेल. अनेक शाळांमध्ये लिपिकांची संख्या कमी आहे किंवा काही शाळांमध्ये लिपिकच नाही. अशावेळी मुख्याध्यापकांच्या सहकार्याने शिक्षकांनी स्वतः पे बिल तयार करावे. बाजारात फिक्सेशन करुन देणाऱ्या अनेक खाजगी संस्थांची जाहीरात होत आहे. प्रतीव्यक्ती १००० ते २००० रुपये घेऊन पे फिक्स करण्याच्या जाहीराती दिल्या जात आहेत. अशा जाहीरातींना बळी पडू नये. खाजगी सॉफ्टवेअरमधून करण्यात आलेल्या फिक्सेशनच्या फॉरमेटला लेखाधिकारी विभागाने मान्यता दिलेली नाही. तरी कृपया याबाबत काळजी घ्यावी. वेतन वाढी बाबतचे हमीपत्र देताना योग्य तारखेची निवड करावी. 

अजून मोठी लढाई बाकी आहे 
मार्च २०१९ पासूनचा पगार सातव्या वेतन आयोगानुसार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी आपल्या सर्व मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीत. केपी बक्षी समितीपुढे आपण सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्याबाबत केलेल्या सादरीकरणाचे काय झाले, हे स्पष्ट झालेले नाही. केपी बक्षी समितीच्या अहवालाचा खंड १ जाहीर झाला परंतू खंड २ अद्यापी समोर आलेला नाही. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत शासनाने ठोस निर्णय घेऊन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर झालेला आर्थिक अन्याय दूर केला पाहिजे. तसेच वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी बाबतचाही निर्णय झालेला नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीचा १०, २० व ३० वर्ष सेवेनुसार स्तर निश्चित करणारा शासन निर्णय आला आहे. पण त्यात शिक्षकांचा उल्लेख केलेला नाही. वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीबाबत २३/१०/२०१८ चा निर्णय अजूनही रद्द झालेला नाही. घरभाडे व प्रवास भत्त्यातही शासनाने कंजुषी केलेली आहे. वरील सर्व मुद्यांचा विचार केला तर आपल्याला पुढील काळात मोठी लढाई करावी लागणार हे स्पष्ट आहे. शिक्षक भारती त्यासाठी कटीबद्ध आहे. 
लढूया, जिंकूया!

आपला, 
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती

38 comments:

  1. निवडणुकीत लाभ मिळावा म्हणून घाईत उशिरा घेतलेला निर्णय..नियोजन नाही..फक्त मते मिळविन्या साठीच..पण शिक्षकांना माहिती आहे की फक्त तोंडाला पाने पुसली..कमी वाढ त्यातही आयकरात वसूल करणार..काहीच फायदा नाही शिक्षकांना..जेवढे दिले त्यापेक्षा जास्त वसूल होणार..सावध व्हा..लढावेच लागेल सर..माध्यमिक शिक्षकांना पदोन्नती नाही.वरिष्ठ व निवडश्रेणी नाही.पेन्शन नाही.सेवाज्येष्ठतेत वाद..समायोजन बाहेर..अनेक समस्यांनी शिक्षक त्रासले आहेत.धडा शिकवूच..

    ReplyDelete
  2. निवडणूक जिंकन्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला निर्णय,

    ReplyDelete
  3. शेतकऱ्यांनी जशी त्यांची ताकद दाखवून दिली, तशी आता सर्वच शिक्षकांनी आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. माननीय कपिल पाटील साहेब आपल्यासाठी लढत आहेत मग आपण फक्त घरात बसून, होत असलेला प्रकार शांतपणे बघत बसावा आणि फार तर फार आपल्या आप्तेष्टांकडे याचा निषेध आणि तो ही घरच्या घरी नोंदवावा, ही वेळ गेली आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. एखादी गोष्ट जर आपल्याला हवी असेल आणि ती समोरची व्यक्ती देत नसेल तर ती वस्तू आपण खेचून किंवा त्या व्यक्तीला विरोध करून मिळवू शकतो हे साध्या तान्या बाळालादेखील कळते आणि तसे ते बाळ करतेदेखील. पण शिक्षक नावाचा प्राणी हा इतका मिंधा आणि गुलाम झाला आहे या प्रशासकीय प्रणालीचा, की झालेल्या अन्यायाविरुद्ध उठाव तर फार दूरची गोष्ट पण त्याची साधी वाच्यतादेखील करायला तो कचरतो. म्हणूनच सरकारमध्ये बसलेल्या लांडग्यांचं फावतं.
    इतक्या तिखट शब्दात आपली हेटाळणी झाल्यावर तरी आपण उठतो का बघूया. आज गुरू आणि गुलाम हे समानार्थी शब्द म्हणून वापरतंय हे सरकार आणि याला आपणंच जबाबदार आहोत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. आज शेतकरीही पेटून उठले आहेत. जे शेती उत्तम प्रकारे करतात परंतु बऱ्याच प्रमाणात अशिक्षितही आहेत,असे हे शेतकरी उसळून उठतात आणि सानेगुरूजींचे वंशज आपण, हातावर हात ठेवून फक्त मजा बघतोय? पण आपल्याला हे ही कळत नाहिये की ही मजा आणि हा तमाशासुद्धा आपलाच होतोय. जागे व्हा शिक्षकहो! आपल्याचसाठी रात्रीचा दिवस करून आणि शासनाच्या पूर्णपणे विरोधात जाऊन माननीय श्री कपिल पाटील आणि त्यांचे सर्व पदाधिकारी जी वणवण करताहेत, त्यांचे हे श्रम आणि प्रयत्न आपल्या झोपेच्या सोंगामुळे निष्फळ होऊ देऊ नका. आपल्यावर अन्याय झालाय आणि होतोय हे अजूनही ज्यांना कळत नाहिये अथवा जे न कळण्याचे सोंग घेत आहेत त्यांनी सरळ शिक्षकाची नोकरी सोडावी आणि हातात बांगड्या भराव्यात. कारण आपला असा स्वभाव असेल तर आपण पुढच्या पिढीलाही हेच संस्कार देऊन गुलामच बनवू. त्यामुळे आपण गुरू आहोत हे जे लोक विसरून गुलामगिरीतच समाधान मानत आहेत त्यांनी ताबडतोब शिक्षकपदाचा राजिनामा द्यावा आणि एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या मशिनखाली काम करावं. निदान आपल्या हाताखाली घडत असलेली पुढची पिढी तरी भविष्यात गुलाम होण्यापासून वाचेल.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. लढेंगे एक साथ और जितेंगे एक साथ. आगे बढो वी आर आँल विथ यू👍👍

    ReplyDelete
  6. माध्यमिक शिक्षकांवर सहाव्या आयोगातही अन्याय करण्यात आला व आता सातव्यातही अन्यायच..
    प्रमोशन ची संधी नाही. 12 वर्षांनंतर मिळणारी वरीष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी मिळणारच नाही याची तरतूद करून ठेवली.. आणि एखाद्याला महत्प्रयासाने मिळलीच तरी फक्त 100/- रू. वाढ..?
    अजब तुझे सरकार...!

    ReplyDelete
  7. खूप छान स्पष्टीकरण ...सलाम तुमच्या लढाईला..

    ReplyDelete
  8. खूपच छान सर आपल्या लढाईत आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत.

    ReplyDelete
  9. सरजी 2002 मध्ये ded शिक्षणसेवक म्हणून लागलेल्या शिक्षकांना नियमित वेतनश्रेणीत आल्यावर जेव्हा 6 वा आयोग लागू झाला तेव्हा मूळ वेतन हे 8370 दिलेले आहे , परंतु 2003 साली जे लागले आणि स्केल वर आले त्यांना मात्र 6 व्या आयोगात मूळ वेतन 8560 दिलेले आहे. म्हणजे वरिष्ठ असूनही 6 व्या वेतन आयोगात आम्हाला 190 रु कमी बेसिक मिळाल्याने एकूण पगारात अंदाजे 800 ते 900 रु तफावत आहे आणि 2006 पासून आम्ही वरील प्रश्नाचे बळी ठरलो आहोत.
    हा प्रश्न ही आपल्या अजेंड्यात घेऊन आम्हाला अगोदर 6 व्या आयोगाची फेर वेतन निश्चिती करून मिळण्यासाठी व मागील फरक मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, ही नम्र विनंती!!

    ReplyDelete
    Replies
    1. ज्युनिअर कॉलेज शिक्षकांचेही असेच आहे 7225 या बेसिकला 1.86 ने गुणून 13440 होतात. ते दिले गेले मात्र आम्ही 2003 ला नियुक्त झालो शिक्षण सेवक पूर्ण केले .आम्ही 2006 च्या आतील कर्मचारी आहोत. मात्र आम्हाला फुल स्केल 2006 ला लागू झाले . आम्हालाही नवीन समजून 12540 नेच सुरवात केली वस्तुतः आम्ही 2006 च्या अगोदर शिक्षण सेवक असल्याने आम्हाला 13540 हे स्केल लागू होणे आवश्यक होते मात्र 12540 लागू झाले . त्या मुळे आमच्या स्केल मध्ये 900 चा फरक पडला.

      Delete
  10. अगदी खरं आहे, ,👍👍👍🙏🙏🙏

    ReplyDelete
  11. 28oo ग्रेड पे असणर्या DEd शिक्षकाचा ग्रेड पे वरिष्ठ वेतनश्रेणी मिळाल्यावर 4200,4600चा 5400होतो.मात्र
    BEd शिक्षकाचा ग्रेड पे 4300 वरुन फक्त 4400 होतो.
    म्हणजे फक्त 100 रु.वाढ.संघटना ईतके दिवस काय करत
    होत्या?

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे. .सहमत

      Delete
  12. Very nice sir,it support to work

    ReplyDelete
  13. सुज्ञास अधिक सांगणे नाही कुठेही भेदभाव नसावा

    ReplyDelete
  14. माध्यमिक शिक्षकांवर नेहमीच अन्याय होत आहे,या सरकारने मात्र मता साठी निवडणुकी आधी केलेली चतुरी आहे.

    ReplyDelete
  15. 2003 ते 2006 या काळात ज्युनिअर कॉलेज शिक्षकांनी शिक्षणसेवक केले त्याच्यावरही सहाव्या आयोगात अन्याय झाला आहे. 7225 या बेसिकला 1.86 ने गुणून 13440 होतात. ते दिले गेले मात्र आम्ही 2003 ला नियुक्त झालो शिक्षण सेवक पूर्ण केले .आम्ही 2006 च्या आतील कर्मचारी आहोत. मात्र आम्हाला फुल स्केल 2006 ला लागू झाले . आम्हालाही नवीन समजून 12540 नेच सुरवात केली वस्तुतः आम्ही 2006 च्या अगोदर शिक्षण सेवक असल्याने आम्हाला 13540 हे स्केल लागू होणे आवश्यक होते मात्र 12540 लागू झाले . त्या मुळे आमच्या स्केल मध्ये 900 चा फरक पडला.

    ReplyDelete
  16. शिक्षकांना10,20,30ही वेतनवाढ मिळावी पाहिजे
    त्याच प्रमाणे
    सर मी माध्यमिक ला काम करणारा डी एड scale वर काम करणारा शिक्षक आहे माझे 6व्या आयोगात वरिष्ट श्रेणी (ऑक्टोबर2017)मिळाल्यावर 3500रु पगार वाढला व 7व्या आयोगात तोच 800 रु वाढला आहे .
    मुळात 6व्या आयोगात 12 वर्षेपर्यंत सेवेत काम करणाऱ्या शिक्षकांना 2800 g p हाच मोठा अन्याय होता तो12वर्षानंतर 4200 gp देऊन दूर केला होता .व आता फार मोठा अन्याय होत आहे.
    मुळात 5 व्या आयोगात डी एड व बी एड शिक्षकांच्या वेतनात 1200 ते 1500 चा फरक होता तो 6 व्यात 12000 ते 14000 झाला आहे .मला इथे डी एड व बी एड वाद करायचा नाही कारण आपण सर्व एकच आहोत.
    आपल्या सर्व शिक्षकांना 10 20 30 वर्षाची वेतनश्रेणी मिळावी व आपल्यावरील वरिष्ट श्रेणीतील अन्याय दूर करण्यासाठी आपल्या संघटनेने मदत करावी ही अपेक्षा.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या सारखा माझा पण हाच प्रॉब्लेम आहे, आपण एकत्रित पणे आवाज उठवला पाहिजे

      Delete
  17. Great work.. keep it up sir g.. you are really working hard for the sake of teachers right...

    ReplyDelete
  18. Excellent work sir. Keep it up. Allah bless you.

    ReplyDelete
  19. Excellent job sir. Allah bless you. Keep it up. 💐💐💐

    ReplyDelete
  20. *सातवा वेतन आयोग*

    शिक्षक मित्रहो 7 व्या वेतन आयोगात शिक्षकांच्या संदर्भात अनेक त्रुटी आढळून येतात.त्या पुढीलप्रमाणे

    *1 जानेवारी 2016पूर्वी वरिष्ट श्रेणी मिळालेल्या शिक्षकांच्या बाबतीत पुढील उदाहरणाने ते लक्षात येईल.एका शिक्षकाचे बेसिक 12250 आहे व ग्रेड पे 2800 आहे या शिक्षकास 1 जानेवारी2016 पूर्वी वरिष्ट मिळाली तर त्यांचे बेसिक होते 46200 (आजचा पगार होतो 54454)*
    *व दुसऱ्या शिक्षकास 1 जानेवारी 2016* *नंतर वरिष्ट मिळाली तर बेसिक होते 43600* *(आजचा पगार होतो 51412)* *तब्बल3000 हजार चा फरक*

    *मुळात डी एड scale वर काम करणारे (यात बहुतांश शिक्षक एम ए बी एड ,एम एस सी बी एड आहेत फक्त ते डी एड scale वर काम करतात)शिक्षक यांचेवर 6 व्या आयोगात 2800 ग्रेड पे देऊन अन्याय केला होता व तो वरिष्ट श्रेणीत 4200 ग्रेड पे देऊन दूर करण्याचा प्रयत्न केला होता.*

    *इतर विभागातील कर्मचाऱ्यांना 10,20,30 वर्षाची कालबद्ध पदोन्नती योजना आहे पण शिक्षकांना मात्र वरिष्ट व निवड श्रेणी मात्र 12 व 24 वर्षानीच आहे.हा अन्याय नाही का?*

    *इतर विभागातील कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देतांना एक जास्तीची वेतनवाढ दयाची आहे अशी वेतनवाढ मात्र आपल्या शिक्षक बांधवांना नाही हा अन्याय नाही का?*

    *शिक्षकांना सुध्दा पदोन्नतीच्या संधी खूप कमी असतांना सुद्धा शिक्षकांवर असा अन्याय का??*

    *यावर बहुतांश शिक्षक संघटना शांत आहेत.*

    *आपणा सर्वांना जागरूक होण्याची गरज निर्माण झाली आहे.*

    ReplyDelete
  21. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  22. सातवा वेतन आयोग त्रृटी
    शिक्षक मित्रहो 7 व्या वेतन आयोगात शिक्षकांच्या संदर्भात अनेक त्रुटी आढळून येतात.त्या पुढीलप्रमाणे
    एकाच निवड यादीत सेवेत लागलेल्या परंतु एकाला 25% पदविधर वेतनश्रेणी मिळाल्यमुळे ग्रेड पे 4300 रु. तर दुस-याला चट्टोपाध्याय वेतनश्रेणी लागू असल्यामुळे 4200 रु. ग्रेड पे
    सदर दोनही शिक्शकांचे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे होणारे फिक्सेशन खालील प्रमाणे होते.
    सहावा वेतन आयोगानुसार 1-1-16 चे वेतन 1740 + ग्रेड वेतन 4300
    अ ) वेतनजेष्ठ शिक्षक

    सहावा वेतन आयोगानुसार
    01-01-2016 चे एकूण वेतन 1740 + ग्रेड वेतन 4300 = 21340
    2.57 ने गुणून येणारे वेतन 54843.80

    पुर्णांकीत रक्कम 54844.00

    पे मॅट्रीक्स मधील वेतन स्तर S-14

    पे मॅट्रीक्स मधील वेतन स्तरामधील अनुषंगीक वेतन 55100.00

    01-07-2016 ची वेतनवाढ 56800.00

    01-07-2017 ची वेतनवाढ 58500.00

    01-07-2018 ची वेतनवाढ 60300.00


    ब) वेतनकनिष्ठ शिक्षक

    सहावा वेतन आयोगानुसार
    01-01-2016 चे एकूण वेतन 17000 + ग्रेड वेतन 4200 = 21200

    2.57 ने गुणून येणारे वेतन 54484.00

    पुर्णांकीत रक्कम 54484.00

    पे मॅट्रीक्स मधील वेतन स्तर S-13

    पे मॅट्रीक्स मधील वेतन स्तरा मधील अनुषंगीक वेतन 55200.00

    01-07-2016 ची वेतनवाढ 56900.00

    01-07-2017 ची वेतनवाढ 58600.00

    01-07-2018 ची वेतनवाढ 60400.00

    वरील प्रमाणे सहाव्या वेतन आयोगात कमी वेतन असणा-या कर्मचा-याचे वेतन
    सातव्या वेतन आयोगात जास्त, तर सहाव्या वेतन आयोगात जास्त वेतन घेत असलेल्या
    कर्मचा-याचे वेतन कमी होत आहे. वरील त्रृटी दुर करण्यासाठी नियम 7 खालील टिप 5 व
    8 नुसार कार्यवाही केल्यावर तमस्या तात्पुरती सुटते व पुन्हा वेतनवाढीचे वेळेत परत 100 रु. चा फरक पडतो. याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
    आपलाच
    उत्तम बरवड
    जि.प.माध्यमिक विध्यालय, विडुळ

    ReplyDelete
  23. सातवा वेतन आयोग त्रृटी
    शिक्षक मित्रहो 7 व्या वेतन आयोगात शिक्षकांच्या संदर्भात अनेक त्रुटी आढळून येतात.त्यातील एक पुढीलप्रमाणे
    एकाच निवड यादीत सेवेत लागलेल्या परंतु एकाला 25% पदविधर वेतनश्रेणी मिळाल्यमुळे ग्रेड पे 4300 रु. तर दुस-याला चट्टोपाध्याय वेतनश्रेणी लागू असल्यामुळे 4200 रु. ग्रेड पे
    सदर दोनही शिक्शकांचे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे होणारे फिक्सेशन खालील प्रमाणे होते.
    सहावा वेतन आयोगानुसार 1-1-16 चे वेतन 1740 + ग्रेड वेतन 4300

    अ ) वेतनजेष्ठ शिक्षक

    सहावा वेतन आयोगानुसार
    01-01-2016 चे एकूण वेतन 17040 + ग्रेड वेतन 4300 = 21340

    2.57 ने गुणून येणारे वेतन 54843.80

    पुर्णांकीत रक्कम 54844.00

    पे मॅट्रीक्स मधील वेतन स्तर S-14

    पे मॅट्रीक्स मधील वेतन स्तरामधील अनुषंगीक वेतन 55100.00

    01-07-2016 ची वेतनवाढ 56800.00

    01-07-2017 ची वेतनवाढ 58500.00

    01-07-2018 ची वेतनवाढ 60300.00

    ब) वेतनकनिष्ठ शिक्षक

    सहावा वेतन आयोगानुसार
    01-01-2016 चे एकूण वेतन 17000 + ग्रेड वेतन 4200 = 21200

    2.57 ने गुणून येणारे वेतन 54484.00

    पुर्णांकीत रक्कम 54484.00

    पे मॅट्रीक्स मधील वेतन स्तर S-13

    पे मॅट्रीक्स मधील वेतन स्तरा मधील अनुषंगीक वेतन 55200.00

    01-07-2016 ची वेतनवाढ 56900.00

    01-07-2017 ची वेतनवाढ 58600.00

    01-07-2018 ची वेतनवाढ 60400.00

    वरील प्रमाणे सहाव्या वेतन आयोगात कमी वेतन असणा-या कर्मचा-याचे वेतन
    सातव्या वेतन आयोगात जास्त, तर सहाव्या वेतन आयोगात जास्त वेतन घेत असलेल्या
    कर्मचा-याचे वेतन कमी होत आहे. वरील त्रृटी दुर करण्यासाठी नियम 7 खालील टिप 5 व
    8 नुसार कार्यवाही केल्यावर तमस्या तात्पुरती सुटते व पुन्हा वेतनवाढीचे वेळेत परत 100 रु. चा फरक पडतो. याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
    आपलाच
    उत्तम बरवड

    ReplyDelete
    Replies
    1. माझी तीच समस्या आहे
      ४३०० ग्रेड पै मुळे माझा पगार कमी झाला आहे पद्दोनती घेऊन पगार कमी ४२०० ग्रेड पै घेणार्याचा पगार जास्त झाला आहे
      सुभाष बा काळबांडे
      बीज बी एड पूर्णा ता.पूर्णा जि.परभणी ४३१५११

      Delete
  24. साहेब ठाकरे मला गाळा मंजूर केला पाहिजे असे माजी अपेक्षा आहे हि माझी नंबर विनंती

    ReplyDelete
  25. चुकून बी ए ऐवजी बीज झाले आहे

    ReplyDelete
  26. सातव्या वेतन आयोगातील मट्रीक्स टेबलमध्ये ४२०० gp असणार्या शिक्षकांना ४३०० gpअसणार्या शिक्षकापेक्षा १०० rs जास्त दिले आहेत .त्यामुळे पदवीधर शिक्षकावर अन्याय झाला आहेत्या तुलनेत पदवीधर शिक्षकांची वाढ झालेली नाही

    ReplyDelete
  27. आ विक्रम काळे साहेबांनी (शिक्षक आमदार)खालील समस्या सोडवावी. बी.ए.बी.एड.करुन डी.एड.वर काम करून नंतर बी.एड .पद्दोनती मिळाली जी.पी.मध्ये १०० रू १९१३ला वाढ झाली.
    पण सातव्या आयोगात सोबत लागलेल्या डि.एड.शिक्षकाचा पगार‌ पद्दोनती घेतलेल्या शिक्षकापेक्षा जास्त आहे .पद्दोनती घेतलेल्या शिक्षकावर अन्याय झालेला आहे अन्यायाची भावना तयार झाली आहे.खंड २मध्ये समस्या सुटेल का?

    ReplyDelete