11 डिसेंबर 2020 रोजी शासनाने राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतिबंध निश्चित करण्याऐवजी प्रति शाळा शिपाई भत्त्यावर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाईगार, कामाठी, तेलवाला, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर इत्यादी चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदावर कार्यरत कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर पदे व्यपगत करण्याचा अन्यायकारक निर्णय केला आहे. खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा करिता चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदा ऐवजी ठोक स्वरूपात शिपाई भत्ता देऊन वेतन श्रेणी नाकारण्याचा जुलमी निर्णय घेतला आहे.
11 डिसेंबर 2020 च्या शासन
निर्णयाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कायद्याने देय असणारी वेतन श्रेणी
नाकारून ग्रामीण भागात पाच हजार रुपये आणि शहरी भागात दहा हजार रुपयापर्यंत
मानधनावर नेमणूक करणारी वेठबिगार पद्धत लागू केली आहे. नाक्यावर
रोजंदारीवर काम करणारा अकुशल कामगार दररोज किमान 500 रुपये तर कुशल कामगार
दररोज किमान 1,000 रुपये घेतल्याशिवाय काम करत नाही. त्याला दरमहा 15,000 ते 30,000 रुपये रोजंदारीवर काम करून मिळतात. महाविकास आघाडीचे सरकार आमच्या
चतुर्थ श्रेणी कर्मचारी बंधू-भगिनींना 5,000 ते 10,000 रुपयाच्या मानधनावर
बोळवण करू पाहत आहे. नाका कामगारापेक्षा कमी पगारावर काम करायला भाग पाडत
आहे.
शासन निर्णयाचा परिणाम काय?
1. 2004
पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. एकही चतुर्थ श्रेणी
कर्मचारी नाही, एकही लिपिक नाही, अशा हजारो शाळा आज अस्तित्वात आहेत.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध लागू झाल्यावर आपल्याला पर्मनंट नोकरी मिळेल या आशेवर गेली पंधरा वर्षापासून तुटपुंज्या पगारावर काम
करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावणारा हा निर्णय आहे.
2. कोणत्याही शैक्षणिक संस्थांना यापुढे वेतनश्रेणीवर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करता येणार नाही.
3.
अतिरिक्त ठरणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना नजीकच्या शासकीय /जिल्हा
परिषद कार्यालयात अनुदानित/अंशतः अनुदानित संस्थांमध्ये आवश्यकतेनुसार
तात्पुरत्या स्वरूपात समायोजित केले जाणार आहे.
4.
ज्या शाळेत अपेक्षित पेक्षा जास्त चतुर्थश्रेणी कर्मचारी पूर्वीच्या मंजूर
पदावर कार्यरत आहेत व सक्षम प्राधिकारी यांकडून मान्यताप्राप्त आहेत
अतिरिक्त होणारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे त्याच संस्थेत सदरचे
कर्मचारी त्या पदावर सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत राहतील.
5.
आज चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना लागू केलेला निर्णय टप्प्या टप्प्याने
लिपिक वर्ग पदे, ग्रंथपाल पदे, प्रयोग शाळा सहाय्यक पदांसाठी लागू होऊ
शकतो.
शिक्षण विभागाने केला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अपमान
2004 सालापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद करण्यात आलेली आहे.
संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना आणि शिक्षकेतर
कर्मचारी संघटना सातत्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी प्रयत्नशील
राहिल्या पण शासनाने नेहमीच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. 23 ऑक्टोबर 2013
रोजी काँग्रेस प्रणित शिक्षण विभागाने राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी
अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध लागू केला होता. सदर शासन निर्णयाबाबत
शिक्षक-शिक्षकेतर यांच्या विविध संघटनांनी फेरविचार करावा अशी मागणी
केल्याने 12 फेब्रुवारी 2015 च्या शासन निर्णयान्वये एक समिती गठीत करण्यात
आली होती. त्या समितीने चिपळूणकर समितीचा अहवाल, गोगटे समितीचा अहवाल
आणि 23 ऑक्टोबर 2013 चा शासन निर्णय याचा सखोल अभ्यास करून चतुर्थ श्रेणी
कर्मचारी, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपीक संवर्ग आणि ग्रंथपाल या चार पदांसाठी
संवर्गनिहाय सुधारित निकषांचा अहवाल शासनाला 31 जुलै 2015 सादर केला.
भाजप
प्रणित शासनातील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 2015 रोजी सादर
केलेल्या अहवालावर कोणतीही कार्यवाही केली नाही. चार वर्ष तो अहवाल धूळ खात
पडला होता. अखेर 28 जानेवारी 2019 ला चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून लिपिक
वर्ग ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या तीन संवर्गासाठी आकृतिबंध जाहीर
करण्यात आला. परंतु त्याचीही आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही.
28
जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी
स्वतंत्र आदेश काढण्यात येतील असे सांगण्यात आले. परंतु महाविकास आघाडीच्या
सरकारने मागच्याच सरकारची री पुढे ओढत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अपमान
करणारा त्यांच्या कुटुंबियांवर बेरोजगारीची कुऱ्हाड घालणारा शासन निर्णय
केला आहे.
महाविकास आघाडी सरकारने केली फसवणूक
राज्यात
नुकत्याच पाच ठिकाणी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूका पार
पडल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी
बहुमतांनी निवडून दिलं. त्याची परतफेड म्हणून की काय महा विकास आघाडीचे हे
सरकार आपल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुळावरच उठले आहे. खाजगीकरण
आणि कंत्राटीकरण शिक्षण क्षेत्रातील अनुदानित व्यवस्था मोडीत काढत आहे. आज
शिक्षकेतर कर्मचारी जात्यात आहेत तर आपण सर्व शिक्षक, मुख्याध्यापक सुपात
आहोत. आता गप्प बसून चालणार नाही!
दिल्लीच्या
सीमेवर आपला शेतकरी/कामगार त्याच्या हक्कासाठी ठाण मांडून बसला आहे. सरकार
कोणाचेही असो काँग्रेस-राष्ट्रवादीचे असो किंवा भाजपाचे असो लढण्याशिवाय
पर्याय उरलेला नाही. 11 डिसेंबर 2020 चा शासन निर्णय केवळ शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वाला नख लावणारा नाही तर आपल्या सर्वांना धोक्याचा
इशारा आहे.
![]() |
आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना दिलेले पत्र. |
शिक्षकेतर
कर्मचारी हा शाळेचा अविभाज्य घटक आहे. सकाळी शाळा उघडल्यापासून ते शाळा बंद
होईपर्यंत शाळेतील शिपाई दादा, शिपाई ताई, शिपाई मामा काम करत असतो.
शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेची, शाळेतील स्वच्छतेची जबाबदारी त्याच्यावर
असते. यापुढे शिपाई हे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याने
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे. 11 डिसेंबर 2020
चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यासाठी शिक्षक भारतीने 14 डिसेंबरला
राज्यभरातील शिक्षणाधिकारी /शिक्षण निरीक्षक कार्यालयावर आंदोलन करून
निवेदने दिली आहेत.
संस्थाचालक महामंडळाने 18 डिसेंबरला शाळा बंदची हाक
दिली आहे. शिक्षक भारती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना जो निर्णय घेतील
जे आंदोलन करतील त्याला शिक्षक भारतीचा पाठिंबा असेल. अखेरपर्यंत या
निर्णयाच्या विरोधात लढण्याची तयारी आपण केली पाहिजे. आज चतुर्थश्रेणी
कर्मचाऱ्यांवर जी वेळ आली आहे ती भविष्यात आपल्यावरही येऊ शकेल. म्हणून
आता गप्प बसून चालणार नाही.
लढूया ! जिंकूया !!
आपला स्नेहांकित
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य
सरकारचा नाकर्ते पणा, आणि अपयश या मुळेच असे निर्णय फहेण्याची वेळ येते.
ReplyDeleteमोरे सर योग्य आहे . मुद्देसूद मांडणी आहे
ReplyDeleteमिलीजूली सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का नाही., राहूच शकत नाही.
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteसरकार कोणाचेही असो नेहमी शिक्षण व्यवस्थेवर दगड आपटन्याचे काम केले जाते मग ते पेंशनबाबत, अनुदानाबाबत किंवा शिक्षक भरतीबाबत असो किंवा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून मंत्र्यांसंत्र्याच्या खाजगी शाळेचा फुगवटा वाढवण्यासाठीची चालबाज आपणां सर्वांना चांगलीच परिचयाची आहे, अशातच आता चतुर्थ कर्मचाऱ्यांची भरती न करून एक प्रकारे भ्रष्टाचार करण्यास पैसे जास्त मिळतील ही मनोवृत्ती स्पष्ट दिसून येते, अशा कर्मचारीविरोधी कायद्यांना शिक्षक भारतीने चोख प्रत्युत्तर देऊन तोंडघशी पाडलेले आहे यापुढेही पाडू यात मात्र शंका नाही, अतिशय खंबीरपणे आपण आपला विरोध दर्शवला आहे त्याबद्दल आपले आभार, जोहार जिन्दाबाद🙏🙏✊✊✊✊✊
ReplyDeleteVery nice article. Congratulations
ReplyDeleteमोरे सर खूप सुंदर अगदी मुद्देसूद आणि सुंदर विश्लेषण केलेले आहे धन्यवाद लढेंगे जितेंगे जय शिक्षक भारती
ReplyDeleteअगदी योग्य आहे.....👍
ReplyDeleteMore Sir Khup Chan...All the necessary points and facts You presented so well...
ReplyDeleteSir we all can struggle for the wrong government decision
ReplyDeleteWe support you sir.. these posts must be saved.
ReplyDeleteमोरे सर ... शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शाळेचा कणा आहे तोच कमकुवत करण्याचे काम हे सरकार फुले , शाहू , आंबेडकरांचे नाव घेवून करीत आहे . त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून लढा उभारणे फारच आवश्यक आहे अन्यथा पुढचा नंबर शिक्षकांचा असू शकतो . तेव्हा लढेंगे , जितेंगे
ReplyDeleteमोरे सर ... शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शाळेचा कणा आहे तोच कमकुवत करण्याचे काम हे सरकार फुले , शाहू , आंबेडकरांचे नाव घेवून करीत आहे . त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून लढा उभारणे फारच आवश्यक आहे अन्यथा पुढचा नंबर शिक्षकांचा असू शकतो . तेव्हा लढेंगे , जितेंगे
ReplyDeleteमोरे सर, खूप छान,ही लढाई जिंकणारच,जय शिक्षक भारती
ReplyDeleteThainks sir thank about ayour camunety sie
ReplyDeleteThank you sir
ReplyDeleteThainks sir thaink abut ayour camunety
ReplyDeleteMy name is Mohammed Ghalib from Ideal hai schools and Jr colleges trombay
ReplyDeleteकोणतेही सरकार असो शिक्षण क्षेत्राविषयी सगळेच राज्यकर्ते हुशारीने gr काढतात ,त्यांना सलाम करावा असे वाटते,
ReplyDeleteलडेंगे !जितेंगे!
ReplyDeleteMore sir your opinion and thought are very important at this movement
ReplyDeleteजय हो
ReplyDeleteHats of U
ReplyDeleteमोरे सर योग्य आणि वास्तव परिस्थिचे दर्शन आपण आपल्या विचारातून मांडले आहे.👌👌👌🙏🙏🙏
ReplyDeleteThank you sir.
ReplyDeleteसाहेब अगदी मुद्देसूद मांडणी आहे फक्त सरकारच्या डोक्यात आपले विचार गेले पाहिजे नाहीतर उद्या हे शिक्षक व शाळा कंत्राटी पद्धतीने भरण्यात मागे पुढे बघणार नाहीत....
ReplyDeleteमानले सर आपण अगदी वास्तव्य परिस्थिती मांडली आभारी
ReplyDeleteVery nice thought sirji 🙏🙏
ReplyDeleteजय शिक्षक भारती 👍👍
ReplyDelete100% correct sir
ReplyDeleteअभ्यासपूर्ण व मुद्देसूदपणे मांडणी केली आहे.
ReplyDeleteशिक्षक भारतीचा विजय असो! 👍🙏🙏
खूप वास्तव व अभ्यासपूर्ण विवेचन सर.लढेंगे, जितेंगे।जय शिक्षक भारती।
ReplyDeleteWe are with you Shikshak Bharati in your fight for justice.
ReplyDeleteश्री मोरे सर अगदी बरोबर लिहले आहे,आजच आपण सर्व ह्या जी आर विरोधात सरकार ला विचारणा केली नाही तर असेच अन्यायकारक जी आर सरकार उद्या इतर कर्मचारी वर्ग ह्यांच्या साठी सुद्धा जाहीर करेल म्हणून सदर जी आर सरकार ने मागे घेतलाच पाहिजे तो रद्द झालाच पाहिजे...
ReplyDeleteसर आपण योग्य पद्धतीने मांडणी केली आहे. हा जीआर सरकारने मागे घेतला च पाहिजे
ReplyDeleteThanks sir, We are with you. --Suresh Patil
ReplyDeleteMore sir yours opinion and thoughts are very important for releted education field. जय शिक्षक भारती,
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteआमदाराच्या खाजगी चालक याला शासन महिना 15 हजार देते
ReplyDeleteमग वर्ग चार कर्मचऱ्याचा असा अपमान करणे योग्य नाही
निषेध या निर्णयाचा
निषेध निषेध निषेध
ReplyDeleteराज्य सरकारने निर्णय मागे घेतलाच पाहिजे.
शिक्षक भारती जिंदाबाद.
ReplyDeleteप्रति मा . कपिल पाटील साहेब शिक्षक आमदार शिक्षक भारती
महोदय सविनय सेवेत अर्ज सादर करण्यात येतो की आम्ही शासन निर्णय शालेय शिक्षण 27/05/2008 नुसार सम्रग शिक्षा अभियाण प्रकल्प अंतर्गत कस्तुरबा गांधी निवासी बालीका विद्यालयात कंत्राटी शिक्षकेत्तर कर्मचारी आहोत आमची निवड जिल्हा निवड समिती मार्फत झालेली असुन आम्हाला खुप कमी मानधनात काम करावे लागत आहे शासनाने कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय शिक्षणापासुन पुर्णपणे वंचित राहिलेल्या तसेच शाळा अर्धवट सोडुन निरक्षरतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मुलींकरीता त्यांचे किमान इ १२ वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करण्याकरिता कस्तुरबा गांधी निवाशी बालीका विद्यालय व निवासी वस्तीगृह सुरू केलेली आहेत व ते वस्तीगृह व शाळा चालविण्याकरीता विविध स्तरावर समित्या गठीत करून शासनाने ते वर्ष 2008 साली सुरू केलेले आहेत व आम्ही तिथे कंत्राटी शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणुन कार्यरत आहोत व आम्हाला मुख्यकार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद यांच्या कडुन नियुक्ती मिळालेली आहे तसेच आम्ही पुढील पदावर कार्यरत आहोत स्वयंपाकी , सहायक स्वंयपाकी, चौकीदार , शिपाई इत्यादी शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणुन काम करत आहोत या मध्ये दोन प्रकारच्या शाळा आहेत आहेत एक टाईप 1 व दुसरी टाईप 4 यामध्ये टाईप 1 मध्ये निवाशी शाळा येतात व टाईप 4 मध्ये निवासी वस्तीगृह आहे आम्हाला येथे टाईप 1 मध्ये शिक्षकेत्तर कर्मचारांना 9450 इतके मानधन मिळते तसेच टाईप 4 मधील शिक्षकेत्तर कर्मचारांना 5500 मानधन मिळते व कामाचे तास हे 12 तास आहे याचे सनियंत्रण प्रकल्प संचालक सम्रगशिक्षा अभियाण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद करते आजच्या माघाई च्या जमान्यात हे मानधन खुप कमी आहे तरी आम्हाला समान काम समान वेतन नुसार किमान वेतन18000 रू मिळावे एकिकड आरोग्य विभागाचा सुरक्षारक्षकला 25000 हजार मानधन मिळते व आम्हाला 5500 रुपये मानधन मिळते तरी आपणास हि विनंती आहे कि आपण आमच्या ह्या विषयात लक्ष्य देऊन कामाचे तास 8 तास करण्यात यावे व किमान 18000 रू मानधन आम्हाला मिळून घ्यावे हीच विनंती बराच वर्षा पासुन आम्ही कंत्राटी व खुप कमी मानघनावर काम करत आहोत आमचा विचार आपण करावा हि नम्र विनंती आपले विश्वासू
सर, आपण अतिशय छान मुद्दे मांडले आहेत.सरकारचे कामगार विरोधी आणि अन्यायकारक निर्णय थांबलेच पाहिजेत.
ReplyDeleteमोरे सर खूपछान माहिती आहे तेवढे 2005 नंतर चे पेस्सेन पहा सर तुमचे खूप उपकर होतील जर पेस्सेन मंजूर झाले तर
ReplyDeleteसुभाष मोरे सर नेहमी प्रमाणे आपण सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली. आपण आपल्या Blog मधून शिक्षण, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्याचे काम करत आला आहात.
ReplyDeleteलड़ेंगे जितेंगे। जय शिक्षक भारती ।
सर हे अन्याय किरक आहे रद्द झालं पाहिजे व उदया शाळा बंद झालेत पाहिजे
ReplyDeleteजय शिक्षक भारती
अभिनंदन सर, शिक्षक भारती
ReplyDelete