Monday 24 August 2020

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मिळणार कधी?


मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. सातव्या वेतन आयोगातील फरकाची थकबाकी पाच समान हप्त्यात पीएफ खात्यावर जमा होणार होती परंतु शासनाने कोरोना महामारीचे कारण देवून पहिला हप्ता दिलेला नाही. पीएफ खात्यावर जमा करण्यात येणार असल्याने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी इन्कमटॅक्स भरला आहे. आपली अवस्था तेलही गेले अन तुपही गेले... अशी झाली आहे. 

बक्षी कमिटीने सादर केलेल्या खंड 1 मधील प्रकरण 5 मध्ये सुधारित आश्वासित प्रगती योजनेबद्दल माहिती दिली आहे. नवीन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत स्थापन केलेल्या अभ्यास गटाचा अहवाल प्रलंबित आहे. बारा वर्ष पूर्ण झाल्यावर मिळणारी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि चोवीस वर्ष पूर्ण झाल्यावर मिळणारी निवड श्रेणीचे लाभ शिक्षकांना मिळत नाहीत. राज्यभर वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे हजारो प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे.

कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवा कालावधीत पदोन्नती मिळत नाही. निदान वेतनाच्या बाबतीत वेतनाचे लाभ मिळावे या अपेक्षेने कालबद्ध पदोन्नती दिली जाते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विनाअट वेतन वाढ मिळते. परंतु शिक्षण विभागाने नेहमी शिक्षकांवर अन्याय केलेला आहे. वरिष्ठ / निवड श्रेणी देताना प्रशिक्षणाची अट ठेवण्यात आलेली आहे. सेवेची बारा वर्षे पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिल्यावर वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होते. तसेच निवड श्रेणी लागू होण्यासाठी चोवीस वर्षे पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण करावे लागते. निवड श्रेणी सरसकट दिली जात नाही. मंजूर पदाच्या केवळ 20 टक्के पदांनाच निवड श्रेणी लागू होते. त्यामुळे अनेक शिक्षक बांधव निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित राहतात. तसेच विज्ञान शाखेतील पदवीधर शिक्षकांना सुट्टी घेऊन पदव्युतर पदवी घेणे शक्य नाही. राज्य सरकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे शिक्षकांना ही विनाअट वेतनश्रेणीचा लाभ झाला पाहिजे, यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आपण लढत आहोत.

मागील काही वर्षांपासून प्रशिक्षण होत नाही. प्रशिक्षण न झाल्यामुळे वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी च्या प्रस्तावावर कार्यवाही होत नाही. शिक्षक संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर हमीपत्रावर वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ द्यायला सुरुवात केली होती. परंतु मागील शासनाने 23 ऑक्टोबर 2017 चा अन्यायकारक शासन निर्णय काढून जाणीवपूर्वक शिक्षकांना वेतनश्रेणीच्या लाभांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. शाळासिद्धिमध्ये शाळेला 'ए' ग्रेड असणे आणि 9वी / 10वी चा निकाल 80% पेक्षा जास्त असणे अश जाचक अटी घालण्यात आल्या. मोठया संघर्षाने 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार वरील जी.आर. अधिकरमित करण्यात आला आहे. पण अंमलबजावणी होत नाही.

शिक्षक भारतीने माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी मिळण्याबाबत खालील मागण्या केलेल्या आहेत

1) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन लाभाची सुधारित आश्वासित प्रगती योजना शाळेतील सर्व शिक्षकांना  विनाअट लागू करा.

2) नवीन आश्वासित प्रगती योजना लागू होईपर्यंत वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करताना मागील दोन वर्षांचे गोपनीय अहवाल विचारात घेऊन पात्र शिक्षकांना वरीष्ठ/निवड श्रेणी देण्याबाबतचे स्पष्ट आदेश देण्यात यावेत.

3) 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयान्वये दिनांक ऑक्टोबर 2017 व दिनांक 21 डिसेंबर 2018 चे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत.  26 ऑगस्ट 2019 चा शासन निर्णय स्वयंस्पष्ट असूनही अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

4) 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयान्वये वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी करता पात्र शिक्षकांना  प्रशिक्षण करण्याची आवश्यकता नाही. असे असूनही प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव प्रलंबित ठेवणे अन्यायकारक आहे.  कृपया याबाबत राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व लेखाधिकारी यांना आदेश  द्यावेत.

शिक्षक भारतीच्या आणि आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लवकरात लवकर लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करूया! लढूया !! जिंकूया !!!

आपला स्नेहांकित 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष 
शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य

170 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. खूपच महत्वाच्या मुद्यावर छान लेखन व मागणी
    लढेंगे जितेंगे।

    ReplyDelete
    Replies
    1. खुप छान विचार मांडले आहेत.या करोना म्हातारीच्या काळात अॉनलाईन प्रशिक्षण दिले पाहिजे.

      Delete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. राज्यातील शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी लढनारी संघटना म्हणजे शिक्षक भारती..
    तमाम पात्र शिक्षकांच्या वतीने बाजू मांडल्याबद्दल सुभाष मोरे सर् आपले लाख लाख धन्यवाद...!!!

    ReplyDelete
  5. Good
    It’s problem of all senior teachers, They are helpless, waiting for our efforts So......
    Ladenge......,.Jitenge

    ReplyDelete
  6. M.sc is compulsory because m B.sc.b.ed n completed 25 years

    ReplyDelete
  7. योग्य मुद्दा आहे

    ReplyDelete
  8. योग्य मुद्दा आहे

    ReplyDelete
  9. अतिशय कळीचा मुद्दा आहे.खरोखरच शिक्षक बांधवांना या लाभापासून लांब ठेऊन त्यांच्यावर अन्याय केला जातो. सर्वांना दोन्ही वेतन श्रेणीचे लाभ मिळालेच पाहिजेत.या प्रश्नास वाचा आपण वाचा फोडली, आपणास खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete
  10. अतिशय कळीचा मुद्दा आहे.खरोखरच शिक्षक बांधवांना या लाभापासून लांब ठेऊन त्यांच्यावर अन्याय केला जातो. सर्वांना दोन्ही वेतन श्रेणीचे लाभ मिळालेच पाहिजेत.या प्रश्नास वाचा आपण वाचा फोडली, आपणास खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete
  11. अतिशय कळीचा मुद्दा आहे.खरोखरच शिक्षक बांधवांना या लाभापासून लांब ठेऊन त्यांच्यावर अन्याय केला जातो. सर्वांना दोन्ही वेतन श्रेणीचे लाभ मिळालेच पाहिजेत.या प्रश्नास वाचा आपण वाचा फोडली, आपणास खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete
  12. धन्यवाद मोरे सर
    अतिशय महत्वाच्या मुद्याला सुरुवात केली

    ReplyDelete
  13. निवड श्रेणी मिळालीच पाहिजेत.

    ReplyDelete
  14. धन्यवाद सर

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर

      Delete
    2. छानच कार्य

      Delete
    3. सरांनी अचूक समस्या हेरून सरकारला शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली. धन्यवाद।

      Delete
    4. wow Great Job Thank you

      Delete
  15. अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत..स्वत:साठी हवे ते नियम धाब्यावर बसवून फायदा करून घेतला जातो पण जेव्हा शिक्षकाला काही द्यायची वेळ येते तेव्हा यांच्या तिजोरीत खडखडाट असतो..

    ReplyDelete
  16. सर,आपले खुप खुप आभार 🙏
    माझी नोकरी ३३वर्ष झाली.प्रशिक्षण २०१६ला झाले.पण निवड श्रेणी मिळाली नाही.

    ReplyDelete
  17. धन्यवाद सर,आपण अतिशय योग्य मुद्दा मांडलेलाआहे.

    ReplyDelete
  18. हा मुद्दा महत्वाचा आहे आजवर शिक्षकांवर सातत्याने अन्याय होत आला आहे.सर्वांनी मिळून लढलं पाहिजे.
    धन्यवाद मोरे सर

    ReplyDelete
  19. हा मुद्दा महत्वाचा आहे आजवर शिक्षकांवर सातत्याने अन्याय होत आला आहे.सर्वांनी मिळून लढलं पाहिजे.
    धन्यवाद मोरे सर

    ReplyDelete
  20. हा मुद्दा महत्वाचा आहे आजवर शिक्षकांवर सातत्याने अन्याय होत आला आहे.सर्वांनी मिळून लढलं पाहिजे.
    धन्यवाद मोरे सर

    ReplyDelete
  21. 2004 नंतर जे सेवेत आले त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा फायदा होत नाही, याबाबत आपण काय भूमिका घेतली?

    ReplyDelete
  22. 10 /20/30 ची आश्वशित प्रगती चा लाभ मिळाला पाहीजे

    ReplyDelete
  23. छान ,मांडणी आणि मागणी सुद्धा , धन्यवाद सर💐💐💐

    ReplyDelete
  24. बरोबर आहेत. सर्वानीच मिळून प्रयत्न केले पाहिजेत. व आपल्यावर होणारा अन्याय दूर केला पाहिजे.आपले खूप खूप आभार.

    ReplyDelete
  25. अगदी योग्य मागणी.धन्यवाद.

    ReplyDelete
  26. छान धन्यवाद सर.अनेक शिक्षकांची ही मागणी आहे.हा प्रश्न लवकर मार्गी लावावा .त्याकरिता लढेंगे जितेंगे..जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  27. अगदी योग्य मागणी.धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. छान धन्यवाद योग्य मागणी आहे

      Delete
  28. बरोबर आहे आपन सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर केला पाहिजे.
    7 वा वेतन आयोग चा पहिला हप्ता PF ला जमा केला म्हूणन 2019-20 साली income tax कट केला त्याचे काय होणार?

    ReplyDelete
  29. अप्रशिक्षित शिक्षणसेवक /अ.प्र सहा.शिक्षक मूळ नियुक्ति पासून सेवा धरण्यात यावी याबाबत संघटने प्रयत्न करावे ही विनंती

    ReplyDelete
  30. आपल्या सर्वांची ही मागणी आहे. लवकरच हा ही प्रश्न सुटेल. लढेंगे जीतेंगे

    ReplyDelete
  31. यापूर्वी चटोपाध्याय मिळल्यानंतर,पदवीधर शिक्षक म्हणून बारा वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा चटोपाध्याय मिळायला, पाहिजे यासाठी प्रयत्न व्हावे.

    ReplyDelete
  32. Sarv teacher jyanchi 24 varsh seva zaleli ahe tya sarvana sarsakat nivad shreni dili pahije

    ReplyDelete
  33. हे सर्व बरोबर आहे. पण आपल्या मध्ये काही बांधव पार्ट-time आहेत यांना देखील अर्धे सर्व गोष्टीचा लाभ मिळावा म्हणून आपण सर्व जण कधी प्रयत्न करणार. काही teacher हे सेट नेट,पी. P.hd झालेले आहेत

    ReplyDelete
  34. Shikshak Bhartacha Vijay Aso

    ReplyDelete
  35. सर,
    मागण्या योग्य व न्याय्य आहेत. अमलबजावणी झालीच पाहिजे.
    जुनी पेन्शन ही मिळावी.
    जय शिक्षक भारती!

    ReplyDelete
  36. सर आपला प्रयत्न खूपच चांगला आहे परंतु त्याची अंमलबजावणी ताबडतोब होत नाही यासाठी अजून प्रयत्नांची गरज आहे.

    ReplyDelete
  37. जर सरसकट 12 व 24 वर्षेपूर्ण चा लाभ मिळालाच पाहिजे

    ReplyDelete
  38. सर आपण करत असलेल्या विधायक कार्यामुळे सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खूपच मदत होत आहे धन्यवाद सर

    ReplyDelete
  39. सर, आपले विधायक कार्य जोमाने रेटून धराआणि शिक्षक बांधवांना न्याय मिळवून द्या.आमच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत.धन्यवाद

    ReplyDelete
  40. मोरे सर आपली तळमळ आणि धडपड रास्त आहे मात्र झारीतील शुक्राचार्य असे प्रस्ताव प्रलंबित ठेवत आहेत त्याविरुद्ध सर्वांनीच एकत्र येवू या . निवडश्रेणी उच्च पदवी प्राप्त प्रत्येक शिक्षकास मिळावयास हवी .त्यासा
    ठी पाच वर्षाच्या गोपनीय अहवालाची गरजच काय ?......... संजय सौंदलगे, कोल्हापूर

    ReplyDelete
  41. मोरे सर आपली तळमळ आणि धडपड रास्त आहे मात्र झारीतील शुक्राचार्य असे प्रस्ताव प्रलंबित ठेवत आहेत त्याविरुद्ध सर्वांनीच एकत्र येवू या . निवडश्रेणी उच्च पदवी प्राप्त प्रत्येक शिक्षकास मिळावयास हवी .त्यासा
    ठी पाच वर्षाच्या गोपनीय अहवालाची गरजच काय ?......... संजय सौंदलगे, कोल्हापूर

    ReplyDelete
  42. हे सर्व खर आहे सर आपण या प्रश्नासाठी आणि अनेक प्रश्नांसाठी नेहमीच प्रयत्नशील असता

    ReplyDelete
  43. सर ,
    आपण खूप महत्त्वाच्या विषयावर भाष्य केले आहे ,शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे .ना प्रशिक्षण ,ना वेतनश्रेणी ,ना प्रस्तावावर विचार.महत्त्वाचे म्हणजे जितक्या उशिराने ही वेतनश्रेणी व तिचे लाभ (arrears)मिळतील, येणाऱ्या उत्पन्न कराचा टप्पा (slab) बदलेल परिणामी ,तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे "तेलही गेलं......".
    आपल्या आमच्या करिता असलेल्या लढ्यास शुभेच्छा.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  44. सर अतिशय योग्य मागणी.सर मी सुद्धा यासाठी खूप प्रयत्न केले,निवडश्रेणी सरसकट सर्वाना मिळाली तर बरे होईल.आपल्या या कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा👌👌👍👍

    ReplyDelete
  45. Nice work ...jay shikshak bharBh

    ReplyDelete
  46. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  47. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  48. सर, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे .शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी विना अट देण्यात यावी .आपण करत असलेल्या विधायक कार्यामुळे शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मदत होत आहे .आपल्या या कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा !!!
    लढेंगे जितेंगे ......
    जय शिक्षक भारती!!!

    ReplyDelete
  49. माननीय आयुष्यमान मोरे सर आपले लक्ष लक्ष धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार.निवड श्रेणीसाठी आपल्या शिक्षक भारती संघटनेचे पत्र शिक्षण निरीक्षक आणि लेखाधिकारीं जोगेश्वरी पश्चिम विभाग यांना देऊन जवळजवळ आता वर्ष होत आले परंतु प्रत्यक्षात साधा प्रस्ताव सुद्धा स्विकारले गेले नव्हते आपण या ज्वलंत विषयाला पुन्हा वाचा फोडली आपले लाख लाख धन्यवाद. माननीय आयुष्यमान आमदारांचेही आभार आणि धन्यवाद आपणा सर्वांचे आयुष्य उत्तरोत्तर वाढत जावो आणि शिक्षणक्षेत्रातील आपले योगदान असेच मोलाचं ठरत जावो.धन्यवाद

    ReplyDelete
  50. सर,
    आपण महत्त्वाच्या मुद्द्याला वाचा फोडण्याचा सुंदर विचार आहे.
    त्यासाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा.
    परंतु काही शाळेतील संस्था चालक मुद्दामच वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यासाठी जाणून बुजून विलंबकरित आहे.निवड श्रेणी मिळू नये किवा निवृत्तीच्या वेळी निवृत्ती वेतन मिळू नये यासाठी आतापासूनच शिक्षकांना दाबाखाली आणून जाचक नियमांचा आधार घेऊन मेमो दिले जात आहे .व भविष्यात त्याचे ते भांडवल करीत आहे त्यासाठी कोणी उत्तर दिले तर त्याला अजून दबावाखाली आणून जाचक नियमांचा आदर घेऊन त्रास दिला जात आहे.
    तरी असो,
    सर आपल्या विचारानं व सुरू केलेल्या संघर्षाला यश नीचितव मिळेल अशी प्रार्थना गणाराला करतो.
    धन्यवाद सर.
    श्री. डी. एल.चाचारे.

    ReplyDelete
  51. सर संगली शिक्षणअधिकारी २६आॕगष्ट२०१९च्या जीआरचा चूकीचा अर्थ लावून प्रस्ताव नामंजूर करीत आहेत.प्रशिक्षण आवश्यक आहे असा रिमार्क देवून त्रूटी कळविली जाते.कृपया प्रश्न लवकर मिटवावा ही विनंती

    ReplyDelete
  52. शिक्षक भारती रांघटनेचे सर्व पदाधिकारी वेळोवेळी शिक्षकावर होण्याऱ्या अन्यायाविरुध्द वाचा फोडतात . आपल्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहेत . सर्व मान्यवरांच स्वागत व मा.श्री.मोरे सरांचे मनःपूर्वक आभार .

    ReplyDelete
  53. मोरे सर आपण छान आणि मुद्देसूद मांडणी केली. आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि भविष्याचा हा विषय आहे.

    ReplyDelete
  54. अंमलबजावणी लवकर व्हावी इतकेच

    ReplyDelete
  55. शिक्षक भारती संघटनेला यश प्राप्त होवो कारण۔ शिक्षकांच्या हक्काचाा प्रश्न आहे۔

    ReplyDelete
  56. राज्यात जेथे संगीत शिक्षक असतात तिथे तबला शिक्षक पण असतात आणि त्यांना निवड श्रेणी तर लांबच वरिष्ठ श्रेणी पण मिळत नाही आणि गेली 20-25वर्षे शासन स्तरावर हा प्रश्न मांडला गेला असून त्यावर अद्याप काही मार्ग निघाला नाही तरी आपण पाठपुरावा करावा हि विनंती

    ReplyDelete
  57. राज्यात जेथे संगीत शिक्षक असतात तिथे तबला शिक्षक पण असतात आणि त्यांना निवड श्रेणी तर लांबच वरिष्ठ श्रेणी पण मिळत नाही आणि गेली 20-25वर्षे शासन स्तरावर हा प्रश्न मांडला गेला असून त्यावर अद्याप काही मार्ग निघाला नाही तरी आपण पाठपुरावा करावा हि विनंती

    ReplyDelete
  58. शिक्षक भारती च्या लढण्यास यश मिळावे व सर्व शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी विनाअट मिळावी जय शिक्षक भारती

    ReplyDelete
    Replies
    1. Yes... we all should fight for it very strongly to get it done, rather we should fight for 10 20 30 format of seniority and hence the increment in the scale.
      Best of luck to all of us..

      Delete
  59. राज्यात जेथे संगीत शिक्षक असतात तिथे तबला शिक्षक पण असतात आणि त्यांना निवड श्रेणी तर लांबच वरिष्ठ श्रेणी पण मिळत नाही आणि गेली 20-25वर्षे शासन स्तरावर हा प्रश्न मांडला गेला असून त्यावर अद्याप काही मार्ग निघाला नाही तरी आपण पाठपुरावा करावा हि विनंती

    ReplyDelete
  60. राज्यात जेथे संगीत शिक्षक असतात तिथे तबला शिक्षक पण असतात आणि त्यांना निवड श्रेणी तर लांबच वरिष्ठ श्रेणी पण मिळत नाही आणि गेली 20-25वर्षे शासन स्तरावर हा प्रश्न मांडला गेला असून त्यावर अद्याप काही मार्ग निघाला नाही तरी आपण पाठपुरावा करावा हि विनंती

    ReplyDelete
  61. सर १०,२०,३० करीता सुध्दा प्रयत्न केला पाहिजे

    ReplyDelete
  62. Apan hati ghetlela mudda yogy asun purn vhave. Aani he shikshak bhrarti marfatch ho oo shkte. 👆👌👍🤝

    ReplyDelete
  63. माझे निवड श्रेणी प्रशिक्षण झाले वीस टक्के वरिष्ठ वेतनश्रेणी निकष पूर्ण होत नाही सन २०१४ पासून मी निवडश्रेणी पासून वंचित आहे. तरी अद्याप स्पष्ट झालेले नाही. १०/२०/३० टप्पा हे ही स्पष्ट झालेले नाही.निश्चित धोरण कधी होणार सर या विषयी मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
  64. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  65. अजूनही एकजूट आवश्यक आहे सर्व शिक्षक एकाच छत्राखाली येणे आवश्यक आहे अन्यथा फोडा आणि झोडा

    ReplyDelete
  66. प्रामाणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीतच शासन असे निर्णय का घेतले जातात.कामाच्या बाबतीत ही असेचं आणि आता आर्थिक बाबतीत ही,म्हणून राज्य शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे शिक्षकांना दिलेल्या कालावधीत वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी त्या त्या टप्प्यानुसार देण्यात यावे

    ReplyDelete
  67. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  68. लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  69. विनाअट वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी मिळाली पाहिजे

    ReplyDelete
  70. काही ठिकाणी मुख्याध्यापक संस्थापक शिक्षणाधिकारी शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतन .श्रेणीसाठी अन्याय करत आहेत.

    ReplyDelete
  71. सर,
    दिनांक ऑक्टोबर 2017 व दिनांक 21 डिसेंबर 2018 चे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत. असा उल्लेख आहे. ह्यात अधिक्रमित करणे म्हणजे नेमके काय करण्यात आले आहे ?

    ReplyDelete
  72. सर,आपण हाती घेतलेल्या कामाला यश मिळालेच पाहीजे, खरेच प्रत्येक सरकार शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे

    ReplyDelete
  73. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी हा मुद्दा गांभिर्याने बघण्यासारखा आहे. याचा पाठपुरावा झालाच पाहिजे.

    ReplyDelete
  74. Variations and nivad vetan shreni please sancation us.Thanks foryour effort.

    ReplyDelete
  75. सर आपण शिक्षकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला आहे.
    वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी सरसकट सर्व शिक्षकांना मिळालीच पाहिजे.

    ReplyDelete
  76. माझी सलग 26 वर्ष सेवा झालेली आहे पण post graduate नाही तर मला निवड श्रेणि मिळेल ka?

    ReplyDelete
    Replies
    1. काही शिक्षक बांधव अर्हता असताना सुद्धा वरिष्ट किवा निवड श्रेणीपासून वंचित आहेत व ते आता निवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत किवा निवृत झाले

      Delete
  77. काही शिक्षक बांधव अर्हता असताना सुद्धा वरिष्ट किवा निवड श्रेणीपासून वंचित आहेत व ते आता निवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत किवा निवृत झाले

    ReplyDelete
  78. मेरी भी संलग्न 26 वर्ष की सेवा हो चुकी है। डबल पोस्ट ग्रेजुएट होने के बावजूद भी, सवाल जहां का तहां।

    ReplyDelete
  79. Good point sir tumhi ahet manunch aamhaala himmat yete

    ReplyDelete
  80. मी काथार एस एस. मी 2013 निवड श्रेणी साठी पात्र असून अद्याप निवड श्रेणी मिळाली नाही.

    ReplyDelete
  81. रास्त मागणी
    लढेंगे ! जितेंगेा!
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  82. ही मागणी योग्य असुन शासनाने लक्ष द्यावे.

    ReplyDelete
  83. वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी सरसकट सर्व शिक्षकांना मिळालीच पाहिजे

    ReplyDelete
  84. सर,आपण छान मुद्दा उपस्थित केला.प्रशिक्षणाची अट रद्द झाली असतानाही(आँगस्ट 2019 चाgr)अधिकारीवर्ग प्रस्ताव मंजूर करित नाहीत.हा मुद्दा लवकर मार्गी लागायला हवा 🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  85. वरिष्ठ वेतन श्रेणी या साठी प्रशिक्षण देण्यात यावे

    ReplyDelete
  86. रास्त मागणी
    लढूया !जिंकूया

    ReplyDelete
  87. विना अट निवड श्रेणी देण्याची सुविधा करा

    ReplyDelete
  88. धन्यवाद सर

    ReplyDelete
  89. खूप खूप आभार सर.🙏🙏

    ReplyDelete
  90. सर आपण खरोखर महत्वाचा मुद्याला वाचा फोडली आहे धन्यवाद मोरे सर.

    ReplyDelete
  91. Very good sir....thanx for fighting for our rights...

    ReplyDelete
  92. Very good sir....thanx for fighting for our rights...

    ReplyDelete
  93. वरिष्ठ व निवड श्रेणी साठी प्रशिक्षण लावण्याचे नियोजन
    10.३.२१.चा Jr
    Great work sir!

    ReplyDelete
  94. वरिष्ठ व निवड श्रेणी साठी प्रशिक्षण लावण्याचे नियोजन
    10.३.२१.चा Jr
    Great work sir!

    ReplyDelete
  95. सर अजूनही शिक्षकांना 10,20,30 वर्षे वरीष्ठ व निवड श्रेणी लागू करावी. याकरिता आपण आपल्या स्तरावर निर्णय घेण्यात यावा. व शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा. हि विनंती🙏😊

    ReplyDelete
  96. सर नमस्कार, आपण केलेल्या कार्याकरिता प्रथम तुमचे अभिनंदन🎉🎊, आपण आपल्या स्तरावर विचार विनिमय करून शिक्षकांना 10,20,30,वर्षांनंतर त्यांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मिळाली तर त्यांना योग्य न्याय⚖️ मिळेल असे मला वाटते. मी आपणास विनंती करतो.🙏😊

    ReplyDelete
  97. खूप खूप आपले आभार आहेब आपण नेहमीच शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून कार्य करत आहात व मोरे साहेब हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यास आपण सरकार ला भाग पाडले ।
    लढेंगे जितेंगे।

    ReplyDelete
  98. sir, even demand justice for those teachers who work in partly aided and partly unaided section in same institution.

    ReplyDelete
  99. लेखन छान,योग्य मागणी.👍

    ReplyDelete
  100. सर,खुपच छान,रास्त मागणीची पुर्तता होवो ही मनोकामना.

    ReplyDelete
  101. सर,खुपच छान,रास्त मागणीची पुर्तता होवो ही मनोकामना.

    ReplyDelete
  102. छान मुद्दे मांडलेत सर धन्यवाद..लढेंगे जितेंगे.जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  103. सरजी, शिक्षक असा सहनशील प्राणी आहे की, कोन्हीही त्यांच्या वर अन्याय करावा त्याना त्यांच्या हकाच्या वरिष्ट निवड तसेच आश्वासित प्रगती योजनेपासून दुर ठेवावे हे खरेच शासनाचे आमच्या प्रती असलेले धोरण चुकीचे आहे. आपण तसेच शिक्षक भारती या आमच्या प्रश्नासंबधी शासन दरबारी प्रश मांडते व त्या सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करते . धन्यवाद पाटील सर .

    ReplyDelete
  104. इतर कर्मचाऱ्यांचे जसे अर्जित रजेचे रिटायर्मेंट नंतर रोखीकरण होते, तसें शिक्षकांचे पण व्हायला हवे. ह्यासाठी please प्रयत्न करा.

    ReplyDelete
  105. अप्रशिक्षित शिकक्षकांना लागु होईल का ?

    ReplyDelete
  106. वरीष्ठ व निवड श्रेणी शिक्षकांना लागु करण्या संदर्भात सखोल अभ्यासपूर्ण मुद्दा मांडल्याबद्दल सुभाष मोरे सरांना धन्यवाद शुभेच्छा शिक्षक भारती सतत पाठपुरावा करावा ही विनंती.

    ReplyDelete
  107. योग्य मागणी सरजी

    ReplyDelete
  108. महत्वपूर्ण मुद्दा हाती घेतल्याबाद्दल आभारी

    ReplyDelete
  109. आपण केलेले कार्य फारच उत्तम आहे शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत वाचा फोडली पाहिजे शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे.

    ReplyDelete
  110. शिक्षिकांना न्याय मिळायलाच पाहिजे .Good Work Sir Congratulations

    ReplyDelete
  111. 21 ऑक्टोंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार मी अविरतटप्पा 1,2 आणि 3 केलेले असुन माझ्याकडे अविरतचे 1,2 आणि3 चेऑनलाईनचे प्रमाणपत्र सुद्धा आहे करीता मी वरिष्ठश्रेणी करीता ZP ला मान्यतेकरीता फाईल टाकलेली आहे परंतुती नाकारण्यात आलेली आहे तरीसुद्धा योग्य मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  112. आपल्या कार्याला मानाचा मुजरा धन्यवाद श्री मोरे सर आपले खूप खूप आभार 🙏🙏

    ReplyDelete
  113. अतिशय महत्वची बातमी सरांचे अभिनंदन 🙏🙏🙏

    ReplyDelete
  114. खूपच महत्वाचे प्रश्न मांडलेत सर,इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रशिक्षणाची अट नाही मग फक्त आपल्यालाच का ? विज्ञान पदवीधर शिक्षकांना पदव्युत्तर शिक्षण त्याच शाखेत घेता येत नाही म्हणून त्यांना Graduate पदविधरवरच निवडश्रेणी लागू व्हायला हवी,तसेच विज्ञान शिक्षकांना दोन वेतनवाढ जास्त असायला हव्यात,आणि प्रशिक्षणतर कोणालाही नकोच,काय गरज आहे प्रशिक्षणाची,त्याने के साध्य होते की फक्त त्रासच द्यायचा आहे शिक्षकांना? कोणतीही गोष्ट शिक्षकांना सहजासहजी मुद्दामहून मिळू दिली जात नाही,यासाठी संघटना strong असायला हव्यात आणि शिक्षकांनी एकजूट दाखवणे फार गरजेचे आहे

    ReplyDelete
  115. आपल्याकडून दिलेली माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे असंख्य शिक्षकां पर्यंत ही माहिती पोहोचणे महत्त्वाचे आहे आणि तसा प्रयत्न आपल्याकडून होत असल्याने आपले खूप खूप अभिनंदन

    ReplyDelete
  116. Go ahead ,we r along with u sir.

    ReplyDelete
  117. आम्हाला 24 वर्षे पुर्ण होवून दोन वर्षे झाले आहे . परंतु आमचे प्रस्ताव अहमदनगर जिल्हा परीषद मध्ये प्रशिक्षणा अभावी तहकूब ठेवले आहे . तरी आपन त्यांना स्पष्ट आदेश द्यावे हि नम्र विनंती . मा कळावे आपला विश्वासू उपशिक्षक श्री गागरे एम बी मो .नं.9850182206

    ReplyDelete
  118. सव॔ कम॔चारी करीता जूनी पेन्शन मागणी करावी .नाशिक जिल्ह्य़ात अनेक प्रस्ताव निवड श्रेणी चे पडून आहे .कार्यवाही होत नाही.

    ReplyDelete
  119. प्रस्ताव स्विकारण्यासाठी संचाल साहेब, आयुक, किंवा शिक्षणमंत्री यापैकी कोणाचा शिक्षणाधिकारी यांना आदेश झाला आहे काय ? आपण सर्व संघटना व सर्व कर्मचारी मागणी करत आहेत. पण जी . आर . असूनही आमलबजावनी होत नाही .

    ReplyDelete
  120. आपल्या शिक्षक बांधवांचा प्रश्न सुटला आहे. धन्यवाद सर
    लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  121. आपल्या शिक्षक बांधवांचा प्रश्न सुटला आहे खुप खुप धन्यवाद सर लढेंगे तो हमारी जित होती रहेगी।

    ReplyDelete
  122. नेहमी प्रमाणे शिक्षकांच्या हक्कासाठी आपला प्रामाणिक लढा ,
    धन्यवाद सर.

    ReplyDelete
  123. प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत पण मंजूरी मिळाली नाही

    ReplyDelete
  124. योग्य मुद्दा आहे सर

    ReplyDelete
  125. अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत

    ReplyDelete
  126. खूपच योग्य प्रकारे मुद्दे मांडले आहेत

    ReplyDelete
  127. शिक्षकेतर कमॅचारी बाबतही विचार करा.एकतीस वषॅ सेवा होवून ही अजून पदोन्नति नाही.यांच्याकड़े शिक्षण खातयासाठी च पैसा नाही.

    ReplyDelete
  128. आपण उत्कृष्ट पद्धतीने सदर बाब हाताळत आहात

    ReplyDelete
  129. खूप छान विषयाला वाचा फोडली, आता प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षक बांधवांना लाभ मिळेल .अशी आशा करू या. मोरे सर आपण. याकडे गभिर्याने लक्ष घालावं . आपल्या कार्यास प्रणाम. धन्यवाद.

    ReplyDelete
  130. आपल्या कार्यास सलाम

    ReplyDelete
  131. हा खरंच शिक्षकावर अन्याय आहे इतर विभागांमध्ये पदोन्नती होत असते पण शिक्षण विभागामध्ये होत नाही कमीतकमी निवड श्रेणी किंवा वेतन श्रेणी मिळावी हा शिक्षकाचा हक्क आहे

    ReplyDelete
  132. सर,
    आपण महत्त्वाच्या मुद्द्याला वाचा फोडण्याचा सुंदर विचार आहे.
    त्यासाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा.
    परंतु काही शाळेतील संस्था चालक मुद्दामच वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यासाठी जाणून बुजून विलंबकरित आहे.निवड श्रेणी मिळू नये किवा निवृत्तीच्या वेळी निवृत्ती वेतन मिळू नये यासाठी आतापासूनच शिक्षकांना दाबाखाली आणून जाचक नियमांचा आधार घेऊन मेमो दिले जात आहे .व भविष्यात त्याचे ते भांडवल करीत आहे त्यासाठी कोणी उत्तर दिले तर त्याला अजून दबावाखाली आणून जाचक नियमांचा आदर घेऊन त्रास दिला जात आहे.
    संस्था ठराव नसताना वरिष्ठ व निवड श्रेणी घेता येता का असा कोणता जी आर आहे का?

    ReplyDelete
  133. निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण अट आहे का?नसल्यास परिपत्रक पाठवावे.
    मो.9881302892

    ReplyDelete
  134. छान प्रस्ताव सादर केला आहे १२व२४वर्षे झालेल्या सर्व शिक्षकांना कोणत्याही प्रकारची अट न लावता वरीष्ठ श्रेणी व निवड श्रेणी देण्यात आली पाहिजे.
    जे सेवावृत्त झाले आहेत त्यांना सुध्दा २४वर्षे पूर्ण झाली तेव्हापासून निवड श्रेणी मिळणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  135. शिक्षणसेवक मानधनवाढ यासाठी संघटनेमार्फत काही प्रयत्न चालू आहेत काय?

    ReplyDelete