Tuesday 24 November 2020

26 नोव्हेंबरचा लाक्षणिक संप कशासाठी?

26 नोव्हेंबर रोजी शिक्षण विरोधी, कामगार विरोधी, शेतकरी विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी देशातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या आदेशान्वये शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा पाडाव व्हावा म्हणून राज्यात सातत्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे.


मागील काही वर्षांमध्ये शेतकरी विरोधी, कामगार विरोधी धोरणं सातत्याने रावबली जात आहेत. शिक्षणाचं खाजगीकरण, कंपनीकरण सुरू आहे. आणि आता NEP 2020 आलेलं आहे. NEP 2020 मुळे जवळपास 1 लाख अनुदानित शाळा आणि 35 हजार कॉलेजेस बंद होणार आहेत. त्यामुळे अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडकळीस निघणार आहे. त्यामुळे गरीब, वंचित वर्गाचं शिक्षण संकटात येणार आहे. या सगळ्या गोष्टींना विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी 26 नोव्हेंबरच्या संपात सहभागी व्हायचं आहे. 

दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजीच्या भव्य परिषदेत दहा प्रमुख राष्ट्रीय संघटनांनी सहभाग घेतला होता. या परिषदेला अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अधिकारी उपस्थित होते. या परिषदेत केंद्र व राज्य सरकारांच्या कामगार शेतकरी आणि शिक्षक-शिक्षकेतर विरोधी धोरणांना पायबंद घालण्यासाठी दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे.

शिक्षक भारती या एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होणार आहे.

प्रमुख मागण्या

1) सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा.

2) 100 टक्के अनुदान द्या.

3) व्हॅक्सिन आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका. शिक्षकांना 50% उपस्थितीची अट रद्द करा, वर्क फॉर्म होमची परवानगी दया. 

4) कोविड पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी थर्मल स्कॅनर, सॅनिटायझेशन इ. सुविधांसाठी संस्थाना किमान 25 हजार आणि कमाल 1 लाख रुपयांचा निधी द्या.

5) शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरीत भरा.

6) सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजना लागू करा. 

7) बक्षी समितीचा खंड 2 तातडीने प्रसिद्ध करा. 

8) अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्यांच्या जिल्ह्यातच करा. 

9) विषयांना शिक्षक नाकारणारा 28 ऑगस्ट 2015, कला क्रीडा शिक्षकांना हद्दपार करणारा 7 ऑक्टोबर 2015 आणि  रात्रशाळा संकटात टाकणारा 17 मे 2017 चा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय मागे घ्या.

10) वस्तीशाळा शिक्षक आणि अप्रशिक्षित शिक्षण सेवक यांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरा.

11) 20 पटाच्या आतील शाळा बंद करु नका.

12)  सहाय्यक शिक्षक परिविक्षाधिन यांना वेतन श्रेणी लागू करा आणि परिविक्षाधिन कालावधी कमी करा. 

13) अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तासिका तत्त्वावर काम करणारे  सर्वच शिक्षकांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू करा.

14)  संस्थांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेतर अनुदान सुरु करा.

15) वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट लागू करा.

16) आयटी विषय शिक्षकांना वेतन मंजूर करा.

17) सावित्रीबाई फुले - फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना लागू करा.

18) शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका.

19) केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्ष बालसंगोपन रजा द्या.

20) खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करा.

दि. 26  नोव्हेंबर 2020 रोजीच्या लाक्षणिक संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुढाकाराने सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षकांची एमफुक्टो, बुक्टो संघटना आणि महामंडळांसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणारं आहेत. 
 
मुंबईसह राज्यातील सर्व विभागिय अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व सर्व शिक्षक भारतीचे पदाधिकारी शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांची ऑनलाईन  सभा घेऊन 26 नोव्हेंबर  रोजी होणाऱ्या लाक्षणिक संपाबाबत माहिती देणार आहेत. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचा लाक्षणिक संप यशस्वी करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोरदार तयारी करावी.

आयफुक्टो, एमफुक्टो, बुक्टू व शिक्षक भारती या अखिल भारतीय व महाराष्ट्र, मुंबई स्तरावरील शिक्षक (शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे) यांच्या संघटनांनी 26 नोव्हेंबर 2020 रोजी होणार्‍या राष्ट्रीय संपास पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रात कामगार संघटना संयुक्त कृती समिती (टीयूजेएसी) आणि सरकारी कर्मचारी संघटनांची समन्वय समिती संप पुकारत आहेत. व त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रद्द करा या आपल्या मागणीला पाठिंबा दिला आहे, कारण...

1) हे धोरण स्वातंत्र्योत्तर भारतातील 1966 च्या कोठारी कमिशनने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अस्तित्वात असलेल्या शिक्षणाची सध्याची रचना पद्धतशीरपणे मोडणारे आणि सार्वजनिक अनुदानित शिक्षणाला तिलांजलि देणारे आहे. हे धोरण आयसीटी आधारित / ऑनलाइन शिक्षण आणि विशेषत: उच्चभ्रू वर्गाला अनुकूल अशी स्वायत्त शिक्षण प्रणाली आणणारे असेल. 

2) हे धोरण घटनात्मक आरक्षण आणि मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यांचे उल्लंघन करणारे आहे. या घटनात्मक संरक्षणामुळेच सद्या शैक्षणिक संस्थांच्या विस्तारासह भारत प्रगती करीत आहे, त्या सर्वसमावेशक शिक्षणामध्ये विशेषत: ग्रामीण, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि इतर उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता व समानता सुनिश्चित करीत आहे. 

3) या धोरणानुसार जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या मोठ्या शैक्षणिक संस्थांवर जास्त जोर देण्यामुळे, सद्याची हजारो शाळा-महाविद्यालये बंद होण्याचा धोका निर्माण होणार आहे, बहुसंख्य विद्यार्थ्यांना अनौपचारिक / दूरस्थ शिक्षणाकडे ढकलले जाणार आहे. 

4) या धोरणामुळे शालेय आणि उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या गळतीच्या प्रमाणात तीव्र वाढ होणार आहे. सद्याच्या लॉकडाउन संबंधित आर्थिक संकटामुळे आधीच मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणाबाहेर पडले आहेत आणि या धोरणामुळे ते आणखी तीव्र होणार आहे. त्याचबरोबर, नियमित शिक्षक / शिक्षकेतर कर्मचार्‍यांऐवजी तातडीने कंत्राटी पद्धतीने नेमणूक प्रक्रियेस गती दिली जाणार आहे.

5) या धोरणामुळे एकूणच घटनात्मक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची पायमल्ली होणार आहे.

मुंबईत आंदोलन कुठे होणार?

शिक्षक भारती, बुक्टू व इतर संघटना 26 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2.30 ते 4.00 वेळेत मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, कलिना येथे गेटवर निषेध निदर्शने करून अखिल भारतीय संपास आपला पाठिंबा दर्शवणार आहेत. यावेळी आमदार कपिल पाटील, शिक्षक भारती अध्यक्ष अशोक बेलसरे, एमफुक्टोच्या नेत्या डॉ. ताप्ती मुखोपाध्याय, बुक्टूच्या नेत्या मधु परांजपे उपस्थित राहणार आहेत. मुंबई आणि परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी इथे यावं आणि आंदोलनात सहभागी व्हावं. 

राज्यभर इतर ठिकाणी जिल्हाध्यक्ष, राज्य पदाधिकारी आणि प्रमुख पदाधिकारी यांनी ठरवून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच इतर सर्व युनिट यांनी संयुक्तपणे जोरदार आंदोलन करावे. कोविडच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घ्यावी.

ज्या ठिकाणी शाळा, कॉलेज सुरू आहेत, 10 वी / 12 वी परीक्षा केंद्र सुरू आहेत तिथे काळ्या फिती लावून काम करावं आणि आंदोलनात आपला सहभाग नोंदवावा.
जिंदाबाद!
लढूया, जिंकूया!! 

आपला स्नेहांकित, 
सुभाष मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र

 

65 comments:

  1. सर आम्ही नेहमी आपल्या पाठीशी आहोत.

    ReplyDelete
  2. We are always with u sir g.. You all are performing herculan Task..

    ReplyDelete
  3. Sir hum aapke sath hai ladhegey jiteygey Jai shikshk Bharti

    ReplyDelete
  4. Sir hum aapke sath hai ladhegey jiteygey Jai shikshk Bharti

    ReplyDelete
  5. Perfect.....always with you sir👍

    ReplyDelete
  6. सर आम्ही नेहमी आपल्या बरोबर आहोत. लढूया. जिंकूया!!

    ReplyDelete
  7. एकदम बरोबर सर, अशा अन्यायकारक कायद्यांना आळा बसलाच पाहिजे. जिन्दाबाद सर. आम्ही आपल्या सोबत आहोत .

    ReplyDelete
  8. सर मी तुमच्या सोबत आहे हा लढा सर्व मिळून लढू

    ReplyDelete
  9. लढेगे जीतेंगे

    ReplyDelete
  10. सर आम्ही नेहमी आपल्या बरोबर आहोत. लढूया. जिंकूया!!

    ReplyDelete
  11. सर मी तुमच्या सोबत आहे हा लढा आपण सर्व मिळून लढू
    धन्यवाद सर....👍

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. लढेंगे ! जितेंगे !

    ReplyDelete
  14. "या दीड दमडीच्या कतपुतळ्यांना न्यायासनावर बसवून त्यांच्याकडे न्याय मागण्याची काय तर त्यांच्यासमोर निरपराध ठरण्याची देखील माझी इच्छा नाही". असे नटसम्राटांसारखे आपल्यालाही म्हणता आले असते तर बरे झाले असते. पण लोकशाहीत या न्यायासनावर बसणाऱ्या प्रत्येकाकडे इतके हक्क आणि अधिकार दिले जातात की त्यांच्यासमोर हतबल होऊन गुरूचा गुलाम होऊन बसलाय. पाच वर्ष खुर्चीवर हे काय बसतात,त्यांना वाटतं आपण शिक्षकांचे मालक झालो. पण त्यातही माननीय शिक्षक आमदार श्री कपिल पाटील साहेबांसारखे आमदार जोपर्यंत या लोकशाहीत आहेत तोपर्यंत आशेचा शेवटचा किरण या शिक्षकांमध्ये जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी अव्याहतपणे चालू ठेवले आहे. त्यांच्यासोबतच श्री जालिंदर सरोदे आणि श्री सुभाष मोरे यांच्यासारखे खंदे वीर जोपर्यंत आमच्यासोबत आहेत तोपर्यंत किमान जगण्याची इच्छा टिकून राहील अशी आशा वाटते.

    ReplyDelete
  15. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  16. आम्ही आपल्यासोबतच आहोत , शिक्षकांच्या हितासाठी व सन्मानासाठी👍 लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  17. 👍योग्य कारणांसाठी योग्य लढा

    ReplyDelete
  18. Thank you very much sir
    We are always with us.
    Jay shikshan Bharati

    ReplyDelete
  19. लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  20. योग्य कारणासाठी योग्य लढा

    ReplyDelete
  21. जय शिक्षक भारती लढू या जिंकू या

    ReplyDelete
  22. जय शिक्षक भारती।आपण जिकणारच!

    ReplyDelete
  23. जय शिक्षक भारती।आपण जिकणारच!

    ReplyDelete
  24. जय शिक्षक भारती।आपण जिकणारच!

    ReplyDelete
  25. Very Nice .We are all with you .👌👌🙏🙏

    ReplyDelete
  26. लढेंगे जितेंगे..जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  27. योग्य कारणांसाठी योग्य लढा
    लढेंगे जितेंगे..जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  28. प्रचलित अनुदान सूत्र लागू झालेच पाहिजे i support you

    ReplyDelete
  29. अगदी बरोबर आहे सर
    मागण्या मान्य झाल्याच पाहिजे

    ReplyDelete
  30. प्रचलितनुसार अनुदान मिळालेच पाहिजे.
    किंवा १००%अनुदान लवकरात लवकर मिळालेच पाहिजे.

    ReplyDelete
  31. उपेक्षित, वंचित, श्रमिक वा दुर्बल घटकातील मोठ्या समूहाला गोरगरिबांच्या शैक्षणिक, सामाजिक स्थित्यंतरासाठीच्या शिक्षण हक्काला डावलणाऱ्या या धोरणाला प्रखर विरोध व्हायलाच पाहिजे. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. नाही रे वर्गाला संपवण्याच्या या कटाला हाणून पाडले पाहिजे.या देशव्यापी आंदोलनास नक्कीच यश येईल.. संपलो नाही अजून आम्ही आणि आमचा निर्धार ही धगधगतो आहे.या निर्धारानं लढूया... आणि जिंकूया...
    (विशेष शाळा कर्मशाळांचा मुख्य प्रवाहापासून अनेक कोसोदूर असलेला अल्पसंख्यांक समूह ही आपल्या सोबत आहेच, या समुहाच्या समस्यांनाही आपल्या पुढील लढ्यात स्थान असावे, ही विनंती. कणा नसलेल्या या वेलींना या आधारवडाची गरज आहे. ..)

    ReplyDelete
  32. १०१% तुम्हीच जिंकणार सर.

    ReplyDelete
  33. छान लिहिलात काही लेख असतील तर ग्लोबल la पाठवत जा

    ReplyDelete
  34. होय या मागन्या पूर्ण व्हायला पाहिजे जुनी पेन्शन मिळाले पाहिजे

    ReplyDelete
  35. आम्ही सर्व जण सोबत आहोत

    ReplyDelete
  36. Thanks Sir. We're always with you.

    ReplyDelete
  37. लढेंगे जितेंगे ....जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  38. लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  39. Sir ap age badho ham apke sath hai

    ReplyDelete
  40. लढेंगे और जितेंगे

    ReplyDelete
  41. सर, तुमच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत. लढेंगे और जितेंगे. शिक्षक भारतीचा विजय निश्चित आहे.

    ReplyDelete
  42. सर जी आपण पुकारलेल्या आंदोलनात आम्ही सगळे सहभागी आहोत.शिक्षक भारती नेहमी प्रमाणे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असते.आपल्या प्रयत्नास यश मिळेल.आपला विजय निश्चित आहे. जय शिक्षक भारती.....����

    ReplyDelete
  43. जय शिक्षक भारती.जीतेंगे लढेंगे.

    ReplyDelete
  44. जय शिक्षक भारती.लढेंगे जितेंगे.

    ReplyDelete
  45. Aamhi Parivikshadhin sahayyak shikshak (tathakathit Shikshan Sevak) Mumbai Public School BMC aaplya sobat aahot

    ReplyDelete
  46. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  47. we are all with you. shikshak bharti.we salute to your efforts and conflicts for the rights and justice for the teachers. 🙏🙏🙏

    ReplyDelete