Thursday 3 June 2021

शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ सुरूच

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी बाबतचे पत्र रद्द केले

26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयामुळे प्रशिक्षणाची अट रद्द करून सर्व पात्र शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी देण्याचे मान्य केले होते. परंतु सदर शासन निर्णयाची राज्यभर अंमलबजावणी होत नव्हती. शिक्षक भारतीने शिक्षण आयुक्त यांना पत्र देऊन 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत पत्र दिले होते. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाअभावी देण्याचे मान्य केले. त्यानुसार शिक्षण निरिक्षक, उत्तर विभाग आणि शिक्षण निरिक्षक, दक्षिण विभाग यांनी पत्र काढले होते. शिक्षण विभागात एकवाक्यता नसल्यामुळे शिक्षणमंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शिक्षण निरिक्षक कार्यालयाने वरिष्ठ व निवड श्रेणी देण्याबाबतचे काढलेले पत्र रद्द केले आहे. शिक्षक भारती याचा तीव्र शब्दात निषेध करते.

शिक्षण सहसंचालक श्री दिनकर टेमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच सर्वांसाठी दहा दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की 12 वर्ष व 24 वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे जे नुकसान होणार आहे याला जबाबदार कोण? राज्यभर शासकीय निमशासकीय कर्मचार्‍यांना विनाअट, विना प्रशिक्षण, सरसकट बारा वर्ष व 24 वर्षाचे लाभ दिले जातात. मग आमचा शिक्षण विभागच आपल्यावर अन्याय का करत आहे?

शिक्षण विभागातील अधिकारी यांना शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी यांना कोणतेही लाभ मिळू नये असेच नेहमी का वाटते?

सरकार बदलल्यानंतर असे वाटले होते की शिक्षणाचे व शिक्षकांचे प्रश्न सुटतील पण आता ती आशा राहिलेली नाही. कोरोना काळा नंतर याबाबत शिक्षक भारतीला रस्त्यावरील तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आपल्या प्रश्नांसाठी आपल्याला लढावं लागेल. शिक्षण मंत्र्यांना आणि शिक्षण विभागाला जागं करावं लागेल.

अधिक माहितीसाठी याच संदर्भातला ऑगस्ट २०२० मध्ये लिहलेला ब्लॉग जरूर वाचा -

लढेंगे! जितेंगे!

आपला स्नेहांकित 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य




65 comments:

  1. शासनाचा जाहीर निषेध

    ReplyDelete
  2. त्यांना त्यांची जागा शिक्षक भारतीच दाखवेल

    ReplyDelete
  3. सर ...शिवाय केवळ 20% शिक्षकांना याचा लाभ देणार का ? असे असेल तर इतरांवर तो अन्याय नाही का ?

    ReplyDelete
  4. इतरांप्रमाणे शिक्षकांनासुद्धा वीनाप्रशिक्षण सरसकट 12 वर्ष आणि 24 वर्षाचे लाभ दिले पाहिजे
    या शासनाचा निषेध, निषेध, निषेध---!

    ReplyDelete
  5. शासनाचे डोके ठिकाणावर आहे काय?????
    २४वर्षे ते २७ वर्षे सतत एकाच पदावर काम सेवा प्रामाणिकपणे करून देखील निवड श्रेणी का देत नाहीत?????आंदोलन शिवाय प्रश्न सुटणार नाही.सेवानिवृत्त झालो तरीही निवड श्रेणी नाही.इतरांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी देतात आणि माध्यमिक शिक्षकांना का नाही????हा मुख्य प्रश्न आहे.

    ReplyDelete
  6. सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन शिक्षक भारती च्या छताखाली येऊन सरकारला जाग आणणे महत्त्वाचे आहे.

    ReplyDelete
  7. ज्या शिक्षकांनी अविरत भाग एक चे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे त्या शिक्षकांना सुद्धा वरिष्ठ वेतन श्रेणी मिळत नाही

    ReplyDelete
  8. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना सलाम।
    शासनाचा निषेध

    ReplyDelete
  9. निषेध! निषेध!! निषेध!!!
    शिक्षक भारती ज़िंदाबाद

    ReplyDelete
  10. सरकारी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला १०,२०,३०अशी विनाअट पदोन्नतीसाठी निकष आहे फक्त शिक्षकांना काही द्यायचे असले की सगळे नियम आणि कायदे आठवतात हे अयोग्य आहे.... यावर उपाय काढला पाहिजे सर्व शिक्षकांना लाभ मिळायलाच पाहिजे

    ReplyDelete
  11. 12 वर्षे व 24 वर्षे पूर्ण करणाऱ्या शिक्षकाला प्रशिक्षण घ्यावे लागले तरी चालेल पण hm यांचा गोपनीय अहवालाची गरज काय?

    ReplyDelete
  12. शिक्षण विभागाचा जाहीर निषेध, निषेध,....

    ReplyDelete
  13. अजब गजब सरकार, निषेध

    ReplyDelete
  14. आता शिक्षकी ही मृगजळासारखी होते की काय असं वाटू लागलंय? आज दिनांक 3 जून 2021 रोजी सुद्धा आधी शाळेची माहिती भरली इयत्ता दहावीतील कमी प्रतिसाद दिलेल्या विद्यार्थ्यांची मग आपला ब्लॉग वाचायला घेतला. सर आमच्या शाळेत असा दिवसाच जात नाही की आज शाळेतील विद्यार्थ्यांशी संबधित काम केले नाही आणि तेही कुठलीच तक्रार न करता अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि शासनाकडून मात्र एवढी अवहेलना होते याच खूप वाईट वाटतं. आज अठ्ठावीस वर्ष पुर्ण होणार सेवेत लहान मोठी वीस पंचवीस प्रशिक्षणे पूर्ण केल्याचे दाखलेही सोबत आहेत शासनाकडून आवश्यक केलेल्या सर्व अटी आणि शर्तीही निवड श्रेणीसाठीच्या पूर्ण केल्या आहेत तरीही तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जातो याचे खूपच वाईट वाटतंय सर, आपण लढा देता आहात शिक्षकांसाठी, शिक्षकांवरील अन्यायाविरुद्ध याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आशावादी राहू या.आपले लाख लाख धन्यवाद सर.

    ReplyDelete
  15. शासनाचा तीव्र निषेध

    ReplyDelete
  16. सर्वांना शिक्षकच खूपतो.कारण शिक्षकांनाही आता जिथे जुंपले तिथे गपगुमान राबायची सवय लागली. शिक्षक भारती मार्फत आवाज उठवलाच पाहिजे.

    ReplyDelete
  17. शासनाचा निषेध

    ReplyDelete
  18. इतर सरकारी कर्मचाऱ्यांना न मागता मिळते परंतु नेहमी शिक्षकांनाच मागण्या मान्य करण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

    ReplyDelete
  19. शिक्षक आता गुरु वैगेरे काहि राहिलाच नाहि,
    शिक्षण मंत्री शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्याकडे लक्ष देत नाहि
    शिक्षकाच्या कामाचा काहिच किम्मत उरली नाहि
    शिक्षकाकडून अणेक कामे करुण घेणे पण
    लाभ देतांना मात्र कानाडोळा करणे ,
    शिक्षकाची ,माणसिक खच्चीकरणच करणे सुरु आहे
    शिक्षक भारतीने आवाज उठविलाच पाहिजे

    ReplyDelete
  20. आशा गोंधळाचा निषेध करुन रद्द करणारे आधिकार्‍यावर कारवावी करुन तोंडाला काळ फासल पाहिजे

    ReplyDelete
  21. प्राथमिक शिक्षक यांना यांना सरसकट
    निवड श्रेणी दिलीच पाहिजे

    ReplyDelete
  22. शासनाचा निषेध

    ReplyDelete
  23. निषेध शासनाचा आणि तकलादू वृत्तीचा

    ReplyDelete
  24. गरज पडेल तेव्हा सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने काम करणारा शिक्षक हा एकमेव कर्मचारी आहे.शासनाला शिक्षकांच्या मदतीशिवाय कोणतीही सार्वजनिक योजना सुलभ रीत्या पार पाडवायची असाल्यास शिक्षकांशिवाय अशक्य आहे, आर्थिक लाभ आल्यास शिक्षकांचा विचार का होत नाही. त्यासाठी सर्व शिक्षकांनी संघटनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

    ReplyDelete
  25. आम्हा सर्व शिक्षकांचा शिक्षक भारती स नेहमीच पाठिंबा आहे 🙏

    ReplyDelete
  26. नमस्कार
    प्राथमिक शिक्षकांना निवड,व. वरिष्ठ श्रेणी सरसकट दिली पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. सरकार खाजगी माध्य,उच्चं माध्य,प्राथमिक अनुदानीत शाळांतील शिक्षकासाठी कोणतीही श्रेणी देण्याच्या मनस्थितीत नाही फक्त एखादे प्रपत्र निघते ते चार आठ दिवसात हवेत विरून जाते मग येरे माझ्या मागल्या हिच स्थिती . किती शिक्षक वरिष्ट ,निवड श्रेणी अभावी निवृत्त झाले त्यांची फार अपरिमित हाणी झाली . कोणींच शिक्षकांचा या श्रेण्या संबधाने सहानुभूती पूर्वेक विचार करत नाही.

      Delete
  27. हा अन्याय केवळ शिक्षण विभागाच्या च वाट्याला का?

    ReplyDelete
  28. आंदोलन केल्या शिवाय शिक्षण विभाग जागा होत नाही, आणि शिक्षक भारती च्या प्रयत्न शिवाय होणार नाही



    ReplyDelete
  29. शाशनाचा जाहीर निषेध !!

    ReplyDelete
  30. गलत नीतियों से गलत नियत से बनी सरकार से क्या अपेक्षा रखते हों सर जी

    ReplyDelete
  31. लूट वाली सरकार जाहिर निषेध😍🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

    ReplyDelete
  32. You are right sir I'm with you.

    ReplyDelete
  33. जाहीर निषेध....

    लढेंगे... जितेंगे...

    ReplyDelete
  34. शिक्षकांच्या बाबतीत दुटप्पीपणा ने निर्णय घेणाऱ्या शासनाचा जाहीर निषेध

    ReplyDelete
  35. सर्व शिक्षकांना विना अट वरिष्ठ व निवड श्रेणी मिळाली पाहिजे

    ReplyDelete
  36. शिक्षकांच्या बाबतीत दुटप्पीपणा ने निर्णय बदलणाऱ्या शासनाचा जाहीर निषेध

    ReplyDelete
  37. सरजी,26 ऑगस्ट 2019 च्या वेळी सत्तेत असलेल्यांनी सदर निर्णय घोषित करून खाजगी व जि.प शिक्षक यांमधे उभीदरी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची भावना शिक्षकबांधवांमधे आहे.आपणास विनंती की ही दरी मिटविण्याचा प्रयत्न व्हावा.

    ReplyDelete
  38. आपन प्रयत्न करीत राहा काही संघटनाअडथळे आणतील च शासन दुर्लक्ष करतीलच

    ReplyDelete
  39. लढेंगे और जितेंगेही।

    ReplyDelete
  40. निषेध.कोणत्याही प्रशिक्षणाची अट नसावी.10 व 20 वर्ष पूर्ण झाले की विनाअट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी.

    ReplyDelete
  41. शिक्षका बद्दल शासन नेहमीच उदासीन असते

    ReplyDelete
  42. जाहीर निषेध

    ReplyDelete
  43. All teachers must get justice .

    ReplyDelete
  44. 2015 पासून निवड श्रेणी मिळाली नाही

    ReplyDelete
  45. दर महिन्याला निवाडश्रेणी पाञ शिक्षक सेवानिव्रुत होत आहे. त्यांना जर श्रेणी मिळाली नाही तर पेन्शन मध्ये काहीच लाभ होत नाही.हा फार दुरगामी परिणाम आहे.व ही समस्या शिक्षक भारती सोडवू शकते.

    ReplyDelete
  46. अगदी बरोबर सर..लढेंगे..जितेंगे.जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  47. हा गुंता सुटला पाहिजे सर .

    ReplyDelete
  48. सर्वांना मूख्याध्यापक पद नाही मिळत म्हणून निवड श्रेणी आवश्यक आहे. तेवढेच समाधान .

    ReplyDelete
  49. माझी सेवा 32 वर्ष झाली आहे.अजून वरीष्ठ श्रेणी चे वेतन घेत आहे.निवड साठी पाञ असूनसुद्धा.

    ReplyDelete
  50. रिटायर ला 10 महिने बाकी आहेत

    ReplyDelete
  51. राज्यातील दोनी श्रेणी पाञ शिक्षक याची यादी शिक्षण संचालक पूणे यांनी मागितली होती.त्याचे काय झाले.

    ReplyDelete
  52. विना अट सर्व शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू झाली पाहिजे

    ReplyDelete
  53. मा.कपिल पाटील साहेब आपण या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष घालावे.ही नम्र विनंती...त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. फसवणूक करणारे शासनाचा तीव्र निषेध निषेध निषेध

      Delete
  54. फसवणूक करणारे शासनाचा तीव्र निषेध निषेध निषेध

    ReplyDelete
  55. निषेध! निषेध! निषेध!

    ReplyDelete
  56. लढेंगे , जीतेंगे 🙏🙏

    ReplyDelete
  57. वरीष्ठ व निवड श्रेणीचा विषय मा.कपिल पाटील साहेबच सोडावू शकते.

    ReplyDelete
  58. खूप सुंदर व अभ्यास पूर्ण विषय मांडला आहे मोरे सर

    ReplyDelete
  59. हो सर हा विषय लावून धरला पाहिजे.

    ReplyDelete