Tuesday 8 June 2021

जुन्या पेन्शन योजनेसाठी किती वेळा माहिती दयायची?

सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. हा आपला संविधानात्मक हक्क आहे. शासन अथवा शासनातील अधिकारी आपल्याला संविधानाने दिलेल्या जुन्या पेन्शनच्या हक्कापासून रोखू शकणार नाहीत. जुन्या पेन्शन बाबत वारंवार चुकीची माहिती सादर केल्याने पेन्शन दिल्यास शासनावर मोठा आर्थिक भार पडणार आहे अशी मानसिकता तयार केलेली आहे. मागील पंधरा वर्षात विविध पक्षांची सरकारी आली पण पेन्शनचा मुद्दा नेहमीच दुर्लक्षित राहिला किंबहुना जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवला गेला. विरोधी पक्षातले नेते सत्तेवर येईपर्यंत जुन्या पेन्शनचा नारा देत होते. परंतु तेच सत्तेवर आल्यावर पेन्शन कशी देता येणार नाही याची कारणे देऊ लागले. आश्वासनं झाली. समित्या झाल्या. बैठका झाल्या. वेगवेगळे अहवाल झाले. अनेक वेळा माहिती मागवली गेली. पण पेन्शन मिळाली नाही. दरम्यानच्या काळात आपले हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव निवृत्त झाले, मरण पावले पण त्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळालेली नाही.

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वित्त विभागाकडे योग्य पाठपुरावा न केल्यामुळे आपण सर्वजण पेन्शन पासून आज पर्यंत वंचीत आहोत. एक नोव्हेंबर 2005 रोजी जुनी पेन्शन रद्द करण्याचा निर्णय झाला. राज्यातील सर्व शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू झाला. पण त्याच बरोबर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्यात आली. पण शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र वगळण्यात आले. डी सी पी एस लागू करण्याचा निर्णय घेण्यासाठी सुमारे पाच वर्षाचा विलंब केला. 29 ऑक्टोबर 2010 रोजी शासन निर्णय पारित केला. शिक्षण विभागातील मंत्र्यांनी, सचिवांनी, अधिकाऱ्यांनी या पाच वर्षात काय केले याचा जाब विचारायला हवा?

आपण सर्वांनी अनेक वेळा माहिती दिली आहे. याही वेळा देऊ. पण ही शेवटची वेळ असेल. यानंतर कोणतीही माहिती द्यायची नाही. माहिती मागवणे ती चुकीच्या पद्धतीने सादर करणे आणि गोंधळ निर्माण करणे हा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा खेळ आता थांबायला हवा. शिक्षण सचिव आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत वस्तुस्थिती समोर न मांडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.

यानंतर माहिती देणार नाही

सर्व अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती की आपल्या विद्यालयात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान किंवा अंशतः अनुदानावर नियुक्त (कायम अनुदान नाही) व त्यानंतर 100% अनुदावर आलेले व सध्या कार्यरत असलेले तसेच आपल्या विद्यालयातून यापूर्वी वरीलपैकी सेवानिवृत्त किंवा मयत झाले असतील याच कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभागाने मागवली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सदर माहिती विनाविलंब आणि अचूक देणे आवश्यक आहे.

ज्या कर्मचाऱ्यांचे जी पी एफ चालू असतील अथवा नसतील, डी सी पी एस चालू असेल अथवा नसेल याचा विचार न करता वरील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती तात्काळ द्यावयाची आहे.

शिक्षण संचालक कार्यालयाने जारी केलेले पत्र - https://drive.google.com/file/d/1S8Qt3mPRA2HWAj5kbbBAEILTxQ_NgHDU/view?usp=sharing

शिक्षण संचालक कार्यालयाने दिलेले प्रपत्र अ आणि प्रपत्र ब भरताना खालील सुचनांचा विचार करावा, ही विनंती.

प्रपत्र अ भरताना

१) रकाना क्र २ मध्ये सर्व कर्मचारी संख्या लिहावी.

२) रकाना क्र ३ मध्ये सर्व कर्मचारी यांची डिसीपीएस रक्कम भरावी (Basic+DA) च्या १०℅ × २

३) रकाना क्र ४ मध्ये सर्व कर्मचारी यांची डिसीपीएस रक्कम भरावी (Basic+DA)च्या १४℅ × २

४) रकाना क्र ५ मध्ये रकाना क्र ४ मधील संख्येला १२ ने गुणून जी रक्कम येईल ती

५) रकाना क्र ६ मध्ये सेवानिवृत्त आणि मयत कर्मचारी संख्या लिहा.

६) रकाना क्र ७ मध्ये त्या सेवकांची Basic+DAला 2 ने भागून येणारी रक्कम भरावी

७) रकाना क्र ८ हा रकाना क्र ७ प्रमाणेच

८) रकाना क्रमांक ९ मध्ये रकाना क्र ८ मधील संख्येला १२ ने गुणने

९) रकाना क्र १० मध्ये सर्व कर्मचारी यांचा जो जी.पी.एफ चालू असेल ती रक्कम

१०) रकाना क्र ११ मध्ये जर काही कारणास्तव आपल्यातील काही कर्मचाऱ्यांचा जी.पी.एफ कट होत नसेल तर त्यांचा जी.पी.एफ (बेसिक च्या ६% )घेऊन त्याची आणि रकाना क्र १० मधील संख्या यांची बेरीज करावी.

११) रकाना क्र १२ मध्ये रकाना क्र ११ ला १२ ने गुणने

१२) रकाना क्र १३,१४,१५ आपण भरू नये

१३) रकाना क्र १६ मध्ये शेरा
१९८२ ची जुनी पेन्शन लागू करावी.

प्रपत्र ब

१) रकाना क्र. 8 एकूण वेतनमध्ये Basic +D.A =Total घ्यावे.
बाकी सर्व रकाने भरणे सोपे आहे.

आपली भूमिका नेहमीच शिक्षण विभागाला मदत करणारी आहे. पण जर आपल्या सहनशीलतेला आपला भ्याडपणा समजत असतील तर गप्प बसून चालणार नाही. आपल्याला लढावे लागेल.


आपला स्नेहाकिंत

सुभाष किसन मोरे, 
कार्याध्यक्ष शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य


51 comments:

  1. आपले एकमेव खाते आहे की तिथले अधिकारी आणि मंत्री आपल्याच खात्यातील शिक्षकांच्या समस्या वाढवतात.

    ReplyDelete
  2. सविस्तर आणि छान मार्गदर्शनपर माहिती

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. 1000 vela mahiti Shasan magavte kruti matra shuny (0).
      Janun Bujun Shasnache Adnyan Panache Darshan hoi.

      Delete
  3. We want juni pension Yojana

    ReplyDelete
  4. पेन्शन आपला हक्क आहे तो मिळालाच पाहिजे.

    ReplyDelete
  5. जुनी पेन्शन साठी भांडणारी सरकार मान्य एकमेव संघटना शिक्षक भारती जय हो लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  6. सर, खूप छान. सरकार वेळ काढू पना करत माहिती मागविण्याची ढोंग करीत आहे. आता पेन्शन द्या हा आमचा हक्कचा लढा असेल.

    ReplyDelete
  7. छान माहिती दिलीत.असाच पाठपुरावा पेन्शन साठी करुया

    ReplyDelete
  8. छान माहिती सर
    जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे.
    जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  9. जुनी पेन्शन सर्वाना मिळायला हवी.
    जय शिक्षक भारती..!

    ReplyDelete
  10. एवढं खूप झालं, बस आता जुनी पेन्शन द्या.

    ReplyDelete
  11. शिक्षण खाते सोडून इतर खात्याच्या बाबतीत एवढा वेळ काढू धोरण केले जात नाही. शिक्षकांना दिली जाणारी सापत्नभावाची वागणूक बंद करा.

    ReplyDelete
  12. जुनी पेन्शन आपली हक्काची

    ReplyDelete
  13. आता खूप झाले,जुनी पेन्शन योजना लागू करा 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना

    ReplyDelete
    Replies
    1. 2005 पूर्वी नियुक्त असे का म्हणता...जुनी पेन्शन 2005 नंतरच्यांना पण मिळाली पाहिजे...

      Delete
  14. जुनी पेंशन सर्वांना मिळायलाच हवी.जय शिक्षक भारती... !
    सर्वांनी मिळून लढा देऊ या बस झालं आता यांची उडवा उडवीची उत्तरे.. !

    ReplyDelete
  15. Replies
    1. जुनी पेंशन आमच्या हककची!मिळायलाच हवी

      Delete
  16. सविस्तर माहिती दिली सर,आता अंतिम लढा द्यावा लागेल,तुम्ही खूप मेहनत घेत आहात आपल्या सर्वासाठी,धन्यवाद..!!

    ReplyDelete
  17. अनेक शाळांकडून चुकीची तथा अर्धवट माहिती पाठवली गेली . जसे ज्यांचे जीपीएफ चालू आहे त्यांनी डीसीपीएस ची माहिती भरली नाही आणि चालू आहे त्यांनी जीपीएफ बाबत माहिती भरले नाही तसेच कॉलम 3 मध्ये अनेकांनी एकच महिन्याची रक्कम भरली.बुलडाणा जिल्हा. अचूक माहितीसाठी सादर करता येईल काय

    ReplyDelete
  18. अगदी बरोबर सर आता लढा द्यावाच लागेल. सर्व शिक्षक भारती चे शिलेदार त्यासाठी तयार आहेतच..

    ReplyDelete
  19. 2005 नंतर कर्मचारी याचापण विचार व्हावा

    ReplyDelete
  20. मोरे सर अतिशय सुंदर लेख.सरकारला इशारा देणारा आणि पेन्शनसाठी लढणाऱ्या शिक्षकांना जागे करणारा.
    किती वर्षे हे कागदी घोडे नाचवतायत? आता बस! आपल्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरवच लागेल.

    ReplyDelete
  21. कागदी घोडे नाचवणे बंद करा. मयत व निवृत्त शिक्षक बांधवांना न्याय मिळाला पाहिजे.सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे👍👍

    ReplyDelete
  22. पुन्हा पुन्हा तीच माहिती मागवता, अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. आणि जुनी पेन्शन योजना सर्वाना मिळायला हवी.

    ReplyDelete
  23. छान माहिती दिली सर

    ReplyDelete
  24. सरकारचे सर्व नाटकं आहे.केवळ माहिती मागवत असते
    केवळ दिखावा आहे.

    ReplyDelete
  25. शासनाने आता तरी कागदी घोडे नाचवू नयेत ठोस निर्णय घेऊन जुनी पेन्शन योजना त्वरीत लागू करावी

    ReplyDelete
  26. Bilkul sahi qadam juni pention milna hi cahiye ye hamara haque hai es ke liye jo qurbani cahiye hum tamam teacher us ke liye tayar hai jai shikshak bharti

    ReplyDelete
  27. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे

    ReplyDelete
  28. एकच मिशन, जुनी पेन्शन

    ReplyDelete
  29. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे तो आमचा संवैधानिक हक्क आहे . त्यासाठी आम्ही काहीही करू ..

    ReplyDelete
  30. खूप छान माहिती व रास्त मागणी सर.

    ReplyDelete
  31. एकच मिशन, जुनी पेन्शन

    ReplyDelete
  32. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे तो आमचा संवैधानिक हक्क आहे . त्यासाठी आम्ही काहीही करू

    ReplyDelete
  33. जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे.

    ReplyDelete
  34. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे

    ReplyDelete
  35. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे

    ReplyDelete
  36. जुनी पेंशन मुद्दा शिक्षक भारती ने सोडवण्यासाठी प्रयत्न केल्यास हजारो कर्मचारी त्यांचे आयुष्य भर ऋणी राहतील।सपोर्ट करतील

    ReplyDelete
  37. शिक्षक भारती ही शिक्षकांची संघटना प्रत्येक बाबतीत जसे प्रामुख्याने जुनी पेंशन योजना या संबधी कित्येकदा रस्त्यावर आली आदरणीय आमदार कपील पाटील सर व त्यांची चमू या मुद्दयावर सरकारला धारेवर धरत आहे यात निश्चीतच यश मिळेल

    ReplyDelete
  38. अगदी बरोबर...... मनापासून धन्यवाद...

    ReplyDelete
  39. तात्काळ दखल घ्यावी

    ReplyDelete
  40. खूप छान कार्य.

    ReplyDelete