Wednesday 30 November 2016

युनियन बँक एटीएम कार्ड

माननीय मुख्याध्यापक आणि शिक्षक - शिक्षकेतर बंधू, भगिनींनो, मुंबई

आपल्या युनियन बँकेच्या एटीएम कार्डाची मुदत आज संपते आहे. Demonetization च्या गर्दीत नवीन एटीएम कार्ड शिक्षकांना सुलभपणे प्राप्त व्हावं यासाठी आमदार कपिल पाटील यांनी युनियन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून शिक्षकांना रांग न लावता ही एटीएम कार्ड्स त्यांच्या शाळेत मिळू शकतील.  यासाठी फक्त मा. मुख्याध्यापकांच्या सही, शिक्कानिशी authority लेटर घेऊन शाळेच्या क्लॅर्कने युनियन बँकेच्या संबंधित ब्रँच मध्ये सादर करून एटीएम कार्ड्स मिळवावीत. आणि ती शिक्षकांना वितरित करावीत. प्रत्येक शिक्षकांकडून एटीएम कार्ड पोचल्याची पोच घ्यावी. पुन्हा सदर सह्यांचा कागद संबंधित ब्रँच मॅनेजरकडे सुपूर्त करावा. संबंधित लिपिकाने हे काम अत्यंत जबाबदरीचे असल्याने आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी व आपल्या प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्याला सुरक्षितपणे एटीएम कार्ड मिळेल याची दक्षता घ्यावी.

आपला नम्र,

सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती
subhashmore2009@gmail.com



नमुना अर्ज खालील प्रमाणे - 



No comments:

Post a Comment