Wednesday 24 November 2021

अखेर १२ व २४ वर्षे वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया जाहीर


शिक्षक भारतीचा यशस्वी पाठपुरावा

मात्र प्रशिक्षणाच्या शुल्काला शिक्षक भारतीचा विरोध

१२ वर्षे / २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी वरीष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाबाबत परिपत्रक जारी झाले आहे. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने सातत्याने याबाबत बैठका केल्या होत्या. पाठपुरावा केला होता. शिक्षण आयुक्त यांनी यासंदर्भात २० सप्टेंबर २०२१ रोजीच्या बैठकीत लवकरच याबाबत १० दिवसांचं ऑनलाईन ट्रेनिंग घेण्यात येणार आहे, असं सांगितलं होतं. २ ऑक्टोबर रोजी हे ट्रेनिंग जाहीर करण्यात येणार होतं. परंतु ते झालं नाही. त्यानंतर कपिल पाटील आणि शिक्षक भारती सातत्याने याचा पाठपुरावा करत होती. आज अखेर या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याबाबतचे पत्रक निघाले आहे. यामुळे अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सविस्तर माहितीसाठी यासंदर्भातला जुना ब्लॉग जरूर वाचा
Tap to read - https://subhashkisanmore.blogspot.com/2020/08/blog-post_24.html?m=1


शिक्षक भारतीचा प्रशिक्षण शुल्काला विरोध

पहिल्यांदा अशाप्रकारच्या प्रशिक्षणासाठी रु. २,०००/- शुल्क आकारण्यात आले आहे. याचा शिक्षक भारती निषेध करते. प्रशिक्षण देणं ही खरं तर सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे शुल्काची ही जाचक अट रद्द करण्याबाबत शिक्षक भारती आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहे.

प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

१) प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

२) दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्ष सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

३) दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी २४ वर्ष सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

४) प्रशिक्षण नोंदणी दिनांक २३ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरू राहील.

५) सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबत नोंदणीनंतरच पुढील सूचना संबंधितांना ईमेलद्वारे देण्यात येतील.

६) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत -
गट क्र. १ - प्राथमिक गट,
गट क्र. २ - माध्यमिक गट,
गट क्र. ३ - उच्च माध्यमिक गट,
गट क्र. ४ - अध्यापक विद्यालय गट.

७) प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

८) नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.

९) प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असतानाच नोंदविलेल्या ईमेल आयडीवर पाठविण्यात येतील.

१०) नोंदणी फार्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास 'माहितीत बदल करा' या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.

११) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

१२) या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.

१३) आणि १४)
प्रशिक्षण शुल्काबाबत शिक्षक भारतीने विरोध केलेला आहे. हे शुल्क रद्द करण्यासाठी शिक्षक भारती तातडीने पाठपुरावा करत आहे.

१५) नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेलवरून trainingsupport@maa.ac.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा.

१६) वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणून संबंधित शिक्षक वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

१७) नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.

१८) शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय . जिल्हा स्तरावर करण्यात येईल.

१९) सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे.

वरील कोणत्याही मुद्द्यांबाबत किंवा प्रशिक्षणाबाबत कोणतीही अडचण आल्यास शिक्षक भारती सदैव आपल्या सर्वांच्या सोबत आहेच.

प्रशिक्षण नोंदणीसाठी दिलेल्या अर्जात असलेल्या त्रुटींबाबत

१) या प्रशिक्षणासाठी नोंदणी करत असताना शालार्थ आयडी असणं आवश्यक आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांचे पगार SAP प्रणाली द्वारे होतात. त्यामुळे त्यांच्याकडे शालार्थ आयडी नाही. याबाबत मुंबई महानगरपालिकेने तात्काळ शालार्थ आयडी द्यावा अशी आयुक्तांकडून सूचना जाणे आवश्यक आहे. अथवा शालार्थ आयडीची नोंद करण्याची अट शिथिल करण्याची आवश्यकता आहे.

२) या प्रशिक्षणासाठी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना नोंदणी करता येणार नाही. कारण त्यांच्याकडे सुद्धा शालार्थ आयडी नाहीये. त्यामुळे शिक्षक भारतीच्यावतीने शालार्थ आयडीची नोंद वगळण्यात यावी अशी मागणी केली जाणार आहे.

३) १२ वर्षे, २४ वर्षे प्रशिक्षणासाठी नोंद करत असताना शिक्षण सेवक (सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन) कालावधी ग्राह्य धरला जात नव्हता. मूळ नियुक्ती दिनांक ग्राह्य न धरल्यामुळे ३ वर्षे नुकसान होतं. याबाबत शासनाने शिक्षण सेवक कालावधी ग्राह्य धरावा असे स्पष्ट निर्देश दिले होते. परंतु ते झालेलं नाही. शिक्षण सेवक कालावधी ग्राह्य धरण्याबाबत दुरुस्ती होणे आवश्यक आहे. 

४) नोंदणी करत असताना व्यावसायिक अर्हता निवडताना जो गट दिलेला आहे त्याच्यामध्ये संगीत शिक्षकांच्याबाबत कोणत्याही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सर्व संगीत शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबतही तात्काळ खुलासा होणे आवश्यक आहे.

इतर काही मुद्दे सूचना असल्यास कमेंटमध्ये कळवावे.

यासर्व त्रुटी दूर होण्याबाबत आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भारती पाठपुरावा करणार आहे.
तसेच
प्रशिक्षण शुल्काची जाचक अटही नक्कीच रद्द होईल.
लढूया, जिंकूया!

आपला,
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र


61 comments:

  1. 10 - 20 - 30 वर्षे असे टप्पे होते ,त्यांचे काय झाले आहे, हे सांगणे PLEASE

    ReplyDelete
  2. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  3. शिक्षणसेवक मानधनवाढ याबाबत संघटनेमार्फत काही प्रयत्न सुरू आहे काय?

    ReplyDelete
  4. हार्दिक धन्यवाद सर जी

    ReplyDelete
  5. सातवा वेतन आयोग बक्षी समितीच्या अहवालामध्ये १०,२०,३० बाबत स्पष्ट उल्लेख आहे.

    ReplyDelete
  6. अप्रशिक्षित शिक्षकांची सेवा ग्राह्य धरली जात नाही

    ReplyDelete
  7. शिक्षक सेवक कालावधी ग्राह्य धरण्यात येत नाही आहे, यावर सुद्धा लक्ष द्यावे

    ReplyDelete
  8. वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी साठी यापूर्वी विद्या प्राधिकरण मार्फत आयोजित केलेल्या तीस दिवसांच्या ही प्रशिक्षणाचा विचार करणे बाबत शासन स्तरावर पत्रव्यवहार करून ते बंधनकारक करण्यात यावे. जर यापूर्वी केलेल्या अविरत, चेस आणि निष्ठा या प्रशिक्षणाचा वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी विचार करण्यात येणार नसेल तर मग या ट्रेनिंगच्या आयोजनाचा व ते करण्याचा उपयोग काय? एक श्रेणी मिळवण्यासाठी संबंधित शिक्षकांनी असे किती ट्रेनिंग करायचे? याबाबत शिक्षण विभागाला जाब विचारणे आवश्यक आहे. ज्या शिक्षकांनी अविरत, चेस व निष्ठा ही प्रशिक्षणे पूर्ण केलेली आहेत, त्या शिक्षकांना यातून सूट देऊन वरिष्ठ व निवड श्रेणी साठी पात्र ठरवले पाहिजे यासाठी शिक्षक भारती कडून पत्रव्यवहार करण्याची विनंती.
    लढेंगे, जितेंगे.
    जय शिक्षक भारती!










    ReplyDelete
    Replies
    1. सध्या आम्ही निष्ठा प्रशिक्षण करत आहोत त्याचा निवडश्रेणीसाठी विचार करावा आणि जे शिक्षक 2022 ला निवृत्त होणार आहेत त्यांना आता प्रशिक्षणाची अट घालू नये असे वाटते

      Delete
    2. माझी सेवा १३-६-१९९७पासून सुरू झाली आहे मला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत पण मला २४ वर्षे पूर्ण नाही अपात्र असा संदेश येतो असे का?

      Delete
    3. सर नमस्कार,वरिष्ठ व निवड श्रेणी फी बाबत आपण केलेला पाठपुरावा यशस्वी झाला.त्याबरोबर आपले मनस्वी आभार.

      Delete
    4. प्रशिक्षण न करता आम्हाला वरिष्ठ वेतश्रेणी मिळाली, मग आम्ही हे प्रशिक्षण करावे का

      Delete
  9. NPS बद्दल सुध्दा पाठपुरावा व्हावा.

    ReplyDelete
  10. आजपर्यंत प्रशिक्षण मोफत असायचे ; पण आजरोजी प्रशिक्षण शुल्क २००० / - रु . अधिकृत आकारले जाणार आहे . हे पूर्णतः गैर आहे . जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( डाएट ) मध्ये डी .एड् . चे वर्ग बंद पडलेले आहेत . त्यामुळे जिल्हा पातळीवर सेवाजेष्ठतेनुसार सेवांतर्गत वर्ग सुरु केलेस प्रशिक्षण प्रभावी - सुरळीतपणे पार पडेल . डाएटच्या अधिव्याख्याता यांनाही ज्ञानदानाची संधी उपलब्ध होईल . अशी मागणी शिक्षक भारती संघटनेमार्फत केली जावी . असे मला वाटते . विचार व्हावा . ही विनंती .

    ReplyDelete
  11. 12 वर्ष सेवा पूर्ण झाली आहे परंतु आता 20%, 40% अनुदानवर असलेले शिक्षक या प्रशिक्षणास पात्र आहेत काय...

    ReplyDelete
  12. 2000 रुपये प्रशिक्षण शुल्क रद्द करावी
    NPS बाबत योग्य निर्णय घेण्यात यावा

    ReplyDelete
  13. जय जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  14. 1 jully 2022 ला 24 वर्ष पूर्ण होत आहेत नोंदणी करता येईल का सर

    ReplyDelete
  15. 1varsha seva shillak aslelya shikshakanna prashikshanachi aat nako.tyanna 12 varsha kivva 24 varsha vetan shreni vina prashikshan dyavyat.

    ReplyDelete
  16. मा.नारायण वाघ सर
    जिल्हाध्यक्ष
    शिक्षक भारती संघटना जळगांव
    नमस्कार
    🙏🙏🙏

    निवड श्रेणी देतांना लहाण शाळेतील शिक्षकांवर अन्याय होतो. एखाद्या शाळेत आठवी ते दहावीचे वर्ग असतील तेथे मुख्याध्यापक सोडून चार शिक्षक असतात. विस टक्के प्रमाणे निवड श्रेणी दिली जाते तर तेथील शिक्षक निवड श्रेणीपासून वंचित राहतो...
    यावर संघटनेच्या माध्यमातून ही समस्या शासनाला निर्दशनास आणून दयावी..
    ईश्वर महाजन अमळनेर

    ReplyDelete
  17. जय शिक्षक भारती.पण काही उच्च माध्यमिक शिक्षकांची शिक्षक परिवेक्षाधिन कालावधी गृहीत न धरल्याने पात्र नाही.सेवा 12 वर्षापेक्षा कमी दाखवित आहे.ही तृटी दूर व्हावी सर.संघटनेकडे तक्रारी येत आहेत.

    ReplyDelete
  18. अविरत व निष्ठा हे प्रशिक्षण ग्राह्य धरावे.त्यांचे परत प्रशिक्षण घेऊ नये.
    भारत रेहपाडे.नागपूर जिल्हा अध्यक्ष शिक्षक भारती.

    ReplyDelete
  19. सरसकट सर्वाना निवड श्रेणी देण्यात यावी...
    ही मांगणी खूप वर्षांपासून सुरू आहे..तरी नेते मंडळी याकडे लक्ष देऊन मांगणी पूर्ण करावे

    ReplyDelete
  20. शिक्षणसेवक मानधन वाढ संदर्भात कपिल पाटील साहेब यांनी एकतरी निवेदन देण्यात यावे.

    ReplyDelete
  21. सेवेचे बारावे वर्ष सुरू असेल व आपण प्रशिक्षणासाठी नोंदणी केली व प्रशिक्षण केले तर काय हरकत आहे ?प्रशिक्षण तर करू शकतो ना ! म्हणजे ते पुढच्या वर्षी बारावे वर्ष संपले तर यावषी झालेले ट्रेनिंग लगेच उपयोगात येईल । या वर्षीचा ट्रेनिंग केलं तर काही अडचण तर नाही ना येणार

    ReplyDelete
  22. फि---मात्र अजिबात नको,या गोष्टीला विरोध नाही केला.
    तर--पुढे इतर बाबी त्रास दायक होतील.
    टेंनिगदेणे हि बाब शिक्षण संचालकाची आहे.

    ReplyDelete
  23. बी एम सि शिक्षकांना शालार्थ id नाही त्यामुळे त्यांना याचा लाभ मिळेल की नाही याबद्दल शंका आहे याबद्दल काही माहिती असल्यास सांगावी 🙏🙏

    ReplyDelete
  24. नोंदणी मध्ये शालार्थ id नंबर देणे बंधनकारक आहे ती अट काढुन टाकावी कारण शालार्थ id फक्त स्टेट च्याच शिक्षकांना मिळतो बी एम सि ला नाही 🙏मार्गदर्शन व्हावे 🙏

    ReplyDelete
  25. चोवीस वर्षे पूर्ण झालेल्या, तसेच ट्रेनिंग घेतलेल्या शंभर टक्के शिक्षकांना निवड श्रेणी प्राप्त होईल. असेही ठाम होत नाही. त्यामुळे ही ट्रेनिंग कोणी करावे. यावर मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
    Replies
    1. सर,खूप खूप चांगला निर्णय 2000 रुपये का भरायचे एक तर उशिरा प्रशिक्षण सुरू करता आणि त्यावर तुम्हीच फाईन बसवता वाईट आहे असे करणाऱ्याला वेळीच थांबवले पाहिजे लढूया जिंकूया जय शिक्षक भारती

      Delete
  26. बारा वर्ष आणि 24 वर्ष सेवा झालेल्या साठी विनाअट वेतन श्रेणी लागू करावी जय शिक्षक भरती पाठपुरवठा करावा व विना वेतन श्रेणी लागू व्हावी यासाठी लढा देण्याची वेळ आली तर सर्व शिक्षक लढ्यात सामील होतील यात शंकाच नाही जय शिक्षक भरती जय शिक्षक भरती वाखाणण्यासारखा काम आहे शिक्षक भारतीचे

    ReplyDelete
  27. सर, माझी सेवा ३३ वर्षे झालेली आहे आणि मी डिसेंबर २१ मध्ये निवृत्त होणार आहे, तरी मला या प्रशिक्षणाचा काही उपयोग होऊन निवड श्रेणी मिळेल का? आमच्या शाळेने आम्हाला कोणत्याच प्रशिक्षणाला पाठवलेले नाही. कृपया माझ्या शंकेचे निरसन करावे ही विनंती.

    ReplyDelete
  28. ज्यांची सेवा 31 डिसेंबर 2021 पर्यंत 12 वर्ष पूर्ण होत नाही अशा सेवकांना देखील प्रशिक्षण मिळाले पाहिजे,कारण काहींची 31 पर्यन्त काही महिने कमी आहे, मग पुढील प्रशिक्षण कधी येईल हे सांगता येत नाही.

    ReplyDelete
  29. फक्त २०% का २४वर्षे सेवा करणारे
    सर्व शिक्षक बंधूंना पात्र करावे .
    चेस केले असल्यास त्यांना विना अट निवड श्रेणी देण्यात यावी.
    पदव्युत्तरची अट काढून टाकावी.

    ReplyDelete
  30. Sir, thank you for your efforts, but kindly look into the matter of contract to be included in 12 years service...

    ReplyDelete
  31. मलाही 25 वर्षे पूर्ण झालीत पण माझीही प्राथमिक शाळा 4 शिक्षकांची आहे. 2 पदे रिक्त आहेत तर मला निवड श्रेणी लागू शकेल का

    ReplyDelete
  32. फक्त 20% ची अट शिथिल करावी ही इच्छा. कारण मोठ्या संस्थेत बरेच शिक्षक संस्थेकडे प्रस्ताव करतात पण याअटीमुळे संधी मिळत नाही.मग सेवानिवृत्त होणा-या शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता वाढ करूनही निवडश्रेणी मिळत नाही. असे का?

    ReplyDelete
  33. Sir..Barich varshe he trainig zale nahi.yavarshi sevanivrutti zali.pan training aata lagle..mag he prashikshan ghenyassthi amhi kay karave

    ReplyDelete
  34. सर,12 वर्ष कधिचेच झाले आहे त्यामुळे ट्रेनिग न घेता डिसेंबर 2021 पर्यंतच्या संपुर्ण पात्र शिक्षक यांना वरिष्ठ श्रेणी देण्यात यावी.

    ReplyDelete
  35. Mi 2000r trending fee Bharti aahe.pawti million nahi.

    ReplyDelete
  36. वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी प्रक्रिया हा उत्तम निर्णय. फक्त प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना सरसकट मिळावी. अटी शिथिल करण्याकरिता आपण प्रयत्न करावेत.धन्यवाद. जय शिक्षक भारती।





    ReplyDelete
  37. निवड श्रेणी मला मिळाली आहे पण त्याचा उपयोग नाही ,कारण सेंट्रल च्या नियमानुसार increment दिली जात नाही फक्त ग्रेड पे मध्ये फरक पडतो ,निवड श्रेणी सर्व जाचक अटींमधून मिळवायची आणि मग सेंट्रल आणि स्टेट मध्ये ही तफावत का?

    ReplyDelete
  38. वस्ती शाळा शिक्षकांची मुळ सेवा पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.असे झाल्यास आम्ही सुध्दा वरीष्ठ श्रेणीसाठी पात्र ठरू शकतो.

    ReplyDelete
  39. आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षक यांना हे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2021-22 नाव नोंदणी व प्रशिक्षण लागू आहे काय? कारण आदिवासी विकास विभागातील शिक्षक कर्मचारी यांना शालार्थ ID नाहीत त्यांना सेवार्थ ID आहेत,तसेच सदरचा शासन निर्णय व पत्रात आदिवासी विकास विभाग आस्थापनांचा उल्लेख केलेला नाही..

    ReplyDelete
  40. आदरणीय मोरेसर,खूप सुंदर माहिती सांगितली आहे.आपण सदैव असेच मार्गदर्शन करत राहावे. ही विनंती!👌👌

    ReplyDelete
  41. कायम विनाअनुदानित मध्ये मी 3 वर्षे सेवा केलेली आहे,माझ्याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले approval देखील आहे , ती सेवा ग्राह्य धरता येईल का सर

    ReplyDelete
  42. जय शिक्षक भारती,सर प्रशिक्षण शुलकविषाई काय

    ReplyDelete
  43. प्रशिक्षण शुल्क माफ होणे गरजेचे आहे

    ReplyDelete
  44. जे विनाअनुदानित आहेत pan 12वर्ष पूर्ण झाली आहेत आशा शिक्षकांनी कसा भरावयाचा अर्ज शालार्थ id सूट दिली आहे मग कसे भरावयाचा अर्ज प्लीज सांगा

    ReplyDelete
  45. 12 वर्षे पूर्ण होण्यासाठी 5 महिने राहिले असल्यास प्रमोशन घेतले तर वरिष्ठ वेतन श्रेणी लागू शकते का?एकच पदावर 12 वर्षे पूर्ण झालेले असावे की संपूर्ण सेवा कृपया मार्गदर्शन व्हावे

    ReplyDelete
  46. वस्तीशाळा शिक्षकांचे काय त्यांनी फक्त मॅसेज वाचत राहायचे का?

    ReplyDelete
  47. सर माझी वरिष्ठ श्रेणी साठीची 12वर्षे 15जानेवारी 2022रोजी पूर्ण होत आहेत.फक्त 15दिवस कमी आहेत.प्रशिक्षणास प्रवेश मिळेल का?

    ReplyDelete
  48. अप्रशिक्षित शिक्षक (शिक्षण सेवक)यांची सेवा मुळ नेमणूक दिनांक पासून बारा वर्ष वरिष्ट्र वेतन साठी ग्राह्य धरली जाणार का कृपया खुलासा व्हावा हि विनंती

    ReplyDelete
  49. सर मी 30 जून 2021 रोजी नियती वयोमानानुसार निवृत्त झाले आहे माझी शैक्षणिक सेवा. 25 वर्षे 18 दिवस एका वेतनश्रेणी मध्ये झालेली आहे दि 30 जून 2020 रोजी मला 24 वर्षे पूर्ण झालेली आहेत. माझे निवड श्रेणी साठीचे ट्रेनिंग झाले नाही. तसेच मला निवड श्रेणी मिळाली नाही. तरी कृपया मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
  50. निष्ठा प्रशिक्षण मान्य होणेबाबत प्रयत्न व्हावेत

    ReplyDelete