Saturday 6 October 2018

वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी हमीपत्र ग्राह्य धरणार

शिक्षक भारतीची मागणी मंजूर


सेवेची १२ वर्ष व २४ वर्ष पूर्ण झाल्यावर वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी दिली जाते. मुंबईतील शेकडो शिक्षक व शिक्षकेतरांची  सेवा १२ वर्ष होऊनही वरिष्ठ वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण न झाल्याचे कारण देऊन लेखाअधिकारी नाकारत होते. शिक्षण विभागातर्फे प्रशिक्षणाचे आयोजन न केल्याने प्रशिक्षण पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे हजारो शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळत नाही.

शिक्षक भारतीने ज्या शिक्षकांची सेवा १२ वर्ष पूर्ण झाली आहे. त्यांना भविष्यात प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या हमीपत्रावर वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याची मागणी केली होती. परंतु लेखाधिकारी यांनी हमीपत्रावर वेतनश्रेणीचा लाभ देण्याबाबत असमर्थता दर्शविली होती. परंतु मा.आमदार कपिल पाटील यांनी हमीपत्रावर वेतनश्रेणीचा लाभ देण्याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे २३/१०/२०१७ च्या शासन निर्णयापूर्वी ज्या शिक्षकांची सेवेची १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना हमीपत्र देऊन वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता नसल्याने वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याबाबतची परवानगी लेखाधिकारी कार्यालयाने दिली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली. यासाठी शिक्षक भारती उत्तर मुंबई विभागाचे अध्यक्ष मछिंद्र खरात यांनी पाठपुरावा केला.




-----------------------

के.पी. बक्षी समिती समोर शिक्षक भारतीचे सादरीकरण 
शिक्षण विभाग माहिती देण्यास असमर्थ

केंद्राप्रमाणे राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मा. श्री. के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या राज्य वेतन सुधारणा समितीसमोर शिक्षक भारतीने आज मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बाजू प्रभावीपणे मांडली. यावेळी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, कॉलेजातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर यांच्यावर सहाव्या वेतन आयोगात झालेला अन्याय दूर करण्याची मागणी शिक्षक भारतीने केली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांच्या वेतनावरील होणारा प्रत्यक्ष खर्च आणि सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी लागणारी रक्कम याची कोणतीही ठोस आकडेवारी शिक्षण विभागाला समितीसमोर देता आली नाही. समितीचे अध्यक्ष श्री. के. पी. बक्षी यांनी सोमवार पर्यंत सर्व आकडेवारी सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले.

सहाव्या वेतन आयोगात केंद्राप्रमाणे वेतन संरचना मंजूर न केल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हकीम कमिटीने सुचवलेल्या वेतन श्रेण्यांमधील त्रुटी शिक्षक भारतीने समितीच्या निदर्शनास आणून दिली. सातव्या वेतन आयोगानुसार राज्यात वेतन संरचना निश्चित करताना केंद्राने मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर यांना लागू केलेल्या वेतन संरचना जशा आहेत त्याच स्वरुपात लागू कराव्यात अशा आग्रह शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी धरला.

शिक्षक भारतीतर्फे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तंत्रनिकेतन, स्पेशल स्कूल विभाग, कला-क्रीडा-कार्यानुभव या सर्व संवर्गातील पदांना न्याय देऊन वेतनश्रेणी देण्याची मागणी केली.

२३/१०/२०१७ चा जाचक जीआर रद्द होणार?
सेवेशी १२ वर्षे व २४ वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी दिली जात होती. परंतु शासनाने २३/१०/२०१७ रोजी जीआर काढून वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी मिळण्यासाठी शाळासिद्धीमध्ये शाळा ए ग्रेड असणे आणि ९वी, १०वीचा निकाल ८० टक्केंपेक्षा जास्त असणे या अटी समाविष्ट केल्या. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी  मिळण्याचा मार्गबंद झाला आहे. संपूर्ण सेवा काळात शिक्षकांना पदोन्नती मिळत नसल्याने १२ वर्षे व २४ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना निवडश्रेणी व वेतनश्रेणी मिळत होती. आता ती मिळत नाही. तसेच शासन तर्फे वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित न झाल्यामुळे हजारो शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. प्रशिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाल्यावर ही संपूर्ण वस्तुस्तिथी शिक्षक भारतीने बक्षी समितीसमोर मांडली. या चर्चेदरम्यान शिक्षण विभागाकडून २३/१०/२०१७च्या शासन निर्णयातील जाचक अटी काढून टाकण्यात येतील असे सांगण्यात आले. शिक्षण विभागाने खरोखरच जर या अटी काढल्या तर हजारो शिक्षकांना शिक्षक भारतीच्या भूमिकेमुळे न्याय मिळेल.

यावेळी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, उपाध्यक्ष तथा वेतन सुधार समिती अध्यक्ष धनाजी पाटील, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, मुंबई ज्युनिअर कॉलेज युनिटचे अध्यक्ष शरद गिरमकर, कल्पना शेंडे, रवीशंकर स्वामी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

57 comments:

  1. 23.10.cha gr nakki radda honar ka,ki saglya thapa aahet.

    ReplyDelete
  2. केंद्र सरकारने निर्णय घेतला तेंव्हाच राज्य सरकारने ही निर्णय घ्यायला पाहिजे होता. बक्षी समिती स्थापन करण्यात आली तेंव्हाच राज्य सरकारचा डाव ओळखायला आला.

    ReplyDelete
  3. Very nice. .जय शिक्षक भारती .

    ReplyDelete
  4. शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

    ReplyDelete
  5. Ya nirnaya mude sikshakana la
    nyay midel.jai shikshak bharti far chhan prayatn

    ReplyDelete
  6. Deनियुक्त 16/06/87
    बीए डिएड पदविधर मान्यता जून 1999.
    त्यामुळे वरिष्ठश्रेणी दिली नाही(एकाचवेळी दोन लाभ नाही)
    वरीष्टश्रेणी 2011 ला मिळाली
    (बी एड2003ला पण नोंद नाही )2023ला निवड मिळाली तर मिळेल..एम ए असेल तर...असे का?..

    नोकरी 31वर्ष झाली आहे..

    ReplyDelete
  7. वस्तीशाळा शिक्षकांची पूर्वीची सेवा धरण्यासाठी पाठपूरावा करावा.

    ReplyDelete
  8. nivala..shrebabad...spat...ulekha...kelela..dishun...yet...nahi..niwada..pramane...

    ReplyDelete
  9. क्या शिक्षकों पर 6पे की तरह फिर आत्याचार व धोखा होगा ?

    ReplyDelete
  10. वस्ती शाळा शिक्षकांची सेवा ग्राह्य धरण्यात यावी.

    ReplyDelete
  11. Great work jai shikshak bharti

    ReplyDelete
  12. Vasti school chi seva grahy dhrave

    ReplyDelete
  13. 23/10 चा जीआर रद्द व्हावा...

    ReplyDelete
  14. Vasti shalache shikshakachi seva grahy dharavi

    ReplyDelete
  15. jya shikshakani ser shikhsha abhiyan chi training purn kili aahe tyana varisht sherni cha labh meedawa

    ReplyDelete
  16. 23/10 चा GR रद्द होणे खूपच गरजेचे आहे .

    ReplyDelete

  17. 23/10 चा GR रद्द होणे खूपच गरजेचे आहे .

    ReplyDelete
  18. अफवांमुळे सत्य असले तरी विश्वास ठेवता येत नाही. अधिकृत होईल तेव्हा सर्वजन मिळून स्वागत करू व आनंद येऊ

    ReplyDelete
  19. 23/10/2017 चा GR रद्द करण्यात कोणत्याही संघटनेला रस नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. Be positive sir...
      Thanks to शिक्षक भारती for raising the issue of वरीष्ठ श्रेणी व निवड श्रेणी before the Govt.Hope you'll solve it very soon..

      Delete
  20. शिक्षक भारती संघटना म्हणजेच विश्वास व शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी कटीबद्ध आहेत शिक्षक आमदार मा.कपिल पाटील साहेब व टीम
    द्वारा::@ C.T.patil District Secretary शिक्षक भारती धुळे जिल्हा

    ReplyDelete
  21. २३/१०/२०१७ च्या शासन निर्णयापूर्वी ज्या शिक्षकांची सेवेची 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना हमीपत्र देऊन निवडश्रेणी लाभ मिळेल का...?

    ReplyDelete
  22. Sir good job..
    Bt after 12 years high School teachers grade pay increase by 100 RS only ..ie from 4200 to 4300...primary teacher gets 1400 RS ie 2800 to 4200..why we get only 100 rs??pls do needfull in 7pay commission meeting

    ReplyDelete
  23. शासनाने विना अट वरीष्ठ निवडश्नेनी मंजूर करावि

    ReplyDelete
  24. 4/2/2018 माझे 24 वर्षे होती आहे. मला वरिष्ठ श्रेणी बाबत....
    माहिती देण्यात यावी..विनंती

    ReplyDelete
  25. 4/2/2018 माझे 24 वर्षे होती आहे. मला वरिष्ठ श्रेणी बाबत....
    माहिती देण्यात यावी..विनंती

    ReplyDelete
  26. 14/11/2017 चा G R D Ed पदोन्नतीचा नेमका अर्थ काय ? स्पष्टीकरण द्या

    ReplyDelete
  27. 27/10/2017 cha GR cancel zalach Paige. Maze 1 Jully 2018 service che 26 varsh porn zale.pan nivad sreni ajunahi milaleli nahi

    ReplyDelete
  28. 23/10/2017 cha GR cancel zalach Paige. Maze service che 1 jully 2018 Roji 26 varsh purn zali tarihi ajunahi mala nivad sreni milaleli nahi. Maze shaikshanik patrata Bsc,B.Ed,M.A(His),DSM ahe.

    ReplyDelete
  29. 23 Oct cha GR Radd jhalach bahijy

    ReplyDelete
  30. 21 सप्टेंबरला 2018 ला मला नौकरीच्या सेवेची बारा वर्षे पूर्ण झाली आहे पण वरीष्ठ वेतनश्रेणी साठी आवश्यक प्रशिक्षण झाले नाही अर्ज आनलाईन भरलेला आहे मला वरीष्ठ वेतनश्रेणी लागु शकते का मार्गदर्शन करावे व त्यासाठी काय अर्ज द्यावा लागेल काय कळवावे.

    ReplyDelete
  31. निर्णय त्वरित लागू करावा, ही विनंती

    ReplyDelete
  32. निर्णय त्वरित अंमलात आणावा, ही विनंती
    प्रकाश राजाराम साठे
    पुणे

    ReplyDelete
  33. निर्णय त्वरित अंमलात आणावा, ही विनंती
    प्रकाश राजाराम साठे
    पुणे

    ReplyDelete
  34. सर,आम्ही 23-10-2017 नंतरचे 12 वर्ष झालेले वरिष्ठ श्रेणी धारक आहोत. आम्हाला न्याय केव्हा मिळेल.

    ReplyDelete
  35. Sir,we won't to join shikshak bharati
    Parag Shegokar ,Wardha

    ReplyDelete
    Replies
    1. सर आपलेशी joIn करीता term condition काय आहे?

      Delete
  36. निर्णय त्वरित लागू करावा, ही विनंती

    ReplyDelete
  37. तबला वादक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी लागू करण्यात यावी.शालेय स्तरावरील या दोन्हि वेतन श्रेणीपासून वंचित असलेल्या या एकमेव पदाला न्याय मिळावा.संचमानयतेमध्ये संगीत शिक्षक व तबला वादक शिक्षक ही पदे समायोजित होऊन इतर शिक्षकांप्रमाणे संगीत विषया बरोबर मराठी ,हिंदी, इंग्रजी,इ.९वी व १०वी ला स्व-विकास व कलारसास्वाद विषयाचे अध्यापन करतात.शालेय व्यवस्थपनाच्या आवश्यकतेनुसार इतर सर्व जबाबदारी पार पाडतात.तरीदेखील वरीष्ठ वेतन श्रेणी पासून वंचित असलेल्या शालेय स्तरावरील तबल शिक्षक या पदाला न्याय मिळावा ही विनंती.

    ReplyDelete
  38. Bt till now, H.M.not give the response for senior grade. So my request to Hon.MLC Patil sir, pl do needful once again. Thnx sir.

    ReplyDelete
  39. राष्ट्रनिर्माण करणार्या शिक्षण खात्याचे राष्ट्रीयकरण करुन शासनाने समाजकल्याण साधने महत्वाचे आहे.

    ReplyDelete
  40. राष्ट्रनिर्माण करणार्या शिक्षण खात्याचे राष्ट्रीयकरण करुन शासनाने समाजकल्याण साधने महत्वाचे आहे.

    ReplyDelete
  41. १२ चटोपाध्याय व २४निवडश्रेणी विनाशर्त मिडाली पहीजे.

    ReplyDelete
  42. आम्ही २३/१०/१७ पूर्वी १२ वर्षे नोकरी झाली आहे तरी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळेल का

    ReplyDelete
  43. आम्ही २३/१०/१७ पूर्वी १२ वर्षे नोकरी झाली आहे तरी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळेल का

    ReplyDelete
  44. Training sale nahi hamipatra chapel asa gr aahe ka

    ReplyDelete
  45. 2019ची प्रशिक्षणलिंक मिळेल काय?

    ReplyDelete
  46. सर माझी सेवा 14 वर्षे झाली आहे पण सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण नाही कारण मी त्या काळात प्रसूती रजेवर होते.त्या सबबीखाली मला अजूनही वरिष्ठ वेतन श्रेणी मिळत नाही .मी काय करावे?कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  47. मी निवड श्रेणी प्रशिक्षण 2017 मध्ये घेऊन फेब्रुवारी 2019 मध्ये MSACIT पास झालो आहे. मला निवड श्रेणी प्रमाणपत्र मिळेल का?

    ReplyDelete
  48. Mazi 32 varsha seva zali varisht sreni milel ka?

    ReplyDelete
  49. माझी नियुक्ती दि. 02/08/85 असुन 23/09/1995 ला पदविधर शिक्षक म्हणून पदोन्नती. 23/09/2007 ला चटोपाध्याय. 2019 मध्ये 24 वर्ष निवड श्रेणी साठी प्रस्ताव पाठवायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे. विनंती.


    ReplyDelete