Monday 6 August 2018

उद्यापासून कडकडीत बंद

प्रति,
मा. संस्थाचालक / प्राचार्य मुख्याध्यापक / शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी

सप्रेम नमस्कार,
सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन योजना या व इतर मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीने ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दिनांक ६ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबई येथे समन्वय समितीच्या राज्यातील सर्व घटक संघटनांच्या पदाधिकारी प्रतिनिधींच्या बैठकीत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शिक्षक भारती समन्वय समितीचा घटक असून संपात सहभागी होणार आहे. संपाची अधिकृत नोटीस समन्वय समितीने शासनास यापूर्वीच दिली आहे. 

राज्यातील सुमारे १७ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उद्यापासून तीन दिवस संपावर जाणार आहेत. या संपात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. दिनांक ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या  संपातील सहभागासाठी आपण सर्वजण कटीबद्ध आहोत. सातवा वेतन आयोग मिळवण्यासाठी, राज्य शासनाच्या अशैक्षणिक धोरणाला विरोध करण्यासाठी आणि शिक्षण विभागाकडून होणारा त्रास वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना संपात सहभागी व्हायचे आहे. 

उद्यापासून सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कुणीही शाळेत/कॉलेजमध्ये जाऊ नये. आपल्या शाळेच्या/कॉलेजच्या पालकांना मुलांना शाळेत न पाठवण्याचे आवाहन करावे. 

उद्या ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ३ वाजता सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षक भारती कार्यालय, कामगार मैदान, परळ, मुंबई येथे जमावे, ही विनंती.
धन्यवाद!

आपले स्नेहांकित,
अशोक बेलसरे, अध्यक्ष
सुभाष मोरे, कार्याध्यक्ष

19 comments:

  1. नक्कीच ,सर्वांनी 100% बंद ठेऊन आपली एकजूट दाखवून देऊ या.शेतकरी संघटित होऊ शकतात तर आपण का नाही?
    नाहीतर आपल्याला नेहमीच गृहीत धरले जाते सरकारकडून.

    ReplyDelete
  2. Dear,
    Kapil Patil sir

    Don't think only aided school teachers . think about private school teachers payment also.We are getting only 8000rs to 10000rs/ months . How we can survive with our family.
    Private school collecting more fees from parents but unable to give even 2nd or 3rd payscale .
    Kindly improve payscale of private teachers.

    ReplyDelete
  3. खरं आहे. आपल्याला नेहमीच गृहीत धरले जाते.परंतु कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांसाठीही काही करावे.कारण आम्हाला सहावा वेतन आयोग ही पूर्ण मिळत नाही आहे.

    ReplyDelete
  4. सर,लडेंगे और जितेंगे ।।

    ReplyDelete
  5. Pls do justice even for private unaided school.only few good managements give salary as per the scale.remaining all exploits the teachers.

    ReplyDelete
  6. Sir, this is right there should be common possible for salary of an employees

    ReplyDelete
    Replies
    1. Please do something about this....in private schools conditions of teachers are very poor

      Delete
  7. Sir secondary teachers ka pay grade 4400 hai lekin scale main ye grade hai hi nahi 4600 hai to secondary teachers ko 4600 pay grade ku nahi hai sab ko ye distinguish hamare sath ku please see this matter & do d needul

    ReplyDelete
  8. far difference between
    jr.college salary & secondary teachers salary why? do something fr secondary teachers

    ReplyDelete
  9. Sir pay grade 4600 secondary teachers ko milna chaiye

    ReplyDelete
  10. Sir,we voted for u..plz bring back the old pension scheme.

    ReplyDelete
  11. कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक शिक्षकांच्या वेतनात प्रचंड तफावत आहे, ती या वेतन आयोगात दूर होईल हवी

    ReplyDelete
  12. There are a lot of issues that needs to be addressed related to the teachers. I think a unanimous meeting should be called to jot down all the grievances. Let's decide on a near by mid area I'm suburbs as soon as possible . Let's all come on one platform for betterment of faculty in both productive teaching and teachers facing problems.

    ReplyDelete
    Replies
    1. I'm Ms Aftab Siddique from Khar (West)

      Delete
    2. I'm Ms Aftab Siddique from Khar. (West)

      Delete
  13. Sir,all demands of government employees should be fulfill.

    ReplyDelete