Friday 14 August 2020

विशेष शाळांना न्याय मिळेल का?


सामाजिक न्याय विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे विशेष शाळातील कर्मचारी पाच महिने पगाराशिवाय जगत आहेत. मुंबईसारख्या शहरात पगाराशिवाय विशेष शाळा/ कर्मशाळेतील  मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. गृहकर्जाचे हफ्ते थकल्यामुळे बँकांना व्याजावर व्याज द्यावे लागत आहे. विजबिल, घरभाडे, किराणा सामान इत्यादी दैनंदिन खर्च भागविण्यासाठी उसनवारी करावी लागत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर कोरोना काळात उपासमारीची वेळ आली आहे. पगार हा प्रत्येक काम करणाऱ्या  व्यक्तीचा सन्मान असतो. पगार वेळेवर मिळणे हा त्याचा अधिकार आहे. परंतु सामाजिक न्याय मंत्रालय ज्याच्या नावात न्याय आहे तो न्याय कर्मचाऱ्यांना कधीच मिळत नाही. दिसतही नाही. वर्षानुवर्षे पगार उशिरा होत आहेत. कधी अधिकारी सही करत नाही म्हणून तर कधी पैसे नसतात म्हणून. पण याची शिक्षा शिक्षक-शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांना मिळते. कर्मचाऱ्यांनी शाळांमध्ये काम करायचं की रोज उठून पगारासाठी एखाद्या याचका प्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या दारात हेलपाटे मारायचे. एवढी अहवेलना का?

कोरोना काळात कोरोनाबरोबर अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाने कहर केला आहे. पाच महिने पगारच नाही. आठ दिवसात पगार होईल असे उत्तर गेली पाच महिने ते देत आहेत. पण आजही पगार आलेला नाही. राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन एक वर्ष उलटून गेले तरी विशेष शाळा/ कर्मशाळा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. याला जबाबदार कोण?

पगार/ वेतन आयोग रखडण्याचे कारण काय?

सामाजिक न्याय विभागाने अखर्चिक राहिलेले 480 कोटी रूपये मार्च महिन्या अखेर वित्त विभागाला परत पाठविले नाहीत. समाज कल्याण आयुक्त तसेच क्षेत्रीय अधिकारी यांनी शासनाला अखर्चिक रककम परत करणे बंधनकारक आहे. पण रक्कम परत न गेल्याने पगाराला उशिरा झाला आहे. पण त्यालाही दोन महिने उलटून गेले आहेत सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी  वित्त विभागाकडे बोट दाखवतात तर वित्त विभागाचे अधिकारी सामाजिक न्याय विभागाकडे बोट दाखवतात. प्रश्न मात्र सुटत नाही. आमदार कपिल पाटील यांनी स्वतः सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेऊन वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्यांनीही आठ दिवसात पगार मिळणार असे आश्वासन दिले. त्यालाही पंधरा दिवस उलटून गेले आहेत. कोरोनामुळे आपण बाहेर पडू शकत नाही. रस्त्यावर उतरून आपल्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू शकत नाही. म्हणून अखेर आपण "ई-मेल भेजो आंदोलन" सुरू केले आहे.

सातवा वेतन आयोग मिळण्यास उशीर होत आहे याचे कारणही सामाजिक न्याय विभागातील अधिकारीच आहेत. सातव्या वेतन आयोगाची फाईल वित्त विभागाकडे पाठवताना योग्य कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे त्या फाईल मध्ये अनेक त्रुटी निघाल्या. या त्रुटी तातडीने दूर करणे आवश्यक होते. शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांनी स्वतः सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर एक बाब लक्षात आली की विशेष शाळा कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी बाबत आवश्यक ती कागदपत्रे  सामाजिक न्याय विभागाकडे नाहीत. शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे, वेतनाबाबतच्या नोंदी, अधिसूचना इ. सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जमा केलेल्या आहेत. तरीसुद्धा आजही आपली सातव्या वेतन आयोगाची फाईल सरकलेली नाही. कोरोनाचं कारण पुढे करून दप्तर दिरंगाई सुरू आहे. म्हणूनच आपल्याला या इमेल भेजो आंदोलनातून शासनाला जागे करायचे आहे. राज्यभरातून हजारो मेल पाठवायचे आहे

दिव्यांगांच्या शाळेतील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न

1.  संस्थाचालक, मुख्याध्यापकांना  लायसन्स नूतनीकरणासाठी, वाढीव विद्यार्थी मान्यतेसाठी हेलपाटे मारावे लागतात.

2.  सामाजिक न्याय विभाग कार्यालयाने नुकत्यात 176 शाळांच्या  नूतनीकरणाच्या प्रस्तावाला नामंजूर केलेले आहे.  संस्थाचालक, मुख्याध्यापकांना वेठीस धरून विशेष शाळा/ कर्मशाळा बंद करण्याचे धोरण राबविले जात आहे.

3. सामाजिक न्याय विभागातील  अधिकाऱ्यांची कामाबद्दल असलेली अनास्था यामुळे शिक्षक-शिक्षकेतर यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

4.  नियमित वेतन वाढ, पदोन्नती, नियुक्ती इत्यादी कामांसाठी शिक्षक-शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे वाट पहावी लागते.

5. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पीएफ, ग्रॅज्युएटी, पेन्शनसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात,

6. ऑनलाईन सेवार्थ प्रणाली द्वारे वेतनासाठी शालार्थ आयडी वेळेत न मिळाल्यामुळे वैयक्तिक मान्यता, प्रशासकीय मान्यता मिळूनही वेतन मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.

7. कायम विनाअनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांना अनुदानासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

8.  अपंग शाळा/ कर्मशाळा कर्मचारी शाळा संहिता च्या अंमलबजावणीबाबत अनेक ठिकाणी विसंगती दिसून येते. शिक्षक, शिक्षकेतरांचे कामाचे तास सर्व संस्थांमध्ये सारखे असणे आवश्यक आहे.

9.  अतिरिक्त शिक्षकांच्या ऑनलाईन समायोजना मध्ये मोठा घोटाळा  दिसून येतो. 

10. दिव्यांग मुलांना सकस पोषण आहार, क्रीडा स्पर्धांचे आयोजन,  सामायिक अभ्यासक्रम इत्यादीबाबत सामाजिक न्याय विभाग उदासीन असल्याचे चित्र दिसते.

12 ऑगस्ट 2020 पासून विशेष शाळा/कर्मशाळा  कर्मचाऱ्यांनी "ई-मेल भेजो आंदोलन" सुरू केले आहे. आमदार कपिल पाटील यांनी सामाजिक न्याय मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांना भेटून रखडलेला पगार व सातवा वेतन आयोग तातडीने सुरू करण्याची विनंती केली आहे. माननीय धनंजय मुंडे साहेबांनी पगार वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत.  पगार वितरीत करणेबाबत झालेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा आपले पदाधिकारी मंत्रालयात जाऊन घेतील.  आपला रखडलेला पगार होण्यासाठी मंत्रालय स्तरावर तातडीने निर्णय न झाल्यास आपण सर्वांनी रस्त्यावर  उतरण्याची तयारी ठेवूया.  सामाजिक न्याय मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेऊया. पगार झाल्याशिवाय आता आपण शांत बसायचे नाही.

लढेंगे! जितेंगे!!

आपला स्नेहांकित 

सुभाष किसन मोरे, 

कार्याध्यक्ष 

शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य


58 comments:

  1. लढेंगे,जितेंगे!

    ReplyDelete
  2. बरोबर आहे सर

    ReplyDelete
  3. लढेंगे जितेंगे..जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
    Replies
    1. लढेंगे जितेंगे......जय शिक्षक भारती।

      Delete
    2. नुतनीकरण करण्यासाठी विनाकारण अडवणूक केली जात आहे

      Delete
  4. बरोबर आहे सर, जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  5. लढे़ंगे जितेंगे..जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  6. शिक्षक भारती विजयी होणार

    ReplyDelete
  7. सर 123 शाळेचे पगार चालू झाले नाहीत
    आयुक्त मॅडम कर्मचारी विरुद्ध रोज एक पत्र काढतात
    पण पगाराबाबत व 7 वा वेतन बाबत काहीच हालचाल करत नाहीत (अध्यक्ष -शिक्षक भारती पुणे )

    ReplyDelete
  8. तुम्ही खूप तळमळीने व अभ्यासपूर्वक लिहले आहे प्रत्येक कामासाठी लढावेच लागत आहे

    ReplyDelete
  9. I agree with your opinion sir.... We Will fight for our rights👍👍👍✊✊

    ReplyDelete
  10. I agree with you sir.... We should fight for our rights

    ReplyDelete
  11. Agree with you sir. We all fight for our rights.

    ReplyDelete
  12. सर तुम्ही सत्य परिस्थिती लिहिलेली आहे.आता तरी सामाजिक न्याय विभागाला जाग येईल.

    ReplyDelete
  13. लढेंगे जितेंगे.जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  14. सर तुम्ही सत्य परिस्थिती लिहिलेली आहे.आता तरी सामाजिक न्याय विभागाला जाग येईल.

    ReplyDelete
  15. आम्ही रोज ऑनलाईन वर्ग घेत आहोत निस्वार्थपणे आणि तरीही समाजकल्याण आमचा पगार काढत नाही.पाच महिने झाले तरी समाजकल्याणच्या शाळांना पगार नाही आम्ही आमचे कर्ज कसे फेडायचे सरकारने प्रायव्हेट कंपनी ना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला व्हावे काकासो फटकारून सांगितले आहे तसाच आदेश समाजकल्याणच्या मंत्र्यांना द्यावा ही विनंती.

    ReplyDelete
  16. I completely agree with you Sir.. We should fight for our rights.

    ReplyDelete
  17. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. I am agree with you sir all staff who wark in this field come together and fight with government for our demand best wishes of youer work sir thank you for presenting the tough

    ReplyDelete
  20. I am agree with you sir all staff who wark in this field come together and fight with government for our demand best wishes of youer work sir thank you for presenting the tough

    ReplyDelete
  21. आपणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे 🙏🙏

    ReplyDelete
  22. Social welfare dept working system have to be change.need to hand over special schools to Education dept.then only all this froud and corrupt system will stop.

    ReplyDelete
  23. हो, सर आम्ही सर्व तुमच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते पाऊल उचलायला तयार आहोत. लवकरात लवकर यातून मार्ग काढला पाहिजे.

    ReplyDelete
  24. धन्यवाद सर आपण दिलेल्या सगळ्या माहितीवरून असे निदर्शनास येते की शासन किती बेजबाबदारपणे शिक्षकांची वागत आहे

    ReplyDelete
  25. आम्ही महाराष्ट्रातील विशेष शाळेतील सर्व कर्मचारी आपल्या सोबत आहोत प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आज विशेष मुलांवर काम करणाऱ्या शाळा, कर्मशाळा, दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक या सर्वांवरच संकट निर्माण झाले आहे.नूतनीकरणाच्या जाचक अटी लादण्यात येऊन शाळा कार्यशाळा बंद करण्याचे धोरण राबवले जात आहे त्यामुळे मुले व कर्मचारी रस्त्यावर आला आहे मुळात नूतनीकरणाची अट रद्द करावयास हवी कारण नूतनीकरणाच्या नावाखाली बरेच पाणी मुरते हे महाराष्ट्रातील सर्व संस्थाचालक कर्मचाऱ्यांना माहीत आहे पण याबाबत कुणीच बोलत नाही
    जे कर्मचारी अतिरिक्त झाले त्यांचे वय निघून जात आहे तरी त्यांचे समायोजन होत नाही ज्यांचे झाले ते कसे झाले हे वेगळे सांगायला नको
    कर्मचाऱ्यांचा काहीही दोष नसताना ज्या शाळा कार्यशाळा नुतनीकरण अभावी बंद होत आहे त्यांचा पगार सुरू ठेवणे गरजेचे आहे
    समायोजन कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा यादी व रिक्त जागांची माहिती अपंग कल्याण आयुक्तालयाच्या नोटीस बोर्डवर लावणे गरजेचे आहे
    कर्मचाऱ्याला त्याला स्वतःच्या जिल्ह्यात समायोजन करणे गरजेचे आहे कारण गडचिरोलीत ला कर्मचारी पुण्यात तर पुण्यातील कर्मचारी गडचिरोलीत असे धोरण नसावे
    शाळा संहितेप्रमाने कामकाज होत नसेल तर त्या शाळेवर लगेच कुऱ्हाड चाळवण्या एेवजी प्रशासक नेमणे गरजेचे आहे
    या विशेष शाळा व कार्यशाळा किती मेहणीतीने उभ्या केल्या आहेत याचा जराही विचार कोणी करत नाही शासनाने विशेष मुलांच्या किती शाळा सुरू केल्या आहेत व त्यांची सद्यस्थिती काय आहे याचेही मूल्यमापन शासनाने करायला हवे .झाड तोडणे सोपे असते ते झाड लावून वाढवणे काय असते ते झाड लावणारालाच कळते तोडणाराला नाही
    म्हणून सर या सर्व प्रश्नांसाठी आम्ही आपल्या सोबत आहोत
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  26. I agree with your views sir. Yes we have to fight for our rights.

    ReplyDelete
  27. सामाजिक न्याय्य विभागाने विशेष विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच न्याय्य नाकारला आहे. मागील 50 वर्षात या शाळा वा कर्मशाळाकडे कोणीही संवेदनशीलतेने पहिलं नाही. या शाळा कर्मशाळा व यातील कर्मचारी हे फ्रॉड असल्याचा तथाकथित दृष्टिकोन उच्चविद्याविभूषितांची मनोभूमिका आधी बदलावी लागेल.. या शाळांतील विद्यार्थी आज सगळ्या क्षेत्रात मानसन्मानाने जगत आहेत हे शासनाने व धोरण आखणाऱ्या धुरिणांनी डोळसपणे न्याहाळावं..
    सर, आपल्या विस्तृत मांडणीची शासनाने दखल घ्यावी. अन्यथा शिक्षक भारती राज्यस्तरीय आंदोलनास सिद्ध आहे. रस्त्यावर उतरून न्याय्य मागणीसाठी लढण्याचं मनोबल प्रत्येक कार्यकर्त्यात आहे.. आपण हाक दया..
    लडेंगे !!!!
    जितेंगे !!!!

    ReplyDelete
  28. बरोबरच आहे आम्ही आपले सोबत आहोत

    ReplyDelete
  29. अगदी बरोबर आहे सर आम्ही सर्व कर्मचारी तुमच्या पाठीशी आहोत सर

    ReplyDelete
  30. अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी आहे धनयवाद मोरे सर.आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर, आपण या दिव्यांच्या विशेष शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुढे आलात. आम्ही सर्व जण आपल्या सोबत आहोत.
      जय हिंद जय महाराष्ट्र

      Delete
    2. धन्यवाद सर, आपण अगदी योग्य शब्दात विशेष शाळांतील कर्मचारी वर्गाची व्यथा मांडली आहे व सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे बघुया आत्ता तरी सरकार जागे होते का?
      सर आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत.

      Delete
  31. शाळा आनि वसतिगृह ही राजकारणी आनि अधिकारी यानी केवळ पैसे कमावण्याची फैक्ट्री केली आहे .....मि 21/08/2020 पासून यासाठी उपोषण करित आहे

    ReplyDelete
  32. आपले म्हणणे योग्य आहे.
    आम्ही आपल्या सोबत आहोत

    आपण केलेली मांडणी अभ्यासपूर्ण व वास्तविक आहे


    ReplyDelete
  33. सर 2011 साली सुरू झालेल्या अनुसूचित जाती मुलामुलीकरता निवासी शाळा सुरू झाल्या. सातवा वेतन आयोग, पदोन्नती, यासारख्या महत्त्वाचे प्रश्नाला कायम समाजकल्याण विभाग ठेंगा दाखवत आलेला आहे.

    ReplyDelete
  34. बरोबर आहे सर आम्ही सर्व कर्मचारी तुमच्या पाठीशी आहोत. धन्यवाद सर

    ReplyDelete
  35. हो बरोबर आहे सर, सातवा वेतन आयोग 4 वर्षांपासून 100 % शासकीय शाळा असून मिळाला नाही व आता या कोरोनाब संकटात 4 महिन्यापासून पगार....आम्ही तुमच्या सोबत आहोत...

    ReplyDelete
  36. Sir you have written a very good blog regarding the current scenario of every problem faced by the divyang teaching community. A very deep and knowledgeable research is seen in your work, hope the department will wake up.
    Thank you

    ReplyDelete
  37. अगदी बरोबर सर आमही आपलया सोबत आहोत

    ReplyDelete
  38. बरोबर आहे सर निवासी शाळा हीच परिस्थिती आहार

    ReplyDelete
  39. धन्यवाद सर, आपण या दिव्यांच्या विशेष शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुढे आलात. आम्ही सर्व जण आपल्या सोबत आहोत.
    जय हिंद जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  40. Govt residential school chya Karmcharyana suddha 7th pay commission adyap lagu zale nahi. Plz sir amhala suddha Nyay milaun dyava.

    ReplyDelete
  41. मोरे सर आमच्या प्रश्नांना वाचा फोडली याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  42. अगदी बरोबर आहे सर, शिक्षकावर होणारा अन्याय थांबला पाहिजे, आम्ही तुमच्या सोबत आहोत सर

    ReplyDelete
  43. सर, मी व माझी शाळा जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय, अहमदनगर सर्व कर्मचारीवृंद आपल्या सोबत आहोत.

    ReplyDelete
  44. सर किती दिवस चालणार असे 123शाळेचे अजून तर पगार पण नाहीत ,सामान्य शाळेचा नियम हा विशेष शाळांना पण असायला पाहिजे,वेळेवर पगार ,विशेष शाळेतील कर्मचाऱ्यांनी एकजूट होऊन उपोषण करायला पाहिजेत ,तरच शासन आपल्या मागण्यांकडे लक्ष देईल

    ReplyDelete
  45. नमस्कार सर विशेष शाळांमधील कंत्राटी कामगार नेमणुका, या शाळांचा प्राथमिक दर्जा, समायोजन, डीएड स्केलवर कार्यरत असणारे पदवीधर, द्वीपदवीधर शिक्षक,विशेष शाळा शिक्षण विभागाशी संलग्न करणे यांसारख्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर विचार होणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  46. नमस्कार सर विशेष शाळांमधील कंत्राटी कामगार नेमणुका, या शाळांचा प्राथमिक दर्जा, समायोजन, डीएड स्केलवर कार्यरत असणारे पदवीधर, द्वीपदवीधर शिक्षक,विशेष शाळा शिक्षण विभागाशी संलग्न करणे यांसारख्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर विचार होणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  47. सर अतिशय योग्य मागणी.निवड श्रेणी लवकरात लवकर मिळावी याकरिता आपणास खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  48. सर अतिशय योग्य मागणी.निवड श्रेणी लवकरात लवकर मिळावी याकरिता आपणास खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete