Sunday 30 August 2020

समान काम समान वेतन


केंद्र शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला किमान अठरा हजार रुपये वेतन मिळणे त्याचा अधिकार आहे. कायमस्वरूपी अथवा कंत्राटी कामगारालाही किमान वेतन मिळण्याचा हक्क आहे. कायदा करण्यासाठी जेवढा संघर्ष करावा लागतो तेवढा किंबहुना त्यापेक्षा जास्त संघर्ष कायद्याच्या अंमलबजावणीसाठी करावा लागतो. केंद्र सरकारने किमान वेतनाचा कायदा केला असला तरी राज्यातील कंत्राटी कामगारांना, अंगणवाडी सेविकांना तसेच विविध स्तरावर काम करणाऱ्या कामगारांना अद्यापि किमान वेतनापेक्षा कमी मानधनावर काम करावे लागत आहे. हे अन्यायकारक आहे. 

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात नवनियुक्त शिक्षकांना अत्यल्प अपमानजनक मानधनावर काम करावे लागत आहे ही शासनासाठी शरमेची बाब आहे. डी. एड, बी.एड पूर्ण करायचे, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हायचे,  अभियोग्यता चाचणी पार करायची आणि हे सर्व करून नोकरी मिळाली तर मानधन मिळत केवळ सहा हजार.  स्वतःचे राहणीमान चांगले ठेवून दर्जेदार शिक्षण देण्याची कसरत गेली वीस वर्ष शिक्षण क्षेत्रात नवनियुक्त शिक्षक करत आहेत. शिक्षक भारती व आमदार कपिल पाटील यांनी पहिल्यापासून शिक्षण सेवक योजना हा कलंक आहे, तो समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे.
 
सेवक नाही, शिक्षक आम्ही
न सहणार अपमान
अज्ञानाचे भेदक आम्ही
पुन्हा मिळवू सन्मान

अशी घोषणा आमदार कपिल पाटील यांनी  दिलेली आहे.

समान काम समान वेतन या न्यायानुसार एकाच स्टाफरूममध्ये बसून समान काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षण सेवक संबोधणे आणि तुटपुंज्या मानधनावर काम करायला लावून त्यांचे आर्थिक शोषण करणे देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अहितकारक आहे.

हे शिक्षणसेवक धोरण कोठून आले?

केंद्रात एनडीएचे सरकार असताना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांना एक पत्र देऊन शिक्षक - शिक्षकेतर यांच्या वेतनावर होणारा खर्च कमी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. कायमस्वरूपी शिक्षक  नेमन्या एवजी कंत्राटी स्वरूपात कर्मचारी नेमण्याचे सुचवले होते. यासाठी त्यांनी भाजपशासित राज्यांचा दाखला दिलेला होता. गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांनी अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या असून अल्प मानधनावर शिक्षक  उपलब्ध होत असल्याचे लक्षात आणून दिले. मध्यप्रदेश शासनाने शिक्षण हमी योजना, राजस्थानने शिक्षाकर्मी योजना आणि गुजरात मध्ये विद्या सहाय्यक योजना या नावाने सुरू असलेल्या योजनांचा हवाला देत महाराष्ट्र सरकारने 10 मार्च 2000 रोजी प्राथमिक शिक्षकांसाठी 27 एप्रिल 2000 मध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांसाठी शिक्षण सेवक योजना जाहीर केली. या शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे मानधन दिले जात होते. 

1. माध्यमिक शाळा 
(5 वी ते 7 वी )
 2500  रुपये

2. माध्यमिक शाळा
(8 वी ते 10 वी)
 3000  रुपये

3. अध्यापक विद्यालय 3000  रुपये

4. कनिष्ठ महाविद्यालय 3500 रुपये
  
शिक्षणसेवक योजनेच्या विरोधात  राज्यभर ज्या ताकतीने आंदोलन उभे राहायला हवे होते त्या प्रमाणात विरोध झाला नाही.  नवीन नियुक्त कर्मचारी संख्या कमी असल्याने विरोध कमी पडला. त्यात काही कर्मचारी कोर्टात गेले. वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या. माननीय हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार शासनाला केवळ योजनेद्वारे अशाप्रकारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येणार नाही असे निरीक्षण नोंदवले. तसेच शिक्षण सेवक योजनेत अनेक सुधारणा सुचविल्या. शासनाने माननीय हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचा विपर्यास करून सदर योजनेचे 13 ऑक्टोबर 2000 रोजी कायद्यात रूपांतर केले.

वर्षानुवर्ष गुरूला आदराचे स्थान देणाऱ्या समाजात शासनाने शिक्षकांना सेवकांचा दर्जा दिला. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा कायदा म्हणावा लागेल. 13 ऑक्टोबर 2000 शासन निर्णयामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय विद्यालयातील शिक्षकांचे मानधन खालीलप्रमाणे ठरवण्यात आले
1. माध्यमिक शाळा
(5 वी ते 7 वी )
 3000  रुपये

2. माध्यमिक शाळा
(8 वी ते 10 वी )
 4000  रुपये

3. अध्यापक विद्यालय 4000  रुपये

4. कनिष्ठ महाविद्यालय 5000 रुपये
 
शिक्षण सेवक कायदा लागू झाला तेव्हा  प्रशिक्षित शिक्षण सेवकांना आणि नियमित वेतनश्रेणी घेणाऱ्या शिक्षकांच्या पगारामध्ये फारशी तफावत नव्हती.  राज्यातील विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी मागणी केल्यामुळे 17 मार्च 2012 मध्ये मानधन वाढ करण्यात आलेली आहे. आठ वर्षे होऊन गेली आहेत.  आज नियमित वेतनश्रेणी घेणाऱ्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग मिळत आहे तर शिक्षण सेवकांना मात्र केवळ सहा हजार रुपये इतक्या मानधनावर काम करावे लागत आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या कामगाराला ही शिक्षण सेवकापेक्षा ज्यादा मानधन मिळते. सहा हजार रुपये मानधनामध्ये ग्रामीण भागातही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अशक्य आहे.

मुंबई - पुण्यासारख्या शहरात हे नवनियुक्त शिक्षक बांधव सहा हजार रुपयात कसे चालवत असतील याचा शासनाने कधी विचार केला आहे का?

सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन कसे झाले ?

2010 मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण सेवकांच्या प्रश्नावर आणि त्यांच्या शोषणावर अशासकीय विधेयक सादर केले. शासकीय सेवेत कुणालाही सेवक म्हणून ठेवण्यात येत नाही केवळ शिक्षणक्षेत्रावरच अन्याय  का? असा प्रश्न त्यांनी या विधेयकाद्वारे शासनाला केला. शिक्षकांना सेवक म्हणणे, समान काम करीत असतानाही त्यांना तुटपुंजे मानधन देणे आणि त्यांचा तीन वर्षे  कालावधी करणे याला अशासकीय विधेयकातुन विरोध केला. शिक्षण सेवकांना सेवक न म्हणता सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन म्हणावे, त्यांना मानधन न देता वेतन श्रेणी द्यावी आदी मागण्या त्यांनी केल्या होत्या. सत्ताधाऱ्यांनी कपिल पाटलांना अशासकीय विधेयक मागे घेण्याची विनंती केली. परंतु कपिल पाटील आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. सभागृहात सत्ताधाऱ्यांची संख्या कमी होती. तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांना सभागृहात परत येण्यास भाग पाडले. कपिल  पाटील यांनी मतदानाची मागणी केली. यावर सत्ताधाऱ्यांची मोठी कोंडी झाली. अखेर सभापतींनी विशेषाधिकाराचा वापर करत नियम (41) 1 अन्वये अशासकिय विधेयक नामंजूर झाल्याचा निर्णय दिला आणि सरकारचा जीव भांड्यात पडला. त्यादिवशी आमदार कपिल पाटील सभागृहात एकटेच पडले अन्यथा आपल्या सर्वांना सन्मान मिळालाच असता. मात्र कपिल पाटील यांच्या विधेयकाची दखल घेत तत्कालीन शिक्षणमंत्री दर्डा यांनी मानधनवाढीचा आणि अपमानास्पद नाव बदलण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्याची घोषणा सभागृहात केली. पुढे थोडंफार मानधन वाढलं आणि कपिल पाटील यांनी सुचवल्याप्रमाणे सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन असं नावंही बदललं गेलं.

समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे

सातव्या वेतन आयोगासाठी नियुक्त केलेल्या बक्षी कमिटीने खंड एक मधील प्रकरण-2 मध्ये मुद्दा क्रमांक 1 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केल्या प्रमाणे किमान वेतन अठरा हजार रुपये देण्याचे सुचवले आहे. महाराष्ट्र सरकारने ज्या  गुजरात शासनाच्या विद्या सहाय्यक योजनेच्या धरतीवर महाराष्ट्रामध्ये शिक्षण सेवक योजना सुरू केली त्या गुजरात सरकारने दिनांक 1 फेब्रुवारी 2017 पासून विद्या सहायकांना सुधारित 19 हजार 950 एवढी मानधन वाढ दिली आहे. या तुलनेत महाराष्ट्रातील सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन यांना केवळ सहा हजार रुपये मानधनावर काम करायला लावणे अन्याय कारक आहे.

तसेच माननीय उच्च न्यायालय जोधपुर, राजस्थान यांच्या दिनांक 29 जानेवारी 2020 च्या आदेशाप्रमाणे सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन कर्मचाऱ्यास अल्प मानधनावर राबवणे म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम 14, 16, 21, 23 आणि 38 चे उल्लंघन करणारे आहे असा निर्णय दिलेला आहे. परिविक्षाधीन कर्मचाऱ्यास त्याच्या परिविक्षाधीन कालावधीत नियमित व पूर्ण  वेतन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.  किमान वेतन कायद्यानुसार कंत्राटी कामगारांनाही 18 हजार रुपयापर्यंत मानधन दिले जात आहे. राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ही ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाच्या काळातही ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी लागू केलेली आहे.

वरील सर्व बाबींचा विचार केल्यास सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन किमान 18000 वेतनासाठी पात्र आहेत. परंतु ते न देणे म्हणजे आर्थिक शोषण होय. महाराष्ट्रासारख्या शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्यात समान काम समान वेतन कायद्यानुसार सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू केली पाहिजे. एवढेच नव्हे तर परिविक्षाधीन कालावधी तीन वर्षापेक्षा कमी केला पाहिजे अशी आमदार  कपिल पाटील आणि शिक्षक भारती ची भूमिका आहे. 

पवित्र पोर्टल द्वारे नवनियुक्त 6000 सहाय्यक शिक्षकांनी  आमदार कपिल पाटील यांचे नेतृत्व मान्य करून शिक्षक भारती सोबत लढ्यात सामील होण्याचे ठरवले आहे. गणेश सावंत, प्राजक्ता गोडसे, हरीश शिंदे, सुधीर पाटील, भरत सोनवणे, किरण पवार, जितेंद्र लोकरे, सचिन हेरोलीकर, जयवंत कुंभार, ऋषी गोटे, विपुल गागरे, राम जाधव, सतीश पाटील, उमेश पवार, अस्मिता रोकडे, संदेश कांबळे, अश्विनी माने, संभाजी बेस्के, संभाजी तोडकर आणि हजारो नवनियुक्त शिक्षकांनी एकत्र येऊन गरज पडली तर मोठा संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे. नियमित वेतनश्रेणी लागू झालीच पाहिजे आणि परिविक्षाधीन कालावधी कमी केला पाहिजे या दोन मागण्या घेऊन शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील माननीय शिक्षणमंत्री मा. वर्षाताई गायकवाड, ग्राम विकासमंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब आणि अर्थमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्यासोबत बैठका घेऊन परिस्थिती लक्षात आणून देणार आहेत.

मला विश्वास आहे आपल्या या सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन बांधवांना न्याय मिळेलच.
लढूया!! जिंकूया!!!

आपला स्नेहांकित 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष 
शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य


96 comments:

  1. खूप चांगला मुद्दा आपण मंडल आहे सर.शिक्षण सेवक ही संकल्पनाच नष्ट केली पाहिजे .

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान सर शिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतन श्रेणी मिळवून द्याल याची नक्कीच खात्री आहे आम्हाला

      Delete
    2. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख ...व न्याय पुर्ण मागणी

      Delete
    3. सर मी.सौ.शमीम पटेल..भा.वि.कन्या महाविद्यालय कडेगाव,सांगली येथे ज्यु.विभागात 2001पासून कार्यरत आहे.2008-09 ला पदे पूणर्वेळ झाली..2014 पदमान्यता आली..पण संस्थेच्या तांत्रिक अडचणीमुळे वैयक्तिक पद मान्यता झाली नसल्याने 09/04/2020 ला वित्त विभागाने आमची पदे व्यपगत केली...पायाभूत अर्धवेळ पदाचे वेतन मिळत होते.मात्र 2014 पूर्णवेळ पद मंजूरी आल्याने पायाभूत पदाचे वेतन बंद झाले....2014 पासून मंजूर पदातील 303 पदे 2014 पासून अनुदानित शाळा काॕलेजमध्ये कार्यरत असून विनावेतन काम करत आहोत.....याची दखल कोणीही घेत नाही.....आपण जी वरील पोस्ट पाठवली आहे.त्याद्वारे तर वेतन मिळाले पाहिजे असे आहे पण मिळत नाही....सहा वर्षे झाली अध्यापन व इतर सर्व कामे बोर्डाची सुरु आहेत..यावर काय करता येईल मार्गदर्शन व्हावे....

      Delete
    4. जय शिक्षक भारती .... तमाम महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाचे व्रत घेऊन हजारो किलोमीटर दूर राहून देखील 2020 मधील परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक हा दुर्लक्षित झालेला आहे कोरोना काळामध्ये देखील जीवावर उदार होऊन लढतो आहे परंतु तरीदेखील दुर्लक्षित आहे महिना 6000रुपये देऊन बोळवण केली जाते.. पुरोगामी महाराष्ट्राला हे कसे शोभते? येत्या शिक्षक दिनाची भेट म्हणून आम्हाला समान काम समान वेतन श्रेणी मिळावी हीच आदरणीय आमदार कपिल पाटील साहेबांकडून अपेक्षा....... श्री तोरकडी अमोल विष्णू( नवनियुक्त प्राथमिक पदवीधर परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक जि प परभणी)

      Delete
  2. नवनियुक्त सहायक शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे.
    शिक्षकभारती जिंदाबाद....!

    ReplyDelete
  3. समान काम समान वेतन व सन्मानजनक वागणूक मिळायलाच हवे. 👍👍

    ReplyDelete
  4. छान सर..हा महत्त्वाचा मुद्दा आहे..लढू या..जिंकू या.जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  5. खूप चांगला मुद्दा मांडला सर आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर तुम्ही आमच्या समस्या समजुन घेऊन त्याबद्द्ल आवाज उठविला

      Delete
  6. अभ्यासपूर्ण भूमिका...खूप छान सर!👍

    ReplyDelete
  7. धन्यवाद साहेब सर्व नवनियुक्त सहायक शिक्षक आपल्या सोबत आहोत. आपनच आम्हाला शिक्षक भारतीच्या माध्यमातून न्याय मिळवून द्याल हा आत्मविश्वास आम्हा सर्व महाराष्ट्रातील सहा. शिक्षक(परिविक्षाधीन) ला आहे. धन्यवाद 🙏🙏🙏

    ReplyDelete
  8. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख…...योग्य मागणी...👌

    ReplyDelete
  9. आपण आम्हाला न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा,

    ReplyDelete
  10. खूप छान , धन्यवाद सर

    ReplyDelete
  11. Nice
    Keep it up👍👍
    लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  12. Chb वाले 72/- रुपयात काम करतात तेव्हा समान काम समान वेतन का नाही आठवत आपल्याला??

    ReplyDelete
  13. खूपच छान सर

    ReplyDelete
  14. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

  15. खूप छान सर शिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतन श्रेणी मिळवून द्याल याची नक्कीच खात्री आहे आम्हाला

    ReplyDelete
  16. समान काम समान वेतन समान पद समान अधिकार
    तरीही शासनाने तयार केलेले नियम पाळल्यास सरकार असमर्थ.
    मोरे सर, सरकारला जाग करण्याचे काम आपण करत आहात. म्हणून तर आज राज्यातील सर्व शिक्षक आज विना अत वेतन श्रेणी मिळविण्यास पत्र झाले.
    जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  17. खूप खूप छान सर
    समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  18. Thank u so much sir ....we r Always with u we want justice.

    ReplyDelete
  19. छान सर आम्हाला न्याय मिळून द्या

    ReplyDelete
  20. खूप छान सर शिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतन श्रेणी मिळवून द्याल याची नक्कीच खात्री आहे आम्हाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून पदासाठी पात्र वेतन मिळावे हिच अपेक्षा....

    ReplyDelete
  21. धन्यवाद मोरे सर
    आणि साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
    अतिशय अभ्यासपूर्वक आणि संवैधानिक मार्गाने प्रत्येक शिक्षकांच्या हक्कांसाठी आपली संघटना लढत असते आणि आम्ही या संघटनेचा एक भाग आहोत याचा अभिमान वाटतो.

    ReplyDelete
  22. खूपच छान धन्यवाद सर ����

    ReplyDelete
  23. फार चांगल्या पद्धति ने विश्लेषण केला आहे साहेबानी

    ReplyDelete
  24. सर खूप छान👍👍

    ReplyDelete
  25. आता ची परिस्तिथी बघता उशिरा का होईना पण हा विचार पुढे आला कित्येकांची लग्ने झाली संसार सुरू झाला पण परिस्तिथी चिंता जनक जीवन जगण्या साठी आर्थिक पाठबळ तर पाहिजे ना 10 वर्ष 20 वर्ष विनावेतन, कमी पगार वर तो ही वेळेवर नाही अशा परिस्तिथी जीवन जगवेतर कसे लवकर आमच्या सारख्या गरजू शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागेल,शिक्षक संघटना खूप चांगल्या परीने कार्य करतेय खूप खूप धन्यवाद! आमच्या परिस्तितीचा विचार अशी अपेक्षा व्यक्त करतो,

    ReplyDelete
  26. अत्यंत अभ्यासपूर्ण मत ..... 👌👌
    नव नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षण सेवक काळ कमी करून नियमित वेतनश्रेणी लागू केलीच पाहिजे
    शिक्षण सेवकांवर होणार्‍या अन्यायाबदल वाचा फोडल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद .. .प्रा.सुभाष मोरे सर.

    ReplyDelete
  27. अत्यंत अभ्यासपूर्ण मत ..... 👌👌
    नव नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षण सेवक काळ कमी करून नियमित वेतनश्रेणी लागू केलीच पाहिजे
    शिक्षण सेवकांवर होणार्‍या अन्यायाबदल वाचा फोडल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद .. .प्रा.सुभाष मोरे सर.

    ReplyDelete
  28. शिक्षण सेवक हद्दपार होणे ही काळाची गरज आहे.

    ReplyDelete
  29. छान सर लढूया जिंकूया!!!!!

    ReplyDelete
  30. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  31. शिक्षणसेवकांना वेठबिगाराप्रमाणे राबवून घेणारा काळा कायदा रद्द करा आणि नियमित वेतनश्रेणी लागू करा

    ReplyDelete
  32. समान काम समान वेतन मिळालेच पाहिजेत त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत, शासनाने लवकरात लवकर याविषयी निर्णय घ्यावा व सर्वांना न्याय द्यावा,ही विनंती.

    ReplyDelete
  33. .. खर तर किमान वेतन कायदा अस्तित्वात असताना हा जुलमी निर्णय रद्द झालाच पाहिजे...

    ReplyDelete
  34. खूप चहा लेख आहे.

    ReplyDelete
  35. खूप चांगला मुद्दा आपण मांडल आहे सर.

    ReplyDelete
  36. खूपच छान, लवकरच सहाय्यक शिक्षकाना लवकरच न्याय मिळेल हीच अपेक्षा..

    ReplyDelete
  37. धन्यवाद साहेब.मुद्देसूद मांडणी आहे. समान काम समान वेतन मिळालचं पाहिजे.

    ReplyDelete
  38. नमस्कार साहेब
    मी आनंद देवरे मुंबई महानगरपालिका शिक्षण खात्यात माध्यमिक विभागात कार्यरत आहे शिक्षणसेवक रद्द करणे व कायद्यात बदल करून समान काम समान मोबदला असणे गरजेचे आहे तसेच आतापर्यंत जेवढेही शिक्षणसेवक झालेले आहेत त्यांना त्यांचा तीन वर्षांचा आर्थिक मोबदलाही मिळायला हवा कारण ती तीन वर्षे त्यांनी कशी लोटली,किती यातना सोसल्या हे आपण समजू शकतात तसेच या ठिकाणी मला एक दुसरा मुद्दा आपणास नजरेस आणून द्यायचा आहे तो म्हणजे मुंबई महापालिकेतील माध्यमिक विभागातील शिक्षकांचा या शिक्षकांना महापालिकेचे कुठलेच लाभ मिळत नाही ,कुठल्याही प्रकारची पेन्शन (नवीन,अंशदायी, किंवा NPS)लागू केलेली नाही शासनाचा आरोग्य विमा नाही अशा अनेक समस्यांनी हे ग्रासले आहेत तसेच म्हटवाचा मुद्दा म्हणजे यांना आंतरजिल्हा बदलीपासून वंचीत ठेवण्यात आलेले आहे महापालिकेच्या म्हणण्यानुसार माध्यमिक शिक्षक हे राज्यशासनाचे कर्मचारी आहेत त्यांना राज्यशासणाची माध्यमिक संहिता लागू असल्याने महापालिकेचे लाभ त्यांना मिळू शकत नाही हे कारण पुढे करत या शिक्षकांना राज्यशासनाच्या धेयधोरणानुसार राज्यशासनाचे लाभ ही मिळू देत नाही हा एक प्रकारे अन्याय आहे ना धड इकडचा ना तिकडचा मध्येच जात्याच्या दोन तळ्यात अडकलेल्या पिठासारखी गट होत आहे राज्यशासनाच्या धोरणानुसार शिक्षक आंतरजिल्हा बदलास पात्र असूनसुद्धा येथील शिक्षकांना हेतुपुरस्कार बदलीपासून वंचीत ठेवले जात आहे येथे कार्यरत बहुसंख्य माध्यमिक शिक्षक हे मुंबईबाहेरील असून 70ते80% शिक्षकांचे मुंबईत स्वतः चे घर नाही अनेक शिक्षक कुटुंबापासून दूर राहतात कित्येकांचे कुटुंब दोन ठिकाणी विखुरले गेले आहे अशा अनेक समस्यां आहेत ह्या शिक्षकांना आंतरजिल्हाबदलीने स्व गावी जाण्यास मिळाल तरी कृपया वरील बाबीकडे लक्ष घालून या शिक्षकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा ही कळकळीची विनंती

    ReplyDelete
  39. शिक्षणसेवक योजनाच रद्द करा

    ReplyDelete
  40. खूप चांगला मुद्दा आपण मांडला आहे सर, समान काम समान वेतन मिळायलाच पाहिजे.

    ReplyDelete
  41. अतिशय समर्पक मुद्दा आहे आमचे समर्थन आहे

    ReplyDelete
  42. धन्यवाद साहेब, आमच्या वर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध तूम्ही आमचे म्हणणे एकूण घेऊन लढा सुरू केल्याबद्दल खूप आभारी

    ReplyDelete
  43. धन्यवाद सर मुद्देसूद मांडणी आहे.लवकरात लवकर न्याय मिळून नियमित वेतन श्रेणी लागू होईल हीच अपेक्षा.we are with u

    ReplyDelete
  44. अतिशय योग्य मुद्दा मोरे सर यांनी मांडला आहे, आपण या विषयी नक्की यशस्वी व्हाल सर व शिक्षकांना योग्य न्याय, मिळवून द्याल, याची मला खात्री आहे.

    ReplyDelete
  45. धन्यवाद सर.. आमच्या व्यथा समजून घेतल्या बद्दल... नवी मुंबई सारख्या ठिकाणी 6k मध्ये आम्ही कसे दिवस काढत आहोत ते सांगणे कठीण आहे. संघर्षासाठी आमची पूर्ण तयारी आहे तुम्ही फक्त आवाज द्या..

    ReplyDelete
  46. परिविक्षाधीन कालावधी हा फक्त एकाच वर्षाचा आसावा.व त्यालाही किमान वेतन हे कमीत कमी १८००० रू.तरी असावे..

    ReplyDelete
  47. खूप खूप धन्यवाद साहेब🙏🙏

    ReplyDelete
  48. लवकरात लवकर आपल्या प्रयत्नांना यश येउदे

    ReplyDelete
  49. धन्यवाद सर... शिक्षणसेवक ही अन्यायकारक पद्धत रद्द होऊन समान काम समान वेतन लागू व्हावी यासाठी शिक्षक भारती व पाटील साहेब आम्हा नवनियुक्त शिक्षकांच्या वतीने आवाज उठवीत आहेत यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत

    ReplyDelete
  50. तुम्ही अशाच प्रकारे आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला न्याय मिळवून द्याल याची आम्हाला खात्री आहे... धन्यवाद सर.. आम्ही तुमचे मावळे होऊन सर्व प्रकारच्या लढाईमध्ये तुमच्या सोबत सहभागी होऊत.

    ReplyDelete
  51. शिक्षक भारती जिंदाबाद!

    ReplyDelete
  52. सोलापूर जिल्ह्यात नवनियुक्त पदवीधर शिक्षकांना 8000 मानधन दिला जातो. परंतु इतर जिल्ह्यांमध्ये (सांगली)6000 मानधन दिला जातो. 6वी-8वी साठी नवनियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांच्या वर होणाऱ्या अन्यायाला तुम्हीच वाचा फोडू शकता. कृपया आमचा देखील प्रश्न घेण्यात यावा. व आम्हाला पदवीधर वेतन श्रेणी मिळावी.

    ReplyDelete
  53. धन्यवाद सर् 🙏🙏🙏 आपण आमच्या व्यथा समजून घेतल्या बद्दल... आम्ही गावापासून ७०० ते ८०० किमी दूर राहून ६००० हजारात घर चालवने खुप आवघड आहे सर् , 🙏🙏

    ReplyDelete
  54. धन्यवाद सर🙏🙏
    समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे.
    6000मधे घर चालवणे खुप अवघड झाले आहे.

    ReplyDelete
  55. धन्यवाद सर🙏🙏
    समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे.
    6000मधे घर चालवणे खुप अवघड झाले आहे.

    ReplyDelete
  56. खुप खुप धन्यवाद साहेब, आपन समान काम समान वेतन हा विषय घेउन आमचा प्रश्न मार्गी लावला. 6000 मधे मुंबई सरख्या जीवन कडणे अशक्यच आहे.

    ReplyDelete
  57. सर, आपल्या प्रयत्नांना यश येवो! आम्ही आपल्या सोबत आहेत. जय शिक्षक भारती. 👍👍

    ReplyDelete
  58. आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेत जवळपास 100 शिक्षणसेवक मे महिन्यापासून आत्ताही कोव्हिड-१९ ड्युटी करत आहोत.आम्हाला कोणताही विशेष भत्ता मिळत नाही फक्त शिक्षणसेवकांचा मानधन 6000 रुपये एवढ्या कमी मानधनात दैनिक गरजा सुद्दा पूर्ण होत नाही वरून लोकल ट्रेन बंद असल्यामुळे कोव्हिड ड्युटीवर जातांना भाडा सुद्दा जास्त लागतो समान काम करून वेतनात तफावत ठेवणे हा अन्याय आहे आपण हा मुद्दा मार्गी लावाल ही अपेक्षा 💐 खूपच सुंदर लेख 💐 शिक्षणसेवकांचा मुद्दा घेतल्याबद्दल आपले धन्यवाद

    ReplyDelete
  59. आज शिक्षण सेवाकांची अवस्था एका मजूरा पेक्षाही खालच्या पातालीची झाली आहे आज एका मजूराला 15000-18000 हजार वेतन आहे आणि शिक्षण सेवकाला फक्त 6000 हजार
    हा अन्याय नाही का मनुन शिक्षण सेवक पद रद्द करून समान काम समान वेतनाप्रमाणे नियमित वेतन श्रेणि लागु करावी हि विनंती.

    ReplyDelete
  60. सर लवकरात लवकर माननीय आमदार कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला शिक्षण सेवकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत.

    ReplyDelete
  61. समान काम समान वेतनच मिळाला पाहिजेत

    ReplyDelete
  62. सर हा काळा कायदा लवकरात लवकर मागे घेऊन शिक्षण सेवक कालावधी कमी करून नियमित वेतन मिळवून द्यावे ही नम्र विनंती.

    ReplyDelete
  63. सर आम्ही सर्व सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन तुमचा सोबत आहो..हा अन्याय दूर करा सर ..समान काम समान वेतन

    ReplyDelete
  64. समान काम समान वेतन देऊन नवनियुक्त शिक्षकांना सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे.

    ReplyDelete
  65. शिक्षणसेवक कालावधी कमी करून समान काम समान वेतन मिळायलाच पाहीजे .






    ReplyDelete
  66. Yes sir same work same pension we are with you.

    ReplyDelete
  67. सर सहा हजारात महानगरपालिका सारख्या ठिकाणी स्वतःचे पोट सुद्धा भरत नाही. तर कुटुंब कुठून चालवणार? घरापासून कोसो दूर असणाऱ्या शिक्षकांना प्रत्येक गोष्ट ही विकतच घ्यावी लागते. ज्या गोष्टीसाठी गावाकडे एकही रुपया लागत नाही,त्या गोष्टीसाठी कितीतरी पट जास्त पैसे खर्च करावे लागतात. शिक्षक बनलो याचा आनंद फक्त एक महिना राहिला मुलांना. आम्ही तर काही मुले आधी नोकरीला होतो गरजा वाढलेल्या पण आता 6000 हजारात नोकरी करतांना व पगार सांगताना फार अपमानास्पद वाटते. जे आधी नोकरी करत होते व नंतर रीतसर पुन्हा शिक्षक पदी नियुक्त झाले त्यांना तर हा परिक्षाविधिन कालावधी नसालाच पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक पदला परिक्षाविधीन कालावधी कसा काढायचा?

    ReplyDelete
  68. खरंच आहे सर आज आपण आम्हा शिक्षणसेवक यांचा आवाज बनून आमच्या व्यथा जाणून आहेत...👏👏

    ReplyDelete
  69. आमच्या मनातील व्यथा फक्त तुम्हीच जाणल्या सर...या लढ्यात आपण आम्हाला साथ दिली तर आम्ही आपले सदैव ऋणी राहू

    ReplyDelete
  70. शिक्षकसेवक योजना बंद करा

    ReplyDelete
  71. आता तुम्हीच एक आशेचा किरण आहे सर आमच्यासाठी,समान काम समान वेतन मिळालेच पाहिजेत..

    ReplyDelete
  72. सर खूप खूप धन्यवाद, किमान तुम्ही तरी आमच्या अडचणी समजून घेतल्या जर ह्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय मिळवून दिला तर आम्ही शेवट पर्यंत कपील पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करू व आमच्या घरचे सुध्दा विसरणार नाही की आमच्या मुलाला एकाही नेत्यांनी जेव्हा मदत केली नाही तेव्हा फक्त पाटील सर हेच होते की जे आमच्या वरील अन्याया विरुद्ध झटत होते जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  73. मोरे सर धन्यवाद!
    आणि.मा.आ.कपिल पाटील साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.लढाऊ योद्धे आहेत ते.
    अतिशय अभ्यासपूर्वक आणि संवैधानिक मार्गाने प्रत्येक शिक्षकांच्या हक्कांसाठी आपली संघटना लढत असते. याचा सार्थ अभिमान वाटतो.DMM

    ReplyDelete
  74. मोरे सर धन्यवाद!मा.कपिल पाटिल साहेबांचे खुप आभार सर,अणखी एक काम करा क्रिडा,कला व कर्यनूभव अतिथी निदेशक याना पण शाळेत काम करायची संधी मिळाली पाहिजे. कारण अतिथी निदेशक,उपाशी पोटी काम करतोय?

    ReplyDelete
  75. खूप आवश्यक आहे अतिशय सुंदर करू आहे

    ReplyDelete
  76. खुप छान अतिशय आवश्यक आहे सर

    ReplyDelete
  77. आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत,आपण सर्वांना न्याय द्याल हीही खात्री आहे.
    आपले खुप खुप आभारी आहोत

    ReplyDelete
  78. आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत,आपण सर्वांना न्याय द्याल हीही खात्री आहे.
    आपले खुप खुप आभारी आहोत

    ReplyDelete
  79. आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत,आपण सर्वांना न्याय द्याल हीही खात्री आहे.
    आपले खुप खुप आभारी आहोत

    ReplyDelete
  80. सर,समान वेतनयोजना देताना ज्या तारखेपासून ही योजना लागू झाली आहे त्या तारखेपासून ची *रिकव्हरी* जे या शिक्षण सेवक पदावर कार्यरत होते त्यांना सुद्धा दिल्या गेली पाहिजे,हा सुद्धा मुद्दा यामध्ये मांडला गेला पाहिजे.

    ReplyDelete
  81. शिक्षणसेवक ही वेठबिगारी प्रथा बंद करुन समान काम समान वेतन मिळवण्यासाठी प्रयत्न खरोखरच अभिनंदनीय.

    ReplyDelete
  82. मा. मोरे सर नमस्कार,
    आपण खरोखरच खुप योग्य भूमिका शिक्षण सेवक या पदां विषयी मांडली तसेच परीविक्षाधिन कालावधी या विषयी आपण योग्य भूमिका मांडली आहे आणि वेळोवेळी आपले शिक्षक नेते मा. कपिल पाटील सर आपल्या वरील अन्याया वाचा फोडतात, त्यांचे आभार परंतु प्रशासनातील काही जबाबदार मंडळी शिक्षकांना त्रासदायक भूमिका घेतात आता हेच पाहा ना आपले बांधव लाॅकडाऊन च्या काळातही जीवावर उदार होऊन आपले सामाजिक दायित्व समजून डाॅ. असो पोलीस असो यांच्या बरोबर कोरोना योध्दा म्हणून तसेच नाकाबंदीला स्पेशल पोलीस म्हणून काम केले आणि कॅटेंन्मेंट झोनमध्ये कोरोनाबाधित बांधवांना जीवनावश्यक वस्तु पुरवण्याचे काम केले करीत आहेत हे सर्व करीत असताना आपले अनेक शिक्षक कोरोनाबाधित झाले यातले बरेच जण जीवानीशी गेले, तरीही यात कसर काय म्हणून आपल्या खात्याच्या अधिकारी तसेच मंत्री महोद्ययांनी असा आदेश काढला की शिक्षकांनी गरज असल्यास आठवड्यातून किमान दोन दिवस शाळेत उपस्थित रहावे अन्यथा घरातूनच ॵनलाईन अध्यापन करावे परंतु या नियमाचा विपर्यास की काय मुख्याध्यापकांना अधिकार दिल्यामुळे ते सरसकट काही काम नसताना ही शिक्षकांना शाळेत बोलवून फक्त मानसिक ताण ध्यायचे काम करीत लाॅकडाऊन आणखी एक महिना वाढले आहे आणि त्रास ही वाढत चालला आहे त्यामुळे या निमित्ताने शिक्षक भारतीचा एक जुना कार्यकर्ता या नात्याने नम्र विनंती आहे मा. आमदार कपिल पाटील सरांनी आवाज उठवावा व याला वाचा फोडावी व हा अन्याय कारक असलेला जीआर रद्द करावा ही नम्र विनंती व शिक्षकांच्या सदृढ आरोग्यासाठी प्रयत्न करावेत-एक कोरोना आजारावर मात करुन आलेला आपला बांधव.

    ReplyDelete
  83. छान विचार मांडलेत सर..

    ReplyDelete
  84. छान विचार मांडलेत सर..

    ReplyDelete
  85. छान विचार मांडलेत सर..

    ReplyDelete
  86. खुप छान सर..

    ReplyDelete
  87. आपण शिक्षक सेवक व त्यांना मिळणारे तुटपुंजे मानधन ज्यामध्ये शिक्षकाचे 1 महिन्याचे खर्च भागत नाही , या विषयी आपण व्यक्त केलेले मत खरंच योग्य आहे.

    ReplyDelete
  88. आपण शिक्षक सेवक व त्यांना मिळणारे तुटपुंजे मानधन ज्यामध्ये शिक्षकाचे 1 महिन्याचे खर्च भागत नाही , या विषयी आपण व्यक्त केलेले मत खरंच योग्य आहे.

    ReplyDelete

  89. प्रति, मोरे साहेब शिक्षक भारती संघटना महोदय सविनय सेवेत अर्ज सादर करण्यात येतो की आम्ही शासन निर्णय शालेय शिक्षण 27/05/2008 नुसार सम्रग शिक्षा अभियाण प्रकल्प अंतर्गत कस्तुरबा गांधी निवासी बालीका विद्यालयात कंत्राटी शिक्षकेत्तर कर्मचारी आहोत आमची निवड जिल्हा निवड समिती मार्फत झालेली असुन आम्हाला खुप कमी मानधनात काम करावे लागत आहे शासनाने कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय शिक्षणापासुन पुर्णपणे वंचित राहिलेल्या तसेच शाळा अर्धवट सोडुन निरक्षरतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मुलींकरीता त्यांचे किमान इ १२ वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करण्याकरिता कस्तुरबा गांधी निवाशी बालीका विद्यालय व निवासी वस्तीगृह सुरू केलेली आहेत व ते वस्तीगृह व शाळा चालविण्याकरीता विविध स्तरावर समित्या गठीत करून शासनाने ते वर्ष 2008 साली सुरू केलेले आहेत व आम्ही तिथे कंत्राटी शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणुन कार्यरत आहोत व आम्हाला मुख्यकार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद यांच्या कडुन नियुक्ती मिळालेली आहे तसेच आम्ही पुढील पदावर कार्यरत आहोत स्वयंपाकी , सहायक स्वंयपाकी, चौकीदार , शिपाई इत्यादी शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणुन काम करत आहोत या मध्ये दोन प्रकारच्या शाळा आहेत आहेत एक टाईप 1 व दुसरी टाईप 4 यामध्ये टाईप 1 मध्ये निवाशी शाळा येतात व टाईप 4 मध्ये निवासी वस्तीगृह आहे आम्हाला येथे टाईप 1 मध्ये शिक्षकेत्तर कर्मचारांना 9450 इतके मानधन मिळते तसेच टाईप 4 मधील शिक्षकेत्तर कर्मचारांना 5500 मानधन मिळते व कामाचे तास हे 12 तास आहे याचे सनियंत्रण प्रकल्प संचालक सम्रगशिक्षा अभियाण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद करते आजच्या माघाई च्या जमान्यात हे मानधन खुप कमी आहे तरी आम्हाला समान काम समान वेतन नुसार किमान वेतन18000 रू मिळावे एकिकड आरोग्य विभागाचा सुरक्षारक्षकला 25000 हजार मानधन मिळते व आम्हाला 5500 रुपये मानधन मिळते तरी आपणास हि विनंती आहे कि आपण आमच्या ह्या विषयात लक्ष्य देऊन कामाचे तास 8 तास करण्यात यावे व किमान 18000 रू मानधन आम्हाला मिळून घ्यावे हीच विनंती बराच वर्षा पासुन आम्ही कंत्राटी व खुप कमी मानघनावर काम करत आहोत आमचा विचार आपण करावा हि नम्र विनंती आपले विश्वासू

    ReplyDelete