दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी जवाहर बाल भवन, चर्नी रोड, मुंबई येथे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्यासोबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक पदाधिकारी बैठक झाली.
![]() |
आयुक्तांच्या बैठकीबाबत शिक्षण उपसंचालक यांचे पत्र. |
![]() |
बैठकीसाठी आमदार कपिल पाटील यांनी आयुक्त यांना दिलेलं पत्र |
1 नोव्हेंबर पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत
आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार आणि शिक्षणमंत्री मा. श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित किंवा तुकडीवर नियुक्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तर चर्चा केली होती. सर्व कर्मचाऱ्यांची एकूण संख्या निश्चित करावी. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास लागणाऱ्या आर्थिक भाराची सविस्तर माहिती घेऊन प्रस्ताव तयार करण्यात यावा असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. वित्त विभाग आणि शिक्षण विभाग यांनी संयुक्तपणे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
(या संदर्भातला 17 जून 2021 चा सविस्तर ब्लॉग जरूर वाचा. Tap to read - http://subhashkisanmore.blogspot.com/2021/06/blog-post_17.html)
त्यानुसार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी बैठकीत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची एकूण राज्यातील संख्या 26 हजार 550 असून आर्थिक भाराची माहिती घेण्याचे काम सुरू आहे असे सांगितले. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची सविस्तर अचूक माहिती येत नसल्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोठा आर्थिक भार पडेल अशा प्रकारचे वक्तव्य वित्त विभागाकडून वारंवार होत होते. म्हणून आमदार कपिल पाटील दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षण संचालकांना पत्र देऊन निश्चित संख्या विचारली होती. त्या अनुषंगाने राज्यभरातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अदययावत माहिती प्राप्त झाली आहे. या माहितीच्या आधारे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव तयार करणे सोपे जाणार आहे.
शिक्षण विभागाकडे आलेल्या माहितीनुसार आज रोजी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित किंवा तुकडीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 26550 निश्चित करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांची पीएफ कपात नियमितपणे होत आहे. शासनाने सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला तर शासनावर पडणारा आर्थिक भार अत्यल्प आहे असे मत आमदार कपिल पाटील यांनी मांडले. या 26 हजार 550 कर्मचाऱ्यांना डीसीपीएस अथवा एनपीएस मध्ये वर्ग केल्यास त्यांचे पीएफ कटिंग बंद होणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला दरमहा दहा टक्के रक्कम एनपीएस मध्ये कपात करून द्यावी लागेल. या रकमेत शासनाला शासन हिस्सा म्हणून 14 टक्के रक्कम कपात करावी लागणार आहे. 26550 कर्मचाऱ्यांना 14 टक्के शासन हिस्सा दिल्याने पडणारा आर्थिक भार हा जुनी पेन्शन योजना लागू केल्यास पडणाऱ्या आर्थिक भारापेक्षा जास्त होऊ शकतो. शासनाने अनुदान सूत्र पाळून वेळीच अनुदान न दिल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष विनावेतन काम करावे लागले आहे. निदान निवृत्तीच्या वेळी तरी जुनी पेन्शन योजना लावून या सर्व शिक्षकांचा सन्मान शासनाने केला पाहिजे अशी भूमिका शिक्षक भारतीने मांडली.
12 वर्षे व 24 वर्षे वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण
राज्यभरात 12 वर्ष 24 वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी यांचे प्रशिक्षण होत नसल्याने हजारो शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळालेला नाही. शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणांमुळे अनेक शिक्षक काही लाभ न घेता निवृत्त झाले किंवा मृत पावले आहेत. वेतनश्रेणीचे प्रशिक्षण ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार आणि नक्की कधी होणार याबाबत संभ्रम पसरलेला आहे. आज शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी ऑक्टोबर महिन्यात ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याचे जाहीर केले. हे ऑनलाईन प्रशिक्षण दहा दिवसांचे असून प्रशिक्षणाची उद्दिष्टे, विषय निश्चिती, घटकांची निश्चिती, वेळापत्रक तयार करणे, अभ्यासक्रमानुसार ऑनलाइन मॉडेल तयार करणे, रेकॉर्डिंग करणे कामे अंतिम टप्प्यात असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ट्रेनिंग जाहीर करण्यात येणार आहे असे सांगितले.
(या संदर्भातला 24 ऑगस्ट 2020 चा सविस्तर ब्लॉग जरूर वाचा. Tap to read - http://subhashkisanmore.blogspot.com/2020/08/blog-post_24.html)
बैठकीत शिक्षण आयुक्तांनी खालील विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.
1) बीडीएस संगणक प्रणाली बंद असल्यामुळे हजारो शिक्षकांना वैद्यकीय बिले, थकीत बिले तसेच स्वतःच्या हक्काचे पीएफचे पैसे मिळत नाहीत. तात्काळ बीडिएस प्रणाली सुरू झाली पाहिजे अशी मागणी शिक्षक भारतीने केली.माननीय शिक्षण आयुक्तांनी 30 सप्टेंबरपर्यंत सर्व बिलांची रक्कम अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
2) मुंबईसह राज्यातील शालार्थ आयडी देण्याची प्रक्रिया विलंबाने होत असल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. मुंबईतील उपसंचालक कार्यालयात 500 पेक्षा अधिक प्रस्ताव प्रलंबित असल्याचे शिक्षक भारतीने सांगितले. त्यावेळी शिक्षण उपसंचालक श्री संगवे यांनी 400 शालांर्थ आयडि देण्याचे काम पूर्ण झाले असून येत्या आठ दिवसात उर्वरित 100 शालार्थ आयडीचे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले. तसेच शालार्थ आयडीसाठी शिक्षण विभागातील कोणत्याही कर्मचाऱ्याला पैसे देऊ नये असे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी केले.
3) कोविड ड्युटी करताना कोविडची लागण झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विशेष रजा देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवण्याचे आश्वासन दिले.
4) सुट्टीच्या कालावधीत बीएलओ ड्युटी करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना बदली रजा देऊन त्यांची नोंद सेवा पुस्तकात करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.
सोबत प्राथमिक शिक्षकांच्या वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा, प्राथमिक पदवीधर / विषय शिक्षकांना सरसकट ४३०० ग्रेड पे वेतन, आंतर जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदली, कोविड ड्युटी केलेल्या कर्मचारी यांना विशेष रजा, मृत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना १० लाख सानुग्रह अनुदान यासह विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
शिक्षण आयुक्त सोबतच्या बैठकीत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, खजिनदार विलास परेरा, चंद्रकांत म्हात्रे, कैलास गुंजाळ, एबीई शाळेचे सचिव फादर डेनिस, फादर केनी, मुख्याध्यापिका डॉमिनिका डाबरे, प्राथमिक शिक्षक भारतीचे सरचिटणीस भरत शेलार, नाशिकचे अध्यक्ष प्रकल्प पाटील, रायगडचे हरिशचंद्र साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
good
ReplyDeleteआपल्या कार्याला सलाम.खरोखरच आ. कपिल पाटील साहेब यांच्या मदतीने आपण शिक्षकांचे प्रश्न आणि समस्या तडीस नेता.
ReplyDeleteजय शिक्षक भारती.
लढेंगे, जितेंगे.
Good
ReplyDeleteनागपूर जिल्ह्यात 7 व्या वेतन आयोगाचा थकित पहिला व दुसरा हप्ता व्याजासह त्वरीत मिळावा. लढेंगे..जितेंगे.जय शिक्षक भारती.
ReplyDeleteलय भारी, जय शिक्षक भारती.
ReplyDelete2005 नंतरच्या शिक्षकांचा ही समावेश जुनी पेन्शन योजनेत करण्यासाठी प्रयत्न व्हावे...
ReplyDeleteवरील कार्यास सलाम व शुभेच्छा
आभारी आहे 🙏,,,अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Deleteलढेंगे जितेंगे.
ReplyDeleteGreat sir, Thank you
ReplyDeleteGreat sir
ReplyDeleteअभिनंदन💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteक्या 10 20 30 वेतन श्रेणी लूंगा होगा ?
ReplyDeleteक्या हैल्थ कॉर्ड शिक्षकों को भी मिलेगा?
क्या शिक्षकसेवक खत्म होगा ?
शिक्षकों के साथ अन्याय कब तक ????
इसके बारे मे विचार होना चाहिए।
Delete1 तारीख मानधन कब से ????????
ReplyDeleteअभिनंदन great work sirji
ReplyDeleteखूप सुंदर काम साहेब खूप महान कार्य नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आपण असेच प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद साहेब धन्यवाद
ReplyDeleteशिक्षणसेवक मानधन वाढ बद्दल एकही मुद्दा नाही
ReplyDeleteशिक्षण सेवक हा शिक्षक नसून राज्यकर्त्यांच्या दृष्टीने तो गुलाम अथवा वेठबिगार आहे त्यामुळे शिक्षण सेवकांचा प्रश्न महत्वाचा नाही. नियमित झाल्यावर हा घडलेला घटनाक्रम लक्षात ठेवा म्हणजे झालं. नाहीतर बसा यांचे झेंडे घेऊन मिरवत.
ReplyDeleteअतिशय उल्लेखनीय व दिलासादायी निर्णय आहेत सर, मा. आ. कपिल पाटील सरांच्या कार्यास सलाम... आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.. 💐
ReplyDeleteSevsavrkshan tapyvaril shikshakanche agodar
ReplyDeleteसलाम
ReplyDeleteआंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यास शासन खूप उशीर करीत आहे.पती-पत्नी एकत्रिरण विनाअट झाले पाहिजे
ReplyDeleteबदली प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्यासाठी शासनाला आग्रह केला पाहिजे ही नम्र विनंती ������
ग्रेट वर्क पाटील साहेब
ReplyDeleteआंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यास शासन खूप उशीर करीत आहे.पती-पत्नी एकत्रिरण विनाअट झाले पाहिजे
ReplyDeleteबदली प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्यासाठी शासनाला आग्रह केला पाहिजे ही नम्र विनंती 🙏🙏🙏
लढेंगे जितेंगे
ReplyDeleteतात्काळ जुनी पेन्शन संदर्भात निर्णय झाला पाहिजे करण उमेदीचा काळ असाच गेला किमान उतरता काळ तरी सुखकर जावा ही माफक अपेक्षा
ReplyDeleteRight
Deleteअतिशय उत्तम काम कपिल पाटील करीत आहेत.यापुढेही असेच प्रयत्न करत रहावे ही विनंती
ReplyDeleteउत्तम, खूप छान
ReplyDeleteएक एक करून आदरणीय आमदार कपिल पाटील साहेब शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवतील हा विश्वास आहे
ReplyDeleteरक्तकर्ण प्रा किरण थोरात
संघटक शिक्षक भारती पालघर जिल्हा
2005 नंतरच्या शिक्षकांना पण जुनी पेन्शन मिळावी.या करिता आपण प्रयत्न कराल ही अपेक्षा
ReplyDelete2005नंतरच काय
ReplyDeleteउत्तम, लवकरच शासन आदेश निर्गमित होतील.
ReplyDeleteमा. कपिल पाटील साहेब आणि सोबतची सर्व मान्यवर खूपच प्रभावी काम करत आहात.यापुढेही आपण असेच प्रभावी आणि परिणामकारक काम करत रहावे ही आपणास नम्र विनंती.
ReplyDeleteआपल्या प्रयत्नांना यश येवो व शिक्षकानं वर पुन्हा पुन्हा कोर्ट केस लढवण्याची वेळ न येवो हीच अपेक्षा🙏
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteसर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी आमदार कपिल पाटील यांची असलेली धडपड ही सर्वांच्या मनात सदैव राहील. धन्यवाद महोदय.
ReplyDeleteGood work
ReplyDeleteआज सेवानिवृत्त झालेल्यांचा कृपया विचार व्हावा माझे पती मे 2017 साली सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही 🙏🏻
ReplyDeleteमहत्वपूर्ण व ज्वलंत शैक्षणिक विषयावर सभेचे आयोजन केले. सकारात्मक निर्णय झाले. खूप खूप अभिनंदन 🌹🌷🌹🌷
ReplyDeleteशतश:आभारी आहोत.
ReplyDeleteशिक्षक हा संयमाचा महामेरू आहे.अंत पाहू नका.सुखाचा एक घास जिवंतपणी त्याला मिळावा हिच एक किमान व माफक अपेक्षा आहे.
त्याकरिता त्याला संघर्ष करावा लागतो हि शरमेची बाब आहे.
सन्मा. पाटील सरांनी वेळोवळी केलेले कार्य फारच अतुलनीय आहे.मनापासून धन्यवाद आणि आभारी आहोत.
सेवानिवृत्त शिक्षिका.
शिक्षक हृद्यसम्राट मा. पाटील साहेब व शिक्षक भारती टीम चे आभार मानले तितके कमीच आहे कारण कोरोना काळात ही साहेब शिक्षकाँच्या प्रश्नासाठी झटत आहे साहेब आपल्या कार्याला सलाम
ReplyDeleteशिक्षक बदली संदर्भात काय सांगितले गेले सर ह्या दिवाळीत होण्याचे संकेत आहार का करण soft ची आताशी निविदा देण्यात आली आहे 14 sep 21 ला
ReplyDeleteशिक्षक बदली संदर्भात काय सांगितले गेले सर ह्या दिवाळीत होण्याचे संकेत आहेत का करण soft ची आताशी निविदा देण्यात आली आहे 14 sep 21 ला
ReplyDeleteGreat work 👍💐
ReplyDeleteGreat work
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteवस्तीशाळा शिक्षकाचा मागील सेवेच्या संदर्भात चर्चा झाली ही आतिशय महत्वाचे आहे. परंतु लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा ही मनापासून अपेक्षा करतो पाटील साहेबांना धन्यवाद देतो
ReplyDeleteबरोबर सर कारण खूप गुरूजी सेवानिवृत्ती च्या उंबरठ्यावर आहेत
Deleteविनंती आहे की 2005 नंतरच्या साठी जूनी पेन्शन योजनेसाठी प्रयत्न करावेत .
ReplyDeleteशिक्षकासाठी व शिक्षकेतरांसाठी शासनदरबारी लढून यश संपादन क
ReplyDeleteरणाऱ्या शिक्षक भारती संघटनेचा सदस्य या नात्याने विजय असो
लढेगे जितेगे
जय शिक्षक भारती
सर विनाअनुदानित शाळांचे काय, प्रचलित चे काय ?
ReplyDelete2005 nantarche teacher man aahet OPS
Deleteअतिशय उत्तम कामगिरी करणारी फक्त एकच संघटना म्हणजे शिक्षक भारती. हे पुन्हा एकदा सिद्ध. जय शिक्षकभारती.
ReplyDeleteतेव्हड शिक्षणसेवक
ReplyDeleteमानधन वाढीचा विषय मार्गी लागला तर खूपच आभारी राहू
लवकर जि.आर. निघाला पाहिजे धन्यवाद
ReplyDeleteजुनी पेन्शन योजनेचा लवकरात लवकर जीआर काढावा
ReplyDeleteFor Selection grade pay scale online training should be arranged as early as possible because most of the teachers are facing problems only because trIning is not organised since few years and their years are left only few those who are above 54 years they need not have the training because they are on the brink of retirement
ReplyDeleteशिक्षण सेवकांच्या तुटपुंज्या मानधनाबाबत प्रयत्न करावे ही विनंती
ReplyDeleteAntarjilla badli lavkr निर्णय घ्यावा ,ऑनलाईन process suru करावी की जेणे करून badligrastanna लवकर त्यांच्या jilyat , family Madhe jata येईल
ReplyDeleteवस्तीशाळा शिक्षक यांच्या बरोबरीने 2003 वर्षी अप्रशिक्षित शिक्षण सेवक म्हणून लागलेल्या शिक्षकांचा
ReplyDeleteसेवा कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणी साठी ग्राह्य धरण्यात यावा.
8482824588 सर आपल्या कडे काम आहे
ReplyDeleteआपला मोबाईल क्रमांक पाहिजे
ReplyDeleteलढेंगे जितेँगे जय शिक्षकभारती
ReplyDeleteGreat job sir
ReplyDeleteविजय असो, पाटील साहेब तुम्ही पुढे चला आम्ही आपल्या सोबत आहोत..
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteहार्दिक हार्दिक अभिनंदन...
ReplyDeleteजिल्हयातल्या जिल्हयात बदली झाल्यास कोकण विभागाप्रमाणे बदली मान्यतेची गरज नसावी
ReplyDeleteशिक्षकांच्या हक्कासाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांची मेहनत नक्की फलदायी ठरणार आहे हा आम्हा सर्वांना ठाम विश्वास आहे
ReplyDeleteपण ज्या माझ्या सारख्या २५ वर्षे रजा मुदतीतील शिक्षणसेवक म्हणून अजूनही कायम न झालेल्या शिक्षकाचे काय?
ReplyDeleteनमस्कार साहेब आपल्याला एक नम्र विनंती आहे की चतुर्थ श्रेणी कर्मचारी बांधवांचा आकृतीबंध निश्चित करण्यात यावा.
ReplyDeleteकाही ठिकाणी एक ही नाही.तर काही ठिकाणी कमी आहेत. आकृतीबंध लागू झाला तर सर्वत्र समतोल येईल.
Great work
ReplyDeleteAbhinandan hon MLC Kapil Patil saheb & More sir & Shishak Bharati team
ReplyDeleteशिक्षक आमदार असावा तर असा, शिक्षकांचे प्रश्न तळमळीने तडीस नेणारा नेता.
ReplyDeleteजुनीच pension विना अनुदानित प्रचलित महत्त्वाचे आहे या कडे पाटील साहेबांनी लक्ष घातले तर खूप बर होइल
ReplyDeleteGreat work
ReplyDeleteखूप छान साहेब, शिक्षकांचे तारणहार श्री कपील पाटील साहेब यांनी शासन व प्रशासन यांच्या कडे ज्या मागण्या मांडल्या ,त्या निश्चितच मंजूर करून घेतील, सलाम आपल्याला कार्याला,जय शिक्षक भारती ,जय सेवा दल
ReplyDeleteनिवड श्रेणी सरसकट द्यायला हवी.केंद्रात जर सर्वांना मिळते तशी
ReplyDeleteबीपीएड विद्यार्थ्यांचा ही प्रश्न सोडवा
ReplyDeleteलांबणीवर पडलेल्या ऑनलाईन बदल्या त्वरित व्हाव्यात ही विनंती
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteखूपच छान सर
ReplyDeleteआपण हाती घेतलेले कोणतेही काम तडीस जातेच हा पूर्वानुभव असल्याने ५ नोव्हेंबर २००५ पूर्वी फक्त शिक्षक कर्मचाऱयांचा पेन्शन हसणं मार्गी लागेल यात शंकाच नाही .याबद्दल आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीने घेतल्या अथक प्रयत्नांचे अभिनंदन 👍👍
ReplyDeleteअथक प्रयत्न.यश लाभो✌
ReplyDeleteThanks you sir.
ReplyDeleteवस्तीशाळा शिक्षकांची मागील सेवा बद्दल चर्चा केली धन्यवाद. पण विषय लवकर मार्गी लागावा ही मापक अपेक्षा 🙏
ReplyDeleteसर वस्तीशाळेतील जे शिक्षक २००१ च्या अगोदर डि.एड.प्रशिक्षित आहेत त्यांना २००१ पासून वेतन श्नेनी लागू करावी.
ReplyDeleteसर ४३०० ग्रेड पै च्या शिक्षकांना ७ व्या वेतनात ज्युनिअर केले व ४२०० ग्रेड पै घ्या शिक्षकांना सिनियर केले
ReplyDeleteपद्दोनती घेतलेल्या शिक्षकांना आयोगाने सजा दिली
खरे आहे का?
रिप्लाय देणे