Wednesday 21 February 2024

अल्पसंख्यांक शाळा - कॉलेजमधील नियुक्त्यांचा मार्ग मोकळा



शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अल्पसंख्यांक शाळांतील नियुक्तीयांवर मे 2020 पासून बंदी घातली होती. हजारो अल्पसंख्यांक शाळातील शेकडो पदे रिक्त असल्याने कार्यरत शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत होता.

आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अल्पसंख्यांक शाळातील नियुक्तयांचा मार्ग मोकळा झाला आहे. विहित प्रक्रिया राबवून नियुक्ती केल्यास मान्यता देण्यास परवानगी दिली आहे.

अल्पसंख्यांक शाळेतील भरती प्रक्रियेत बंदी असल्याने गेल्या अनेक वर्षापासून नवीन भरती करता येत नव्हती. शालेय शिक्षण विभागाने भरतीवरील बंदी उठवल्याने रिक्त पदांच्या 50 टक्के पदांना भरती करण्याची परवानगी मिळालेली आहे. अल्पसंख्यांक शाळेतील पदांना भरताना शालेय शिक्षण विभागाची ना हरकत घेण्याची आवश्यकता नाही. अल्पसंख्यांक शाळेतील रिक्त पदांची जाहिरात देऊन भरती करायची आहे. सदर भरती करत असताना भरती प्रक्रियेचा अवलंब करून त्यांना मान्यता मिळण्याबाबतचे प्रस्ताव शिक्षक निरीक्षक कार्यालयात सादर करायचे आहेत. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील नियुक्त्यांचे प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर करायचे आहेत.



शिक्षक भारती संघटनेतर्फे अल्पसंख्यांक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील नियुक्तांना पंधरा दिवसात मान्यता देण्याबाबतची मागणी केलेली आहे. अल्पसंख्यांक शाळात नियुक्त करताना कोणत्याही दबावाला बळी न पडता गुणवंत व शैक्षणिक अहर्ता प्राप्त शिक्षकांची नियुक्ती करावी. मान्यता मिळणे बाबत कोणतीही समस्या उद्भवल्यास शिक्षक भारती कार्यालयाशी संपर्क साधावा.

धन्यवाद


आपला स्नेहांकित,

सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती



9 comments:

  1. जय शिक्षक भारती! लढेंगे, जितेंगे!!👍👍👍

    ReplyDelete
  2. लढेंगे, जितेंगे!जय शिक्षक भारती!!👍👍

    ReplyDelete
  3. सर आपले आणि मा. आ. कपिल पाटील साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद... राज्यातील दिव्यांगाच्या शाळा कार्यशाळा आणि मतिमंद बालगृहातील गेल्या 10 वर्षांपासून भरती बंद आहे. समायोजनाच्या नावाखाली या भरतीप्रक्रियेसाठी आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांच्याकडून NOC दिली जात नाही. यामुळे दिव्यांगाच्या शिक्षण हक्काची पायमल्ली केली जात आहे. शासनास यासाठी आपल्या माध्यमातून इशारा द्यावा, ही विनंती.. 🙏

    ReplyDelete
  4. Replies
    1. खूप उत्तम कार्य आहे... शुभेच्छा

      Delete