Saturday 11 January 2020

मुंबई महानगरपालिकेतील 532 शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा


शिक्षक भारती मुंबई मनपा युनिट आणि आमदार कपिल पाटील यांनी मुंबई मनपा आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत महानगर पालिकेतील रिक्त जागांवर भरती तातडीने सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मनपा आयुक्तांनी राज्य शासनाला रिक्त जागांची माहिती सादर केली. शिक्षण विभागाने मुंबई मनपातील रिक्त जागांवर पवित्र पोर्टल मार्फत भरती करण्याची प्रक्रिया सुरु करण्यास परवानगी दिली. त्यांनतर राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी मुंबई मनपातील रिक्त जागांवर पवित्र पोर्टल मार्फत भरती सुरु केली. त्याअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेने 659 पदांसाठी जाहिरात पोर्टलला दिली. त्यानुसार 9 ऑगस्ट 2019 रोजी 483 उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यांना शिफारस पत्र देण्यात आले. या प्रक्रियेनुसार 13 ऑगस्ट 2019 ते 26 ऑगस्ट 2019 दरम्यान उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण केली.

252 उमेदवारांना त्यांचे 10 वी आणि काहिंचे 12 वी शिक्षण मराठी माध्यमातून असल्या कारणाने त्यांना नियुक्ती पासुन वंचित ठेवण्यात आले. या संपूर्ण अभियोग्यताधारक व कागदपत्र पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या अन्यायग्रस्त उमेदवारांनी आमदार कपिल पाटील यांचे कार्यालय गाठले व झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागितली या गोष्टीची आमदार कपिल पाटील यांनी गांभिर्याने दखल घेऊन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा लावून धरला त्यांच्या अथक प्रयत्नाअंतर्गत दि. 7 जानेवारी 2020 रोजी कपिल पाटील यांनी स्वतः महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांची भेट घेऊन मुद्दा मांडला त्यानुसार आयुक्तांनी या गोष्टीची तातडीने दखल घेत कपिल पाटील यांच्या समोरच नियुक्ती बाबतचे दस्ताऐवज बोलवून लगेच त्यावर निर्णय घेतला आणि महापालिकेची अट शिखिल करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. 280 उमेदवारांच्या नियुक्तीमध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचनींना दूर करून त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश मा. आयुक्तांनी लगेच दिले. त्यामुळे आता 280 उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली आहे. शिक्षणाचे माध्यम मराठी असल्याने उर्वरित 252 उमेदवारांची इंग्रजी ज्ञानाची चाचणी घेऊन त्यांना नियुक्ती देण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. 

या 252 उमेदवारांना इंग्रजी चाचणीच्या पूर्व तयारी साठी शिक्षक भारती कार्यालयात आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य प्रशिक्षण शिबिर आज पासून सुरु करण्यात आले आहे. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचे इंग्रजी शिक्षक आणि ब्रिटिश कॉन्सिलचे तज्ज्ञ् मार्गदर्शक श्री. धर्मराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. सोमवार दि. 13 जानेवारी ते शुक्रवार दि. 17 जानेवारी 2020 या कालावधीत प्राथमिक व माध्यमिक विभागातील उमेदवारांना ब्रिटिश कॉन्सिलच्या तज्ज्ञ् मार्गदर्शकांद्वारे इंग्रजीचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. श्रवण, वाचन, संभाषण आणि  मूलभूत भाषिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन या 252 उमेदवारांना इंग्रजीच्या प्रभावी अध्यापनासाठी मदत करण्याचे काम शिक्षक भारती करत आहे. ज्या उमेदवारांना अद्यापी प्रशिक्षण वर्गाची माहिती मिळालेली नाही त्यांनी सोमवार पासून सुरु होणाऱ्या प्रशिक्षण वर्गास उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी आज केले. 


आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती यांच्या प्रयत्नामुळेच 280 उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर उर्वरीत 252 उमेदवारांना इंग्रजी चाचणी नंतर नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. 

टीईटी उत्तीर्ण एकूण या 532 उमेदवारांना आमदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नामुळे मुंबई महानगरपालिकेत नियुक्ती मिळत आहे. त्यामुळे मुंबई मनपातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणारी शिक्षक भारती नेहमीच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते. 

- सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती 

17 comments:

  1. Thanks for Your Co operation Sirjii...

    ReplyDelete
  2. या जाहिराती मधेच मराठी आणि हिंदी ला प्रत्येकी 24 जागा होत्या पण त्या आम्ही पात्र असून आम्हाला मिळाल्या नाही कारण आमचे माध्यम मराठी आहे.त्या जागा तश्याच रिक्त आहेत.आपणास विनंती आहे की कृपया त्या जागा मराठी माध्यमातील मुलांना मिळाव्यात.कारण भाषा शिकवण्यासाठी माध्यमाची अडचण येतच नाही.कृपया लक्ष देऊन आम्हाला न्याय द्या!!

    ReplyDelete
  3. Well done sir,
    Thanks you sir.

    ReplyDelete
  4. सन्मा. आमदार कपिल पाटील यांना मनःपूर्वक धन्यवाद. आपण भविष्यातही आपली शिक्षकांना साथ राहिल . या बद्दल शंकाच नाही. नमस्कार.

    ReplyDelete
  5. मा. आमदार कपिल पाटील साहेबाचे मनपूर्वक आभार

    ReplyDelete
  6. ट्रेनिंगच्या काळामध्ये राहण्याची सोय करावी, ही आपल्याला नंबर विनंती .

    ReplyDelete
  7. सन्माननीय आमदार कपिल पाटील साहेब यांचे मनपुर्वक आभार....साहेब आम्हाला 6 ते 8 साठी adjust केलं गेलं आहे परंतु आमचे इतर शिफारसपात्र सहकाऱ्यांचे जेव्हा काम होणार तेव्हाच खर समाधान होणार...

    ReplyDelete
  8. It is a privilege that SHIKSHAN BHARTHI considered me Eligible to train the teachers in English language.
    It's a social service for a worthy cause as teachers are the Nation builders.

    ReplyDelete