Saturday, 10 April 2021

शिक्षक भारतीने केस जिंकली

मुंबईतील 2012 नंतर नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे हायकोर्टाचे आदेश


मुंबईतील अनेक प्रकल्पांमुळे झालेले विस्थापन व स्थलांतर यामुळे दक्षिण मुंबईतील विद्यार्थी संख्या कमी झाली. परिणामी, शाळांच्या अनुदानित तुकडया कमी झाल्या. मात्र उपनगरात विस्थापितांच्या व स्थलांतरीच्या पुनर्वसनामुळे तेथील शाळांमध्ये तुकडया वाढल्या. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अन्यत्र रिक्त जागेवर झाले असले तरी स्थलांतरित तुकडयांचे समायोजन वाढीव तुकडयांवर झालेले नव्हते. आमदार कपिल पाटील यांच्या पहिल्या निवडणुकीत प्रचारा दरम्यान अशा अनुदानित शाळांतील वाढीव विनाअनुदानित तुकडीवर कार्यरत शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनाचा प्रश्न समोर आला. दक्षिण मुंबईतील बंद पडलेल्या अनुदानित तुकड्यांचे समायोजन उपनगरातील वाढीव तुकड्यांवर करण्याची मागणी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने केली होती.

अनुदानित तुकड्यांचे समायोजन 
तत्कालिन शिक्षण सचिव दिवंगत श्रीमती शर्वरी गोखले आणि त्यांच्यानंतर आलेले शिक्षण सचिव व नुकतेच मुख्य सचिव म्हणून निवृत्त झालेले श्री. संजय कुमार यांनी मुंबईतील या समायोजनांसाठी दि. 12 जून 2007, दि. 7 जून 2008, 2 फेब्रुवारी 2009, दि. 25 मे 2012 आणि 21 फेब्रुवारी 2013 रोजी विशेष शासन निर्णय करून हा प्रश्न सोडवला. मुंबईतील रिक्त जागांबाबत मा. हायकोर्टाने वर्तनमानपत्रातील बातमी वाचून जागा भरण्याचे सुमोटो आदेश दिले. सुमारे 350 अनुदानित तुकड्यांचे उपनगरातील वाढीव तुकड्यांवर समायोजन करण्यात आले. मुंबईतील कार्यरत शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी विशेष जीआर निर्गमित करण्यात आले. एकाही कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ दिला नाही. त्यानुसार विनाअनुदानित तुकड्यांवर कार्यरत शिक्षकांना मान्यता मिळाल्या. पहिल्या दिवसांपासून 100 टक्के पगार सुरु झाला. नियुक्ती दिनांकापासून सर्व फायदे मिळाले.

चौकशीचा फेरा
मुंबईतील वाढीव तुकडयांवर कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना आमदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने शंभर टक्के पगारावर मान्यता मिळाली होती. 350 तुकडयांवर सुमारे 600 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना पूर्णवेळ वेतनाचा निर्णय झाला होता. भाजप प्रणित शिक्षक परिषद आणि मुंबई टीडीएफ संघटनेने तुकडी वाटपामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. बेकायदेशीर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याची आरोळी उठवून नियुक्त्या रद्द करण्याची मागणी तत्कालीन शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्याकडे केली. शिक्षक भारती आणि कपिल पाटील यांच्यावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत शिक्षणमंत्र्यांनी या शिक्षक, शिक्षकेतरांच्या मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण निरीक्षक व शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत चौकशीचा फार्स रचून मान्यता रद्द करण्यात आल्या. 10 ते 12 वर्ष सेवा करणाऱ्या आणि पूर्ण पगार घेणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालवल्या. गृहकर्जाचे हफ्ते थकले. दैनंदिन खर्च भागेनासा झाला. हजारो रुपये फी देऊन सर्वांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या.

दरम्यान शिक्षणमंत्री बदलले. नवीन शिक्षणमंत्री  श्री. आशिष शेलार यांच्या काळात याबाबत फेरविचार झाला. त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. शिक्षण आयुक्त श्री. सोळंकी यांनी दि. 16 मार्च 2019 रोजी शासनाने बंद तुकडयांचे केलेले समायोजन व वाढीव तुकडीवर केलेले समायोजन व दिलेल्या मान्यता पुढे चालू ठेवणे योग्य राहिल. मान्यता रद्द केल्यास न्यायालयीन प्रकरणे उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी स्पष्ट शिफारस केली. पण शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त श्री. सोळंकी यांच्या अहवालाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

महाविकास आघाडीचे सरकार आले पण... 
नवीन शिक्षणमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्याकडे 2012 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मान्यता सुरु ठेऊन वेतन पूर्ववत सुरु करण्याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती समवेत दोन बैठका झाल्या. पण निर्णय झाला नाही. शिक्षक, शिक्षकेतरांचे बंद असलेले पगार पूर्ववत सुरु करण्याबाबत काही प्रकरणात मा. हायकोर्टाने स्थगिती देऊनही सर्वांसाठी पगार सुरु करण्याचा निर्णय झाला नाही. 40 शिक्षकांच्या प्रकरणात मा. हायकोर्टानेअंतिम आदेश देऊन पगार तातडीने सुरु करण्याचा स्पष्ट निकाल दिला. मा . हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर करून शिक्षण विभागाने इतर सर्व प्रकारणांबाबत तातडीने निर्णय घेऊन पगार सुरु करण्याचे आदेश द्यायला हवे होते. पण तसे न करता  सुप्रीम कोर्टात अपील करण्यासाठी संबंधित बाब शिक्षण विभागाने विधी व न्याय विभागाकडे पाठवली. विधी व न्याय विभागाने सुप्रीम कोर्टात जाणे उचित ठरणार नाही असे स्पष्ट शब्दात दोनदा कळवले. तरीही शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभाग निर्णय घेत नाही. असे असेल तर या महविकास आघाडीचा उपयोग काय? असा प्रश्न निर्माण होतो.

अखेर कोर्टानेच ताशेरे ओढले 
मुंबईतील 2012 नंतरच्या कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या शिक्षण विभागाने बेकायदेशीर ठरवून अमान्य केल्या होत्या. मागील दोन वर्षांपासून या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार बंद पडल्याने उपासमारीची वेळ आली होती. अखेर या शिक्षक, शिक्षकेतर यांच्यावतीने दाखल केलेल्या याचिकेवर मा. हायकोर्टाने अंतिम निकाल देत शिक्षण विभागाचे आदेश रद्द केले. शिक्षक भारतीच्या वतीने  अ‍ॅड. सचिन पुंडे यांनी मा. हायकोर्टात बाजू मांडली होती.

न्यायमूर्ती श्री भडंग आणि न्यायमूर्ती श्री जामदार यांच्या डबल बेंच कोर्टाने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढत शिक्षण विभागाचे आदेश रद्द केले. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर यांचे पगार थकबाकीसह देण्याचे आदेश दिले आहेत. 
(मुंबईतील 2012 नंतर नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे मा. हायकोर्टाने दिलेले  आदेश वाचण्यासाठी https://bit.ly/322OESw या लिंकवर क्लीक करा.)

या प्रश्नाला खो घालण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाच्या सचिवांनीच केला होता. याशिवाय पेन्शनचा प्रश्न, रात्रशाळा, कला-क्रीडा शिक्षक आणि संचमान्यतेबद्दल मागच्या सरकारच्या काळातले अन्यायकारक जीआर मागे घेण्याबाबत तसेच शिक्षण, शिक्षक यांच्या इतर विविध प्रश्नांबाबत कपिल पाटील यांनी घेतलेली आग्रही भूमिका, पाठपुरावा यालाही हरकत घेत, सचिवांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे कपिल पाटील यांची तक्रार केली. अनेक खोटेनाटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. परंतु सचिवांच्या या सगळ्या खटाटोपाला हायकोर्टानेच वरील निर्णयातून परस्पर उत्तर दिलं आहे.

हायकोर्टाने अंतिम निकाल दिल्याने निदान आता तरी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार पूर्ववत सुरु होतील.
लढूया, जिंकूया!

- सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष,शिक्षक भारती


101 comments:

  1. good!अभिनंदन 💐
    जय शिक्षक भारती 👍
    लढेगे ...जितेंगे ..👍

    ReplyDelete
  2. शिक्षक भारतीच हे काम करू शकते असे पूर्ण विश्वास आता सर्वांनाच होत आहे... जय शिक्षक भरती

    ReplyDelete
  3. जय शिक्षक भारती
    लडेंगे ! जितेंगे !

    ReplyDelete
  4. अभिनंदन आणि धन्यवाद

    ReplyDelete
  5. लडेंगे ! जितेंगे !
    जय शिक्षक भारती!

    ReplyDelete
  6. जय शिक्षक भरती सर

    ReplyDelete
  7. लडेंगे ! जितेंगे !!
    जय शिक्षक भारती!

    ReplyDelete
  8. Hearty congratulations sir ji. U people are real warrior

    ReplyDelete
  9. खूपच मोठा आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता, मननीय आमदार श्री कपिल पाटील, व सर्व शिक्षक भारती टीम चे खूप खूप अभिनंदन, लढेंगे और जितेंगे भी।

    ReplyDelete
  10. Hearty congratulations. U people are real warrior

    ReplyDelete
  11. अभिनंदन आणि धन्यवाद🙏

    ReplyDelete
  12. लढेंगे जितेंगे 🙏💐

    ReplyDelete
  13. खूप खूप अभिनंदन.
    लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  14. जय शिक्षकभारती

    ReplyDelete
  15. खूप खूप अभिनंदन सुभाष मोरे सर

    ReplyDelete
  16. आपण खूप चांगले करट आहात.तुमच्या कामाला सलाम

    ReplyDelete
  17. अभिनंदन!!
    लढेंगे...जितेंगे..

    ReplyDelete
  18. प्रयत्नांना यश मिळाले अभिनंदन .

    ReplyDelete
  19. Jay shikshak Bharti. Ladenge, jeetenge.

    ReplyDelete
  20. जय शिक्षक भारती.आमच आधार स्तम्भ कपिल भाऊ पाटील साहेब

    ReplyDelete
  21. हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  22. Aap k kam ko dil se salam. Always help to teacher like this sir...

    ReplyDelete
  23. अत्यंत चांगला व शिक्षक हिताचा निर्णय..!👍

    ReplyDelete
  24. सर्वांचे अभिनंदन 💐💐💐

    ReplyDelete
  25. सर आम्ही 2012चे शिक्षक आमचे खूप चौकशा लागलेला होत्या आणि आम्हाला शिक्षक भारती या संघटनेच्या माध्यमातून खूप मदत मिळाली त्याबद्दल मी शिक्षक भरतीचे मरेपर्यंत आभारी राहीन व माझे कुटुंब सुद्धा नेहमी माझ्या गेल्यानंतरही या संघटनेचे आभारी राहील.... जय शिक्षक भरती

    ReplyDelete
  26. मा. कपिल पाटील सर आणि आपण सर्व जण शिक्षकांच्या विविध अडचणी व समस्या नेहमी सोडवत आला आहात त्यामुळे कोणत्याही बिकट प्रसंगी शिक्षकभारतीचा आणि आपल्या सर्वांचा खूप मोठा आधार शिक्षकांना वाटतो. आम्ही सर्व शिक्षक आपल्या पाठीशी आहोत. या पुढे ही आपल्या प्रयत्नाने अनेक लढ्यान मध्ये आपल्याला यश मिळेलच.
    लढेंगे जितेंगे ।

    ReplyDelete
  27. प्रयत्नांना यश मिळाले सर्वांचं अभिनंदन

    ReplyDelete
  28. ! जितेंगे लढेंगे !
    जय शिक्षक भारती !
    सुभाष मोरे सर अभिनंदन .

    ReplyDelete
  29. अभिनंदन सर्वांचे

    ReplyDelete
  30. जय शिक्षक भारती
    लढेंगे जितेंगे
    छोडेंगे नही
    साहेबांचा विजय असो

    ReplyDelete
  31. जय भारतीशिक्षक

    ReplyDelete
  32. अभिनंदन.
    लढेंगे जितेंगे
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  33. जय शिक्षक भारती
    आ.कपिल पाटील यांच्या मागणीने आपले सर्वांचे बरेच प्रश्न मार्गी लागणार आहेत, त्यांच्या प्रयत्नांना त्रिवार सलाम..

    ReplyDelete
  34. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  35. मल्हारी कारभारी शिंदे,
    जय शिक्षक भारती
    आ.कपिल पाटील यांच्या मागणीने आपले सर्वांचे बरेच प्रश्न मार्गी लागणार आहेत, त्यांच्या प्रयत्नांना त्रिवार सलाम..

    ReplyDelete
  36. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  37. शिंदे मल्हारी कारभारी,
    मोरे सर तुमचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

    ReplyDelete
  38. Hearty Congratulations to Mr,Mla Kapil Patil saheb and Shikshak bharati team of Maharashtra State teacher Association for justice of teacher and their rights 🙏🌹🎉

    ReplyDelete
  39. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  40. मोरे सर, आपण अतिशय विस्तृतपणे आमदार कपिल पाटील शिक्षक भारती आणि आपल्यासारखे पदाधिकारी यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.
    आपण सर्वंजण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने वेळोवेळी आवाज उठवत आहात. आपल्या कार्याला सलाम.जय शिक्षक भारती !!

    ReplyDelete
  41. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  42. Congratulations sir go ahead we are with shikshak Bharti and our beloved leader Kapil Patil sir.

    ReplyDelete
  43. लडेंगे-जितेंगे

    ReplyDelete
  44. बहुत बढ़िया आपके विचार अति उत्तम और शिक्षकों के प्रति साकारात्मक है

    ReplyDelete
  45. आपण सर्वंजण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने वेळोवेळी आवाज उठवत आहात. आपल्या कार्याला सलाम.जय शिक्षक भारती !!

    ReplyDelete
  46. आपण सर्वंजण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने वेळोवेळी आवाज उठवत आहात. आपल्या कार्याला सलाम.जय शिक्षक भारती !!

    ReplyDelete
  47. खूप छान सर.शेकडो शिक्षकांची घरे वाचली.
    आपल्या संघटनेचा अभिमान आहे.

    ReplyDelete
  48. छान सर आपल्या सहकाऱ्यांना न्याय मिळाला

    ReplyDelete
  49. खूप छान सर असे जटील प्रश्न फक्त शिक्षक भारती संघटनाच सोडू शकते
    धन्यवाद सर

    ReplyDelete
  50. Congratulations Shikshak Bharati Team.
    God bless all members of Shikshak Bharati Team.

    ReplyDelete
  51. शिक्षक भारती या संघटनेच्या माध्यमातून आदरणीय कपिलजी पाटील साहेब, मा सुभाष मोरे सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यरत आहात . अनेक शिक्षकांचे प्रश्न आपण मार्गी लावलेले आहेत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद .

    ReplyDelete
  52. खूप छान काम सर
    आपल्या कार्याला सलाम
    पुढील वाटचालीस शुभेच्छा

    ReplyDelete
  53. शिक्षकांसाठी खूप मोठा निर्णय आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. शिक्षक भारती की जय....

    ReplyDelete
  54. खूप छान कार्य. सर्व व्यथीत शिक्षकांची दुवा तुमच्या पाठीशी आहे. असेच खंबीरपणे कार्य करत राहावे हीच सदिच्छा !!!
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
  55. खूप खूप अभिनंदन! खूप मेहनत आहे या मागे

    ReplyDelete
  56. जय हो लढेंग और जितेंगे जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  57. अभिनंदन सर

    ReplyDelete
  58. Well fought..... congratulations ..Jay Shikshak Bharti

    ReplyDelete
  59. अभिनंदन सर. आणि शिक्षक भारती.

    ReplyDelete
  60. अभिनंदन सर, शिक्षक भारती

    ReplyDelete
  61. Sir Aamcha pn usach problem chalu ahe plz amchi madat kra aapla number Hva ahe maza ya no.vr send kra plzz😭😭🙏🙏tyatlya tyat cancer pn zhala hota aata khoop kathin pristithi cha ahe plzzzzz madat kra sir Aamchi mobile number 83298o8412

    ReplyDelete
  62. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  63. धन्यवाद सर आणि खुप खुप अभिनंदन💐💐💐

    ReplyDelete
  64. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  65. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  66. शिक्षणाच्या हक्कासाठी
    शिक्षकांच्या सन्मानासाठी

    शिक्षक भारती संघटना

    ReplyDelete
  67. Mumbaicya shikshakanna ek khambir neta labhlela ahe te mhanje KAPIL PATIL SAHEB..GREAT BLOG MORE SIR..

    ReplyDelete
  68. सर प्रथम आपले अभिनंदन सह शिक्षक भारती संघटनेचे मनपूर्वक कौतुक शिक्षकांच्या साठी निष्ठने लढणारी एक मात्र संघटना
    लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  69. अभिनंदन सर पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  70. असेच सहकार्य आपण करत रहावे हिच आपल्या कडून अपेक्षा आहे आणि केलेल्या कामाबद्दल आपले खूप खूप अभिनंदन 👍👍👍

    ReplyDelete
  71. असेच सहकार्य आपण करत रहावे हिच आपल्या कडून अपेक्षा आहे आणि केलेल्या कामाबद्दल आपले खूप खूप अभिनंदन 👍👍👍

    ReplyDelete
  72. Great job sir �� we are proud of our SHIKSHAK BHARATI TEAM ��������

    ReplyDelete
  73. जय शिक्षक भारती। आपण शिक्षकांच्या समस्या अचूक हेरून सातत्याने त्यासाठी लढता.कपिल पाटील सर नेहमीच आम्हां शिक्षकांचे मार्गदर्शक आहेत. तसेच आपणासारखे पदाधिकारी
    समस्यांची दखल घेतात.हे विशेष. - सौ.मनिषा काळे.

    ReplyDelete
  74. Hearty congratulations Team shikshak bharti

    ReplyDelete
  75. Saheb, Shikshaketar karmacharyanchya bharticha GR 2019 la nighunahi ajun paryant approvals nahi bhetle tyasathi kahi madat kara ashi vinanti mi aapnas karat aahe!

    ReplyDelete
    Replies
    1. हो सर मलाही मदत हावी

      Delete
  76. सर तुमच्या सर्व या सलाम

    ReplyDelete