Wednesday 21 April 2021

शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे व बेपर्वाईमुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार रखडले

शिक्षण सचिवांना हटवा, शिक्षक भारतीची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी 

दि. २१ एप्रिल २०२१ -

गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे व बेपर्वाईमुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार उशिरा होत आहेत. गुढी पाडवा सण गेला, आज राम नवमी आहे. आणि रमजानचा पवित्र महिनाही सुरु झालेला आहे. महिन्याची २० तारीख उलटून गेली तरी अद्याप पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने बिलं नाकारली आहेत. याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहलेले आहे. परंतु अदयाप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे. 

मागील महिन्यातही असाच प्रकार झाल्याचं उघडकीस आलं. शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे वेळेत पैसे न मागितल्यामुळे पगार उशिरा झाले होते. आमदार कपिल पाटील यांनी वित्त सचिवांना भेटून हा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर हालचाली होऊन फेब्रुवारीचे पगार झाले. तरी सुद्धा अद्यापही काही जिल्ह्यात फेब्रुवारीचे पगार झालेले नाहीत. 

मार्च पेड इन एप्रिल पगार न होण्यासाठी अनेक तांत्रिक बाबी सांगितल्या जात आहेत. मात्र या सर्वांचा फटका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे. कोविड काळात अनेक ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतरांचे मृत्यू झालेले आहेत. अनेकजण कोविडग्रस्त असून उपचारासाठी मोठा खर्च होत आहे. कर्जाचे हफ्ते थकलेत. दंड, व्याज भरावे लागत आहे. आणि या सगळया परिस्थितीत शिक्षण विभाग मूग गिळून बसलेला आहे. आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण विभागातल्या या दिरंगाईवर आणि शिक्षण विभागातले अधिकारी काम करत नाहीत, याबद्दल आवाज उठवला. तेव्हा काम करायचं राहिलं बाजूला पण शिक्षण सचिवांनी विधान परिषदेच्या सभापतींकडेच आमदार कपिल पाटील शिक्षकांच्या हिताच्या निर्णयांसाठी दबाब टाकतात, अशी तक्रार केली आहे. अशा प्रकारची वागणूक करणाऱ्या शिक्षण सचिवांनाच हटवा अशी मागणी शिक्षक भारतीने आज केली आहे. 

मुंबईतील शिक्षकांच्या पगाराबाबत सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच निर्णय दिलेला आहे. परंतु शिक्षक भारतीने याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाकडून त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे युनियन बँक ऑफ इंडियाला निधी वितरणाची अडचण येत आहे. यासर्व प्रश्नांबाबत उद्या आमदार कपिल पाटील उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांना भेटून सर्व परिस्थिती सांगणार आहेत, अशी माहिती मोरे यांनी दिली.  



68 comments:

  1. अगदी बरोबर सर..लढेंगे जितेंगे..जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  2. नागपूर जिल्ह्यात पण अजूनपर्यंत मार्च चे वेतन झाले नाही सर.🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मार्च2020ते आजपर्यंत आमचे13 महिन्याचे वेतन झालेले नाही सर, शिवनेर विद्यामंदिर, साकीनाका, घाटकोपर,

      Delete
  3. Ratnagiri che payment aale nahi sir

    ReplyDelete
    Replies
    1. नाशिकचेही नाही आलेत अजून

      Delete
  4. शिक्षक भारती नेहमीच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असते., धन्यवाद मान.आ.कपिल पाटील साहेब व सन्मा. सुभाष मोरेसर व इतर सर्व पदाधिकारी.🙏🏻

    ReplyDelete
  5. ठाणे जिल्ह्यातही TDCC व TJSB बँकेने शिक्षकांचे मार्च-2021 वेतन दि.9 व दि.12 एप्रिल 2021 रोजीगुढीपाडव्या निमित्त केलेत.

    ReplyDelete
    Replies
    1. जिल्हा परिषद शिक्षकांचे बाकी आहेत साहेब ठाणे जिल्हयात

      Delete
  6. शिक्षक भारतीचे बहुमोल कार्य . असेच कार्य पुढे सुद्धा होत राहील धन्यवाद .

    ReplyDelete
  7. अजून पर्यंत गडचिरोली जिल्हयाचे शिक्षकाचे वेतन झाले नाही

    ReplyDelete
  8. संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींचे पगार एकट्या शिक्षण सचिव बाईंमुळे रखडले आहेत, निषेध

    ReplyDelete
  9. अहमदनगरचे पण नाही

    ReplyDelete
  10. सर विभाग सचिव आणि मंत्री आपापल्या विभागासाठी जागरूक असतात, शिक्षण विभागालाच सुरुवातीपासून काही तरी रोग असल्यासारखा वागतात, 7 वेतन आयोग बाबतीत पण हेच झालं,

    ReplyDelete
  11. वित्त विभाग आणि शिक्षण विभाग यांच्यात गेली अनेक वर्ष समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. त्यामुळे अनेक वर्ष हा म्हणजे पगाराचा प्रश्न उदभवतो आहे. आपण हा प्रश्न कायम स्वरुप निकाली काढावा. त्याकरिता आपण योग्य पावले उचली आहेत. धन्यवाद। सौ.मनिषा काळे.

    ReplyDelete
  12. सर औरंगाबाद जिल्ह्यात देखील मार्च महिन्याचे पगार अद्याप झालेले नाहीत

    ReplyDelete
  13. आमच्या जळगाव जिल्ह्यात नेहमीची रडकथा आहे. कधीच पगार वेळेवर होत नाही.

    ReplyDelete
  14. सर पाटील साहेबाना उद्याच्या मिटिंगमध्ये शिक्षणसेवक मानधनवाढीचा मुद्दा पण उपस्थित करायला लावा ही नम्र विनंती 🙏🙏🙏

    ReplyDelete
  15. सर जी शालेय शिक्षण विभाग आणि वित्तविभागालामार्च 2022 पर्यंत तरतूद करायला लावा

    ReplyDelete
  16. दरमहा वेतन Cmp नेच होणे गरजेचे आहे. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये cmp प्रणाली सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणे करण्यात यावा.

    ReplyDelete
  17. Shikshan sachiv satat shikshakanna davchat astat tyanna हटवायला pahije .

    ReplyDelete
  18. Cmp द्वारे होणे गरजेचे आहे प्रणाली द्वारे जिल्ह्यांमध्ये वेतन होणे गरजेचे आहे आहे पाटील साहेब वस्तीशाळा शिक्षकांची सेवा सातत्य धरणे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे साहेब

    ReplyDelete
  19. गेले काही महिने सेवा निव्रुत्त शिक्षक, जि प.कर्मचारी यांचे
    पेन्शन २०/२५तारखेला होतात.एकल असलेल्या पेन्शनर लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तरी विद्यमान
    कर्मचाऱ्यांनी आपली कामे वेळेवर करावी.

    ReplyDelete
  20. शिक्षण सचिव शिक्षकांचे प्रश्न सोडू शकत नसतील तर, असे शिक्षण सचिव काय कामाचे? आशा शिक्षण सचिवांना हटविलेच पाहिजे.
    लढेंगे, जितेंगे.

    जय शिक्षक भरती

    ReplyDelete
  21. Dcpsधारक शिक्षकांचे हप्ते अजूनही दिलेले नाहीत

    ReplyDelete
  22. इतर विभागांचे वेतन वेळेवर तर शिक्षण विभागाबाबत असे का?आम्ही आपल्या सोबत आहोत.... पिंपळे सर

    ReplyDelete
  23. इतर विभागांचे वेतन वेळेवर तर शिक्षण विभागाबाबत असे का?आम्ही आपल्या सोबत आहोत.... पिंपळे सर

    ReplyDelete
  24. सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनसुद्धा पगार होत नसतील तर कायद्याची पायमल्ली होत आहे,कायदा कुचकामी ठरतो आहे या कायद्यामध्ये सचिव ,वित्तविभागाचे सर्व अधिकार यांना या कायद्यामध्ये शिक्षेची तरतुद नाही यामुळे पगार वेळेवर झाला काय आणि नाही झाला काय त्यांना काही फरक पडत नाही.आधी कायदे खडक झाले पाहिजेत की शिक्षा व दंडाची तरतूद हवी..

    ReplyDelete
  25. अगदी बरोबर, पगार दिरंगाईमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत,त्यासाठी अधीकारी वर्गाने वेळ पाळणे,दिरंगाई टाळणे गरजेचे आहे

    ReplyDelete
  26. शिक्षक भारती व आदरणिय कपील पाटील साहेब नेहमिच शिक्षकांच्या हितासाठी संघर्ष करतात.
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  27. रायगड जिल्ह्याचे ही पगार झालेले नाहीत

    ReplyDelete
  28. Barobar sir Akola jilyache pan Marche payment zale nahi

    ReplyDelete
  29. Ratnagiri kahi shalanche February che pagarhi jhalele nahit adyap

    ReplyDelete
  30. मुद्दा केवळ पगाराचा नाही, शिक्षण आणि शिक्षकाला बदनाम करणे, त्यांची हेटाळणी करणे, शिक्षकांना दुर्लक्षित करणे, त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे हे सर्व स्तरावर होत आहे.

    ReplyDelete
  31. ठाणे जिल्ह्यातही पगार रखडलेत...
    पुन्हा एकदा नंदकुमार साहेबांना आणा plz

    ReplyDelete
  32. योग्य मागणी आहे. सचिवांना हटवा.

    ReplyDelete
  33. शिक्षकांच्या वेतनाबाबत प्रशासकीय यंत्रणा योग्य दखल घेत नाही त्यामुळे वेतन नेहमीच उशिराने होतात यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे माहे फेब्रुवारी चे वेतन अजूनपर्यंत व्हायचे आहे *शिक्षक भारती ने वेतनाबाबत मांडलेली समस्या अभिनंदनीय आहे*

    ReplyDelete
  34. शिक्षकभारती नेहमी शिक्षकांच्या हितात असते

    ReplyDelete
  35. अतिशय वाईट परिस्थितीत शिक्षकांचे पगार न होणे म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही सर्व शिक्षक शिक्षक भारती च्या पाठीशी आहोत. जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  36. Mr. Lahu Fakira Kokane from Mumbai

    ReplyDelete
  37. Sir shikshak bharati done a good job

    ReplyDelete
  38. इतर शिक्षक आमदार यांनी सुद्धा लक्ष घातले पाहिजे. एक तारखेला पगार होणार म्हणले तेही होत नाही.
    आपण न्याय देऊ शकत नसेल तर उपयोग काय?

    ReplyDelete
  39. परभणीत काय तीच बोंबाबोंब प्रत्येक महिन्याचा पगार पंधरा तारखेच्या पुढे होतो अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

    ReplyDelete
  40. पगार वेळेत होणे आवश्यक आहे शिक्षकांना अनेक संघटना सामोरे जावे लागते

    ReplyDelete
  41. धुळे जिल्ह्यात पण हाच प्रकार चालू आहे.

    ReplyDelete
  42. हो.अगदी रास्त मागणी.सचिवांना हटवलेच पाहिजे.

    ReplyDelete
  43. शिक्षकभारती नेहमी शिक्षकांच्या हितात असते

    ReplyDelete
  44. हे काम फक्त शिक्षक भारती करते

    ReplyDelete
  45. जळगाव जिल्ह्य़ात कधीच वेळेवर पगार होत नाहीत सर . सहसा 15 ते 20 तारखे पर्यंत पगार होतात. होम लोन किंवा बँकांचे हप्ते वेळेवर भरले जात नाहीत..cmp प्रणाली सुरू करून स्टेट बँक ऑफ इंडियातच पगार हवेत. मा आमदार कपिल पाटील सरांचे मनःपूर्वक आभार कारण ते शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम खंबीरपणे उभे राहतात

    ReplyDelete
  46. हे काम शिक्षक भारती करणारच कारण शिक्षकांच्या प्रश्ना साठी अविरत काम करणारी संघटना म्हणजे ,शिक्षक भारती

    ReplyDelete
  47. खरच,
    पगार फारच उशिरा होत .
    पण बाकी संघटना मात्र याबाबत काहीच बोलतांना दिसत नाही.

    ReplyDelete
  48. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा पगार झाले नाहीत...cmp..sbi....मोहीम यशस्वी होणे खूपच गरजेचे आहे....संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे......

    ReplyDelete
  49. श्रीमती वंदना कृष्णा,शिक्षण सचिव या शिक्षकांच्या समस्यां गांभीर्याने घेतच नाहीत,दुर्लक्ष करतात अशा निष्काळजी सचिवांची तात्काळ बदली झाली पाहिजे.

    ReplyDelete
  50. नांदेडला सुद्धा पगारी नाही झाल्या अजून

    ReplyDelete
  51. CMP प्रणाली सुरू होणे ही काळाची गरज आहे

    ReplyDelete
  52. अन्या याला वाचा फोडणारे .सर्वसामान्यांचा विचार करून कायद्याची चौकटीत बसून काम करणारे कपिल भाऊ पाटील साहेब

    ReplyDelete
  53. कपिल पाटील जिंदाबाद

    ReplyDelete
  54. लढेंगे ! जितेंगे

    ReplyDelete
  55. आमदार कपिल पाटील साहेब जिंदाबाद.

    ReplyDelete
  56. अन्यायाला वाचा फोडणारे आ.कपिल पाटील साहेब व मोरे सर जिंदाबाद शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे प्रश्न न सोडविणा-या सचिवांना हटविणे गरजेचे आहे.एप्रिल महिना संपत आला तरी मार्च महिन्याचे पगार अजून झाले नाहीत.

    ReplyDelete
  57. अन्यायाला वाचा फोडली आणि सरकारी बाबूना वठणीवर आणले मा. आमदार कपिल पाटील साहेब आणि आपले तरूण तडफदार धडाडीचे मोरे सर जिदाबाद

    ReplyDelete