Thursday 22 April 2021

शिक्षक, शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगारासाठी आमदार कपिल पाटील यांचे अजित पवार यांच्याकडे गाऱ्हाणे

अजितदादांचे वित्त सचिवांना शिक्षण विभागाकडून खुलासा घेण्याचे आदेश 

दि. २२ एप्रिल २०२१ -

शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे व बेपर्वाईमुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार रखडले आहेत. याबाबत आमदार कपिल पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून, वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शालार्थ प्रणालीत बदल करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्यापही शिक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे आला नसल्याचे लक्षात आले. यावर अजितदादांनी वित्त सचिवांना शिक्षण विभागाकडून तात्काळ खुलासा मागण्याचे आदेश दिले आहे. निदान आता तरी शिक्षक, शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगाराचा मार्ग मोकळा होईल आणि त्यांना दिलासा मिळेल असा विश्वास शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी व्यक्त केला आहे. 

महिन्याची २० तारीख उलटून गेली तरी राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे अद्याप पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने बिलं नाकारली आहेत. याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहलेले आहे. परंतु अदयाप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.  कोषागार कार्यालयाने दिलेल्या सुचनेनुसार कार्यवाही करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये बदल करावा लागणार आहे. त्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे कोणताच पाठपुरावा झाल्याचे दिसून येत नाही. यासाठी कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन शालार्थ प्रणालीमध्ये बदल होईपर्यंत प्रचलित पद्धतीनुसार शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार करावेत अशी मागणी कपिल पाटील यांनी अजित पवार यांना दिलेल्या पत्रात केली आहे.   

शालार्थमध्ये आवश्यक बदलाची कार्यवाही होईपर्यंत NPS ची कपातीची रक्कम प्रथमतः DDO च्या बँक खात्यावर घेऊन त्यानंतर DTO च्या खात्यावर वर्ग करणे व त्यानंतरच DTO खात्यावरून NSDL च्या खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेस मान्यता मिळावी. यासाठी  शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग यांनी शालेय शिक्षण विभागास पत्रव्यवहार केला आहे. शालार्थ प्रणाली मध्ये NPS कपातसाठी आवश्यक हेड उपलब्ध होईपर्यंत उपरोक्त पद्धतीने प्रक्रियेस मान्यता देण्याचे आदेश वित्त विभागातील सबंधित अधिकारी यांना देण्यात यावेत, अशी सूचनाही पत्रात केली असल्याची माहिती मोरे यांनी दिली आहे. 

इतर अनेक प्रश्नांबाबतही शिक्षण विभागाकडून वारंवार अशाप्रकारची दिरंगाई होत आहे आणि त्याचा फटका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शिक्षक भारतीने शिक्षण सचिवांना हटवायची मागणी केलेली आहे. याबाबतीत तात्काळ कारवाई न झाल्यास शिक्षण सचिव हटवायची मोहीम अधिक तीव्र करावी लागेल असा इशारा शिक्षक भारतीच्यावतीने सुभाष मोरे यांनी दिला आहे.  




51 comments:

  1. अतिशय रास्त मागणी आमदार कपिल पाटील महोदयांची प्रत्येक बाबतीत अन्यायाला वाचा फोडणारे आमदार म्हणून अख्या महाराष्ट्र मध्ये ख्याती आहे .आमदार साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद! आतातरी झोपलेला अधिकारीवर्ग जागा होईल काय? श्री डी.जी. चौधरी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ तालुका शाखा जिंतूर. जिल्हा परभणी

    ReplyDelete
  2. धन्यवाद साहेब
    धन्यवाद मोरे सर

    ReplyDelete
  3. Much needed step, Great job sir 🙏

    ReplyDelete
  4. धन्यवाद सर 🙏

    ReplyDelete
  5. धन्यवाद सर,जय शिक्षक भारती!

    ReplyDelete
  6. धन्यवाद सर....

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. धान्यवाद साहेब..लढेंगे जितेंगे..जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  9. Education secretary is against teachers. Time to time her attitude is shown with her decisions. She must removed.

    ReplyDelete
  10. जय शिक्षक भारती। आपण योग्य दिशेने वाटचाल करीत आहात.- सौ.मनिषा काळे.

    ReplyDelete
  11. हे सर्व कधी थांबणार............
    द्रोणाचार्य हे प्रत्येक युगात, प्रत्येक पिढीत नव्हे तर कुठेतरी प्रत्येक शिक्षकात असतातच. पण त्यांची अवहेलना ही महाभारतापासून आजपर्यंत अगदी त्याच पद्धतीने आणि तशीच होत आली आहे. सरकार कोणतेही असो, त्यांनी शिक्षक वर्गावर अन्याय करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा तो करत राहायचा आणि पुन्हा काहीही न झाल्यासारखे अनभिज्ञ राहून आपण समाजासाठी किती करतो याचा डंका पिटायचा, मग नेहमीप्रमाणे सर्व शिक्षक आमदारांमधून माननीय श्री कपिल पाटील साहेबांनी त्याबद्दल आवाज उठवला की मग जागे व्हायचे आणि पुन्हा उपकार केल्यासारखे, भीक दिल्यासारखे तोंडे वेंगांडून आपल्याच हक्काचे आपल्याला द्यायचे.
    तत्त्वज्ञानाची गूढतत्वे योगयुक्तज्ञानाने चिंतून सिद्धत्व पावलेले असे स्वतःला समजणाऱ्या, स्वतःला शिक्षण क्षेत्रातील तपस्वी, ज्ञानचक्र प्रवर्तक समजणाऱ्या, तसेच
    बुद्धिभ्रष्ट आणि आत्मनाशवृत्तीने वागणाऱ्या वृत्ती बाळावलेल्या, गुरुतत्वाला बळी देऊ पाहणाऱ्या,गुरु स्थानाचा खेळ मांडणाऱ्या आणि शाळेसारख्या पवित्र स्थानाचा विध्वंस करून ज्ञानक्षय करू पाहणाऱ्या, समाजकारण करण्याचे नाटक करणाऱ्या या राजकीय नेत्यांना शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी आणि शिक्षकांचे मन कधी कळणार कुणास ठाऊक.

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. धन्यवाद माननीय श्री सुभाष मोरे सर धन्यवाद माननीय श्री कपिल पाटील साहेब

    ReplyDelete
  14. कोरोनाच्या महामारीत ही
    कोणीतरी देवदूत आहेत
    श्री कपील पाटील साहेबांच्यामुळे
    प्रश्न मार्गी लागले आहेत

    शिक्षक भारतीचे सर्वच गुरूदेव कार्यकर्ते
    आहोरात्र झटत आहेत
    त्यातही पाहिले नाहीत
    परी सुभाष श्री मोरे सरांच्या सारखे
    बावन्नकशी सोने लाभले आहे

    आपली धडपड अतुलनीय आहे
    कर्मचारी यांच्या वेतनाचा मार्ग
    सुखर झाला आहे
    शिक्षक भारतीस आमचा सदा सलाम आहे.
    धन्यवाद

    ReplyDelete
  15. आपल्या प्रयत्नांना यश मिळणारच .शिक्षकांचा बुलंद आवाज शिक्षक भारती मा . आमदार कपिलजी पाटील साहेब, श्री सुभाव मोरे सर आपणास धन्यवाद

    ReplyDelete
  16. कपिल पाटील साहेब 1 च नंबर.तळमळीने काम करणारे नेतृत्व

    ReplyDelete
  17. आदरणीय आमदार कपिल पाटील सर व मोरे सर शिक्षकांच्या समस्यांबद्दल नेहमीच पुढाकार घेतात,साहेब आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल याबाबत तिळमात्र शंखा नाही.

    ReplyDelete
  18. आदरणीय आमदार कपिल पाटील सर व मोरे सर शिक्षकांच्या समस्यांबद्दल नेहमीच पुढाकार घेतात,साहेब आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल याबाबत तिळमात्र शंखा नाही.

    ReplyDelete
  19. कावळ्याचे बसणे आणि फांदीचे तुटणे एक होणार तर आता. म्हणजे पगार येणार आहे पण केव्हा तर 22 एप्रिल नंतर आता दोन महिने इनकम टँक्स कपात त्यानंतर अजूनही पगार नाही शिक्षक कसा स्वस्थ राहणार?😢☺️

    ReplyDelete
  20. आपल्या सारख्या दक्ष आमदारसाहेबांनमुळे शिक्षक आजून तरी चांगल्या स्थितीत आहेत.या पुढेही आपले सहकार्य असेच लाभावे हीच अपेक्षा.धन्यवाद साहेब 👏👏👏

    ReplyDelete
  21. शिक्षक भारती अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे.

    ReplyDelete
  22. अतीशय तळमळीने शिक्षक बांधवांच्या पगारासाठी दखल घेऊन प्रयत्न क्रुती केली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद साहेब

    ReplyDelete
  23. Weldon sirji
    You are a true fighter and teacher family M L A

    ReplyDelete
  24. खूप छान सर योग्य वेळी दखल घेतल्याबद्दल अत्यंत आभारी आहे सर खूप खूप धन्यवाद सर

    ReplyDelete
  25. Thank you so much sir 🙏👍

    ReplyDelete
  26. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  27. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  28. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  29. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  30. अतीशय तळमळीने शिक्षक बांधवांच्या पगारासाठी दखल घेऊन प्रयत्न क्रुती केली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद...साहेब

    ReplyDelete
  31. अतीशय तळमळीने शिक्षक बांधवांच्या पगारासाठी दखल घेऊन प्रयत्न केले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद कपिल पाटील साहेब व मोरे साहेब आपले मनः पुर्वक धन्यवाद

    ReplyDelete
  32. खूप छान सर योग्य वेळी दखल घेतल्या बद्दल अंत्यत आभारी आहे ,सर खूप धन्यवाद.

    ReplyDelete
  33. खूप छान सर हे सर्व थांबले पाहिजेत किती दिवस असा पगारासाठी प्रत्येक वेळेला संघटनांनी प्रयत्न करायचे ज्याचं त्याला आपला आपलं काम समजले पाहिजे कामात दिरंगाई करणाऱ्या यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत कोणावरी कारवाई होत नाही तोपर्यंत यांच्याकडून काम नीट होणार नाही

    ReplyDelete
  34. प्रत्येक वेळेला शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करणारे दहा जण बसलेले आहेत पण या ऑफिशियल काम करणाऱ्या लोकांचे मूल्यमापन कोण करणार यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत पगारासाठी असंच रडत बसावे लागणार का वाट पाहत बसावे लागणार का यांचे पगार कधी उशीरा झालेत का ते पहा यांचे पण पगार दोन दोन मिनिटे ठेवून बघा लेट करून बघा मग यांना समजेल इतरांच्या वेळेत पगार न होण्याचे महत्त्व यावर्षी कधी जागृतता निर्माण होणार

    ReplyDelete
  35. आपण करत असलेल्या कामाबद्दल आपले मनःपूर्वक आभार

    ReplyDelete
  36. आपण करत असलेल्या बहुमोल कामाबद्दल आपले मनःपूर्वक आभार

    ReplyDelete
  37. मा.कपिल पाटिल साहेब,व शिक्षक भारती खुप खुप आभार

    ReplyDelete
  38. आमदार साहेब आपले खूप खूप आभार
    राञ दुबार शिक्षकांचा पण प्रश्न सर लवकरच
    मार्गी लावा

    ReplyDelete
  39. ज्या शिक्षकांची प्राण नंबर आलेले नाहीत त्या शाळांनीपगार पत्रक फॉरवर्ड करू नये असे परिपत्रक आजच devare
    साहेबांनी टाकलेली आहे. कृपया तो आदेश रद्द करण्यास सांगावा आमदार साहेब धन्यवाद🙏

    ReplyDelete
  40. आमदार साहेब व शिक्षक भारती यांचे खूप खूप आभार सर कामात दिरंगाई करणा-यावर कारवाई होणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  41. You are real fighter Patil saheb. Thank you sir

    ReplyDelete
  42. आपण करत असलेले काम हे निश्चित अतुलनिय आहे. तसेच राज्य आपणाकडे नेहमी आकसाने पहात असते माझी देव मला काही तरी दिल्या शिवाय थांबणार नाही हीच खररी कामाची पावती मिळवून देतील माझे देव.

    ReplyDelete
  43. मा आमदार कपिल पाटील साहेब,आदरणीय बेलसर सर,मोरे साहेब सर्वांचे आभार

    ReplyDelete
  44. Thank you more sir ( jay shikshak Bharti)

    ReplyDelete