Tuesday 21 September 2021

शिक्षण आयुक्तांसोबतची आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीची बैठक यशस्वी


दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी जवाहर बाल भवन, चर्नी रोड, मुंबई येथे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्यासोबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक पदाधिकारी बैठक झाली.

आयुक्तांच्या बैठकीबाबत शिक्षण उपसंचालक यांचे पत्र. 

बैठकीसाठी आमदार कपिल पाटील यांनी आयुक्त यांना दिलेलं पत्र 

1 नोव्हेंबर पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत

आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार आणि शिक्षणमंत्री मा. श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित किंवा तुकडीवर नियुक्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तर चर्चा केली होती. सर्व कर्मचाऱ्यांची एकूण संख्या निश्चित करावी. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास लागणाऱ्या आर्थिक भाराची सविस्तर माहिती घेऊन प्रस्ताव तयार करण्यात यावा असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. वित्त विभाग आणि शिक्षण विभाग यांनी संयुक्तपणे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

(या संदर्भातला 17 जून 2021 चा सविस्तर ब्लॉग जरूर वाचा. Tap to read  - http://subhashkisanmore.blogspot.com/2021/06/blog-post_17.html)

त्यानुसार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी बैठकीत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची एकूण राज्यातील संख्या 26 हजार 550 असून आर्थिक भाराची माहिती घेण्याचे काम सुरू आहे असे सांगितले. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची सविस्तर अचूक माहिती येत नसल्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोठा आर्थिक भार पडेल अशा प्रकारचे वक्तव्य वित्त विभागाकडून वारंवार होत होते. म्हणून आमदार कपिल पाटील दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षण संचालकांना पत्र देऊन निश्चित संख्या विचारली होती. त्या अनुषंगाने राज्यभरातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अदययावत  माहिती प्राप्त झाली आहे. या माहितीच्या आधारे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव तयार करणे सोपे जाणार आहे.

शिक्षण विभागाकडे आलेल्या माहितीनुसार आज रोजी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित किंवा तुकडीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 26550 निश्चित करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांची पीएफ कपात नियमितपणे होत आहे. शासनाने सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला तर शासनावर पडणारा आर्थिक भार अत्यल्प आहे असे मत आमदार कपिल पाटील यांनी मांडले. या 26 हजार 550 कर्मचाऱ्यांना डीसीपीएस अथवा एनपीएस मध्ये वर्ग केल्यास त्यांचे पीएफ कटिंग बंद होणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला दरमहा दहा टक्के रक्कम एनपीएस मध्ये कपात करून द्यावी लागेल. या रकमेत शासनाला शासन हिस्सा म्हणून 14 टक्के रक्कम कपात करावी लागणार आहे. 26550 कर्मचाऱ्यांना 14 टक्के शासन हिस्सा दिल्याने पडणारा आर्थिक भार हा जुनी पेन्शन योजना लागू केल्यास पडणाऱ्या आर्थिक भारापेक्षा जास्त होऊ शकतो. शासनाने अनुदान सूत्र पाळून वेळीच अनुदान न दिल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष विनावेतन काम करावे लागले आहे. निदान निवृत्तीच्या वेळी तरी जुनी पेन्शन योजना लावून या सर्व शिक्षकांचा सन्मान शासनाने केला पाहिजे अशी भूमिका शिक्षक भारतीने मांडली.

12 वर्षे व 24 वर्षे वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण 

राज्यभरात 12 वर्ष 24 वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी यांचे प्रशिक्षण होत नसल्याने हजारो शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळालेला नाही. शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणांमुळे अनेक शिक्षक काही लाभ न घेता निवृत्त झाले किंवा मृत पावले आहेत. वेतनश्रेणीचे प्रशिक्षण ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार आणि नक्की कधी होणार याबाबत  संभ्रम पसरलेला आहे. आज शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी ऑक्टोबर महिन्यात ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याचे जाहीर केले. हे ऑनलाईन प्रशिक्षण दहा दिवसांचे असून प्रशिक्षणाची उद्दिष्टे, विषय निश्चिती, घटकांची निश्चिती, वेळापत्रक तयार करणे, अभ्यासक्रमानुसार ऑनलाइन मॉडेल तयार करणे, रेकॉर्डिंग करणे कामे अंतिम टप्प्यात असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ट्रेनिंग जाहीर करण्यात येणार आहे असे सांगितले.

(या संदर्भातला 24 ऑगस्ट 2020 चा सविस्तर ब्लॉग जरूर वाचा. Tap to read  - http://subhashkisanmore.blogspot.com/2020/08/blog-post_24.html)

बैठकीत शिक्षण आयुक्तांनी खालील विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.

1) बीडीएस संगणक प्रणाली बंद असल्यामुळे हजारो शिक्षकांना वैद्यकीय बिले, थकीत बिले तसेच स्वतःच्या हक्काचे पीएफचे पैसे मिळत नाहीत. तात्काळ बीडिएस प्रणाली सुरू झाली पाहिजे अशी मागणी शिक्षक भारतीने केली.माननीय शिक्षण आयुक्तांनी 30 सप्टेंबरपर्यंत सर्व बिलांची रक्कम अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

2) मुंबईसह राज्यातील शालार्थ आयडी देण्याची प्रक्रिया विलंबाने होत असल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. मुंबईतील उपसंचालक कार्यालयात 500 पेक्षा अधिक प्रस्ताव प्रलंबित असल्याचे शिक्षक भारतीने सांगितले.  त्यावेळी शिक्षण उपसंचालक श्री संगवे यांनी 400 शालांर्थ आयडि देण्याचे काम पूर्ण झाले असून येत्या आठ दिवसात उर्वरित 100 शालार्थ आयडीचे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले. तसेच शालार्थ आयडीसाठी शिक्षण विभागातील कोणत्याही कर्मचाऱ्याला पैसे देऊ नये असे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी केले.

3) कोविड ड्युटी करताना कोविडची लागण झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विशेष रजा देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवण्याचे आश्वासन दिले.

4) सुट्टीच्या कालावधीत बीएलओ ड्युटी करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना बदली रजा देऊन त्यांची नोंद सेवा पुस्तकात करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.

सोबत प्राथमिक शिक्षकांच्या वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा, प्राथमिक पदवीधर / विषय शिक्षकांना सरसकट ४३०० ग्रेड पे वेतन, आंतर जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदली,  कोविड ड्युटी केलेल्या कर्मचारी यांना विशेष रजा, मृत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना १० लाख सानुग्रह अनुदान यासह विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. 






शिक्षण आयुक्त सोबतच्या बैठकीत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे,  प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, खजिनदार विलास परेरा, चंद्रकांत म्हात्रे, कैलास गुंजाळ, एबीई शाळेचे सचिव फादर डेनिस, फादर केनी, मुख्याध्यापिका डॉमिनिका डाबरे, प्राथमिक शिक्षक भारतीचे सरचिटणीस भरत शेलार, नाशिकचे अध्यक्ष प्रकल्प पाटील, रायगडचे हरिशचंद्र साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


89 comments:

  1. आपल्या कार्याला सलाम.खरोखरच आ. कपिल पाटील साहेब यांच्या मदतीने आपण शिक्षकांचे प्रश्न आणि समस्या तडीस नेता.
    जय शिक्षक भारती.
    लढेंगे, जितेंगे.

    ReplyDelete
  2. नागपूर जिल्ह्यात 7 व्या वेतन आयोगाचा थकित पहिला व दुसरा हप्ता व्याजासह त्वरीत मिळावा. लढेंगे..जितेंगे.जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  3. लय भारी, जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  4. 2005 नंतरच्या शिक्षकांचा ही समावेश जुनी पेन्शन योजनेत करण्यासाठी प्रयत्न व्हावे...
    वरील कार्यास सलाम व शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. आभारी आहे 🙏,,,अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

      Delete
  5. अभिनंदन💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
  6. क्या 10 20 30 वेतन श्रेणी लूंगा होगा ?
    क्या हैल्थ कॉर्ड शिक्षकों को भी मिलेगा?
    क्या शिक्षकसेवक खत्म होगा ?
    शिक्षकों के साथ अन्याय कब तक ????

    ReplyDelete
  7. 1 तारीख मानधन कब से ????????

    ReplyDelete
  8. अभिनंदन great work sirji

    ReplyDelete
  9. खूप सुंदर काम साहेब खूप महान कार्य नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आपण असेच प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद साहेब धन्यवाद

    ReplyDelete
  10. शिक्षणसेवक मानधन वाढ बद्दल एकही मुद्दा नाही

    ReplyDelete
  11. शिक्षण सेवक हा शिक्षक नसून राज्यकर्त्यांच्या दृष्टीने तो गुलाम अथवा वेठबिगार आहे त्यामुळे शिक्षण सेवकांचा प्रश्न महत्वाचा नाही. नियमित झाल्यावर हा घडलेला घटनाक्रम लक्षात ठेवा म्हणजे झालं. नाहीतर बसा यांचे झेंडे घेऊन मिरवत.

    ReplyDelete
  12. अतिशय उल्लेखनीय व दिलासादायी निर्णय आहेत सर, मा. आ. कपिल पाटील सरांच्या कार्यास सलाम... आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.. 💐

    ReplyDelete
  13. Sevsavrkshan tapyvaril shikshakanche agodar

    ReplyDelete
  14. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यास शासन खूप उशीर करीत आहे.पती-पत्नी एकत्रिरण विनाअट झाले पाहिजे
    बदली प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्यासाठी शासनाला आग्रह केला पाहिजे ही नम्र विनंती ������

    ReplyDelete
  15. ग्रेट वर्क पाटील साहेब

    ReplyDelete
  16. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यास शासन खूप उशीर करीत आहे.पती-पत्नी एकत्रिरण विनाअट झाले पाहिजे
    बदली प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्यासाठी शासनाला आग्रह केला पाहिजे ही नम्र विनंती 🙏🙏🙏

    ReplyDelete
  17. लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  18. तात्काळ जुनी पेन्शन संदर्भात निर्णय झाला पाहिजे करण उमेदीचा काळ असाच गेला किमान उतरता काळ तरी सुखकर जावा ही माफक अपेक्षा

    ReplyDelete
  19. अतिशय उत्तम काम कपिल पाटील करीत आहेत.यापुढेही असेच प्रयत्न करत रहावे ही विनंती

    ReplyDelete
  20. एक एक करून आदरणीय आमदार कपिल पाटील साहेब शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवतील हा विश्वास आहे
    रक्तकर्ण प्रा किरण थोरात
    संघटक शिक्षक भारती पालघर जिल्हा

    ReplyDelete
  21. 2005 नंतरच्या शिक्षकांना पण जुनी पेन्शन मिळावी.या करिता आपण प्रयत्न कराल ही अपेक्षा

    ReplyDelete
  22. उत्तम, लवकरच शासन आदेश निर्गमित होतील.

    ReplyDelete
  23. मा. कपिल पाटील साहेब आणि सोबतची सर्व मान्यवर खूपच प्रभावी काम करत आहात.यापुढेही आपण असेच प्रभावी आणि परिणामकारक काम करत रहावे ही आपणास नम्र विनंती.

    ReplyDelete
  24. आपल्या प्रयत्नांना यश येवो व शिक्षकानं वर पुन्हा पुन्हा कोर्ट केस लढवण्याची वेळ न येवो हीच अपेक्षा🙏

    ReplyDelete
  25. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  26. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी आमदार कपिल पाटील यांची असलेली धडपड ही सर्वांच्या मनात सदैव राहील. धन्यवाद महोदय.

    ReplyDelete
  27. आज सेवानिवृत्त झालेल्यांचा कृपया विचार व्हावा माझे पती मे 2017 साली सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही 🙏🏻

    ReplyDelete
  28. महत्वपूर्ण व ज्वलंत शैक्षणिक विषयावर सभेचे आयोजन केले. सकारात्मक निर्णय झाले. खूप खूप अभिनंदन 🌹🌷🌹🌷

    ReplyDelete
  29. शतश:आभारी आहोत.
    शिक्षक हा संयमाचा महामेरू आहे.अंत पाहू नका.सुखाचा एक घास जिवंतपणी त्याला मिळावा हिच एक किमान व माफक अपेक्षा आहे.
    त्याकरिता त्याला संघर्ष करावा लागतो हि शरमेची बाब आहे.
    सन्मा. पाटील सरांनी वेळोवळी केलेले कार्य फारच अतुलनीय आहे.मनापासून धन्यवाद आणि आभारी आहोत.
    सेवानिवृत्त शिक्षिका.

    ReplyDelete
  30. शिक्षक हृद्यसम्राट मा. पाटील साहेब व शिक्षक भारती टीम चे आभार मानले तितके कमीच आहे कारण कोरोना काळात ही साहेब शिक्षकाँच्या प्रश्नासाठी झटत आहे साहेब आपल्या कार्याला सलाम

    ReplyDelete
  31. शिक्षक बदली संदर्भात काय सांगितले गेले सर ह्या दिवाळीत होण्याचे संकेत आहार का करण soft ची आताशी निविदा देण्यात आली आहे 14 sep 21 ला

    ReplyDelete
  32. शिक्षक बदली संदर्भात काय सांगितले गेले सर ह्या दिवाळीत होण्याचे संकेत आहेत का करण soft ची आताशी निविदा देण्यात आली आहे 14 sep 21 ला

    ReplyDelete
  33. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  34. वस्तीशाळा शिक्षकाचा मागील सेवेच्या संदर्भात चर्चा झाली ही आतिशय महत्वाचे आहे. परंतु लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा ही मनापासून अपेक्षा करतो पाटील साहेबांना धन्यवाद देतो

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर सर कारण खूप गुरूजी सेवानिवृत्ती च्या उंबरठ्यावर आहेत

      Delete
  35. विनंती आहे की 2005 नंतरच्या साठी जूनी पेन्शन योजनेसाठी प्रयत्न करावेत .

    ReplyDelete
  36. शिक्षकासाठी व शिक्षकेतरांसाठी शासनदरबारी लढून यश संपादन क

    रणाऱ्या शिक्षक भारती संघटनेचा सदस्य या नात्याने विजय असो
    लढेगे जितेगे
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  37. सर विनाअनुदानित शाळांचे काय, प्रचलित चे काय ?

    ReplyDelete
  38. अतिशय उत्तम कामगिरी करणारी फक्त एकच संघटना म्हणजे शिक्षक भारती. हे पुन्हा एकदा सिद्ध. जय शिक्षकभारती.

    ReplyDelete
  39. तेव्हड शिक्षणसेवक
    मानधन वाढीचा विषय मार्गी लागला तर खूपच आभारी राहू

    ReplyDelete
  40. लवकर जि.आर. निघाला पाहिजे धन्यवाद

    ReplyDelete
  41. जुनी पेन्शन योजनेचा लवकरात लवकर जीआर काढावा

    ReplyDelete
  42. For Selection grade pay scale online training should be arranged as early as possible because most of the teachers are facing problems only because trIning is not organised since few years and their years are left only few those who are above 54 years they need not have the training because they are on the brink of retirement

    ReplyDelete
  43. शिक्षण सेवकांच्या तुटपुंज्या मानधनाबाबत प्रयत्न करावे ही विनंती

    ReplyDelete
  44. Antarjilla badli lavkr निर्णय घ्यावा ,ऑनलाईन process suru करावी की जेणे करून badligrastanna लवकर त्यांच्या jilyat , family Madhe jata येईल

    ReplyDelete
  45. वस्तीशाळा शिक्षक यांच्या बरोबरीने 2003 वर्षी अप्रशिक्षित शिक्षण सेवक म्हणून लागलेल्या शिक्षकांचा
    सेवा कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणी साठी ग्राह्य धरण्यात यावा.

    ReplyDelete
  46. 8482824588 सर आपल्या कडे काम आहे

    ReplyDelete
  47. आपला मोबाईल क्रमांक पाहिजे

    ReplyDelete
  48. लढेंगे जितेँगे जय शिक्षकभारती

    ReplyDelete
  49. विजय असो, पाटील साहेब तुम्ही पुढे चला आम्ही आपल्या सोबत आहोत..

    ReplyDelete
  50. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  51. हार्दिक हार्दिक अभिनंदन...

    ReplyDelete
  52. जिल्हयातल्या जिल्हयात बदली झाल्यास कोकण विभागाप्रमाणे बदली मान्यतेची गरज नसावी

    ReplyDelete
  53. शिक्षकांच्या हक्कासाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांची मेहनत नक्की फलदायी ठरणार आहे हा आम्हा सर्वांना ठाम विश्वास आहे

    ReplyDelete
  54. पण ज्या माझ्या सारख्या २५ वर्षे रजा मुदतीतील शिक्षणसेवक म्हणून अजूनही कायम न झालेल्या शिक्षकाचे काय?

    ReplyDelete
  55. नमस्कार साहेब आपल्याला एक नम्र विनंती आहे की चतुर्थ श्रेणी कर्मचारी बांधवांचा आकृतीबंध निश्चित करण्यात यावा.
    काही ठिकाणी एक ही नाही.तर काही ठिकाणी कमी आहेत. आकृतीबंध लागू झाला तर सर्वत्र समतोल येईल.

    ReplyDelete
  56. Abhinandan hon MLC Kapil Patil saheb & More sir & Shishak Bharati team

    ReplyDelete
  57. शिक्षक आमदार असावा तर असा, शिक्षकांचे प्रश्न तळमळीने तडीस नेणारा नेता.

    ReplyDelete
  58. जुनीच pension विना अनुदानित प्रचलित महत्त्वाचे आहे या कडे पाटील साहेबांनी लक्ष घातले तर खूप बर होइल

    ReplyDelete
  59. खूप छान साहेब, शिक्षकांचे तारणहार श्री कपील पाटील साहेब यांनी शासन व प्रशासन यांच्या कडे ज्या मागण्या मांडल्या ,त्या निश्चितच मंजूर करून घेतील, सलाम आपल्याला कार्याला,जय शिक्षक भारती ,जय सेवा दल

    ReplyDelete
  60. निवड श्रेणी सरसकट द्यायला हवी.केंद्रात जर सर्वांना मिळते तशी

    ReplyDelete
  61. बीपीएड विद्यार्थ्यांचा ही प्रश्न सोडवा

    ReplyDelete
  62. लांबणीवर पडलेल्या ऑनलाईन बदल्या त्वरित व्हाव्यात ही विनंती

    ReplyDelete
  63. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  64. आपण हाती घेतलेले कोणतेही काम तडीस जातेच हा पूर्वानुभव असल्याने ५ नोव्हेंबर २००५ पूर्वी फक्त शिक्षक कर्मचाऱयांचा पेन्शन हसणं मार्गी लागेल यात शंकाच नाही .याबद्दल आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीने घेतल्या अथक प्रयत्नांचे अभिनंदन 👍👍

    ReplyDelete
  65. अथक प्रयत्न.यश लाभो✌

    ReplyDelete
  66. वस्तीशाळा शिक्षकांची मागील सेवा बद्दल चर्चा केली धन्यवाद. पण विषय लवकर मार्गी लागावा ही मापक अपेक्षा 🙏

    ReplyDelete
  67. सर वस्तीशाळेतील जे शिक्षक २००१ च्या अगोदर डि.एड.प्रशिक्षित आहेत त्यांना २००१ पासून वेतन श्नेनी लागू करावी.

    ReplyDelete
  68. सर ४३०० ग्रेड‌ पै च्या शिक्षकांना ७ व्या वेतनात ज्युनिअर केले व ४२०० ग्रेड पै घ्या शिक्षकांना सिनियर केले
    पद्दोनती घेतलेल्या शिक्षकांना आयोगाने सजा दिली
    खरे आहे का?
    रिप्लाय देणे

    ReplyDelete